गुजरात निवडणुकीचा संदर्भ देत शिंदे गटाच्या मंत्र्यांची ठाकरे यांच्यावर टीका, म्हणाले माझ्या नावापुढे माजी आमदार असं लागलं असतं

| Updated on: Dec 10, 2022 | 1:35 PM

उध्दव साहेबांची तब्बेत बरी नाही म्हणून रशमी वहिनींना मुख्यमंत्री खुर्चीवर बसवा असे सांगणारा मी होतो असा पुनरुच्चार शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केला आहे.

गुजरात निवडणुकीचा संदर्भ देत शिंदे गटाच्या मंत्र्यांची ठाकरे यांच्यावर टीका, म्हणाले माझ्या नावापुढे माजी आमदार असं लागलं असतं
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलो असतो तर माझ्या नावसमोर माजी आमदार असं लागलं असतं. इतकंच काय तर राहुल गांधीना गुजरात मध्ये जेवढा फायदा झाला तेवढा फायदा उध्दव ठाकरे यांना महाराष्ट्रात होणार असा टोला देखील शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला आहे. उध्दव साहेबांची तब्बेत बरी नाही म्हणून रश्मी वहिनींना मुख्यमंत्री खुर्चीवर बसवा असे सांगणारा मी होतो असंही अब्दुल सत्तार यांनी म्हंटले आहे. अब्दुल सत्तार इथंच थांबले नाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या जालना दौऱ्यावर देखील टीका केली आहे. परदे मे रहने वाले आता बाहेर पडत आहेत. चांगली गोष्ट आहे प्रत्येकाने बाहेर फिरायला पाहिजे पक्षवाढीसाठी चांगले आहे. आता सर्वच बाहेर फिरत आहेत, राहुल गांधी तिकडे फिरत आहेत, त्यांना हिमाचल प्रदेश मध्ये फायदा झाला असेही अब्दुल सत्तार यांनी चिमटा काढला आहे.

राहुल गांधीना गुजरात मध्ये जेवढा फायदा झाला तेवढा फायदा उध्दव ठाकरे यांना महाराष्ट्रात होणार असा चिमटा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हंटलं आहे.

उध्दव साहेबांची तब्बेत बरी नाही म्हणून रशमी वहिनींना मुख्यमंत्री खुर्चीवर बसवा असे सांगणारा मी होतो असा पुनरुच्चार सुद्धा सत्तार यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

उध्दव ठाकरे यांच्या सोबत राहिलो असतो तर माझ्या नावापुढे माजी आमदार पाटी लागली असती, मला पुन्हा निवडून यायचे आहे असंही सत्तार यांनी सांगितल्यानं चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान याच वेळी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या महापुरुषांच्या वादग्रस्त विधानावर अब्दुल सत्तार यांनी बोलणं टाळलं आहे. याच वेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल जे विधान केले त्याचीही आठवण सत्तार यांनी आणून दिली.

मी जे मागे बोललो ते ग्रामीण भागात बोलतात मात्र आता पुन्हा बोलणार नाही इतरांना खुराक देणार नाही असही स्पष्ट मत सत्तार यांनी मांडले आहे.

दरम्यान सत्तार यांनी पुन्हा निवडून येण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो असा सुर आवळल्याने या विधानावरून चर्चा सुरू झाली आहे.