‘ही काळ्या दगडावरील रेघ आहे लिहून ठेवा’, रवी राणा यांचे शिवसेनेच्या बाप बेट्यांना खुले आव्हान

| Updated on: Jul 15, 2023 | 5:09 PM

उद्धव ठाकरे यांच्यासोबत तुम्ही असताना त्याच बालेकिल्ल्यातून नवनीत राणा निवडून आल्या. त्याला आम्ही खिंडार पडले. खासदार असताना दहा दहा वर्ष कोणत्या गावात जाऊन काम केली नाहीत. पण, खासदार नवनीत राणा यांनी एकाच गावात पाच पाच वेळा जाऊन कामे केली. 

ही काळ्या दगडावरील रेघ आहे लिहून ठेवा, रवी राणा यांचे शिवसेनेच्या बाप बेट्यांना खुले आव्हान
MP NAVNEET RANA AND ANAND ADSUL
Follow us on

अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची तिहेरी युती झाली असली तरी आगामी काळात या युतीपुढे जागावाटपाचे कठीण आव्हान उभे असणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात कुणाला झुकते माप द्यायचे या विचार या तिन्ही नेत्यांना करावा लागणार आहे. एकाच जागेसाठी तिन्ही नेत्याचे पक्ष आपल्याच पक्षाचा दावा सांगत असून आतापासूनच धुसफूस सुरु झाली आहे. राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघापासून याची सुरवात झाली आहे. अमरावतीची जागा खासदार नवनीत राणा याच लढणार असे सांगत आमदार रवी राणा यांनी शिवसेनेच्या बाप बेट्यांना थेट आव्हान दिलंय.

लोकसभेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी पत्रकार परिषदेत कार्यकर्त्यांनी ज्या घडामोडी दाखविल्या जातात, मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल यात लक्ष घालण्याची गरज नाही. तर, येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लक्ष घालावे. अमरावती लोकसभा शिवसेनेचीच राहिलेली आहे आणि येणाऱ्या काळात शिवसेनाच ही लोकसभा लढवेल असे स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या खासदारांना केंद्रात मंत्रीपद मिळणार आहे. जर आनंदराव अडसूळ खासदार असते तर पंतप्रधान मोदी यांनी आनंदराव अडसूळ यांना नक्कीच केंद्रात स्थान दिले असते. मात्र, ते खासदार झाले नाही हे अमरावतीचे दुर्देव आहे. पण, अमरावतीच्या लोकसभेच्या जागेवर तसेच विधानसभेच्या जिंकलेल्या जागांवर शिवसेना दावा ठेवणार असे असे त्यांनी सांगितले.

दहा वर्ष आम्ही भाजप…

अभिजीत अडसूळ यांच्या या दाव्याची आमदार रवी राणा यांनी खिल्ली उडवली आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार म्हणून खासदार नवनीत राणा याच निवडणुकीच्या रिंगणात राहतील. मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची युती झाल्याने आमची ताकद वाढली आहे. गेली दहा वर्ष आम्ही भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करत आहोत असे ते म्हणाले.

काही असेल ते लवकरच बाहेर काढू…

कोण म्हणत हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पण, उद्धव ठाकरे यांच्यासोबत तुम्ही असताना त्याच बालेकिल्ल्यातून नवनीत राणा निवडून आल्या. त्याला आम्ही खिंडार पडले. खासदार असताना दहा दहा वर्ष कोणत्या गावात जाऊन काम केली नाहीत. पण, खासदार नवनीत राणा यांनी एकाच गावात पाच पाच वेळा जाऊन कामे केली, लोकांशी संवाद साधला. पण, तरीही कुणाचे काही असेल ते लवकरच बाहेर काढू, असा टोलाही त्यांनी लगावला.

नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस येतील. माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि अभिजीत अडसूळ हे देखील खासदार नवनीत राणा यांचाच प्रचार करतील ही काळ्या दगडावरील रेष आहे. आगामी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची निवड होणार आहे. तेथे राजकीय पोळी शेकण्यासाठी काहीची कुजबुज चालू आहे. पण, लक्षात ठेवा आम्हीच येथे निवडणूक लढवू असे राणा यांनी स्पष्ट केले.