पत्र नाही ग्रंथ दिला, विषय माहीत नाही आणि लक्षवेधीचं पत्र, देवेंद्र फडणवीस यांची धुवांधार बॅटिंग

| Updated on: Jul 16, 2023 | 9:50 PM

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी चहापानाचा आनंद घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.

पत्र नाही ग्रंथ दिला, विषय माहीत नाही आणि लक्षवेधीचं पत्र, देवेंद्र फडणवीस यांची धुवांधार बॅटिंग
DCM DEVENDRA FADNAVIS
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुंबई | 16 जुलै 2023 : विरोधकांनी सत्ताधारी पक्षाने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यावरून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांवर सडकून टीका केली. विधिमंडळात आम्ही जास्तीत जास्त चर्चा करु. लोकांच्या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न करु. विरोधी पक्ष अद्याप निराशेच्या मानसिकतेतुन बाहेर निघाला नाही. एकीकडे लोकशाहीच्या गप्पा मारायच्या आणि लोकशाहीच्या मंदिराने दिलेल्या निर्णयाला मानायचे नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महाराष्ट्र FDI मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. 2.38 लाख कोटी गुंतवणूक आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे. तीन राज्यांचे आकडे एकत्र केले तरी महाराष्ट्राची गुंतवणूक जास्त आहे. जे सरकार आले त्यावर जनतेचा प्रचंड विश्वास आहे. राज्यात अजून समाधानकारक पाऊस नाही. शेतीच्या प्रश्नांवर सरकार लक्ष देवून आहे. सर्व प्रश्नांवर आम्ही सभागृहात उत्तर देऊ असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पवार साहेबांनी पत्र दिले पण…

पवार साहेबानी आम्हला एक पत्र दिले आहे. त्यात शिक्षणाचा क्रमांक सातव्या क्रमांकावर गेला असे म्हटलंय. पण, ती आकडेवारी MVA च्या काळातली आहे. पण, ते महत्वाचं नाही. सरकार कोणाचे हे महत्वाचे नाही पंरतु महाराष्ट्र मागे गेला ही वस्तूस्थिती नाही. याबाबत जास्तीत जास्त चर्चा होईल असा सरकारचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ते पत्र नाही ग्रंथ…

उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. आम्ही विरोधीपक्षाला चहापानाला बोलवले होते पण ते आले नाही. विरोधी पक्षाने आम्हांला एक पत्र दिले आहे. ते पत्र नाही तर दहा पानी ग्रंथ दिला आहे. लक्षवेधी प्रश्न देतात तसे हे पत्र आहे. विरोधी पक्षांना नेमका विषयच माहीत नाही असा टोला फडणवीस यांनी यावेळी लगावला.