बदलापूर : बदलापूर पालिकेच्या कोव्हिड केअर सेंटरमधील आयसीयू विभाग अखेर सुरु करण्यात आला आहे. गेल्या 4 महिन्यांपासून हा विभाग बंद असल्याने शहरातील गंभीर रुग्णांची उपचारांसाठी फरपट होत होती. ही बाब टीव्ही 9 मराठीनं समोर आणली होती. यानंतर अखेर हे आयसीयू पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. (TV9 Impact Badlapur Covid ICU started after 4 Months)
कोरोनाच्या गंभीर रूग्णांवर शहरातच मोफत उपचार उपलब्ध व्हावेत, या हेतूने ऑक्टोबर महिन्यात आयसीयू विभाग सुरु करण्यात आला होता. बदलापूर पश्चिमेच्या गौरी सभागृहात कुळगाव बदलापूर नगरपालिकेने हा विभाग सुरु केला होता. पण गेल्या 4 महिन्यांपासून हा विभाग बंद होता. त्यामुळे बदलापूर शहरातील कोरोनाच्या गंभीर रूग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत होते. त्याशिवाय खर्चही अधिक होत होता. याबाबतची बातमी टीव्ही 9 मराठीने प्रदर्शित केली होती. (TV9 Impact Badlapur Covid ICU started after 4 Months)
त्याची दखल घेत बदलापूर नगरपालिकेने हा आयसीयू विभाग सुरु करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. त्यानंतर तातडीनं सोपस्कार पूर्ण करत अखेर काल (मंगळवारी) हा आयसीयू विभाग पुन्हा सुरु करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी या आयसीयूत 12 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे आता बदलापूर शहरातील गंभीर रुग्णांना शहरातच मोफत उपचार घेता येणार आहेत.
बदलापूर नगरपालिकेनं एका खासगी कंपनीच्या मदतीने गौरी सभागृहातील आयसीयू विभाग 15 ऑक्टोबर रोजी सुरू केला. त्यावेळी तिथे 30 खाटांची सुविधा उपलब्ध होती. या आयसीयू विभागामुळे नगरपालिका क्षेत्रात अतिदक्षता विभागाचे उपचार मोफत देणारी बदलापूर नगरपालिका राज्यातली पहिली नगरपालिका ठरली होती.
एकीकडे पुन्हा एकदा बदलापुरात रुग्णसंख्या वाढत असतानाच शहरातला पालिकेचा आयसीयू विभाग बंद असल्याने पालिका प्रशासनावर संताप व्यक्त केला जात होता. शहरात आतापर्यंत स्वागत कमानी, चौक सुशोभीकरण, कला नसलेली दालनं अशा दुय्यम गोष्टींसाठी कोट्यवधी रुपये खर्च होतो. मात्र आरोग्यासारख्या अतिमहत्त्वाच्या गोष्टींवर खर्च करण्यास हात आखडता घेतल्यानं शहरात नाराजी व्यक्त केली जात होती. (TV9 Impact Badlapur Covid ICU started after 4 Months)
संबंधित बातम्या :
बदलापूर पालिकेचं कोव्हिड ICU 4 महिन्यांत बंद; रुग्णांची फरफट