इर्शाळवाडी दुर्घटनेने माळीण दुर्घटनेच्या कटूस्मृती जाग्या, काय झाले होतं जुलै महिन्यात

| Updated on: Jul 20, 2023 | 2:14 PM

मोबाईलचे इंटरनेट नसल्याने या गावात असं काही घडले आहे उर्वरित जगाला ठावूकच नव्हते. एका एसटी चालकामुळे या घटनेचा थांगपत्ता लागला.

इर्शाळवाडी दुर्घटनेने माळीण दुर्घटनेच्या कटूस्मृती जाग्या, काय झाले होतं जुलै महिन्यात
landslide malin and irshalwadi
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई | 20 जुलै 2023 : बरोबर नऊ वर्षांपूर्वी असाच जुलै महिन्याचा पाऊस कोसळत होता. भीमाशंकरजवळ पुण्यापासून 75 ते 80 किमीवरील डिंभे धरणाच्या परिसरात वसलेले गाव अचानक सकाळी मोठा आवाज होत डोंगराखाली गडप झाले. त्याच्या आठवणी आज महाड तालुक्यातील  इर्शालवाडी दुर्घटनेने जाग्या झाल्या आहेत. काय झाले होते माळीण गावात नऊ वर्षापूर्वी कशामुळे झाळी होती दुर्घटना पाहा…

 

आंबेतालुक्यातील 44 उंबऱ्याचं अख्ख माळीण गावच 30 जुलै 2014 रोजी पहाटे धडाम असा आवाज येत धरणीच्या कुशीत सामावले गेले. या भीषण दुर्घटनेत एकूण 151 जणांचा झोपेतच मृत्यू झाला होता. त्यात महिला पुरुष त्यांची कच्चीबच्ची या गावाची लोकसंख्या 175 इतकी होती. आजही घटना आठवली की काळजाचा थरकाप होतो. या दुर्घटनेत एक शाळाही गडप झाली होती. शासनाने नंतर या गावाचे पुर्नवसन तेथेच करुन दिले आणि घरांसह शाळाही बांधून दिली होती. या घटनेवर चित्रपटही आला होता.

एसटी चालकामुळे जगाला कळले

मोबाईलचे इंटरनेट नसल्याने या गावात असं काही घडले आहे उर्वरित जगाला ठावूकच नव्हते. एका एसटी चालकामुळे या घटनेचा थांगपत्ता लागला. त्यानंतर प्रशासनाची मदत पोहचली. सहा दिवस मदत कार्य सुरु होते. सहा दिवसात सुमारे 151 मृतदेह काढण्यात आले. नऊ जणांचे जीव देखील वाचविण्यात एनडीआरएफला यश आले. या दुर्घटनेतील मृतदेहांवर अत्यसंस्कारासाठी घरातील कोणतीच व्यक्ती जीवंत नव्हती. पुण्याच्या भारतीय भूवैज्ञानिक पथकाने माळीण परिसकराची पाहणी करुन माळीण दुर्घटनेला बेसुमार वृक्षतोड आणि जमीनीचे सपाटीकरण या जबाबदार असल्याचे म्हटले होते.