Maharashtra Breaking News LIVE 5 September 2024 : आमदार दत्तात्रय भरणे यांचं विधानसभेबाबत मोठे विधान

| Updated on: Sep 06, 2024 | 7:36 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 5 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 5 September 2024 : आमदार दत्तात्रय भरणे यांचं विधानसभेबाबत मोठे विधान
Follow us on

छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा आठ महिन्यात कोसळला. आता याप्रकरणी प्रमुख आरोपी असलेला शिल्पकार जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली आहे. आज त्याला मालवण न्यायालयात हजर केले जाणार आहे. तसेच याप्रकरणी अटकेत असलेला बांधकाम सल्लागार चेतन पाटीलची पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे त्यालाही न्यायालयात हजर केले जाणार आहे. तर दुसरीकडे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे 5 हजार रुपयांच्या वेतनवाढीची मागणी मान्य करण्यात आली. तर दुसरीकडे राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी देखील संप मागे घेतला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

 

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Sep 2024 08:32 PM (IST)

    जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर

    जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह, नितीन गडकरी, राम माधव, स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ यांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

  • 05 Sep 2024 05:15 PM (IST)

    परभणीत पुन्हा पावसाला सुरुवात

    परभणी : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर परभणी शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने कमबॅक केलं आहे. दुपारी पाच वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टीमध्ये परभणी जिल्ह्यात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. परभणीत पुन्हा सर्वदूर पाऊस सुरू झाला आहे.


  • 05 Sep 2024 04:52 PM (IST)

    उदयपूर कन्हैयालाल हत्याकांड: आरोपी जावेदला हायकोर्टातून जामीन

    राजस्थानच्या उदयपूर येथील कन्हैयालाल हत्याकांडातील आरोपी जावेदला उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. न्यायालयाने त्याला दोन लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

  • 05 Sep 2024 04:37 PM (IST)

    केजरीवाल यांना जामीन दिल्याने उच्च न्यायालयाचे मनोधैर्य खचेल: सीबीआय

    दिल्ली दारू धोरण घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे आहे. हे प्रकरण सीबीआयशी संबंधित आहे. सुनावणीदरम्यान सीबीआयने न्यायालयाला सांगितले की केजरीवाल यांना जामीन मिळाल्यास ते उच्च न्यायालयाचे मनोधैर्य खचेल कारण याचिकेच्या गुणवत्तेचा विचार केला गेला नाही.

  • 05 Sep 2024 04:25 PM (IST)

    सिक्कीममध्ये लष्कराचे वाहन 300 फूट खोल दरीत कोसळले

    सिक्कीममध्ये लष्कराच्या वाहनाचा अपघात झाला आहे. पूर्व सिक्कीम जलुक आर्मी कॅम्पकडून दलपचंदकडे जाणारे लष्कराचे वाहन रस्त्यापासून 300 फूट खाली पडले. बचावकार्य सुरू आहे.

  • 05 Sep 2024 04:09 PM (IST)

    अंधेरीच्या राजाच्या पंडालमध्ये ड्रेस कोड लागू

    ‘अंधेरीच्या राजाचे’ दर्शन घ्यायचे असेल तर ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. हाफ पँट आणि स्कर्ट परिधान करून येणार्‍यांसाठी मंडपात लूंगी आणि फूल पँट ठेवण्यात आली आहे. ज्या महिला आणि पुरुष हाफ पँट आणि स्कर्ट घालून येतील त्यांना लूंगी आणि फूल पँट देण्यात येणार आहे. लुंगी किंवा फूल पँट परिधान करून आत गेल्यावरच बाप्पाचं दर्शन घेता येणार आहे. मंडळाने हा नियम 16 वर्षांपूर्वी लागू करण्यात आला असून तो दरवर्षी पाळला जातो.

  • 05 Sep 2024 03:56 PM (IST)

    इंदापूर विधानसभा मतदारसंघाबाबत मोठे संकेत

    आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघाबाबत मोठं विधान केलं आहे. भरणे यांनी ग्रामस्थांशी बोलताना स्वतःचीच उमेदवारी जाहीर केली. ” मला तुम्हा सर्वांची साथ द्या. तसेच सहकार्य हवं, अशी मी तुम्हाला विनंती करतो,असं म्हणत भरणे यांनी 2024 ला स्वतःच विधानसभेचा उमेदवार असल्याचे संकेत दिले.

