ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेनी कचरापेटी लपवली? शिंदे गटाच्या तक्रारीनंतर पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल

| Updated on: Oct 20, 2022 | 5:34 PM

ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेने कचरापेटी लपवल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेनी कचरापेटी लपवली? शिंदे गटाच्या तक्रारीनंतर पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल
Follow us on

मुंबई : ठाकरे आणि शिंदे गटात वेगळ्या वेगळ्या कारणावरुन वाद होत आहेत. हे वाद पोलिस ठाण्यापासून थेट कोर्टापर्यंत जात आहेत. आता मुंबईच्या बोरीवली परिसरात ठाकरे आणि शिंदे गटात वेगळेच आरोप प्रत्यारोप झाले आहेत. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेने कचरापेटी लपवल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. शिदे गटाच्या तक्रारीनंतर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे.

बोरिवली कस्तुरबा मार्ग पोलिसांनी माजी नगरसेविका गीता संजय सिंघन यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीएमसीने दिलेली कचरापेटी लपवून ठेवल्याचा आरोप शिंदे गटातील महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे.

बोरिवली आर/मध्य मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी आयपीसी 420,406,403,36 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

आदित्य ठाकरे यांचे स्वप्न धुळीत मिसळले आहे, त्यांच्या माजी नगरसेविका गीता संजय सिंघन, ठाकरे गट शिवसेनेच्या माजी नगरसेविका यांनी तीन गोडाऊन कचरा पेट्यांनी भरले असल्याचा आरोप बाळासाहेबांच्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्या मीना पानमानंद यांनी केला आहे.

या कचरा पेट्या लोकांमध्ये वितरित करा अशी मागणी त्यांनी केलीय. शिलाई मशीन आणि लॅपटॉप जप्त केल्याचा दावाही शिंदे गटाचे कार्यकर्ते करत आहेत.