राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्रातील सर्वच मोठे, छोटे पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. त्यातच आता सर्व पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. तसेच महायुती आणि महाविकासआघाडीतील जागावाटपाच्या चर्चाही होताना दिसत आहेत. त्यासोबतच राज्यात पुन्हा एकदा पावसाने कमबॅक केले आहे. सध्या महाराष्ट्रात सर्वत्रच दमदार पाऊस होत आहे. येत्या मंगळवारपर्यंत मुंबई, पुणे, नाशिकमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस कोसळू शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मुंबईत काळबादेवी परिसरात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झालाय. फणसवाडीतील इमारतीची ३० फूट लांब भिंत कोसळली आहे. शेजारील इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू असताना ड्रिल मशीनच्या वायब्रेशनुळे दुर्घटना घडल्याचा दावा केला जातोय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितीन पाटील यांची आज राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. यावेळी त्यांनी विधानभवनात निवडणूक अधिकाऱ्यांकडून पत्र स्वीकारले. बिनविरोध निवड झाल्याबद्दल पक्षाचे कोषाध्यक्ष आणि सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी पक्षाचे सहकोषाध्यक्ष संजय बोरगे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्या देवत आहेत. झालेली घटना दुर्दैवी आहे. हा पुतळा नेवी ने उभारलेला. ४५ किलोमीटर प्रतितासीवारा होता त्यात हे नुकसान झाले. उद्या त्या ठिकाणी नेवी अधिकारी येणार आहे. आराध्य दैवत असलेल्या महाराजांचा पुतळा लवकरच उभारू, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
सिंधुदुर्ग येथील भंग पावलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानाने उभारण्यात यावा, यावेळी कोणाच्याही स्वार्थासाठी कामाच्या दर्जासोबत कसलीही तडजोड करू नये ही माझ्यासह तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गात उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळणे अतिशय गंभीर आहे. असे नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी. घडलेली घटना दुर्दैवी असली तरी शिवभक्तांनी शांतता राखावी, कायदा व सुव्यवस्था भंग होऊन छत्रपती शिवरायांच्या विचारांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी असे माझे आवाहन आहे, असं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
पुण्यात शरद पवार गटाकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरुन घ्यायला सुरुवात झाली आहे. सर्व इच्छुकांचे अर्ज 5 सप्टेंबरपर्यंत प्रदेश कार्यालयाला देण्याच्या सुचना जंयत पाटील यांनी जिल्हाध्यक्षांना दिल्या आहेत.
छत्रपती संभाजी नगर शहरातील राडा प्रकरणी शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या 32 कार्यकर्त्यांवर तर शिवसेनेच्या तब्बल 28 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. रामा हॉटेलबाहेर झालेल्या राडा प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. छत्रपती संभाजी नगरच्या सिडको पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल केला गेला आहे. पोलिसांनी कलम – 189/2 – कलम 190, कलम 191/1 आणि कलम 132 नुसार गुन्हे दाखल केले आहेत.
शरद पवारांनी पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली. जिल्ह्यातील पक्षाची स्थिती आणि लढवायच्या जागा या सदर्भात चर्चा झाली. अजित पवार गटाचे आमदार असलेल्या मतदारसंघात विशेष रणनिती आखली जाणार आहे.
कंगना राणावतने केलेल्या वक्तव्याचा भाजप पक्षाशी संबंध नाही. भाजप पक्षाकडून अधिकृत पत्र जाहीर करण्यात आले आहे. कंगना राणावतने व्यक्त केलेले मत हे तिचं व्यक्तिगत मत असल्याचं पक्षाने म्हटलंय. शेतकरी आंदोलनावेळी महिलांवर बलात्कार झाले होते असे वक्तव्य कंगनाने केलं होतं
लडाखबाबत गृहमंत्रालयाने मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट केले की, विकसित आणि समृद्ध लडाख बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेला अनुसरून गृह मंत्रालयाने लडाख केंद्रशासित प्रदेशात पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. येथे झंस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे नवीन जिल्हे बनवले जातील.
झारखंडमधील राजकीय घडामोडींवर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, “चंपाई सोरेन यांच्यासमोर 3 मार्ग आहेत, ते सध्या दिल्लीत आहेत, त्यांच्याशी चर्चेचा मार्ग खुला आहे, भविष्यात काय होते ते पाहू.
स्वतःवर झालेल्या हल्ल्याने हताश झालेल्या रशियाने युक्रेनच्या 17 भागात 65 ठिकणांवर हवाई हल्ले केले आहेत. रशियाने राजधानी कीव आणि ल्विव्हला सर्वाधिक लक्ष्य केले आहे. कीवमध्ये 10 हल्ले करण्यात आले आहेत.