  • 05 Sep 2024 03:12 PM (IST)

    शेती नुकसान आणि मराठा आरक्षण प्रश्नी घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

    अब्दुल सत्तार मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. अब्दुल सत्तार समृद्धी महामार्गावरून मुंबईला येत आहेत. अब्दुल सत्तार शेती नुकसान आणि मराठा आरक्षण या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तार मुंबईकडे येत आहेत. 10 दिवसात तोडगा काढला पाहिजे असं जरांगे यांचं वक्तव्य केलं होतं. आता अब्दुल सत्तार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

  • 05 Sep 2024 03:09 PM (IST)

    मोदींनी नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीसाठीही माफी मागावी: राहुल गांधी

    काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सांगलीतील जाहीर सभेतून भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा कोसळलेल्या पुतळ्यावरुन माफी मागितली. या मुद्द्यावरुन मोदींनी नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीसाठीही माफी मागावी, असंही गांधींनी म्हटलं.

  • 05 Sep 2024 02:58 PM (IST)

    अनिल देशमुख हे लांडगे – गोपीचंद पडळकर

    अनिल देशमुख दिसायला गरीब तोंडाची गाय दिसते पण मुळात ते लांडगे आहेत अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. त्यांची सीबीआय चौकशी व्हायलाच पाहिजे, माझ्या बाबतीतही त्यांनी कट कारस्थान केलं होतं, माझी माहिती मागवली होती, असा आरोप त्यांनी केला.

  • 05 Sep 2024 02:53 PM (IST)

    भाजपला देशात जाती-धर्म द्वेष पसरायचा आहे -राहुल गांधी

    भाजप. आपल्याला सर्वांना पुढे घेऊन जायचं. पण त्यांना काही लोकांचा फायदा करायचा आहे. दलित दलित राहिले पाहिजे, मागास मागास राहिले पाहिजे. आदिवासी आहे तसेच राहिले पाहिजे. जातीची चौकट राहिली पाहिजे असं त्यांना वाटतं. त्यांना द्वेष पसरवायचा आहे. हिंसा भडकवायचे आहे. एका धर्माला दुसऱ्याच्याबद्दल भडकवत आहेत. मणिपूर सिव्हिल वॉर सारखं झालं आहे. दीड वर्ष झाले पण पंतप्रधान तिकडे गेले नाहीत. जाऊच शकत नाही. कारण भाजपच्या लोकांनी तिकडे आग लावली, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

  • 05 Sep 2024 02:50 PM (IST)

    आदिवासी कोळी समाजाचा बिराड मोर्चा

    मुक्ताईनगर तहसील कार्यालयावर आदिवासी कोळी समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. तहसील कार्यालयावर बैलगाड्यासह बिराड मोर्चा काढण्यात आला.

  • 05 Sep 2024 02:40 PM (IST)

    तिसऱ्या आघाडीची पुण्यात बैठक

    तिसऱ्या आघाडीची पुण्यात बैठक झाली. स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकारांचे पणतू राजरत्न आंबेडकर आणि इतर घटक पक्ष सहभागी झाले. प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले.

  • 05 Sep 2024 02:30 PM (IST)

    पूजा खेडकर यांना अटकेपासून संरक्षण

    पूजा खेडकर यांना दिलासा मिळालेला नाही. अटके पासून संरक्षण मिळालं आहे, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली. 26 सप्टेंबर रोजी प्रकणात पुढील सुनावणी आहे. जामीन हा नियम आणि अटक हा अपवाद देशातील चित्र आहे. कोर्ट सर्व बाबींचा विचार करून 26 सप्टेंबर रोजी जामिनावर निकाल देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • 05 Sep 2024 02:20 PM (IST)

    वनविभागाने बिबट्याला केले जेरबंद

    चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात आढळलेल्या बिबट्याला तब्बल सहा तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाच्या पथकांनी जेरबंद केले. आज सकाळी बिनबा चौकातल्या एका बंद घरात असलेल्या झुडपांमध्ये बिबट्या आढळला होता.

