नाशिक : नाशिकमधील मुन्सिपल कामगार सेनेच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे गटात (Eknath shinde) पहिल्यांदाच मोठा वादंग निर्माण झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने नाशिक महानगर पालिकेच्या (NMC) पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. राज्यामध्ये ठाकरे-शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या सत्ता संघर्षाचे पडसाद राज्यभर उमटताना पाहायला मिळत आहे. नाशिक महानगरपालिकेच्या शिवसेना (Shivsena) प्रणित मुन्सिपल कर्मचारी संघटनेचे अध्यक्षाने शिंदे गटात प्रवेश केल्याने या जागेवर शिवसेनेच्या महानगर प्रमुखांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर या ठिकाणी आज शिवसेनेने पदग्रहण सोहळ्याच्या कार्यक्रमाच आयोजन केलं होतं. मात्र शिंदे गटात गेलेल्या अध्यक्षांनी या संघटनेवर आपलाच दावा सांगत या पदग्रहण सोहळ्याला विरोध केल्याने ज्या ठिकाणी वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी दोन्ही संघटनांना पदग्रहण सोहळ्याची परवानगी नाकारत महापालिकेत प्रवेश नाकारला आहे.
शिवसेना प्रणीत असलेली मुन्सिपल कामगार सेनेच्या अध्यक्षपदावरुन मोठा वादंग निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक महानगर पालिकेच्या प्रवेशद्वारावर मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.
नाशिक महानगर पालिका प्रवेशद्वारावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नाशिक महानगरपालिकेला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाला आहे.
मुन्सिपल कामगार सेनेच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या वादात शिंदे गटात दाखल झालेले प्रवीण उर्फ बंटी तिदमे यांनी संघटनेच्या नियमांचे दाखले देत बडगूजर यांची निवड अवैद्य असल्याचा दावा केला आहे.
तर शिंदे गटात दाखल होताच मुन्सिपल कामगार सेनेचे संस्थापक बबनराव घोलप यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगूजर यांची निवड केली होती.
एकूणच मुन्सिपल कामगार सेनेच्या अध्यक्षपदावरुन शिंदे आणि ठाकरे यांच्या दोन्ही समर्थकांकडून मोठा वाद निर्माण झाला आहे.