अखेर शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश आले आहे. केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या सीमा शुल्क विभागाने मोठी मागणी घोषणा केली असून कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवले आहे.
कोरटकर वर्षावर असतील तर संजय राऊत यांनी तेथे जाऊन कोरटकरांना घेऊन यावे असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
कोरटकरला पाठीशी घालणारे लोकही साधीसुधी नसावी असे दिसतंय. कोरटकरला काही राजकीय विचारधारेचा सपोर्ट असल्यासारखे दिसून येतंय असे वकील असिम सरोदे यांनी म्हटले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपायूनच धगाळ वातावरण आहे. तर राज्यात अवकाळी गारपिटीची शक्यता आहे. मुंबईत ऊष्ण व दमट हवामान वाढणार तर उर्वरित महाराष्ट्रात अवकाळी पाऊस येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विरोधात सध्या अॅक्शन मोडमध्ये आहे. ठाण्यातील येऊर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बेकायदा हॉटेल्स सुरु होते. आता या बेकायदा हॉटेल्सवर अतिक्रमण विभागाची कारवाई सुरु झाली आहे. १५ दिवसांमध्ये खुलासा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत अन्यथा बांधकाम निष्कसित करण्यात येणार असे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.
नागपूर राड्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. यात त्यांनी नागपूर राड्याचा घटनाक्रम आणि परिस्थितीचा आढावा घेतला. हिंचारातील 104 आरोपींची ओळख पटली असून त्यातील 92 जणांनी अचक करण्यात आलं आहे.तसेच या आरोपींमध्ये काहीजण अल्पवयीन असल्याचंही फडणवीसानी दिली आहे. तसेच दंगा करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई होणार आहे. सोशल मीडियावर हिंसा घडवणाऱ्या पोस्ट करणाऱ्याना सहआरोपी करणार असून चुकीची पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान राडा करणाऱ्यांनी जी वाहनांची तोडफोड केली, तसेच जे काही नुकसान केलं त्याची नुकसान भरपाई ही त्यांच्याकडूनच वसूल करून घेणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. आणि जर त्यांनी नुकसान भरपाई दिली नाही तर थेट त्यांची संपत्ती जप्त करणार असल्याचंही फडणवीस म्हणाले. 3 ते 4 दिवसांत नुकसान भरपाई देणार असल्याचा विश्वास फडणवीसांनी दिला आहे
नागपूर राड्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. यात त्यांनी नागपूर राड्याचा घटनाक्रम आणि परिस्थितीचा आढावा घेतला. हिंचारातील 104 आरोपींची ओळख पटली असून त्यातील 92 जणांनी अचक करण्यात आलं आहे.तसेच या आरोपींमध्ये काहीजण अल्पवयीन असल्याचंही फडणवीसानी दिली आहे. तसेच दंगा करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई होणार आहे. तसेच सोशल मीडियावर हिंसा घडवणाऱ्या पोस्ट करणाऱ्याना सहआरोपी करणार असून चुकीची पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचं त्यांनी म्हटलं. आंदोलनावेळी कुराणची आयात लिहिलेली चादर जाळल्याची अफवा असल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.संचारबंदीकरून लवकरात लवकर शिथिलता आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
नागपूर हिंसाचारात एका जखमीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इरफान अन्सारी असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव होतं. नागपुरातील मेयो रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. मुख्यमंत्र्यांकडून नागपुरातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. फडणवीसांनी सद्य परिस्थितीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच नागपूर राडा प्रकरणातील आरोपींची संख्या 105 वर गेली असून या हिंसाचाराप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडे आरोपी फहिम खानने जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्या जामीन अजार्वर सोमवारी सुनावनी होणार आहे.
नागपूर हिंसाचारात एका जखमीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इरफान अन्सारी असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव होतं. नागपुरातील मेयो रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. मुख्यमंत्र्यांकडून नागपुरातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. फडणवीसांनी सद्य परिस्थितीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच थोड्याच वेळात फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत.
tv9 ने बातमी दाखवल्यानंतर शासनाला आली जाग. धू़ळ खात पडलेल्या आरोग्य विभागाच्या 100 शव वाहिकांच्या वाटपास सुरुवात. काल म्हणजेच शुक्रवारी पाच शववाहिन्यांचं वाटप करण्यात आलं, तर आज चार शववाहिका देण्यात येणार आहेत. 35 कोटीच्या 100 शववाहिका धूळखात पडल्या होत्या.