  • 05 Sep 2024 02:10 PM (IST)

    इमारतीचा स्लॅब कोसळून 3 मजुरांचा मृत्यू

    मुंबईतील दिंडोशी येथे एका बांधकामाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून 3 मजुरांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या बांधकामाचे काम सुरू होते. स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना स्लॅब पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

  • 05 Sep 2024 02:02 PM (IST)

    गणेशोत्सवानिमित्त मोफत बस

    मातोश्रीच्या अंगणात कोकणवाशियांसाठी खास गणेशोत्सवा निमित्त मोफत बस आज सोडण्यात येणार आहे. या बस सेवेचे उद्धघाटन आज सायंकाळी 5.00 वा  मंत्री दिपकजी केसरकर साहेबांच्या हस्ते करण्यात येणार आहे

  • 05 Sep 2024 01:56 PM (IST)

    प्रकरणातील सर्व कागदपत्रे खरी हे कोर्टाने सांगितलं हे मला खटकलं आहे- विजय कुंभार

    पूजा खेडकर यांना दिलासा मिळालेला नाही. अटके पासून संरक्षण मिळालं आहे. 26 सप्टेंबर ला सुनावणी आहे. जामीन हा नियम आणि अटक हा अपवाद देशातील चित्र आहे. कोर्ट सर्व बाबींचा विचार करून 26 सप्टेंबर रोजी जामिनावर निकाल देतील असा विश्वास आहे. पूजा खेडकर

  • 05 Sep 2024 01:45 PM (IST)

    शिंदे, फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये कॅबिनेट बैठक…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये कॅबिनेट बैठक पार पडतंय.

  • 05 Sep 2024 01:34 PM (IST)

    तिसऱ्या आघाडीची बैठक पुण्यात बैठक सुरु

    स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकारांचे पणतू राजरत्न आंबेडकर आणि इतर घटक पक्ष सहभागी. प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती. राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन

  • 05 Sep 2024 01:22 PM (IST)

    अक्षय शिंदेला पुन्हा तीन दिवसांची पोलिस कोठडी

    ⁠SIT ने केले होते कोर्टात हजर. कल्याण कोर्टात केले होते हज. अजूनही अक्षयचा मोबाईल पोलिसांना सापडला नाहीये.

  • 05 Sep 2024 01:14 PM (IST)

    धुळ्यात जोरदार पावसाला सुरुवात..

    तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत…

  • 05 Sep 2024 12:00 PM (IST)

    अनिल देशमुखांनी माझ्याविरोधात कटकारस्थान केलं – गिरीश महाजन

    “अनिल देशमुख आणि त्यांच्या नेत्यांनी माझ्याविरोधात कटकारस्थान केलं हे सिद्ध झालय. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे गुन्हा दाखल करत नव्हते. ते महिनाभर थांबले. पुण्यात घटना घडली आणि 3 वर्ष 12 दिवसांनी जळगाव जिल्ह्यात 650 किलोमीटर अंतरावर निंबोऱ्यात गुन्हा कसा नोंदवायचा? यासाठी ते तयार नव्हते” असं गिरीश महाजन म्हणाले

  • 05 Sep 2024 11:27 AM (IST)

    एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आम्ही सामोपचाराने सर्वसहमत होईल असा तोडगा काढला- मुख्यमंत्री

    ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर काल आम्ही सामोपचाराने सर्वसहमत होईल असा तोडगा काढला आहे. एसटी कामगारांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे आता कोंकणासह राज्यभरात गणरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसमोरचा मोठा अडथळा दूर झाला आहे. आपल्या या लाल परीमधूनही काही गणपती बाप्पा घरात येतात. त्यांच्या आगमनाची तयारी उत्साहाने आपल्याला करता येईल,’ असं ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय. 
  • 05 Sep 2024 11:17 AM (IST)

    अनिल देशमुखांना टार्गेट केलं जातंय – जयंत पाटील

    “अनिल देशमुखांना टार्गेट केलं जातंय. त्यांना पूर्ण जेरीला आणायच आहे असं दिसतय. आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नेत्यांना जेरीस आणायचं सुरु आहे” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील म्हणाले.

  • 05 Sep 2024 11:14 AM (IST)

    संजय राऊत नोकरी उद्धव ठाकरेंची, चाकरी शरद पवारांची करतात – नरेश म्हस्के

    “संजय राऊत नोकरी उद्धव ठाकरे यांची करतात, चाकरी शरद पवार यांची करतात. ज्या मतदारसंघाने उद्धव ठाकरे यांना नाकारलं तिथं आज राहुल गांधी जात आहेत. उद्धव ठाकरे यांना त्याच मतदारसंघात काँग्रेसच्या व्यासपीठावर जावं लागत आहे” असं शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले.

