मुंबईकरांनो सावधान शहरात फिरतोय केस कापणारा माथेफिरू, एकटी मुलगी दिसताच साधतो संधी!

| Updated on: Jan 08, 2025 | 5:59 PM

मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, मुंबईच्या दादर परिसरामध्ये एक माथेफिरू फिरत आहे. हा माथेफिरू मुलींचे केस कापत असल्याचं समोर आलं आहे.

मुंबईकरांनो सावधान शहरात फिरतोय केस कापणारा माथेफिरू, एकटी मुलगी दिसताच साधतो संधी!
Follow us on

मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, मुंबईच्या दादर परिसरामध्ये एक माथेफिरू फिरत आहे. हा माथेफिरू एकट्या मुलीला पाहून तिचे केस कापत असल्याचं समोर आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. तो फक्त मुलींचे केस कापतो बाकी काहीही करत नाही असं देखील समोर आलं आहे.  फॉर्मल कपडे एका हातात बॅग आणि दुसऱ्या हातात मोबाईल असा या माथेफिरूचा वेश आहे. तो पाकिटाच्या मागे कात्री लपवून मुलींचं लक्ष नसताना त्यांचे केस कापतो. असा अनुभव आतापर्यंत दोन मुलींना आल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान ज्या मुलीचे केस या माथेफिरूनं कापले त्या मुलीनं त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. दादर परिसरात ही घटना घडली आहे, रेल्वे स्थानकावर माथेफिरूनं तिचे केस कापले. सोमवारी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. दादर ब्रिज क्रॉस करत  असताना ही घटना घडली आहे. सीसीटीव्हीमध्ये हा माथेफिरू कैद झाला आहे. फॉर्मल कपडे एका हातात बॅग आणि दुसऱ्या हातात मोबाईल असा या माथेफिरूचा वेश आहे. तो पाकिटाच्या मागे कात्री लपवून मुलींचं लक्ष नसताना त्यांचे केस कापतो.

पीडित मुलीनं या माथेफिरूबद्दल माहिती देताना सांगितलं की, सोमवारी सकाळी 9 वाजता ही घटना घडली. दादार ब्रिज क्रॉस करत असताना ही घटना घडली. फॉर्मल कपडे घातलेला, हातात बॅग असलेला व्यक्ती होता. मोबाईच्या मागे कात्री लपवून त्याने माझे केस कट केले.  माझ्या आधीही अजून एका मुलीचे केस त्याने कापले आहेत.  गेल्या तीन महिन्यांपासून तो असं करत आहे. त्याचा उद्देश फक्त मुलींचे केस कापणे एवढाच आहे. माला सुरुवातीला गर्दीमुळे ही गोष्ट लक्ष आली नाही, मात्र जेव्हा मी बोरिवली ट्रेन पकडली, तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझे केस कापले गेले आहेत. हा व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे, अशी माहिती या पीडित मुलीनं दिली.