Eknath Shinde : लढणारा माणूस ! दोन मुलं डोळ्यासमोर गमावली, राजकीय संन्यासाच्या विचारात होते, आता थेट बंड, एकनाथ शिंदेंची माहित नसलेली कहाणी

| Updated on: Jun 23, 2022 | 6:58 PM

सध्या राज्याच राजकारण हे शिंदे यांच्यामुळे ढवळलं जात आहे. तर हे महाविकास आघाडी सरकार गटकाळ्या खाताना दिसत आहे. मात्र एकेकाळी शिंदे यांच्या जिवणात असा प्रसंग आला ज्यामुळे त्यांचे आयुष्यच उद्धवस्त होण्याच्या मार्गावर होते. तर त्यावेळी आनंद दिघे आणि शिवसेनेने त्यांनी आधार दिला होता. आणि आज हेच शिंदे शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत, असे बोलले जात आहे.

Eknath Shinde : लढणारा माणूस ! दोन मुलं डोळ्यासमोर गमावली, राजकीय संन्यासाच्या विचारात होते, आता थेट बंड, एकनाथ शिंदेंची माहित नसलेली कहाणी
एकनाथ शिंदे
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : शिवसेना, हिदुत्व आणि आनंद दिघे यांना मानत शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केलेल्या एकनाथ शिंदे यांना आज अख्खा देश ओळखतो. शिंदे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या मर्जितले तर जवळचे नेते. तर शिवसेनेतील नंबर दोनचे नेते. उद्धव ठाकरे यांचे दुत म्हणून ओळखले जाणारे शिंदे यांनीच आज सेनेला खिंडार पाडत उद्धव यांना शिवसेनेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तसेच तब्बल 45 आमदार आपल्या गळाला लावले आहे. तर शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनाला या महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावं लागेल असा इशारा दिला आहे. शिवसेनेलाच इशारा देणारे शिंदे यांचा प्रवास अनेकांना माहित आहेच मात्र तो मध्यंतरी थांबला होता. आणि त्यांना आनंद दिघे यांनीच राजकारणात आणलं होतं हे ही अनेकांना माहित आहे. पण ते सक्रीय राजकारणातून का बाहेर पडले होते हे आजही अनेकांना माहीत नाही. तर चला जाणून घेऊ काय झालं होतं शिंदे बरोबर जे शिवसेना सोडून बाहेर पडले होते आणि राजकारण ही सोडलं होतं.

शिंदे यांचे होत्याचं नव्हतं झालं

सध्या राज्याच राजकारण हे शिंदे यांच्यामुळे ढवळलं जात आहे. तर हे महाविकास आघाडी सरकार गटकाळ्या खाताना दिसत आहे. मात्र एकेकाळी शिंदे यांच्या जिवणात असा प्रसंग आला ज्यामुळे त्यांचे आयुष्यच उद्धवस्त होण्याच्या मार्गावर होते. तर त्यावेळी आनंद दिघे आणि शिवसेनेने त्यांनी आधार दिला होता. आणि आज हेच शिंदे शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत, असे बोलले जात आहे. ही 2000 सालाची गोष्ट असेल. त्यावेळी शिंदे नगरसेवक होते. त्यावेळी ते आपल्या परिवारासह महाबळेश्वरला गेले होते. ते येथील तापोळा गावात 2 जून 2000 मध्ये आपल्या परिवारासह गेले होते. तेथेच एक अपघात झाला आणि शिंदे यांचे होत्याचं नव्हतं झालं. येथील तापोळा नदीत (कोयना नदी) स्पीड बोटमध्ये खेळत असताना त्यांचा मुलगा दिपेश (11 वर्ष) आणि मुलगी शुभधा (7 वर्ष) पाण्यात बुडून मृत्य झाला होता. ज्यानंतर त्यांनी राजकारणातून आपले अंग काढले होते. बोटिंग करत असताना अपघात झाला आणि शिंदे यांची दोन्ही मुले डोळ्यासमोर बुडाली. त्यावेळी श्रीकांत हे अवघ्या 14 वर्षांचे होते.

दरम्यान एका मुलाखतीत या वेदनादायक घटनेची आठवण करून देताना शिंदे म्हणाले होते की, ‘तो माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस होता. मी पूर्णपणे तुटलो होतो. मी सर्वकाही सोडण्याचा निर्णय घेतला. राजकारणही. मात्र यानंतर त्यांची समजूत काढत आनंद दिघे यांनी त्यांना सभागृह नेते पद दिले. ज्यामुळे ते आमदार आणि आता मंत्री पदापर्यंत पोहचले. आता या घटनेला 22 वर्षे झाली आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे सिंहासन हलवले आहे. एकेकाळी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतलेल्या शिंदेंची ताकद शिवसेनेत कशी काय वाढली ते जाणून घेऊया?

