तुर्कस्थानचे हादरे ताजे असतांना महाराष्ट्रात भूकंपाचे सौम्य धक्के, कोणत्या गावात भीतीचे वातावरण?

| Updated on: Feb 20, 2023 | 7:47 AM

तुर्कस्थान या देशात भूकंपामुळे काही क्षणात होत्याचे नव्हते झाले आहे. सोशल मीडियाद्वारे समोर आलेले व्हिडिओ फोटो बघून अधिक नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तुर्कस्थानचे हादरे ताजे असतांना महाराष्ट्रात भूकंपाचे सौम्य धक्के, कोणत्या गावात भीतीचे वातावरण?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : तुर्कस्थानमध्ये झालेल्या भूकंपाचे ( Earthquake ) विध्वसंक दृश्य संपूर्ण जगाने पहिले. सोशल मीडियावर याबाबत फोटो, व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाल्याने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भूकंपाची तीव्रता पाहता तुर्कस्थानचे होत्याचे नव्हते झाले आहे. अशातच महाराष्ट्र आणि गुजरात सीमावर्ती ( Maharashtra Gujrat Border ) भागात तीन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. याच भागात अनेकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. तुर्कस्थानचे दृश्य ताजे असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून खळबळ उडाली आहे.

गुजरात सीमावर्ती भागात असलेली राशा, रघतविहीर आणि फणसवाडा या गावांत चोवीस तासात तीन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाशिक जिल्ह्यातील गावे असल्याने सुरगाणा तहसीलदार सचिन मुळीक यांनी याबाबत गावात जाऊन भेट घेत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे. खरंतर या भागात यापूर्वीही भूकंपाचे धक्के जाणवले आहे.

हे सुद्धा वाचा

तुर्कस्थान या देशात भूकंपामुळे काही क्षणात होत्याचे नव्हते झाले आहे. सोशल मीडियाद्वारे समोर आलेले व्हिडिओ फोटो बघून अधिक नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तुर्कस्थानची स्थिती पाहता महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर्ती भागात यापूर्वीही अनेकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे. यामध्ये आता पुन्हा शनिवारी दुपार पासून चोवीस तासांच्या अंतरावर तीन वेळेस धक्के जाणवले आहे.

गुजरात आणि महाराष्ट्राच्या सुरगाणा परिसरात अनेकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे. याशिवाय नाशिकच्या सुरगाणा तालुक्याबरोबरच पेठ, कळवण या भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहे.

शनिवारी ( 18 फेब्रुवारी ) पहाटेच्या वेळी एक भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला, त्यानंतर काही क्षणात दूसरा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. त्यानंतर दुपारी 2 वाजेच्या दरम्यान सौम्य धक्का जाणवल्याची माहिती नागरिकांनी प्रशासनाला दिली आहे.

विहीरीतून फायरचा बार उडविला जातो अगदी तशाच स्वरूपाचा आवाज आला आहे. काही वेळ नागरिकांना चक्का आल्यासारखे झाले होते. घरात मांडणीत लावलेले भांडे खाली पडले. संपूर्ण गावात ही घटना झाल्याने मोठा आवाज झाला होता.

खरंतर या भागातील नागरिकांना ही सवय झाली आहे. भूकंपाचे सौम्य धक्के नवीन नाहीत. मात्र, तुर्कस्थानची घटना पाहता नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासन घाबरून जाऊ नये असे आवाहन करीत आहे.

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या हद्दीत उंबरठाण येथे भूकंपाची तीव्रता मोजण्याकरिता मापक बसविले होते. त्यावरून याबाबतची माहिती दिली जायची. आता त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.