कार्यकर्त्यांच्या गदारोळात भाजपने जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीची दुसरी यादीही जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 15 उमेदवारांचा समावेश होता, तर दुसऱ्या यादीत फक्त एका उमेदवाराचा समावेश होता. चौधरी रोशन हुसेन गुजर हे कोकरनाग मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. कोकरनाग ही जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव जागा आहे.
BJP announces name of one candidate in second list for Jammu and Kashmir Assembly elections. #JammuKashmirElections pic.twitter.com/vAGjsH64fa
— Press Trust of India (@PTI_News) August 26, 2024
सोलापूरच्या माढ्यातील म्हैसगावच्या विठ्ठल कार्पोरेशन साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. शेअर्स रक्कम १५ टक्के व्याजासह मागणी करुनही न दिल्याने हे आंदोलन करण्यात आले.
बदलापूर, कोलकातासह विविध ठिकाणी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सांगलीच्या पलूसमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार अरुण आण्णा लाड आणि शरद लाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. मुख्यमंत्री पाहणी करणार असल्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले होते.
परभणीत वंचीत बहुजन आघाडी चारही विधानसभेवर ओबीसी उमेदवार देणार आहे. त्यासाठी पक्षाकडून ओबीसी उमेदवार चाचणी सुरू झाली आहे. 15 सप्टेंबरपर्यंत वंचित बहुजन आघाडीची विधानसभेची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
प्रहार अपंग क्रांतीच्या वतीने जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्यात आले. पुणे जिल्हा परिषद दिव्यांग विभागामधील रिक्त असलेल्या सहाय्यक सल्लागार पदे तत्काळ भरण्यात यावी, या मागणीसाठी आंदोलन झाले. पुणे जिल्हा परिषदेसमोरील रास्त्यावर हे आंदोलन झाले.
पोलिसांनी केली आरोपीला अटक. सतत दोन दिवस केला पाठलाग. देवरी शहरातील घटना. या घटनेमुळे अल्पवयीन शाळकरी मुली शहरात सुरक्षित नसल्याची भीती पीडित मुलीच्या पालकांसह समाजमनात निर्माण.
एक आरोपी अटकेत. नोकरीचे आमिष दाखवुन अनेक लोकांची केली होती फसवणूक… नागरिकांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. कुणी नोकरीच्या नावावर पैसे उघडण्याचा प्रयत्न करत असेल तर तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी असे आवाहन गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी केले आहे.
विकृत मानसिकता जर सरकारमुळे होतं असेल तर समाजाने क्रांती घडवली पाहिजे. बेटी पढाव आणि बेटी बचाव या पेक्षा आता बेटा पढाओ आणि बेटी बचाव हे करण्याची गरज, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले.
44 उमेदवारांची यादी स्थगित करून पुन्हा पंधरा उमेदवारांची यादी जाहीर. पहिल्या यादी वरून काही नेत्यांमध्ये आणि उमेदवारांमध्ये होती नाराजी, सूत्रांची माहिती
जळगावमध्ये 2 मद्यधुंद पोलिसांची जोरदार हाणामारी झाली. वादानंतर एका मद्यधुंद पोलिसाने एका सायकलस्वाराला सुद्धा धडक दिली. या हाणामारीचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पळूण संगमेश्वर मतदार संघाच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. संगमेश्वर मतदार संघावर काँग्रेस पक्षानेही दावा केला आहे.
या मतदार संघात काँग्रेस पक्षाला जनतेचा पाठिंबा असल्याचा दावा. काँग्रेसच्या युवक प्रदेश उपाध्यक्षा सोनल लक्ष्मी घाग यांनी उमेदवारीची मागणी केली आहे.
शिवरायांचा महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही. अच्छे दिन येणार होते, आता 10 वर्ष झाली. पुढील काळात केंद्रात इंडिया आघाडीच सरकार येणार – आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास.
लोकसभेत भाजप 240 च्या पुढे गेले नाहीत. देशात फक्त जनतेचा आवाज चालतो. देशात इंडिया आघाडीच्या विजयासारख वातावरण आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेची तळोजा जेलमध्ये रवानगी . आज आरोपीला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात त्याला तळोजा जेलमध्ये नेले. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण असून, पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेत आरोपीला जेलमध्ये धाडलं.
बदलापूर अत्याचारप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महत्वाची बैठक बोलावली. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस अधिकारी हे या बैठकीसाठी दाखल झाले आहेत. या प्रकरणातील आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.
गेल्या 9 वर्षात सरकारकडे एक हजारांपेक्षा जास्त बनावट जात प्रमाणपत्राद्वारे नोकऱ्या मागितल्या गेल्याची माहिती आरटीआय मधून उघड झाली आहे.