हे सुद्धा वाचा

शिंदे यांचे राजकीय गुरू

शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी झाला. ते महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील रहिवासी. परंतु त्यांची कर्मभूमी ही ठाणेच राहिली. शिंदे सुरुवातीला ठाण्यात ऑटो चालवायचे. शिवसेनेचे खंबीर नेते आनंद दिघे यांच्यामुळे प्रभावित होऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रथम शिवसेनेचे शाखाप्रमुख आणि नंतर ठाणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून ते निवडून आले. शिंदे यांनी मुलाच्या निधनानंतर राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा धरमवीर दिघे यांनीच त्यांना परत आणले.

आनंद दिघे यांच्या आकस्मिक निधन

26 ऑगस्ट 2001 रोजी अचानक धरमवीर दिघे यांचे अपघाती निधन झाले. त्याच्या मृत्यूला आजही अनेकजण हत्या मानतात. दिघे यांच्या निधनानंतर शिवसेनेला ठाण्यातील वर्चस्व राखण्यासाठी एका चेहऱ्याची गरज होती. ठाकरे कुटुंब हे ठाण्याला असंच सोडणारे नव्हते. तर शिंदे यांचा सुरुवातीपासूनच दिघे यांच्याशी संबंध असल्याने त्यांचा राजकीय वारसा हा शिंदे यांना मिळाला. शिंदे यांनी देखील दिघे यांचा वारसाप्रमाणे काम केले आणि शिवसेना ठाण्यात भक्कम केली.

शिंदे सलग चार वेळा विधानसभेत पोहोचले

शिंदे हे त्यांच्या गुरूप्रमाणेच लोकनेतेही झाले. 2004 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. लवकरच त्यांनी ठाण्यात असा दबदबा निर्माण केला की ते तिथल्या राजकारणाचे केंद्र म्हणजे शिंदे असेच समिकरण बनले. 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही विजयाचा गुलाल त्यांना लागला. 2014 मध्ये ते विरोधी पक्षनेतेही बनले. मंत्री असताना शिंदे यांनी नेहमीच महत्त्वाची खाती सांभाळली. 2014 मध्ये ते फडणवीस सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. यानंतर 2019 मध्ये शिंदे यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि शहरी विकास मंत्रालयाची जबाबदारी आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री सहसा हा विभाग त्यांच्याकडे ठेवतात.

बंडाच्या मागे शिंदे पुत्र आणि फडणवीस

आपले वर्चस्व वाढवण्यासाठी शिंदे यांनी आपल्या मुलालाही मैदानात उतरवले. व्यवसायाने डॉक्टर असलेले श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. शिंदे यांच्या बंडखोरीमागे त्यांचा मुलगा श्रीकांत याचा दबाव असल्याचेही बोलले जात आहे. श्रीकांत म्हणतात की भाजपसोबतच्या त्यांच्या राजकारणाला सोनेरी भविष्य आहे. भाजपनेही विशेषत: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच एकनाथ शिंदे यांना आतून मजबूत केले आहे. उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड पुकारण्यासाठी शिंदे हा सर्वात मजबूत दुवा असल्याचे फडणवीसांना माहीत होते. शिंदे यांना बाजूला केले जात असल्याचे भाजपने अनेकवेळा सांगितले आहे. भाजपनेच शिंदे यांना शिवसेनेत आपले महत्त्व नाही, याची वारंवार जाणीव करून दिली. शिंदे ठाकरेंवर नाराज आहेत आणि केव्हाही निघून जाऊ शकतात, असे वातावरण असताना मात्र ठाकरे यांनी त्यांची समजूत काढली नाही की नक्की कोणती खिचडी शिजत आहे त्याकडे लक्ष दिले नाही.

शिंदे उद्धव ठाकरेंचे दूत

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून राजकीय प्रवासाला सुरुवात करणाऱ्या शिंदे यांना उद्धव ठाकरेंचे दूत म्हटले जायचे. कोणत्याही जिल्ह्यात राजकीय संकट आले की ते सोडवण्यासाठी शिंदे यांनाच पाठवत. याचे एक वैशिष्ट्य कोविड दरम्यान देखील दिसून आले. गेल्या दोन वर्षांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकही मोठी बैठक घेतली नाही किंवा आमदारांचीही फारशी भेट घेतली नाही. ठाकरेंऐवजी शिंदे आमदारांच्या भेटीगाठी घेत त्यांचे प्रश्न सोडवत राहिले. येथेच त्यांनी शिवसेना आमदारांचा विश्वास जिंकून त्यांना बंडखोरीसाठी तयार केल्याचे आताच्या चित्रावरून दिसून येत आहे.