हाडं गोठवणाऱ्या थंडीत अग्निवीरांचे खडतर प्रशिक्षण सुरू, देश सेवेत दाखल होतांना सुरू असलेलं प्रशिक्षण आहे तरी कसं, पाहा

| Updated on: Jan 11, 2023 | 9:43 AM

21 आठवड्यांमध्ये अत्याधुनिक प्रशिक्षण घेऊन हे अग्निवीर जवान सैन्य दलात दाखल होतील, कागदपत्रे, शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता, चारित्र्य पडताळणी असे स्तर पार करून हे प्रशिक्षण सुरू आहे.

हाडं गोठवणाऱ्या थंडीत अग्निवीरांचे खडतर प्रशिक्षण सुरू, देश सेवेत दाखल होतांना सुरू असलेलं प्रशिक्षण आहे तरी कसं, पाहा
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : सैन्य दलात दाखल होऊन देशसेवा करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते, त्यासाठी शारीरिक कसरतीसह बौद्धिक क्षमतेचा कस लागत असतो. त्यासाठी अनेक तरुण दिवसरात्र मेहनत घेत असतात. अशातच केंद्र सरकारने एक नवी संकल्पना अमलात आणली आहे. यामध्ये अग्निवीर नावाने ही सैन्य भरती करण्यात आली आहे. अग्निवीर सैन्य भरतीत चार वर्षे देशसेवा करता येणार आहे. या अग्निवीर भरतीवरुन खरंतर मोठ्या प्रमाणात वाद झाला होता, टीकाही झाली होती, त्यानंतर ही भरती प्रक्रिया ठिकठिकाणी पार पडली होती. 17 ते 21 वयोगटातील तरूणांनी यामध्ये सहभाग घेतला होता. पहिल्या तुकडीत 2 हजार 640 अग्निवीर दाखल झाले आहे. 31 आठवड्यांचे हे प्रशिक्षण असणार आहे. दोन जानेवारी 2023 ते सहा ऑगस्ट 2023 पर्यन्त प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये पहाटे साडेपाच पासूनच प्रशिक्षणाला सुरुवात होते, त्यामध्ये सुरुवातीला धावणे, उड्या मारणे, पुलअप्स, क्लाइम्बिंग आणि फायरिंगच धडे दिले जात आहे.

देशसेवे स्वप्न उराशी बाळगून अनेक तरुण आज अग्निवीरच्या माध्यमातून सैन्य दलात दाखल झाले आहे. त्याचे प्रशिक्षण आटोपल्यानंतर जय ठिकाणी मनुष्यबळ कमी तिथे त्यांना रुजू करण्याचा आदेश दिला जाणार आहे.

देशातील सैन्य दलाच्या तुकड्या आहेत, तेथील जवान सेवानिवृत्त झाले तर त्यांच्या जागेवर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे, त्यातच सैन्य दलातील खडतर प्रशिक्षणाचे टप्पे करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

यामध्ये देशभरात 46 ठिकाणी सैन्य दलाचे प्रशिक्षण केंद्र आहेत. त्यातील पाच महाराष्ट्रात असून नाशिकच्या देवळालीत हे प्रशिक्षण सुरू आहे.

21 आठवड्यांमध्ये अत्याधुनिक प्रशिक्षण घेऊन हे अग्निवीर जवान सैन्य दलात दाखल होतील, कागदपत्रे, शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता, चारित्र्य पडताळणी पत्र असे स्तर पार करून ही प्रक्रिया पार पडत आहे.

नाशिकमधील कडाक्याच्या थंडीतही सैन्य दलात दाखल होणारे अग्निवीर खडतर असे प्रशिक्षण घेत आहे. नाशिकच्या देवळाली येथे हे प्रशिक्षण सुरू आहे.