महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. यंदा महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. महाविकासआघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर काही पक्षांकडून उमेदवारांच्या घोषणा केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील वरिष्ठ नेते महाराष्ट्राचा दौरा करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. आज दिवसभर उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा निहाय बैठकांचे आयोजन राज ठाकरे करणार आहेत.
रावेर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. संजय राऊत जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
कायदेशीर यंत्रणेत पक्ष कोठेही हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल.
जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठा समाजाचा नारायण गडावर दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला राज्यभरातून लाखोच्या संख्येने मराठा समाज येणार आहेत.
मी कायदा मोडत असेल तर सांगा, मी या ठिकाणावरुन परत जातो, असे संभाजीराजे यांनी पोलिसांना बजावले. आम्ही कायदा हातात घेणार नाही, असे त्यांनी म्हटले.
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभे राहणार होते? त्याचे काय झाले. सरदार पटेल यांचे स्मारक झाले. पण शिवाजी महाराजांचे स्मारक झाले नाही, असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले.
छत्रपती संभाजीराजे अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाची पाहणी करण्याचा निर्णयावर ठाम आहेत. ते अरबी समुद्रात जाण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया परिसरात पोहचले आहेत.
चेंबुरमधील आग प्रकरणात गुप्ता कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे त्या कुटुंबाला तातडीने पाच लाखांची मदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनी येथे लागलेल्या आगीची पाहणी करण्यासाठी पोहचले आहेत. या ठिकाणी लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक सुरू झाली आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अमित ठाकरे मात्र खुर्चीवर न बसता शेजारी उभे राहिले आहेत. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंचा संवाद सुरु आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे युवा सेना सचिव दीपेश मात्रे यांचा आज ठाकरे गटात प्रवेश होणार आहे. प्रवेशा आधी डोंबिवलीत त्यांनी शक्ती प्रदर्शन केले. शेकडो कार्यकर्ते घेऊन दीपेश मात्रे पक्ष प्रवेश साठी मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले आहेत.
अब्दुल सत्तार यांनी वाटलेल्या साड्यांची महिला आणि गावकऱ्यांनी होळी केली. सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक या गावात साड्यांची होळी केली. मराठा समाजातील महिला आणि गावकऱ्यांनी मिळून अब्दुल सत्तार यांनी वाटलेल्या साड्यांची होळी केली.
बॅनर लावून बहुजनांचा नेता होता येत नाही, असा टोला अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. त्यांनी तर बहुजन नेते संपवण्याचे काम केले असा आरोप पण दानवे यांनी केला.
अजितदादा पवार अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अकोले येथे त्यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. यावेळी अनेक कार्यकर्ते गुलाबी फेट्यात दिसले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील ड्रग्जबाबत सुद्धा बोलावे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी हाणला. काल मोदींनी पोहरादेवी आणि ठाण्यातील सभेत काँग्रेसचे पदाधिकारी ड्रग्स रॅकेटमध्ये सापडल्यावरून हल्लाबोल केला होता.
राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकारी बैठकीला नाशिकमध्ये सुरुवात झाली आहे. मनसेचा आज उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी मेळावा होत आहे. राज ठाकरे बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतील. काही नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर होईल. मनसे नाशिक सह उत्तर महाराष्ट्रात किती जागांवर लढणार यावर चर्चा होणार आहे.
