रत्नागिरी : कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात (Untimely Rain) अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज सुरवातीला (Meteorological Department,) हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार आता झालेल्या पावसामुळे (Orchard) फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, आता अवकाळीचा फटका विदर्भासह मराठवाड्यालाही बसणार आहे. विदर्भ, मराठवाडा ते कर्नाटक या भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये आगामी दोन दिवस ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. भर उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याची अनुभती येत आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील पिकांची काढणी झाल्यावर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नुकसान टळले असले तरी कोकणात आंबा फळबागांचे नुकसान हे सुरुच आहे.
अवकाळीची अवकृपा ही कोकण आणि उत्तर महाराष्ट्रामध्येच अधिक झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे केवळ 40 टक्के आंबा फळपिक शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले आहे. आता तिसऱ्या हंगामातील आंबा झाडावर आहे. 15 एप्रिलपासून याची तोड होणार असे सांगितले जात होते पण अवकाळी पावसामुळे पुन्हा फळगळती सुरु झाली आहे. फळगळतीमुळे उत्पादनावर तर परिणाम झालाच आहे पडलेला आंबाही डागाळत आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना ना अपेक्षित उत्पादन पदरी पडलेले आहे ना दर. यंदाचा हंगाम नुकसानीचाच ठरत आहे.
मध्य महाराष्ट्रासह कोकणातील काही भागात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अणखी दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसणार आहे. 13 एप्रिलपर्यंत अशीच स्थिती राहणार आहे. तर 14 एप्रिलपासून हवामान कोरडे आणि आकाश हे निरभ्र राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रत्नागिरीमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तापमानात काही अंशी घट झाली आहे.
मराठवाड्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. सुरवातीला औरंगाबादसह जिल्ह्यात तर आता उर्वरित भागात पावसाने हजेरी लावलेली आहे. सोमवारी उस्मानाबाद, लातूर, परभणी जिल्ह्यात अवकाळीची अवकृपा झाली तर अद्यापही ढगाळ वातावरण कायम आहे. मराठवाड्यात जरा उशिराने पावसाला सुरवात झाल्याने रब्बी हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. सध्या ज्वारी, गहू, हरभरा या मुख्य पिकांची काढणी कामे अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, कोकणासह उत्तर महाराष्ट्रातील फळपिकांना अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला आहे.
11 April: Maharashtra weather in last 24 hrs.
Light to mod rains also reported at isolated places with thunderstorms and lightning too in south madhya mah, S Konkan and parts of Marathwada
cloudy sky prevailed at few places pic.twitter.com/BIHE9MkJT2— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 11, 2022
Sugarcane Sludge : ऊस फडातच, गाळप बंद, सांगलीत साखर आयुक्तांच्या आदेशालाही केराची टोपली
Nanded : पीक विम्याचा प्रश्न चिघळला, कृषिमंत्र्यांचे भाकीत अखेर खरे ठरले, नांदेडमध्ये असे काय घडले?