  • 05 Sep 2024 10:50 AM (IST)

    नांदेड- राहुल गांधी हे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला

    नांदेड- राहुल गांधी हे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या नायगाव इथल्या घरी पोहोचले आहेत. मल्लिकार्जुन खर्गे, रमेश चेन्नीथला, नाना पटोले, विजय वड्डेटीवार, हिंगोली खासदार नागेश आष्टीकर, लातूर खासदार शिवाजी कळगे, आमदार अमित देशमुखसुद्धा याठिकाणी उपस्थित आहेत. राहुल गांधी यांनी दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

  • 05 Sep 2024 10:40 AM (IST)

    कृषीमंत्री शुद्धीत आहेत का? राऊतांचा संतप्त सवाल

    “आदित्य ठाकरे येणार म्हटल्यावर कृषीमंत्र्यांनी पाहणीचा फार्स केला. ते गाडीतून उतरलेही नाही. त्यांनी जमिनीला पायही लावला नाही. उलट ते शेतकऱ्यांवर ओरडत होते. मी काय करू शकतो? मी काय तुमच्या शेतात येऊन काम करू का? असं कृषी मंत्री म्हणत होते. कृषी मंत्री शुद्धीत आहेत का,” असा संतप्त सवाल राऊतांनी केला.

  • 05 Sep 2024 10:30 AM (IST)

    हे सरकार पंधराशेच्यावर जाणार नाही- संजय राऊत

    “हे सरकार पंधराशेच्या वर जाणार नाही. स्वत पंधरा हजार कोटी ठेवतील. पण बहिणींना १५००, कर्मचाऱ्यांना १५०० देतील. त्यांचं १५०० चं लिमिट आहे. त्यांचा एक पेग १५०० चा आहे. त्याच्यावर ते जाणार नाही,” असा टोमणा राऊतांनी महायुती सरकारला मारला आहे.

  • 05 Sep 2024 10:20 AM (IST)

    कृषीमंत्र्यांनी पाहणी दौऱ्यात जमिनीला पायही लावला नाही- संजय राऊत

    “कृषीमंत्री मदतीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर धावून गेले. कृषीमंत्र्यांनी पाहणी दौऱ्यात जमिनीला पायही लावला नाही. ग्रामीण भागातील रस्त्यांची कामं गुजरातच्या ठेकेदारांना दिली. गुजरातच्या ठेकेदारांनी बांधलेले रस्ते पावसाच्या पाण्यात वाहून गेले,” असा आरोप राऊतांनी केलाय.

  • 05 Sep 2024 10:15 AM (IST)

    जयदीप आपटेला त्याचे बॉस वाचवू शकले नाहीत- संजय राऊत

    जयदीप आपटेला त्याचे बॉस वाचवू शकले नाहीत. आपटेला काम दिलेले सूत्रधार सरकारमध्येच आहे. त्या सूत्रधारांवर कारवाई कधी होणार? आपटेच्या जामिनासाठी ठाण्यातून सूत्र हलत आहेत. ठाण्यातून आपटेला कायदेशीर मदत दिली जातेय

  • 05 Sep 2024 10:10 AM (IST)

    कोलकाता प्रकरणी पीडितेच्या काकीकडून संताप व्यक्त

    कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये बलात्कार-हत्येप्रकरणी पीडितेच्या काकीने संताप व्यक्त केला. “घरात आई-वडिलांसमोर मुलीचा मृतदेह पडून असताना पोलीस पैसे देण्याचा प्रयत्न करत होते. हीच पोलिसांची माणुसकी आहे का”, असा सवाल त्यांनी केला.

  • 05 Sep 2024 09:57 AM (IST)

    चंद्रपूर घरात बिबट्या शिरला

    चंद्रपूर शहरातल्या बिनबा गेट परिसरात एका रिकामा घरात बिबट्या शिरला आहे. अत्यंत वर्दळीच्या आणि घनदाट वस्तीमध्ये हे बंद घर आहे. पहाटेच्या दरम्यान हा बिबट या घरात शिरल्याची शक्यता आहे. बिबट पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. हा भाग अतिशय अरुंद असल्याने आणि बिबट एका झाडीझुडपी असलेल्या ठिकाणी लपून बसल्याने बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी येत  अडचणी आहेत. वनविभागाचे कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत.

  • 05 Sep 2024 09:47 AM (IST)

    राहुल गांधी नांदेड दौऱ्यावर

    कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे आज नांदेड दौऱ्यावर आहेत. कॉंग्रेसचे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या नायगाव येथील घरी भेट देणार आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करणार आहेत. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच कॉंग्रेसचे मोठे नेते नांदेडमध्ये येणार आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत रमेश चेन्नीथला, नाना पटोले, विजय वड्डेटीवार हे असणार आहेत.

