दरवर्षीप्रमाणे यंदाही लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी लाखो चाकरमनी कोकणात जाण्यासाठी रवाना झाले आहेत. सध्या अनेक बस डेपोत चाकरमान्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे कोकण रेल्वेवर धावणाऱ्या सर्वच ट्रेन हाऊसफुल झाल्याचे दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा आठ महिन्यात कोसळला. याप्रकरणी प्रमुख आरोपी असलेला शिल्पकार जयदीप आपटेला पोलिसांनी अटक करण्यात आली असून त्याला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आज मुखदर्शन सोहळा आहे. मुखदर्शन सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे. यंदा चिंचपोकळीच्या चिंतामणीचे 105 वे वर्ष आहे. यंदाची थीम जगन्नाथ पुरीची असणार आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणी या मूर्तीचे मूर्तिकार रेश्मा खातू या आहेत. विलोभनीय अश्या मूर्तीचे प्रथम मुख दर्शन पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
“कॉमनमॅन, इन्फ्रामॅन, एक्सेसीबीलीटी,सिंपलीसीटी आणि क्रेडीबीलीटी ही माझी ओळख आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ काय म्हणून लक्षात ठेवावा? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. यावर शिंदेंनी हे उत्तर दिलं.
पुण्यात पोलिसांकडून गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला रूटमार्च काढण्यात आला. पुण्यातील शनिवार वाड्यापासून रूटमार्चला सुरुवात करण्यात आली. पुण्यात वाढती गुन्हेगारी, अंदेकर गोळीबार प्रकरण, काही दिवसांपूर्वी दहशतवादी विरोधी पथकाने कोंढव्यात केलेली बनावट कॉलसेंटर प्रकरणातील कारवाई या सर्व गोंष्टीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दक्ष आहेत. सणासुदीच्या काळात गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांचा वचक असावा तसेच परिसरात काही अनुचित घटना घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था टिकून रहावी यासाठी रूटमार्च काढण्यात आला.
मुख्यमंत्री पदाचा मला लोभ नसल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच विकास हेच माझं उद्देश आहे, असंही शिंदेंनी म्हटलं. “मला मुख्यमंत्री पदाचा लोभ नाही. राज्याचा विकास हाच माझा उद्देश आहे”, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
“महाराष्ट्रात अनेक गुंतवणुकी आणल्या. अनेक विकासकामांना आणि प्रकल्पांना चालना दिली”, असं उत्तर मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे टीव्ही 9 मराठीच्या विशेष कार्यक्रमात दिलं. अडीच वर्षाच्या काळात काय केलं? असं प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिलं.
काँग्रेस अध्यक्षांनी महेश गौर यांची तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे तत्काळ प्रभावाने या पदाची नियुक्ती करण्यात आली आहे.
गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी जम्मूला पोहोचले. येथे त्यांनी पक्षाच्या संकल्प पत्राचे प्रकाशन केले. यावेळी ते म्हणाले की, कलम 370 हा इतिहास बनला आहे. आता परत येणार नाही.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली आहे. ही बैठक जर्मनीतील रामस्टीन तळावर झाली. अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी युक्रेनला $250 दशलक्ष किमतीची शस्त्रे देण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले की, कुर्स्कमध्ये 6000 रशियन सैनिक मारले गेले आहेत किंवा जखमी झाले आहेत.
मी निर्लज्ज मंत्र्यासारखं बोलणार नाही. सरकार पडलं ते वाईट झालं. महाराष्ट्र मागे गेला, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
या आरोपीवर कारवाई केली जाणार. कोयत्यावर सरसकट बंदी घालता येणार नाही. पहिल्या दोन दिवसात मोठी कारवाई केली जाणार आह. फरासखाना, खडक, विश्रामबाग या भागातील दारूचे दुकाने गणेशोत्सवाच्या 10 दिवस बंद ठेवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे देण्यात आला आहे, त्यावर अजून निर्णय नाही, असे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे.
राज्यातील बेरोजगारी हा गंभीर प्रश्न असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
नुकताच जयंत पाटील यांनी मोठे भाष्य केले आहे, जयंत पाटील म्हणाले की, मालवणमधील घटना दुदैवी आहे.
विरोधी पक्ष हार घालून सत्कार करतील अशी अपेक्षा नसते. तोंडावर निवडणूका आल्या आहेत.
प्रमुख नेत्यांना साहजिकच टार्गेट केलं जाईल. मात्र आमचे प्रमुख नेते त्यांचे काम करत आहेत, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
अब्दुल सत्तार तोडगा काढण्यासाठी गेले की नाही माहित नाही मात्र जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांचे बोलणं सुरू असतं मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांचा डायरेक्ट संवाद सुरू असतो, सत्तार यांना कोणी पाठवलं होतं ते का गेले याबाबत मला माहिती नाही, संजय शिरसाठ यांचे मोठे विधान
गणेशोत्सवासाठी मुंबईच्या चौपाटीही सज्ज झाले आहे. चौपाटी परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात झाली आहे. दिड दिवसांचे गणपती विसर्जनाची मनपाकडून तयारी सुरू आहे.
