नवी मुंबई – एका बिल्डिंगच्या सहाव्या मजल्याचा काही भाग कोसळल्याची (Building collapse) घटना नवी मुंबईच्या (Navi Mumbai) सेक्टर 17 मध्ये घडली आहे. या दुर्घटनेत एक जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. दुर्घटनेनंतर या ठिकाणी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. नवी मुंबई परिसरात शुक्रवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) 4 गाड्या दाखल झाल्या आहेत. जिमी पार्क नावाच्या या बिल्डिंगचे छत कोसळले आहे. यात दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. आत्तापर्यंत चार जणांना वाचवण्यात आले असून, अद्याप 10 ते 12 जण आतमध्ये अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. घटनास्थळावरून मिळानेल्या माहितीनुसार, इमारत कोसळळ्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाकडून घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू असून कोसळलेल्या इमारतीतून चार जणांना बाहेर काढण्यात आले आहे.
पावसाळ्यात मुंबईत इमारत कोसळण्याच्या अनेक घटना घडत असतात. कालच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून आज नवी मुंबईत इमारत कोसळण्याची घटना घडली आहे. नेरुळ सेक्टर 17 येथील जिमी पार्क सोसायटीच्या सहाव्या मजल्यावरील रुममध्ये लादी बसवण्याचे काम सुरु होते. हॅाल मध्ये काम सुरू असतानाच सहाव्या मजल्याचा स्लॅब खाली कोसळला. वरुन पडलेल्या स्लॅबच्या वजनाने खालच्या माळ्यापर्यंत संपूर्ण हॅालचा भाग कोसळला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. या घटनेत सहा जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सहा मजल्यावरुन खालचे सगळे स्लॅब पडल्याने खिडकीत अडकून बसलेल्यांना ग्रील कापून बाहेर काढण्यात आले.
कोसळलेली इमारत 1994 साली बांधलेली आहे. अजून 30 वर्षेही पूर्ण न झालेल्या इमारतींचा भाग पडल्याने बांधकामाबाबत शंका उपस्थितीत होत आहे. त्यामुळे ही इमारत बांधलेल्या बिल्डरने शहरात अजून किती ठिकाणी बांधकाम केले आहे, याची चौकशी करुन स्ट्रक्चरल ॲाडिट केलं जाणार आहे. दरम्यान पावसाळ्यात घरातील कामे काढून इमारतीला धोका पोहोचविणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. दरवेळी पावसाळ्याआधी अशा धोकादायक इमारतींचं ऑडिट करण्याची मगाणी ही वारंवार होत असते. मात्र ऑडिटकडे दुर्लक्ष झाल्यास अशा गंभीर परिणामांना समोरे जावे लागू शकते, हेच दाखवणारी ही घटना आज नवी मुंबईत घडली आहे. आता पुढील धोका ओळखून तरी प्रशासनाने अलर्ट होण्याची गरज आहे.