महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. यंदा महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. महाविकासआघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर काही पक्षांकडून उमेदवारांच्या घोषणा केल्या जात आहेत. त्यातच आता इनकमिंग आऊटगोईंगही सुरु झाले आहे. इंदापुरातील माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत.
झारखंडबाबत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, “भाजपचा तपशीलवार जाहीरनामा येणार आहे पण ही निवडणूक फक्त कुणालातरी मुख्यमंत्री बनवण्यासाठी नाही. ही निवडणूक ‘रोटी’, ‘बेटी’ आणि ‘माटी’च्या रक्षणासाठी आहे. संरक्षण करण्याचा आमचा संकल्प आहे. बांगलादेशी घुसखोरांमुळे येथील लोकसंख्या झपाट्याने बदलत आहे. संथाल परगणा येथील आदिवासी लोकसंख्या 44% पेक्षा जास्त होती, ती आता 28% वर आली आहे, व्होट बँकेच्या लालसेपोटी हेमंत सोरेन यांचे सरकार त्यांना समाविष्ट करत आहे, त्यांचे आधार कार्ड बनवत आहे, त्यांची नावे मतदार यादीत टाकत आहेत. हा धोका इतका मोठा आहे की ते येतात, आमची जमीन ताब्यात घेतात आणि एवढेच नाही तर आदिवासी मुलींची लग्न करतात आणि मुलींचे तुकडे करून फेकून देतात.”
केंद्रीय मंत्री आणि झारखंड विधानसभा निवडणूक प्रभारी शिवराज सिंह चौहान यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. झारखंडमध्ये NRC लागू करण्यात येणार असून नागरिकत्वाची नोंदवही करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. परदेशी घुसखोरांना निवडकपणे बाहेर काढले जाईल.
मनीष सिसोदिया यांनी आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरूर यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. सिसोदिया म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांना कसे संपवायचे याचे मोदीजी रोज भुतासारखे स्वप्न पाहतात.
काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा म्हणाले, ‘हरयाणात बदल घडवून आणणे, हरियाणात काँग्रेसचे सरकार स्थापन करणे हे आमचे पहिले आणि शेवटचे ध्येय आहे जेणेकरून हरियाणाला नवी सुरुवात मिळेल. भाजपने 10 वर्षात हरियाणात कोणतेही सकारात्मक काम केले नाही, ते हरियाणाला मागास नेत आहेत. परिवर्तनाचे आमचे ध्येय आम्ही गाठले आहे, यानंतर कोणती जबाबदारी कोणाला मिळणार, अशी व्यवस्था काँग्रेसमध्ये आहे. अनेक दशकांपासून सुरू असलेल्या प्रक्रियेनंतर, विधिमंडळ पक्षाची बैठक होते, त्यानंतर प्रत्येकजण आपल्या विवेकबुद्धीनुसार केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या अंतिम निर्णयाच्या आधारे पुढे जातो. प्रक्रिया तशीच राहील आणि केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल.’
जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला म्हणाले, “आमची गरज नसली तरी आम्ही (पीडीपी) सोबत घेऊ कारण आम्हाला एकत्र वाटचाल करायची आहे. हे राज्य वाचवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. मी त्यांचे (मेहबूबा मुफ्ती) मनापासून आभार मानतो. आपण सर्व मिळून एक संस्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करू.”
सीएम बंगल्याबाबत भाजपने अरविंद केजरीवाल यांच्यावर मोठा आरोप केला आहे. सरकारी नोंदीनुसार 6 फ्लॅग स्टाफ रोड अद्याप रिकामा झालेला नाही. 6 फ्लॅग स्टाफ रोडची चावी PWD चे विजय कुमार यांना द्यायला हवी होती पण ही चावी मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष सचिव प्रवेश रंजन झा यांना देण्यात आली आणि काही तासांनंतर ती परत घेण्यात आली. नोटीसमध्ये लिहिले आहे की, 6 फ्लॅग स्टाफ रोड रिक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. यावेळी काही काही जण नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. प्रवेशावेळी दिग्गज गैरहजर असल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ज्युनियर महिला डॉक्टरांच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी कनिष्ठ डॉक्टरांचे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. पीडितेला न्याय मिळावा आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता या मागणीसाठी डॉक्टर आंदोलन करत आहेत.
