आंब्याच्या झाडाने अचानक पेट घेतल्यामुळे गावकरी संभ्रमात

| Updated on: Apr 16, 2023 | 3:14 PM

सध्या राज्यात अवकाळी पाऊस सुरु आहेत. त्यामुळे वीज पडल्यानंतर अनेक ठिकाणी आग झाडांनी पेट घेतला आहे, परंतु भंडारा जिल्ह्यात झाडाने कशामुळे पेट घेतला याचं कारण अद्याप कुणाला माहित नाही.

आंब्याच्या झाडाने अचानक पेट घेतल्यामुळे गावकरी संभ्रमात
Mango trees started burning
Image Credit source: tv9marathi
Follow us on

भंडारा : भंडारा (bhandara) जिल्ह्याच्या तुमसर (Tumsar) तालुक्याअंतर्गत येणाऱ्या रुपेरा गावात अचानक झाडाने पेट घेतला. लागलेल्या आगीत संपूर्ण झाड जळून खाक झालं आहे. गावालगत असलेल्या शेतातील आंब्याचं झाड अचानक पेटू लागलं, त्यावेळी कुठलंही वादळ नाही, वीज कडाडली नाही. मात्र उभ्या असलेल्या आंब्याचं झाड पेटू लागल्याने (Mango trees started burning) नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. रात्री उशीरा पर्यंत संपूर्ण झाड जळून खाली पडू लागलं. मात्र झाडाला आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही. अचानक आग लागल्यामुळे संपूर्ण गावात चर्चा होती.

सध्या राज्यात अवकाळी पाऊस सुरु आहेत. त्यामुळे वीज पडल्यानंतर अनेक ठिकाणी आग झाडांनी पेट घेतला आहे, परंतु भंडारा जिल्ह्यात झाडाने कशामुळे पेट घेतला याचं कारण अद्याप कुणाला माहित नाही.

अवकाळी पावसामुळं झाडं जळाली

पुण्याच्या भोरमध्ये विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसा दरम्यान नारळाच्या झाडावर वीज कोसळ्यानं नारळाच्या झाडाला आग लागल्याची घटना घडली. भोरच्या संजय नगर परिसरात संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडलीय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र वीज कोसळ्यावर जोरदार आवाज झाल्यानं, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. जवळपास अर्धा तास पावसानं भोर परिसराला झोडपून काढलं.

हे सुद्धा वाचा

नंदूरबार जिल्ह्यातील नंदूरबार, नवापूर तालुक्यातील वादळवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, नवापूर तालुक्यातील करंजाळी गावात नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाड संपूर्ण जळून खाक झाले आहे. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नवापूर तालुक्यात जोरदार वारा आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊसाला सुरवात झाली. याचवेळी करंजाळी गावात गावाजवळ असलेल्या शेतात नारळाच्या झाडावर वीज पडल्याने नारळाच्या झाडाच्या शेंड्यावर आग लागल्याची घटना घडली. नारळाच्या झाडावर वीज पडल्या नंतर झाडाने पेट घेतला.