प्रशांत कोरटकर विदेशात फरार झाल्याची चर्चा आहे. त्यावर “सोयरा आहे ना, सरकारचा सोयरा आहे ना तो, त्याच्यामुळे सापडणार नाही. बाकीचे असते तर नसते कशातरी मध्ये टाकले असते. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून जेवढी मकोकासारखी कलमं आहेत, तेवढी कलमं त्यांच्यावर टाकली पाहिजेत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“महाराष्ट्राला स्वतंत्र गृहमंत्री मिळावा. महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री नाही. महाराष्ट्राचा गृहविभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का?” काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
मुंबईतील रुग्णालयांमध्ये सध्या रुग्णांची मोठी गैरसोय… MRI, सीटीस्कॅनसाठी करावं लागतंय 15 दिवस ते 1 महिना वेटिंग… सीटीस्कॅन, MRI मशीन दुरुस्त करण्याते 2 महिन्याआधी निर्देश…
मनसेच्या गुडी पाडवा मेळाव्याच्या परवानगीला मान्यता… दादर शिवाजी महाराज मैदानात ३० मार्चला होणार मेळावा… मुंबई पालिका आणि पोलिस प्रशासनाची मिळाली परवानगी मनसेला परवानगी…. राज्यभरातून येणाऱ्या मनसैनिकाना राज ठाकरे करणार संबोधित… मुंबईच्या शिवाजी पार्कवर मनसेच्या राज ठाकरेंच्या या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे…. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका मांडणार? महापालिकेची पक्ष बांधणी ते महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणावर राज ठाकरे घेणार भूमिका…
निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणासह गोदावरी नदी पात्रात जलपर्णीचा विळखा… पक्षांचे अन्नपाणी धोक्यात… पाणी दूषित झाल्याने पाणीपुरवठा योजनेवर असलेल्या लाभार्थ्यांचे आरोग्य धोक्यात… जलपर्णी तातडीने न काढल्यास करंजगाव येथील नागरिकांनी आक्रमक होत दिला जलसमाधीचा इशारा…
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागणाऱ्या महिलेला सातारा न्यायालयात केले हजर… जुने प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटींपैकी 1 कोटी स्वीकारताना संबंधित महिलेला सातारा पोलिसांनी शुक्रवारी केली होती अटक… सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधित महिलेवर गुन्हा दाखल आहे…
अंधेरी येथील के पूर्व विभाग कार्यालयावर झोपडपट्टीवासियांनी आंदोलन केले. भूखंड क्रमांक १८७, नगर योजना क्रमांक वी भूखंडावर अधिकृत बांधकामवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह 25 माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेच्या नोटीसा आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील विविध पक्षांचे अनेक बडे राजकीय नेते गोत्यामध्ये आले आहेत.
देशाच्या न्यायव्यवस्थेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. दुसऱ्याकडे जर अशी रक्कम सापडली असती तर लागलीच ईडी, सीबीआय पोहचली असती पण हे भाजपाने नियुक्त केलेले न्यायमूर्ती असल्याचा घणाघात राऊतांनी केला.
डोंबिवलीत लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासाठी सर्वपक्षीय कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. याविषयीचा ठराव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. पण अद्याप निर्णय प्रलंबित असल्याने बैठक ठेवण्यात आली आहे.
तमाशा अश्लील नाही तर चावट आहे तमाशाला बदनाम करणं थांबवा अशा शब्दात रघुवीर खेडकरांनी राज्य सरकारला इशारा दिलाय.
राज्यातील सरकार हे मनोरुग्णांचे सरकार आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला. भाजपाच्या राजवटीत काहीही होऊ शकतं असे ते म्हणाले.
महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जळगावत ओबीसींचा महाएल्गार मेळावा होत आहे. जळगावातील मानराज पार्क मैदानावर सायंकाळी 6 वाजता समता परिषदेचा महाएल्गार मेळावा पार पडत आहे.