उद्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा नांदेड दौरा लांबणीवर पडला आहे. 7 ऑक्टोबर रोजी होणारा लाडक्या बहिणीचा आनंद सोहळा कार्यक्रमाचे आता 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
टिटवाळा रेल्वे स्थानकावर एक्सलेटर आणि लिफ्ट बंद… प्रवाशांनी दिव्यांग व्यक्तीला सायकलीसह उचलून नेले प्लॅटफॉर्मवर… सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल… प्रशासनाने दिव्यांगणासाठी उपाययोजना कराव्या संतप्त दिव्यांगणाची मागणी…
देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजी नगरात आगळीवेगळी बॅनरबाजी.. देवेंद्र फडणवीस यांच्या अज्ञात चाहत्यांकडून केली बॅनरबाजी… ‘महाराष्ट्रासाठी झटला… बहुजनांसाठी राबला’ म्हणूनच ‘प्रस्थापितांना खुपला’ असा उल्लेख असलेली बॅनरबाजी… बॅनरबाजीतून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न… मात्र बॅनरवर कुणाचाही उल्लेख नाही…
कोल्हापूरच्या चंदगड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे माजी सभापती बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या नंदाताई बाभुळकर इच्छुक आहे. नंदाताई बाभुळकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा चंदगडच्या नेसरीमध्ये आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे. अजित पवार गटाचे राजेश पाटील हे चंदगडचे विद्यमान आमदार आहेत. नेसरीमध्येच अजित दादा पवार यांची जनसन्मान यात्रा आणि सभा होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार दिलीप मोहिते पाटील आणि विरोधक यांच्यात बाजार समितीच्या निवडणुकीवरून चुरस रंगली आहे. पुण्याच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदाची स्थगित झालेली निवडणूक गुरुवारी दिनांक १० ऑक्टोबरला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पणन मंत्रालय, जिल्हा सहनिबंधक यांना या बाबतचा आदेश दिला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार दिलीप मोहिते पाटील आणि विरोधक यांच्यात या निवडणुकीवरून मोठी चुरस निर्माण झाली आहे. आमदार मोहितेचा विरोधात सर्वपक्षीय एकत्र आल्याने कुणाचा सभापती, उपसभापती होणार आणि सत्त्ता कोणाच्या हाती जाणार याबाबत तालुक्यात उत्सुकता निर्माण झाली आहे
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमांत ९८ लोकांना ऑक्टोंबर हिटचा फटका बसला आहे. चक्कर येणे, भुरळ, उच्च रक्तदाबामुळे वैद्यकीय मदत कक्षात धाव घेतली. या सर्वांना उपचार करून सोडून देण्यात आले. ठाणे शहरात ३३.२ अंश सेल्सिअस तापमान होते, अशी माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती विभागाने दिली. या परिसरात १०० बेड्सचे तात्पुरते रुग्णालय उभारण्यात आले होते. यासाठी कार्यक्रमाला आलेल्या प्रत्येकाच्या हाती खाण्याचे पाकीट, पाणी तसेच ओआरएस पाण्याची सुविधा सुद्धा पुरविण्यात आली होती.
अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मतदार संघावर ठाकरे गटाने दावा केला आहे. ठाकरे गटाचे अभिजित ढेपे यांचा शिव संकल्प मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात ठाकरे गटाच्या दाव्याने काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांच टेंशन वाढलं. उबाठाचे नेते व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. चांदूर रेल्वे येथे ठाकरे गटाच्या वतीने शिवसंकल्प मेळावा घेत शक्ती प्रदर्शन करण्यात आले. या ठिकाणी वीरेंद्र जगताप यांचाही दावा आहे.
तर महाविकास आघाडीतून धामणगाव रेल्वे मतदार संघ ठाकरे गटाला देण्याची मागणी करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे अभिजित ढेपे यांची विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. तर पक्षाने संधी दिली तर मशाल चिन्हांवर निवडणूक लढेल अशी प्रतिक्रिया अभिजित ढेपे यांनी दिली
कल्याण डोंबिवली : सण उत्सव आनंदाने साजरे करायचे असतील, तर महायुतीशिवाय पर्याय नाही, असे विधान खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले. रवींद्र चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना मोठ्या मतांनी विजयी करा. पुढच्या दोन महिन्यांत दादाच येणार, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले. डोंबिवली विधानसभेत सुरु असलेल्या महायुतीच्या अंतर्गत वादांवर शांतता आणण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे मैदानात उतरले आहेत. त्यावेळी त्यांनी डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांना निवडून देण्याचा विश्वास व्यक्त केला.