जळगाव : ऐन कडाक्याच्या थंडीत जळगावमधील वातावरण तापलं आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. त्याच दरम्यान गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देतांना मला बोलायला लावू नका म्हणत मुलाचा मृत्यू झाला की खून ? असा सवाल उपस्थित तर करत शोध घ्यावा लागेल असं गिरीश महाजन म्हणाले होते. त्यावरून एकनाथ खडसे यांनी स्वतः याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. गिरीश महाजन यांनी केलेल्या विधानामुळे आमच्या संपूर्ण कुटुंबाला वेदना झाल्या आहेत. बायकोला आणि मुलीला रडायला येत आहे. त्यामध्ये सुनेला धक्का बसला असून मला देखील वेदना होत असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हंटलं आहे. यावर मला जास्त बोलायचे नाही पण मी त्यांना चावट म्हंटलो त्याचा राग आला असेल तर शब्द मागे घेतो मी त्यांची माफी मागतो असेही एकनाथ खडसे जळगावमध्ये म्हणाले आहे. पण याच काळात मला मित्रांचे साठ-सत्तर कॉल आले असेही खडसे म्हणाले आहे.
गिरीश महाजन यांनी मुलाच्या मृत्यूवर संशय निर्माण केल्याने एकनाथ खडसे यांना कॉल आले त्यात महाजन यांच्या विधानाचा निषेध केल्याचे खडसे म्हणाले आहे.
गिरीश महाजन यांनी केलेल्या सवालावरुन एकनाथ खडसे यांनी महाजन यांच्या चांगलाच हल्ला बोल केला होता, त्यात गिरीश महाजन हे चावट असल्याचे म्हंटले होते.
याशिवाय गेस्टहाऊसवर काय घडलं आहे ? हे मी पाहिलं आहे. त्यामध्ये गिरीश महाजन यांचे लोकांशी प्रेमसंबंध आहे, प्रेमसंबंध असू शकतात पण यावर मी कधी बोललो नाही असं म्हणत खडसे यांनी महाजन यांना टोला लगावला होता.
जळगावमधील सध्याचे राजकारण बघता खडसे आणि महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असून एकमेकांवर हल्लाबोल केला जात असल्याने राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.