  • 05 Sep 2024 09:30 AM (IST)

    लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची कडक तपासणी होणार

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटण्याच्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी आता अर्जांची कडक तपासणी करण्यात येणार आहे. तर बोगस अर्ज आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा ही देण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे लाटण्याच्या प्रकारानंतर महिला आणि बालविकास विभाग आता खडबडून जागे झाले आहे. यापुढे अर्जांची सखोल छाननी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

  • 05 Sep 2024 09:15 AM (IST)

    केजरीवाल यांना न्यायालयाकडून दिलासा मिळणार?

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्यात सीबीआयने केलेल्या अटकेला आव्हान दिलं आहे. 23 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणी शपथपत्र दाखल करण्याची परवानगी दिली होती. केजरीवाल यांना उत्तर दाखल करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली होती.

  • 05 Sep 2024 08:53 AM (IST)

    Maharashtra News Live : पंकजा मुंडे 4 दिवस पुणे दौऱ्यावर, मतदारसंघाचा आढावा घेणार

    भाजप नेत्या पंकजा मुंडे चार दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत

    पंकजा मुंडे यांनी काल पुण्यातील वडगाव शेरी आणि हवेली विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला

    पंकजा मुंडे यांच्याकडे पुणे शहर आणि ग्रामीण अशा सहा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी

    आज दौंड आणि खडकवासला विधानसभा मतदार संघाचा घेणार आढावा

    आढावा घेऊन रिपोर्ट प्रदेश कार्यालयाला सादर करणार

  • 05 Sep 2024 08:51 AM (IST)

    Maharashtra News Live : एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर सेवा सुरळीत

    पुणे – एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर एसटी सेवा सुरळीत

    – पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील बससेवा 100 टक्के पूर्ववत

    – स्वारगेट बसस्थानकातून सुटणाऱ्या सर्व बसेस रवाना

  • 05 Sep 2024 08:45 AM (IST)

    Maharashtra News Live : परभणीतील येलदरी जलाशय 63 टक्के भरला

    परभणी जिल्ह्यासाठी समाधानाची बाब,

    येलदरी जलाशय 63 टक्के भरला,

    जलाशयात आणखी वाढ होण्याची स्थिती .

    खडकपूर्णा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

    त्याचा थेट फायदा परभणी जिल्ह्यातील येलदरी जलाशयाला मिळाला,

    परभणीकरांची पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता आता मिटली,

    खडकपूर्णा जलाशयातून पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने, येलदरी जलाशयात आणखीन जल साठा वाढण्याची शक्यता

  • 05 Sep 2024 08:44 AM (IST)

    Maharashtra News Live : जलशक्ती अभियान उपक्रमांतर्गत केंद्रीय पथक नाशिक दौऱ्यावर

    नाशिक – जलशक्ती अभियान उपक्रमांतर्गत केंद्रीय पथक जिल्हा दौऱ्यावर
    – केंद्रीय पथक तीन दिवसीय नाशिक जिल्हा दौऱ्यावर
    – जलशक्ती अभियान कॅच द रेन उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध विभागांनी केलेल्या कामांचा आढावा घेणार
    – निवडक गावांना भेटी देवून नदी नाल्यांच्या खोलीकरणासह जलसंधारणाच्या कामांची करणार पाहणी
    – दोन तज्ज्ञ सदस्यांच्या केंद्रीय पथकासोबत जिल्हाधिकारी व प्रादेशिक जलसंधारण अधिकारी उपस्थित असणार असल्याची माहिती

  • 05 Sep 2024 08:43 AM (IST)

    Maharashtra News Live : नाशिकमधील नागरिकांना ‘आनंदाचा शिधा’ची प्रतीक्षा, साडेआठ लाख पात्रताधारक

    नाशिक – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना ‘आनंदाचा शिधा’ची प्रतीक्षा
    – नाशिक जिल्ह्यात साडेआठ लाख पात्रताधारक
    – 8 लाख 36 हजार आनंदाच्या शिधा संचांची मागणी
    – अंत्योदय योजनेचे एक लाख 76 हजार 18 लाभार्थी
    – तर प्राधान्य कुटुंबांचे सहा लाख 78 हजार 640 लाभार्थी
    – आनंदाच्या शिधा संचाची मागणी राज्य शासनाकडे नोंदवली
    – पुरवठा झाल्यानंतर लाभार्थ्यांना लवकरच वाटप केले जाणार असल्याची माहिती