संगमनेर, अहमदनगर : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा ज्या दिवशी वाढदिवस (Birthday) होता त्याच दिवशी त्यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यासह संपूर्ण देशभरात बाळासाहेब थोरात आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे समोर आले आहे. बाळासाहेब थोरात यांनी हायकमांडला नाराजीचं स्फोटक पत्र लिहिलं असून त्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा आहे. मात्र, इंदूरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून संगमनेरसह कॉंग्रेसच्या वर्तुळात त्या व्हिडिओचीच चर्चा आहे.
बाळासाहेब थोरात यांचा 7 फेब्रुवारीला वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संगमनेरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्याच निमित्ताने सायंकाळी इंदूरीकर महाराजांचे किर्तनही आयोजित करण्यात आले होते.
यावेळी इंदूरीकर महाराज यांनी बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल जे भाष्य केलं आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, पटोले-थोरात वाद सुरू असतांना इंदूरीकर महाराज यांचे विधान चर्चेचा विषय ठरत आहे.
बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस, इंदुरीकर महाराजांचा हा व्हिडीओ जोरदार चर्चेत #Balsahebthorat #indurikar #sangamner #birthday pic.twitter.com/Q3xXETSBUa
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) February 8, 2023
किर्तन सोहळ्यात इंदूरीकर महाराज म्हणाले, कोणत्याही दगडाची मूर्ती होत नाही. घाव सहन करणारे दगडचं मूर्तीसाठी वापरली जातात. ज्यांच्यात घाव सहन करण्याची ताकद आहे त्यांना यश निश्चित आहे.
जे दगडं घाव सहन करतात तीच दगडं मूर्तीसाठी उपयोगी पडतात, हे वाक्य बाळासाहेब थोरात यांना लागू होतं. क्षेत्र कोणतंही असो, आपला माणूस हा आपला स्वाभिमान असतो असंही इंदूरीकर महाराज म्हणाले आहे.
इंदूरीकर महाराज यांच्या याच विधानाचा व्हिडिओ थोरात समर्थक यांच्याकडून सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यात पटोले आणि थोरात यांच्या वादाच्या दरम्यान हा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद हायकमांड पर्यन्त जाऊन पोहचला आहे. त्याच काळात इंदूरीकर महाराज यांचा हा व्हिडिओ थोरात समर्थक सोशल मीडियावर शेअर करत आहे.
बाळासाहेब थोरात यांनी हायकमांडकडे विधीमंडळ पक्षेनेते पदाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कारभारावरुन नाराजीचे पत्रही लिहिले आहे.
त्याच काळात इंदूरीकर महाराज यांनी संगमनेर येथील आयोजित किर्तनात केलेले विधान राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे या व्हिडिओची चर्चा हायकमांडकडेही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.