अहमदनगर जिल्हात जोरदार पासून पडल्याने जिल्हा टँकर मुक्त झाला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर देखील जिल्ह्यातील काही भागात टँकर सुरू होते. मात्र गेल्या आठवड्यात जिल्हात सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने जिल्हा टँकर मुक्त झाला आहे. तर जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून शेवगाव तालुक्यात सर्वाधिक ९३.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गडचिरोली नागेपल्ली येथील कार्यक्रमात रक्षाबंधन कार्यक्रमानंतर महिला भगिनींशी अजित पवार यांनी संवाद साधला. एक मुक्या भगिनी सोबत संवाद साधत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले का? अशी विचारणा केली.
पवार साहेबांना महाराजांना लुटारू म्हणणं मान्य आहे का. हा सवाल आहे. माझा राजा लुटारू नव्हता. माझा राजाने रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू दिला नाही. त्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला परत पाठवलं. असा हा राजा होता. महाराजांनी कधीच सुरत लुटली नाही. त्यांनी स्वराज्याच्या खजिन्यासाठी स्वारी केली. त्यावेळचं ते तत्व होते. हे मोघल लुटारू होते. महाराज लुटारू नव्हते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराजांनी सुरत लुटली नाही. स्वारी केली. अल्लाउद्दीन खिलजी, तैमूरलंग जे करतो त्याला लूट म्हणतो. शिवाजी महाराजांनी सामान्य लोकांना हातही लावला नाही. महाराजांनी त्यांना पत्र दिलं होतं. खर्च द्या नाही तर मी खजिना वसूल करेल.
जागा वाटपाची चर्चा अजून सुरू आहे त्यामुळे आमच्या पक्षाने किंवा महाविकास आघाडीतील इतर पक्षाने किती जागांवर दावा केला हे चर्चेनंतर समजेल. उगाच तर्कवितर्क करून दिशाभूल करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल ते चुकीचा आहे. लोकांनी उमेदवार कोण असावा याचा निश्चय केलेला आहे. सर्वे होत आहेत त्यात सुद्धा आमच्या पक्षाचा कल सांगितला जात असल्याचा दावा अनिल देसाई यांनी केला.
एमएसआरडीसीच्या पुण्यातील जागेच्या गैरव्यवहारप्रकरणी पुणे शहर मनसे आक्रमक झाली आहे. या जागेवर कॅन्सर हॉस्पिटल बनवण्याचा प्रस्ताव आहे. मात्र कॅन्सर हॉस्पिटल न बनवता ही मोक्याची जागा खाजगी बिल्डर देण्याचा डाव असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा गैरव्यवहार थांबवण्यासाठी व या जागेत कॅन्सर हॉस्पिटल बनवण्यासाठी मनसेचे आंदोलन करण्यात येत आहे.
ईसीबीसीला सहा महिन्याची मुदत वाढ दिली होती आणि त्यामुळे देवेंद्र फडवणीस यांनी आमचं ईडब्ल्यूएस रद्द केले होते. ईडब्ल्यूएस जशाला तसे ठेवावे अशी मागणी आमची देवेंद्र फडवणीस यांच्याकडे आहे.एसीबीसी ईडब्ल्यूएस किंवा कुणबी यापैकी कोणते ऑप्शन घेऊ शकतात आणि यामध्ये सर्व जातींच्या मुलांचं फायदा आहे. कुणबी असलेल्यांना व्हॅलेडीटी साठी सहा महिन्याची मुदत दिल्याने आम्ही शंभूराजे देसाई यांचे कौतुक आणि अभिनंदन करतो असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
गडचिरोली या नक्षल प्रभावित जिल्ह्यात अजित दादा ची जन सन्मान यात्रा येत आहे मोठा उत्साह आहे. दुसऱ्या टप्प्याचा हा शेवटचा टप्पा आहे अति दुर्गम नक्षल भागात दादा येत आहे. दादांच्या यात्रेचा दुसऱ्या टप्प्यात शेवटचा टप्पा आहे मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येणार आहेत.विदर्भात 20 जागा आम्ही लढवणार आहोत आणि शंभर टक्के निवडून येणाऱ्या जागांची मागणी आम्ही करणार आहोत, असे धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितले.
आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे घोंगडी बैठक होत आहे. घोंगडी बैठकीला माजलगाव विधानसभा मतदार संघातील मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित राहणार आहेत. घोंगडी बैठकीच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील यांची रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी अभिवादन केले. स्मृतीदिनानिमित्त शिवसेना पदाधिकारी दादरमध्ये दाखल झाले होते.
पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोल नाक्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात चाकरमानी येत असल्यामुळे आज सकाळपासून आनेवाडी टोल नाक्यावर वाहनांची गर्दी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
गौरी गणपती सणानिमित्त कोकणात, पुण्यात आणि साताऱ्यात जाण्यासाठी नवी मुंबई कळंबोली महामार्गावरती मोठ्या प्रमाणात गर्दी. दोन ते तीन तास एसटी मिळत नसल्यामुळे सातारकरांनी व्यक्त केली नाराजी. कोकणात जाण्यासाठी एसटीच्या जादा गाड्या, मात्र सातारा या ठिकाणी जादा गाड्या का नाही सोडत? असा सवाल प्रवाशांनी सरकारला विचारला आहे.
“अजितदादांना अमित शाह, नरेंद्र मोदींच्या दयेवर जगावं लागेल. अजित पवार यांना वाट पहावी लागेल. केंद्रात सरकार 2025 पाहणार नाही, देशात 2026 ला पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागू शकते. अजित पवार यांना गृहीत धरले आहे” अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
गौरी गणपती सणानिमित्त कोकणात ,पुण्यात आणि साताऱ्यात जाण्यासाठी नवी मुंबई कळंबोली महामार्गावरती मोठ्या प्रमाणात गर्दी दिसुन येत आहे. दोन ते तीन तास एसटी मिळत नसल्यामुळे सातारकरांनी व्यक्त केली नाराजी. कोकणात जाण्यासाठी एसटीच्या जादा गाड्या मात्र सातारा या ठिकाणी जादा गाड्या का नाही सोडत असा सवाल प्रवाशानी सरकारला विचारला आहे..
अमित शाह रविवारपासून 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर… शाह सोमवारी लालबागच्या राजाचं घेणार दर्शन…
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएल बसच्या मार्गांमध्ये बदल… सात ते १७ सप्टेंबर या कालावधीत पर्यायी मार्गावरून बस धावणार आहेत… सायंकाळी पाच वाजता मध्यवर्ती भागातील रस्ते बंद झाल्यानंतर बस मार्गात बदल होणार… ६३ मार्गावरील चार हजार ३९६ फेऱ्यांवर परिणाम होणार आहे.
रत्नागिरी – गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सोडल्यानं कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल
कोकण रेल्वेमार्गावर काही गणपती स्पेशल गाड्या साडेचार तास उशीराने धावताहेत
तर नियमित धावणा-या गाड्या दिड तास उशीराने धावत आहेत
गणेशोत्सवासाठी येणा-या चाकरमान्यांचा होतोय खोळंबा
कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी 310 जादा गाड्या
कोकणकन्या , तुतारी , सावंतवाडी गणपती स्पेशल, सिंधुदूर्ग एक्सप्रेस गाड्या उशीरानं
मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता
महाविकास आघाडी कडून विनोद पाटील हे निवडणूक लढवण्याची शक्यता
फुलंब्री विधानसभा मतदारसंघात विनोद पाटील यांची चाचपणी सुरू
याचिका कर्ते विनोद पाटील हे लोकसभेला छत्रपती संभाजी नगर मतदारसंघातून होते इच्छुक
मात्र आता विधानसभेसाठी फुलंब्री मतदार संघातून निवडणूक लढवण्याची शक्यता
पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट बस स्थानकावर प्रवाश्यांची मोठी गर्दी
– गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाण्यासाठी नागरिकांची लगबग
– यामध्ये कोकणात जाणाऱ्या प्रवाश्यांची संख्या अधिक
– गणेशोत्सवाच्या सुट्ट्या असल्यामुळे नागरिक घराकडे जात आहेत
गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर 325 हून अधिक फेऱ्या
मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे कडून गणपतीसाठी विशेष ट्रेन नियोजन
दोन दिवस अगोदरच चाकरमानी कोकणात दाखल
कोकणात येणाऱ्या सर्वच ट्रेन हाउसफुल
सहा ते सात लाख भाविक गणेशोत्सव ट्रेनने येणार कोकणात
रत्नागिरी- गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात दाखल
यावर्षी देखील चाकरमान्यांची कोकण रेल्वेला पसंती
रत्नागिरी रेल्वे स्टेशन वरती चाकरमान्यांची मोठी गर्दी
गणपतीच्या स्वागतासाठी लाखो चाकरमानी कोकणात
चाकरमान्यांना गणेशोत्सव आगमनाचे लागले वेध
गणपती स्पेशल ट्रेनने चाकरमानी कोकणात दाखल