पुण्यात अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात तब्ब्ल अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. आता अधिकार्यांना अजित पवारांनी आतमध्ये बोलवले आहे.
बीड: देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात झाला असून त्यामध्ये लोणारे कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी आहेत.
नाशिकहून तुळजापूरला जाताना बीडजवळ पहाटेच्या सुमारास झाला अपघात. रांजणी गावाजवळ गाडी पुलावर आदळली. सर्व भाविक नाशिक जिल्ह्यातील सिन्नर गावचे रहिवासी. गंभीर जखमींत बालकांचा समावेश असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पिंपरी- चिंचवड नदीकाठी सुशोभीकरण प्रकल्पातील वाकड ते सांगवी या प्रस्तावीत 1 हजार 150 पेक्षा अधिक झाड तोडण्याचा प्रस्तावावर नागरिकांनी आक्षेप नोंदवला आहे. या संदर्भात अधिकारी उमेश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली. यासाठी पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधून 70 नागरिक हजर होते.
अकोल्याच्या बाळापूरमध्ये 2 तरूणांना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप होत आहे. स्टेटस ठेवण्यावरून पोलिसांनी या दोघांना मारहाण केली असा आरोप आहे. आपला कोणताही दोष नाही असा दावा या तरूणांनी केला आहे.
पुण्यात अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा सुरू. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या बैठकीनिमित्त दोन्ही नेते आज पुण्यात असून बैठकीपूर्वी त्यांची चर्चा सुरू आहे. या बैठकीसाठी शरद पवारही उपस्थित राहणार आहेत.
हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल अपघात अपडेट – ज्या कंपनीत कामगार काम करत होते, तिथे जाऊन हिंजवडी पोलिसांनी काल बेंझिन सोल्युशन हे केमिकल कशा पद्धतीने ठेवलं जातं, याची पाहणी केली. ते किती सुरक्षित ठेवलं आहे, ते कंपनीत कुठल्या बाजूला आहे. याची तपासणी करण्यासाठी काल हिंजवडी पोलीस ह्योमा ग्राफिक्स कंपनीत पोहोचले होते.
कंपनीतील मशीन्स साफ करण्यासाठी हे केमिकल वापरलं जातं. अद्यापही कंपनीत जवळपास 35 लिटर बेंझिन सोल्युशन असल्याचे पोलीस तपासात समोर आलेला आहे. याबाबत कंपनी मालकाकडे सर्व बिलं आहेत. आरोपी जनार्दन हंबर्डेकरने चोरलेल्या बेंझिन सोल्युशन केमिकल संदर्भात कंपनी दोषी आहे का? याचा देखील तपास आता हिंजवडी पोलीस करत आहेत.
नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपूरमध्ये आहेत. त्यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही बोलावली असून ते हिंसाचाराच्या घटनेचा आढावा घेणार आहेत. याप्रकरणी आणखी दोघांना अटक. डीसीपवरील हल्ला, महिला पोलिसाचा विनयभंग याची गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस आज नागपुरात. हिंसाचाराच्या घटनेनंतर ते आज पहिल्यांदाच नागपूरमध्ये आहेत. त्यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही बोलावली आहे. मुख्यमंत्री फडणवीस आज हिंसाचाराच्या घटनेचा आढावा घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या पुन्हा एकत्र येणार आहेत. पुण्यातील मांजरी येथील वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटची आज सकाळी दहा वाजता बैठक होणार असू त्यावेळी दोन्ही पवार एकत्र येणार आहेत. काँग्रसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे शहर,पिंपरी-चिंचवड तसेच पुणे जिल्हा शाखांच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या तसेच पक्षाच्या आजीमाजी लोकप्रतिनिधींच्या ते काँग्रेसभवनमध्ये बैठका घेतील. जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व शासकीय विभागांची आढावा बैठक घेतली. सर्व शासकीय यंत्रणांनी 31 मार्चपूर्वी आपले कामं पूर्ण करावेत , निधी परत जाता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. यासह देश-विदेश, राज्यातील, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घटनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.