त्यातील फक्त 92 जणांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये बनावट जात प्रमाणपत्र दाखवून मागितल्या गेल्या नोकऱ्या
“आदित्य ठाकरेंनी पळ काढण्यापेक्षा उत्तर द्यावं. माझ्यावरील आरोप खोटे, असं आदित्य ठाकरेंनी सांगावं”, दिशा सालियान प्रकरणावरून नितेश राणेंनी टीका केली आहे.
नवी दिल्ली- जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. भाजपने तिन्ही टप्प्यासाठी 44 उमेदवारांची यादी जाहीर केली. पहिल्या टप्प्यासाठी 15, दुसऱ्या टप्प्यासाठी 10 तर तिसऱ्या टप्प्यासाठी 19 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. नगरोटा विधानसभा मतदार संघातून देवेंद्रसिंह राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राज्यात सर्व शाळांमध्ये पॅनिक बटण बसवणार. पॅनिक बटणद्वारे पोलिसांना गैरप्रकाराची माहिती देता येणार आहे, असं दीपक केसरकर यांनी सांगितलंय. बदलापुरातील शाळेत घडलेल्या प्रकारानंतर आता राज्यातील सर्व शाळांमध्ये पॅनिक बटण बसवण्यात येणार आहे.
बदलापूर प्रकरणात कुणालाही वाचवलं जाणार नाही. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असं दीपक केसरकर म्हणाले.
“मुंबई गोवा महामार्गाची पाहणी आज मुख्यमंत्री करणार आहेत. मात्र काहीही केलं तरी याने चाकरमान्यांना काहीही दिलासा मिळणार नाही. हा सरकारचा गलथान कारभार आहे. अदानी, अनिल अंबानींना रस्ते बांधण्याचा किती अनुभव आहे हे सर्वांना माहिती आहे. आपल्या मित्रांना प्रॉफिट मिळावा यासाठी रस्त्याचं काम त्यांना दिलं जातं. यासाठी नितीन गडकरी यांचंही काही चालत नाही. कारण सगळे निर्णय वरून होत असतात,” अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाणांनी टोला लगावला आहे.
बदलापुरातील अल्पवयीन लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका, सेक्रेटरी यांना आरोपी बनवण्यात आलंय. शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका, सेक्रेटरींना फरार दाखवलंय.
“खासदार वसंतराव चव्हाण यांचं दुःखद निधन झालं. त्यांनी निर्णायक विजय मिळवला होता. विधानसभेच्या तयारीबाबत त्यांच्यासोबत बोलणं झालं होतं. जागावाटपाबाबत चर्चा सुरु होती. ते आजारी पडले होते. पण लगेच बरे होतील अशी अपेक्षा होती,” अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी भावना व्यक्त केल्या.
पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक… पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच आंदोलन… गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची शरद पवार पक्षाकडून मागणी… सोमवारी पुण्यातील वानवडी परिसरात पोलीस अधिकाऱ्यावर गुंडांनी केला होता कोयत्याने हल्ला… त्याच्याच विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आंदोलन
बदलापूर येथे दोन चिमुकलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला आज न्यायालयात हजर करणार… आरोपीला उल्हासनगरमधून कडेकोट बंदोबस्तात पोलीस ताफ्याने कल्याणच्या दिशेने नेण्यात येत आहे. गेल्या दिवसांपासून या प्रकरणामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
राज्यात पोलिसांवर हल्ले होत आहेत… शिंदे गटाने वामन म्हात्रेंना पक्षातून अजून का काढलं नाही… भाजप आमदार किसन कथोरेंवर अजून कारवाई का नाही… बदलापुरात लोकांनी आंदोलन केलं त्याला राजकीय म्हणतात… बदलापुरात घटना घडली त्यात महिलेची तक्रार दाखल करुन घेतली नाही… अंतरवलीत लाठीचार्ज करण्याचे आदेश देणारे जनरल डायर कोण? असे अनेक प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.
वसंत चव्हाणांचं जाणं अत्यंत दुःखद… वसंत चव्हाण अतिशय हरहुन्नरी व्यक्तीमत्व होतं… दुसऱ्या पक्षात असतानाही चव्हाण यांनी कधी कटुता ठेवली नाही… वसंत चव्हाणांना भावपूर्ण श्रद्धांजली… असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.
