‘जिंदाल’मधील आग अजूनही अजूनही धूमसतीच, सोळा स्फोट झालेल्या कंपनीत २२ तासांतरही धुराचे लोळ का आहेत?

| Updated on: Jan 02, 2023 | 8:45 AM

22 तास उलटून गेले तरी जिंदालकंपनीतून धुराचे लोळ बाहेर पडत असून आग धुमसतेच आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करीत आहे.

जिंदालमधील आग अजूनही अजूनही धूमसतीच, सोळा स्फोट झालेल्या कंपनीत २२ तासांतरही धुराचे लोळ का आहेत?
Image Credit source: Google
Follow us on

चंदन पूजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकच्या इगतपुरीत मोठी दुर्घटना घडली आहे. पहिल्याच दिवशी मोठी घटना घडली असून इगतपुरीच्या मुंढेगाव येथे असेलेल्या जिंदाल कंपनीत ही लागली होती ती आग 22 तासानंतर अद्यापही धूमसतेच आहे. अग्निशमन दलाचे जवान अजूनही शर्तीचे प्रयत्न करत असून अग्नितांडव आटोक्यात आणण्यासाठीचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. आत्तापर्यन्त या आगीच्या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून तिघाची प्रकृती गंभीर असून 17 जण जखमी आहेत. सुरुवातीला ही आग कंपनीतील बॉयलरमुळे लागली असावी असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, बॉयलरमुळे ही लागली नाही असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अशातच केमिकलचे बॅरल असल्याने स्फोट झाल्याने ही आग भडकली आहे. अद्यापही परिसरात धुराचे लोळ दिसून येत आहे. कंपनीत आग धुमसतच असल्याने अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इगपुरीमध्ये येऊन आगीच्या घटनास्थळी पाहणी केली होती, त्यामध्ये मृतांना पाच लाखांची मदत जाहीर केली होती.

रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची भेट गेऊन शासकीय आरोग्य विभागाच्या निधीतून उपचार केले जातील अशी माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.

हे सुद्धा वाचा

याशिवाय कंपनीत एवढी भीषण आग कशी लागली आहे. याची उच्चस्तरीय चौकशी होणार असली तरी 22 तास उलटून गेले तरी अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही.

कंपनीतून अजूनही धुराचे लोळ बाहेर पडत आहे,म यामध्ये अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना केमिकलचे बॅरल फुटलेले असल्याने त्याचा त्रासही सहन करवा लागत आहे.

नाशिक-मुंबई महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येकाला हे धुराचे लोळ नजरेस पडत आहे, त्यामुळे कंपनीला लागलेली भीषण आग पाहता ही आग नेमकी कशामुळे लागली असावी याबाबत तर्क-वितर्क सध्या लावले जात आहे.