या कारणामुळे सांगलीतील बहुचर्चित पर्यटन स्थळ पावसाळ्यात बंद करतात

| Updated on: Jun 15, 2023 | 10:49 AM

तीन ते पाच हजार मिलिमीटर पाऊस तिथल्या परिसरात पडतो. या कालावधीत नैसर्गिक आपत्ती ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळा सुरू झाला, की येथील पर्यटन बंद करण्यात येते.

या कारणामुळे सांगलीतील बहुचर्चित पर्यटन स्थळ पावसाळ्यात बंद करतात
warna damp
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यातील शिराळा (shirala) तालुक्याच्या पश्चिमेस असणार्‍या पर्यटकांचे माहेरघर म्हणून बहुचर्चित असणाऱ्या चांदोली परिसरातील चांदोली धरण (chandoli latest news in marathi) आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान आजपासून म्हणजे 15 जून पासून 15 आक्टोबर पर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे हा निर्णय दरवर्षीप्रमाणे घेण्यात आला आहे. सध्या तिथं मान्सनपूर्व पाऊस सुरु असल्यामुळे धरण प्रशासनाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्या परिरात घनदाट जंगल असल्यामुळे अनेकदा प्राणी पाहायला मिळत असल्यामुळे पर्यटकांची अधिक गर्दी असते.

चांदोली परिसरात पावसाला सुरुवात

चांदोली परिसरात पावसाला हळूहळू सुरुवात होऊ लागली आहे. दरवर्षी तीन ते पाच हजार मिलिमीटर पाऊस तिथल्या परिसरात पडतो. या कालावधीत नैसर्गिक आपत्ती ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळा सुरू झाला, की येथील पर्यटन बंद करण्यात येते. यंदाही हे पर्यटन नियमानुसार बंद करण्यात आले आहे.आजपासून 15 ऑक्टोंबर पर्यंत हे पर्यटन आता बंद असणार आहे. चांदोलीला भेट देणाऱ्या पर्यटकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलावडे व वारणा प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता मिलिंद किटवाडकर यांनी केले आहे.

शिराळा तालुक्यात पश्चिमेस असलेल्या चांदोली धरणातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वारणा नदीत पाणी सोडण्यातं येतं. त्याचबरोबर मागच्या दोन तीन वर्षात तिथं अतिवृष्टी होत असल्यामुळे भल्ले मोठे डोंगर घसरण्याच्या दुर्घटना सुध्दा घडल्या आहेत. ज्यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असतो. त्यावेळी चांदोली धरण परिसरात मोठा बंदोबस्त सुध्दा पाहायला मिळतो. सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे या जिल्ह्यातील पर्यटक कायम चांदोली परिसरात पाहायला मिळतात.

हे सुद्धा वाचा

चांदोली धरण परिसरात लोकांच्या राहण्याची सोय असल्यामुळे तिथं विदेशी पर्यटक सुध्दा येतात. त्याचबरोबर इतर राज्यातील सुध्दा पर्यटक सप्टेंबर महिन्यात पाहायला मिळतात.