मुंबई : मुंबई म्हणजे रेल्वेचे जाळं असणारं शहर येथे मुंबई लोकल (Mumbai Local)सह दुर पल्ल्याच्या धावणाऱ्या मध्य रेल्वेच्या रेल्वे गाड्या ही धावतात. तर येथे रेल्वे संदर्भात अनेक घटना या अधून मधून समोर येत असतात. दरम्यान मुंबईमध्ये अशीच एक घटना घडली होती, ज्यात माटुंगा येथे एका रेल्वेचे इंजन दुसऱ्या रेल्वे गाडीच्या डब्यांना धडकले होते. त्यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नव्हती. तर त्यावेळी पोलिसांना आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी लोकांना बाहेर काढत रेल्वे पुर्वपदावर आणली होती. त्यामुळे अशा मोठ्या दुर्घटनेशी दोन हात करता यावे म्हणून मध्य रेल्वे मुंबई विभाग, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF)आणि इतर आपत्ती व्यवस्थापन टीमसंयुक्त कवायती केली. असे प्रतिवर्षी केले जाते. या मॉकड्रिलमधून (Mock drill) मोठी दुर्घटना घडल्यास विविध विविध टीमसोबत सतर्कता आणि प्रतिसाद वेळत साधला जातो. तर आज कल्याण अप यार्ड येथे कवायती घेण्यात आली. जळत्या डब्यात अडकलेल्या प्रवाशांची कृत्रिम अपघाताची (Artificial accident) परिस्थिती निर्माण करण्यात आली. जिथे ट्रेन क्र. 11130 चा एका डब्बा रुळावरून घसरला आणि ट्रेन क्र.11021 च्या शेजारील डब्याला धडकून दोन्ही गाड्यांना आग लागली. एक अशी परिस्थिती निर्माण झाली, जिथे प्रवासी जळत्या कोचमध्ये अडकले होते.
आज सकाळी 10.30 वाजता कवायत सुरू झाली आणि क्षेत्रीय (field)कर्मचार्यांनी मुंबई विभागाच्या आपत्कालीन नियंत्रणास त्वरित संदेश दिला. नियंत्रण कार्यालयाने तात्काळ कारवाई केली आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF),रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि अपघात निवारण ट्रेन, रेल्वे मेडिकल रिलीफ व्हॅन, रेल्वेचे नागरी संरक्षण कर्मचारी यांनी प्रथम प्रतिसाद दिला. अग्निशामक यंत्रे वापरली आणि प्रवाशांची सुटका केली. त्यानंतर अग्निशमन दल 10.41 वाजता पोहोचले. एनडीआरएफची टीम 10.45 वाजता घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी मोठे बचाव कार्य सुरू केले. ताबडतोब डबा वरून आणि खिडक्यांमधून कापला गेला आणि प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ जवान डब्यात दाखल झाले.
अग्निशमन दलाने फायर हायड्रंटचा वापर केला आणि रेल्वे रुग्णवाहिका देखील 10.40 वाजता पोहोचली आणि जखमी प्रवाशांना त्वरित वैद्यकीय मदत दिली गेली. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी रेल्वेच्या आरपीएफनेही एनडीआरएफला मदत केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी डब्यात प्रवेश केला आणि 11.02 वाजता आग पूर्णपणे आटोक्यात आणली. 11.27 वाजता सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि रेल्वेच्या डॉक्टरांकडून त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. यंत्रणेतील सर्व भागधारकांचा प्रतिसाद चांगला आणि जलद असल्याचे दिसून आले आणि संपूर्ण परिस्थिती एका तासात नियंत्रणात आली. कल्याणच्या अपघात निवारण ट्रेनने 11.55 वाजता रुळावरून घसरलेल्या कोचला पुन्हा रुळांवर आणण्याचे काम पूर्ण केले.
या कवायतींमुळे विविध आपत्ती प्रतिसाद एजन्सीसह रेल्वेचे संयुक्त ऑपरेशन सुरळीत होते आणि वास्तविक वेळी मोठ्या प्रमाणात यामुळे मदत होते. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाला अपघात शून्य करण्याचे उद्दिष्ट आहे. तथापि, अशी कोणतीही अनुचित घटना घडल्यास सज्जतेसाठी आणि द्रुत प्रतिसादासाठी या कवायती रेल्वेकडून संयुक्तपणे सुरू राहतील. या कवायतीचे संयोजन मुंबई विभागाच्या संरक्षा विभागाने केले. रॉबिन कालिया, वरिष्ठ विभागीय संरक्षा अधिकारी, मुंबई विभाग, शशांक मेहरोत्रा, मुख्य वैद्यकीय अधीक्षक आणि डॉ. रुद्र अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधीक्षक, कल्याण रेल्वे रुग्णालय, इतर रेल्वे अधिकारी यावेळी उपस्थित होते.