Ambernath : अंबरनाथमध्ये माजी नेव्ही ऑफिसरला मारहाण; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या, तर मुख्य आरोपी फरार

| Updated on: Dec 27, 2021 | 9:21 PM

माजी नेव्ही ऑफिसर ब्रिजेश सिंग त्यांच्या दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी एक दुचाकीस्वार त्यांच्या समोर मोबाईलवर बोलत गाडी चालवत होता. त्यामुळे ब्रिजेश सिंग यांनी त्याला बाजूला थांबून फोनवर बोलून घे, असं सांगितलं होतं.

Ambernath : अंबरनाथमध्ये माजी नेव्ही ऑफिसरला मारहाण; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या, तर मुख्य आरोपी फरार
अंबरनाथमध्ये माजी नेव्ही ऑफिसरला मारहाण
Follow us on

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये पोलीस चौकीच्या बाहेरच नेव्हीच्या माजी ऑफिसरला मारहाण करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली होती. या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून मुख्य आरोपीचा अद्याप शोध सुरू आहे. अंबरनाथ पूर्वेतील हुतात्मा चौकात शनिवारी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली होती. या भागातून माजी नेव्ही ऑफिसर ब्रिजेश सिंग त्यांच्या दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी एक दुचाकीस्वार त्यांच्या समोर मोबाईलवर बोलत गाडी चालवत होता. त्यामुळे ब्रिजेश सिंग यांनी त्याला बाजूला थांबून फोनवर बोलून घे, असं सांगितलं होतं.

माजी नेव्ही अधिकाऱ्याला आरोपींनी केली होती मारहाण

मात्र त्यावरून संतापलेल्या दुचाकीस्वाराने सिंग यांना हुतात्मा चौकातील पोलीस चौकीसमोर थांबवलं आणि शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. यावर ब्रिजेश सिंग यांनी आपण नेव्हीवाला असल्याचं सांगताच या गुंड प्रवृत्तीच्या दुचाकीस्वाराने नेव्हीच्या नावानेही शिवीगाळ करत सिंग यांना काठीने मारहाण केली. यानंतर या दुचाकीस्वाराने त्याच्या साथीदाराला बाजूच्या गॅरेजमधून सायलेन्सरचा रॉड आणायला सांगितलं आणि स्वतः देखील रॉड आणायला गेला. मात्र यामुळे ब्रिजेश सिंग यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानं ते तिथून निघून गेले. मात्र या दुचाकीस्वारांनी त्यांचा पाठलाग करत अंबरनाथ पश्चिमेला तहसीलदार कार्यालयापासून ते लक्ष्मीनारायण टॉकिजपर्यंत सिंग यांच्या गाडीला लाथा मारणे, चालत्या गाडीवर त्यांना लाकूड फेकून मारणे असे प्रकार केले.

टीव्ही 9 च्या बातमीचा इम्पॅक्ट

ब्रिजेश सिंग हे याप्रकरणाची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी एनसी देण्यास सांगितलं. मात्र हे प्रकरण टीव्ही 9 मराठीने लावून धरल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या दिवशी ब्रिजेश सिंग यांच्या तक्रारीनुसार मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी काही तासातच अल्ताफ तस्लीम अन्सारी आणि सचिन भोईर या दोघांना अटक केली. ब्रिजेश सिंग यांना मारहाण करणारा मुख्य आरोपी पक्या हा मात्र अजूनही फरारच आहे.

दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या अल्ताफ तस्लीम अन्सारी आणि सचिन भोईर या दोघांना आज उल्हासनगर न्यायालयात हजर केलं असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. तर तिसरा आरोपी पक्या हा मात्र अजूनही फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी काही पथकं तयार केली आहेत. त्यामुळं आर्मीला शिव्या देणारा हा पक्या आता पोलिसांना कधी सापडतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (The two accused who beatened the former Navy Officer in Ambernath)

इतर बातम्या

Pimpri-Chinchwad crime | हिंजवडीत विद्युत डीपीवर चढून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न ; अग्नीशामक दलाने वाचवाला जीव

Anil Deshmukh : अनिल देशमुखांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