नाशिक : सबंध देशात सध्या हर घर तिरंगा ह्याच अनोख्या उपक्रमाची रेलचेल सुरु आहे. यामुळे (Indian) राष्ट्राबद्दलचा अभिमान समोर येणार असून पुढील तीन दिवस हा तिरंगा प्रत्येकाच्या घरावर फडकणार आहे. आतापर्यंत तिरंगा केवळ (Government Office) सरकारी कार्यायांवरच फडकवला जात होता पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सबंध देशात पार पडत आहे. त्यामुळे स्वातंत्र्यासाठी ज्यांचे योगदान आहे त्यांची आठवण आणि पुढील पिढीला प्रेरणा मिळावी हाच यामागचा उद्देश असल्याचे (Raosaheb Danve) मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. नाशिक आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. घरघर तिरंगा यामागचा उद्देश आणि सरकारची धोरणे यावेळी त्यांनी उपस्थितांना पटवून दिली.
सध्या भाजपाचे 9 केंद्रीय मंत्री हे राज्यातील 12 लोकसभा मतदार संघात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु असलेला हर घर तिरंगा या उपक्रमाला हे मंत्री उपस्थित राहत असून प्रत्येक मतदार संघात तीन कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. स्वातंत्र्यासाठी ज्या सैनिकांनी योगदान दिले त्यांचा इतिहास सांगून आताच्या पिढीला प्रेरणा मिळेल असे मार्गदर्शन केले जात आहे. तर दुसरीकडे केंद्राची धोरणे काय आहेत ? हे देखील पटवून दिले जात आहे. 12 मार्च 2021 ला अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाला सुरवात झाली तर 15 ऑगस्ट 2022 ला समारोप होईल असेही दानवे यावेळी म्हणाले.
स्वातंत्र्यासाठी वीर सावरकर यांनी केलेला संघर्ष भारतीयांच्या मनात कायम राहणारा आहे. त्यांनी देशासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली होती. हे एक उदाहरण आहे. पण त्यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकाचे योगदान हे महत्वाचे आहे. अशाच योगदानाची जाणीव आजच्या पिढीतील तरुणांना व्हावी म्हणूनच हा उपक्रम केंद्राने हाती घेतला असल्याचे दानवे यांनी सांगितले. तर भगूर मधील 75 स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांचे नातेवाईक अंदमानला जाणार असतील तर त्यांची जाण्याची व्यवस्था आम्ही रेल्वे मंत्रालया मार्फत केली जाईल असेही ते म्हणाले. केंद्रातील सर्व मंत्री सर्व ठिकाणी जाऊन स्वातंत्र्य स्मारकाला भेट देऊन स्वतंत्र सैनिकांचा सन्मान करत आहेत, मोदींनी तसे आदेश दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
काळाच्या ओघात इंधन दरात वाढ होत असली तरी रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना सोई-सुविधा देण्याचा कायम प्रयत्न करण्यात आला आहे. मध्यंतरी रेल्वेच्या तिकीट दरात कपात व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार रेल्वेच 2 रुपयांचे तिकीट काढले तर त्यामागे सरकार 55 पैसे भरते पण प्रवाशांना झळ बसू दिली जात नसल्याचे दानवे म्हणाले. ही भरपाई माल वाहतुकीमधून काढली जात असल्याचे सांगितले. रेल्वेमध्ये कर्मचाऱ्यांपेक्षा निवृत्त असलेले अधिक आहेत. त्यांनाच पेन्शन अधिकची जात असल्याचेही त्यांनी सांगितले. मिशन लोकसभा नव्हे तर अशा कार्यक्रमातून राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे ही भावना असल्याचेही दानवे म्हणाले आहेत.