भाजपकडे कोणतंही काम राहिलेलं नाही… अत्याचाराच्या घटनेवर प्रश्न विचारा, बनावट विषय निर्माण करतात… भाजपकडे सध्या काही काम नाही… संजय राऊतांचा भाजपवर जोरदार निशाणा
मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था… पहाडी दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी खड्ड्यातून प्रवास करावा… मुंबई गोवा महामार्गाचा खड्ड्यांचा वनवास मुख्यमंत्र्यांनी संपवावा… दररोज मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे अपेक्षा व्यक्त… मुंबई ते रत्नागिरी अंतर पार करण्यासाठी लागतोय १२ ते १४ तास…
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ कायम… पंचगंगा नदीचे पाणी पात्र बाहेर… यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्रा बाहेर… पंचगंगा नदीची पाणी पातळी सत्तावीस फूट दोन इंचांवर…
उपमुख्यमंत्री अजित पवार वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन करणार आहेत. येरवडा परिसरातील बाल न्याय हक्क इमारतीच्या बाजूला असणाऱ्या जागेची अजितदादा पाहणी करणार आहेत. वडगाव शेरी मतदारसंघातील विकासकामांच्या भूमिपूजनावरून महायुतीत तणाव आहे. विकासकामांच्या बॅनर्सवर मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो नसल्याने जगदीश मुळीकांनी टीका केलीय.
भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. छत्रपती संभाजीनगरममधील रामा हॉटेलबाहेर भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आमने आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई गोवा- महामार्गाची पाहणी करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पाहणी आधी मुंबई गोवा महामार्गावर खड्डे बुजवण्यात आले. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्याची डागडुजी सुरू आहे. गेले 17 वर्ष मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण रखडलं आहे. मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती खड्डे बुजवण्याचं काम केलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण सुद्धा यावेळी उपस्थित आहेत. या अगोदर तब्बल 17 वेळा बांधकाम मंत्री रवीद्र चव्हाण यांनी पाहणी दौरा केला आहे. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी यावर्षीही खड्ड्यांचं विघ्न पाहायला मिळत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 27 फुटांवर आली आहे. पंचगंगा नदीवरील कसबा बावडा इथला राजाराम बंधारा पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. शहर परिसरात पावसाची उघडीप मात्र धरण क्षेत्रात अजूनही पावसाची संततधार सुरु आहे. राधानगरी धरणा च्या चार स्वयंचलित दरवाजांमधून 7 हजार क्युसेक चां विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू आहे.
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावरून शिवसेना – भाजप आमने-सामने येण्याची शक्यता
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला भारतीय जनता पार्टीचा विरोध
रामा हॉटेलच्या बाहेर आदित्य ठाकरेंना काळे झेंडे दाखवून केला जाणारा विरोध
आदित्य ठाकरेंच्या विरोधात झळकवले जाणार दिशा सालीयनचे फोटो
तर आदित्य ठाकरे यांना विरोध करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवसेना ही करणार विरोध
भाजप शिवसेना आमने-सामने येण्याची शक्यता
अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात
बैठकीला जिल्हाधिकारी सुहास दिवसे, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महपालिका आयुक्त शेखर सिंह, यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित
जिल्ह्यातील सर्व विकास कामांचा आणि प्रकल्पांचा अजित पवार घेणार आढावा
कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांना मोठा धक्का
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा
राळेभात यांचा राजीनामा आमदार रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का
मतदारसंघात रोहित पवार यांनी एकाधिकारशाही आणि कार्यकर्त्यांनां दुय्यम वागणूक दिली राळेभात यांचा आरोप
आगामी काळामध्ये आपण स्वतः उमेदवारी करू किंवा रोहित पवार यांच्या विरोधात जो कोणी उमेदवार असेल त्याच्यासोबत राहू – राळेभात
ऐन निवडणुकीच्या तोंडावर जामखेड येथील एक प्रभावी नेता रोहित पवार यांना सोडत असल्याने रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ
नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालं आहे. ते 70 वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपासून वसंत चव्हाण यांची प्रकृती खालावली होती.
त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरू होते.
सोमवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यात यावे
केंद्रीय वाहतूक उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
राज्य शासनाने तसा प्रस्ताव तयार करुन केंद्र सरकारकडे पाठवावा, मुरलीधर मोहोळ यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. त्यानंतर केंद्र सरकारकडे आपण याचा पाठपुरावा करणार आहोत , मुख्यमंत्र्यांची माहिती
पुणे शहरात वाहन चोरांचा धुमाकूळ
शहरात एकच दिवशी सहा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून वाहनांची चोरी
काल एका दिवसात येरवडा ,चंदन नगर ,वानवडी हडपसर आणि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोरी
संबंधित सर्व पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल
वाहन चोरी थांबवण्याच पोलिसांसमोर आवाहन
पुणे शहरात पावसाची विश्रांती, मात्र खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच
रात्री उशिरा खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात ३१ हजार ३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
पुणे शहरासह जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट
पुण्यात आज दिवसभर रिमझिम पावसाचा अंदाज
गरज पडल्यास खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवण्यात येणार
नदीकाठच्या गावांना पाणी परिसराला सतर्कतेचा इशारा