चिपळूण – चिपळूण (Chiplun) येथे स्थानिक प्रशासनाच्या बैठकीत परशुराम घाटातील (Parashuram Ghat) वाहतुक महामार्ग रुंदीकरणाच्या कामासाठी आज दुपारी 11 ते 5 कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक 25 एप्रिल पासून अंदाजे महिन्याभरासाठी परशुराम घाटातील रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर चालणार आहे. पावळ्यापुर्वी काही कामे करायची असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच परशुराम घाटात पावसाळ्यात प्रवास करीत असताना प्रवाशांना अधिक त्रास होत होता. अवजड वाहने जात असताना इतर वाहनांना देखील त्रास व्हायचा त्यामुळे स्थानिक प्रशानसनाने रूंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. आज पासून परशुराम घाटातील वाहतुकीबाबतचे बदल लागू होतील अशी माहिती अधिकारी यांनी दिली. आता पर्यायी मार्गाने म्हणजे आंबडस – चिरणी – लोटे रस्ता व कळस – आंबड- धामणंद रस्ता मार्ग पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे. सर्व प्रकारची अवजड वाहने कराड (Karad) मार्गे जातील अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
पावसाळ्यात अपुऱ्या रस्त्यामुळे अवजड वाहनांचे अपघात होत असतात. तसेच रस्त्याला कायम वाहनांची रहदारी असते. तिथल्या अनेकदा रस्ता रूंदी करणाची मागणी स्थानिकांनी केली होती. ती मागणी मान्य झाल्याने रस्त्याचे काम आजपासून सुरु होणार आहे. साधारण हे काम एक महिना चालण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाळ्यापुर्वी लोकांना मोठा रस्ता प्रवास करण्यासाठी मिळणार आहे. काम सुरू असताना आंबडस – चिरणी – लोटे रस्ता व कळस – आंबड- धामणंद रस्ता मार्ग पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सर्व अवजड वाहने कराड मार्गे जातील.