टीव्ही नाईन मराठीने मायलेकाची व्यथा जगासमोर आली, दगडाला बांधलेल्या मुलाला मिळाला एकनाथ शिंदे यांचा मदतीचा हात

| Updated on: Mar 25, 2025 | 8:37 PM

या 3 वर्षीय मुलाची माता मोनाली अक्षय चव्हाण या टीव्ही नाईन मराठी चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना भावूक झाल्या.आपला लाडक्या निलेशला पोलीस करण्याचे आपले स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

टीव्ही नाईन मराठीने मायलेकाची व्यथा जगासमोर आली, दगडाला बांधलेल्या मुलाला मिळाला एकनाथ शिंदे यांचा मदतीचा हात
Follow us on

आपल्या पोटच्या गोळ्याला दगडास बांधून पोटाची खळगी भरणाऱ्या आईचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने टीव्ही ९ मराठी चॅनलने त्याची बातमी केली. त्यानंतर राज्याचे संवदेनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याची दखल घेतली. आणि या मुलाला ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले आहे. या मुलावर सर्व आवश्यक उपचार करणार असल्याचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी म्हटले आहे. तीन वर्षांच्या या मुलाला आणि त्यांच्या कुटुंबाला टीव्ही नाईनच्या बातमीमुळे वैद्यकीय आधार मिळाला आहे. वैद्यकीय मदत पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी टीव्ही नाईनने या घटनेला वाचा फोडल्याबद्दल आभार मानले आहेत.

तीन वर्षांच्या मुलाला दोरीच्या सहाय्याने दगडाला बांधून मजूरी करणाऱ्या आईचा पोटच्या पोराचा बांधलेला विडिओ वायरल झाल्यानंतर टीव्ही 9 वृत्तवाहिने या घटनेची दखल घेत बातमी दाखवली आणि याच बातमीची दखल राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. आणि 24 तासांच्या आत सातारा जिल्ह्यातून त्या लहानग्या मुलाला आणि त्याच्या पालकाला ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात आणण्याची व्यवस्था केली. या मुलाचा सर्व वैद्यकीय खर्च करण्यासही त्यांनी पुढाकार घेतला आहे. शिवसेना वैद्यकीय पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आणि सहायक भरत गोपाळे यांनी या मुलाची आणि त्याच्या पालकांची ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांशी भेट घालून दिली आहे.

 मुलगा कुठे जाऊ नये यासाठी…

सातारा जिल्ह्यातील पातेपूर या गावातील अक्षय चव्हाण आपल्या पत्नीसोबत मजुरी करुन गुजराण करतात. त्याना एक तीन वर्षांचा मुलगा असून हा मुलगा जन्मापासून मुकबधीर आहे. तसेच दिवसभर आई-वडील काम करीत असताना या मुलाला पाहण्यासाठी कोणी नाही म्हणून त्याला दोरीच्या सहाय्याने दगडाला बांधून ठेवावे लागते. मुलगा कुठे जाऊ नये यासाठी त्याची आई तिच्या पद्धतीने ही काळजी घेत होती. या वृत्ताची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत नेहमी प्रमाणे मदतीची तात्काळी तयारी दाखविली आहे.

हे सुद्धा वाचा

बातमी सलग दाखवली.. मायलेकाची व्यथा जगासमोर आली

या तीन वर्षीय मुलाचा सर्व वैद्यकीय खर्च करणार असल्याचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखांनी सांगितले आहे. चव्हाण कुटुंबीयांना 24 तासाच्या आत मूळ गावावरून ठाण्यातील जुपिटर रुग्णालय पुढील उपचारासाठी आणण्यात आले आहे. ज्या पद्धतीने टीव्ही नाईन वृत्तवाहिनीने ही बातमी सलग दाखवली त्यामुळे आणि मायलेकाची व्यथा जगासमोर आली. शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांचे सहायक भरत गोपाळे यांनी टीव्ही नाईन इनपुट हेड प्रमुख मोहन देशमुख आणि स्थानिक प्रतिनिधी संतोष नलावडे यांचे आभार मानले आहेत.