तपास यंत्रणांच्या हाती संशयास्पद माहिती. मालेगावातून अटक केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरसह त्याच्या पत्नीचे मोबाईल तपास यंत्रणांच्या हाती. 17 तारखेला दिल्ली येथे एनआयएच्या मुख्यालयात हजर राहण्याची नोटीस
राजधानी दिल्लीतल्या विज्ञान भवनात दोन्ही नेत्यांमध्ये बैठक. नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक संपल्यानंतर निवडणुकीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. गेल्या दहा मिनिटांपासून शहा आणि शिंदे यांच्यात चर्चा
सगळ्यांनी आग्रह धरला मग आम्ही प्रवेश केला.मंत्री असताना सगळ असताना लोक सोडुन जात आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले.
अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचे निलंबन रद्द. सोबत गेलेल्या पदाधिकाऱ्यांचे निलंबन रद्द….
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटनेने सरकारविरोधात आंदोलनाचा ईशारा दिला आहे. राज्यातील शासकीय कंत्रादारांची 40 हजार कोटीची बिले थकवली आहेत.
माजलगाव येथील एका अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या पाच वर्षाच्या मुलीवर अमानुष अत्याचार करण्यात आला. त्या घटनेनंतर माजलगावमधील सर्व पक्षी संघटनांनी आज बंद पुकारला आहे.
बारामती विधानसभेत उमेदवार देणार की नाही याबाबत मनसेचा आज निर्णय होणार आहे. आज राज ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्राची बैठक बोलवली आहे. त्यात हा निर्णय होणार आहे.
पुणे सातारा महामार्गावरील कापूरहोळ येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा रास्ता रोको करण्यात आले. भाजपचे भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दगडे यांच्या दिवाळी किराणा वाटप कार्यक्रमात, काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्याबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त विधाना विरोधात हे आंदोलन केले.
अब्दुल सत्तार यांनी वाटलेल्या साड्यांची आज पुन्हा होळी करण्यात आली. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या मांडणा गावात ही होळी करण्यात आली.
“आम्ही बोललो तर ट्रोल होतो असा विचार करू नका. मी आजवर जे काही बोललो, भाषण केलं, सोशल मीडियावर त्यावर काय बोललं जातं ते मी कधी वाचत नाही. त्या भानगडीत पडत नाही. माझं बोलून झालं ना, मग विषय संपलं. मी कोणत्याही गोष्टीचं स्पष्टीकरण देत नाही,” असं राज ठाकरे साहित्यिकांना म्हणाले.
“सोशल मीडियावर माझ्याबद्दल काय लिहिलं जातं, ते मी कधीच वाचत नाही. मी कोणाला स्पष्टीकरण द्यायलाही जात नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस झाली आहे,” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
इंदापूर- हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेश सोहळा सुरू आहे. इंदापूरमध्ये शरद पवार कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते, माजी उपमुख्यमंत्री विजय सिह मोहिते पाटील यांची उपस्थिती आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकर संघटनांच्या वतीने मोर्चाला सुरुवात झाली आहे. बौद्ध लेणीच्या बचावासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. शहराच्या क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत हा मोर्चा असेल. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मोर्चासाठी हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी सहभागी होणार आहेत. मोर्चाच्या अनुषंगाने पोलिसांकडून शहरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पहिली भुयारी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. ‘मेट्रो 3’ मार्गिकेतील आरे-बीकेसी टप्पा आजपासून खुला करण्यात आला आहे. बीकेसी आणि JVLR स्थानकावरून भुयाची सेवेची सेवा सुरू झाली आहे.
अब्दुल सत्तार यांनी वाटलेल्या साड्यांची आज पुन्हा होळी करण्यात आली. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या मांडणा गावात साड्यांची होळी करण्यात आली. अब्दुल सत्तार यांच्या पॅम्प्लेटसह साड्यांची होळी केली. वांगी गावानंतर मांडणा गावातही अब्दुल सत्तारांनी वाटलेल्या साड्यांची होळी करण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. लोणंद येथील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
कार्यक्रम ठिकाणी लावलेल्या अजित पवारांच्या बॅनर शेजारी शरद पवार समर्थकांचा आम्ही निष्ठावंत साहेबांचे असा लक्षवेधी बॅनर लावला असून बॅनरवॉर रंगण्याची चिन्हे आहेत.
नवी दिल्ली येथे नक्षल प्रभावीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ही बैठक होत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही बैठकीसाठी दाखल झाले आहेत.
