मुंबई – एसटी महामंडळाची सेवा गावखेड्यापर्यंत पोहचली आहे. त्यामुळे एसटीला ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हटले जाते. आता एसटी महामंडळाच्या अनेक योजनांमुळे एसटी उत्पन्न हळूहळू वाढू लागले आहे.एसटीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना आणखीन चांगली सेवला द्यावी आणि त्यांच्या कामगिरीत आणखी सुधारणा व्हावी यासाठी त्यांना प्रोत्साहन देणारी नवी योजना या 1ऑगस्ट महिन्यांपासून सुरु झाली आहे. या महिन्यांपासून दररोज एसटीच्या प्रत्येक आगारात टॉप – 5 उत्कृष्ठ सेवा देणार्या कर्मचाऱ्यांना गुण गौरव आगार पातळीवर करण्यात येणार आहे.
1ऑगस्ट,2024 पासून एसटीच्या 251 आगारांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या 5 ड्रायव्हर, 5 कंडक्टर , 5 यांत्रिकी कर्मचाऱ्यांचा आगार पातळीवर दररोज गुणगौरव करण्यात येणार आहे. एसटी महामंडळात सध्या 88 हजार पेक्षा जास्त कर्मचारी आणि अधिकारी काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यामध्ये चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. या कर्मचाऱ्या प्रवाशांशी रोजचा संबंध येत असतो. त्याच्या कामगिरीवरच एसटी प्रतिमा अवलंबून असते. त्यामुळे प्रत्यक्ष सेवा देणे, तिकीट विक्रीतून उत्पन्न वाढविणे, इंधन बचतीतून खर्च कमी करणे आणि गाडीची सुयोग्य देखभाल ठेवून तांत्रिकदृष्ट्या योग्य गाडी मार्गस्थ करण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर असते.
एसटीची प्रवाशांशी संबंधीत सर्व महत्त्वाची कामे प्रामुख्याने चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचारी करत असतात. त्यांच्या कामगिरीवर एसटी महामंडळाचे उत्पन्न अवलंबून असते. अशा कामगारांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्याच्या हेतूने आगारात दररोज उत्कृष्ट काम करणाऱ्या 5 चालक, 5 वाहक, 5 यांत्रिकी कर्मचारी यांचा सत्कार करावाअसे निर्देश एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी सर्व आगार व्यवस्थापक यांना दिले आहेत.