राष्ट्रीय स्वयंसवेक संघाकडून भाजपची खरडपट्टी काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. हिंदुत्ववादी मुद्यांना बगल दिल्याने संघ नाराज असून दक्षिण मुंबईमधील पदाधिकारी, नेत्यांवर नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आरे ते बीकेसी मेट्रो स्थानकांचा प्रवास आजपासून सुरू… थोड्या वेळात पहली मेट्रो सुटणार … शनिवारी मेट्रोचं लोकार्पण झाल्यानंतर मुंबईकरांना या भुयारी मेट्रोचा प्रवास करण्याची लागली होती उत्सुकता… प्रवास साडे बारा किलोमीटरचा असून ही सेवा सकाळी ६ ते रात्री १०:३० वाजेपर्यंत उपलब्ध होणार आहे..
नाशिक-मुंबई महामार्गावर कसारा घाटात कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने चार वाहनांना धडक, तीन जण गंभीर जखमी… दुर्घटनेत दोन लहान मुलांसह कंटेनर चालक जखमी… कसारा रुग्णालयात उपचारासाठी दाखल…
गेल्यावेळी आम्ही निवडणूक जिंकता जिंकता हरलो… हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते पवारांच्या पक्षात प्रवेश करणार… इंदापूरच्या विकासासाठी पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला… हर्षवर्धन पाटील आज पवार गटात प्रवेश करणार… इंदापूरमध्ये आद शरद पवार गटाची सभा…
बौद्ध लेणीच्या बचावासाठी काढण्यात येणार मोर्चा… शहराच्या क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत असेल मोर्चा… जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शाळा,महाविद्यालयांना सुट्टी जाहीर.. मोर्चासाठी हजारोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी होणार सहभागी… मोर्चाच्या अनुषंगाने पोलिसांकडून शहरात तगडा बंदोबस्त…
अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार जनसंपर्क कार्यालयाचा अखेर वाद मिटला… काँग्रेस खासदार बळवंत वानखडे आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांना अर्धे अर्धे कार्यालय… खासदार बळवंत वानखडे नंतर आता खासदार अनिल बोंडे यांच्या नावाचेही लागले फलक… कार्यालय मिळाव यासाठी काँग्रेसने केले होते ताला तोडो आंदोलन..
रत्नागिरी : राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का बसला आहे. लांजा तालुक्यातील भांबेड जिल्हा परिषद गटाने शिंदे गटात प्रवेश केला आहे. पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या उपस्थितीत भांबेड जिल्हा परिषद गटातील १८ गावातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. किरण सामंत यांनी भांबेड जिल्हा परिषद गटाला सुरुंग लावला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सर्व पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाले आहेत.
उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा युवाअधिकारी विनय गांगण यांच्यासहित माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती.उपसभापती, काही गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य तर भांबेड ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातून किरण सामंत यांना उमेदवारी मिळण्याचे उदय सामंत यांच्याकडून संकेत देण्यात आले.
कल्याण पूर्वेत शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांचे भावी आमदार म्हणून बॅनर झळकले आहेत. एकीकडे महेश गायकवाडवर गोळीबार करणाऱ्या आमदार गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभा गायकवाड यांनी भाजपकडून विधानसभेची तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे महेश गायकवाड यांचे वाढदिवसानिमित्त कल्याण पूर्वेत बॅनर लागले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
लाडकी बहिण योजनेनंतर आता ‘सक्षम भगिनी’ योजना सुरु केली जाणार आहे. ग्रामीण भागासह शहरी भागात ही महिलांना रोजगार मिळावा यासाठी बचत गटांच्या माध्यमातून मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महिलांसाठी अनोखा उपक्रम सुरु केला आहे. यात सुमारे पाच हजाराहून अधिक महिला सहभागी होणार आहेत.
आगामी निवडणुकीत वाशिम विधानसभेसाठी पक्षनिष्ठ कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेतील इच्छुक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसैनिकांच्या सह्यांचे पत्रही दिलं आहे. यामध्ये शशिकांत पेंढारकर, राजाभैया पवार, डॉ सुधीर विहलेकर, सचिन डोफेकर, राजू मानमोठे या इच्छुक उमेदवारांचा समावेश होता.
दरम्यान वाशिम विधानसभेमध्ये शिवसेनेची चांगली ताकद आहे. मात्र पक्ष बाहेरील व्यक्तीला उमेदवारी देण्याची चर्चा होत आहे. त्यामुळे पक्षनिष्ठ असलेले शिवसैनिक अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी वाशिम-मंगरुळपीर विधानसभेची उमेदवारी निष्ठावान शिवसैनिकालाच देऊ असा शब्द पदाधिकाऱ्यांना दिला.
मुंबई – मराठा क्रांती ठोक मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते आज आझाद मैदानात धडक देणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री व्हावं आणि मराठा आरक्षण द्यावं या मागणीसाठी आज मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.