Maharashtra Breaking News LIVE 20 September 2024 : संजय राऊत राजकारणात अशिक्षित – नरेश म्हस्के

| Updated on: Sep 20, 2024 | 11:55 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 20 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 20 September 2024 : संजय राऊत राजकारणात अशिक्षित - नरेश म्हस्के
Follow us on

LIVE NEWS & UPDATES

  • 20 Sep 2024 11:55 AM (IST)

    गृहमंत्री अमित शहा नागपुरला येणार

    गृहमंत्री अमित शहा 24 तारखेला नागपुरात येणार. विदर्भातील प्रमुख कोर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची होणार बैठक. विदर्भातील सगळ्या विधानसभा मिळून 1500 पदाधिकारी राहणार उपस्थित. सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत करणार चर्चा. शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांची माहिती.

  • 20 Sep 2024 11:55 AM (IST)

    तिरुपती देवस्थान लाडू प्रकरण, नरेश म्हस्के काय म्हणाले?

    तिरुपती देवस्थानात लाडू काय प्रत्येक सदस्य बघायला जात नाही. मिलिंद नार्वेकर तिथे सदस्य होते. त्यांना दोष देणे योग्य नाही. पण ज्यांनी केलं जे दोषी आहेत त्यांना फासावर लटकवा अशी मागणी नरेश म्हस्के यांनी केली. ते ठाण्याचे खासदार आहेत.


  • 20 Sep 2024 11:23 AM (IST)

    शरद पवार गटाचा नाशिक जिल्ह्यात किती जागांवर दावा?

    राष्ट्रवादी शरद पवार गटाचा नाशिक जिल्ह्यात दहा जागांवर दावा. जिल्ह्यात 47 उमेदवार इच्छुक असल्याचा देखील दावा. शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांची माहिती. इच्छुकांची यादी प्रदेशाध्यक्षांकडे केली सुपूर्द. जागा वाटपाबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता. 16 पैकी दहा जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने केला दावा. मित्र पक्षापेक्षा या जागांवर आमची ताकद जास्त असल्याचा दावा

  • 20 Sep 2024 11:13 AM (IST)

    संजय राऊत राजकारणात अशिक्षित – नरेश म्हस्के

    “संजय राऊत खोटारडी व्यक्ती. बदलापूरची शाळा श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात नाही, ती शाळा भिवंडी मतदारसंघात आहे. संजय राऊत राजकारणात अशिक्षित आहेत. ते नोकरी शिवसेनेची करतात आणि चाकरी शरद पवार यांची करतात” अशी टीका ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली.

  • 20 Sep 2024 10:59 AM (IST)

    शिरूर तालुक्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, 15 ते 20 लोकांना घेतला चावा

    शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस माजवला आहे. या कुत्र्याने 15 ते 20 लोकांना चावा घेतला असून अनेक लहान मुले महिला जेष्ठ नागरिक गंभीर जखमी झालेत. जखमींवरती पाबळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू तर काही जखमींना पुढील उपचारासाठी पिंपरी चिंचवड येथील यशवंराव रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.


  • 20 Sep 2024 10:49 AM (IST)

    २२० वर्षं जुन्या या एशियाटिक सोसायटी ताब्यात घ्या, कर्मचारी संघटनेची केंद्र सरकारला विनंती

    दक्षिण मुंबईतील हॉर्निमन सर्कल परिसरात दोन शतकांहून अधिक काळ दिमाखात उभ्या असलेल्या ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीचे अस्तित्व धोक्यात आल्याची चर्चा आहे.  २२० वर्षं जुन्या एशियाटिक सोसायटीच्या कर्मचारी संघटनेनं केंद्र सरकारला ही संस्था ताब्यात घेण्याची विनंती केली आहे.

  • 20 Sep 2024 10:29 AM (IST)

    शरद पवार गटाची थोड्याच वेळात अंतर्गत बैठक, काय खलबतं ?

    शरद पवार गटाची थोड्याच वेळात अंतर्गत बैठक होणार असून जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे या उपस्थित राहणार आहेत. पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर ही बैठक होईल.

  • 20 Sep 2024 10:21 AM (IST)

    तिसरी आघाडी कायम सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनवली जाते – संजय राऊत

    तिसरी आघाडी कायम सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी असते. तिसरी आघाडी बनवून विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी माजवतात.

    महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत आहे मात्र महाविकास आघाडीची मत कमी करण्यासाठी ही तिसरी आघाडी बनवण्याचं धोरण आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

  • 20 Sep 2024 10:19 AM (IST)

    काँग्रेसच्या जागा वाढल्या यात आमचा वाटा आहे – संजय राऊत

    मविआतील सर्वच पक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे. काँग्रेसच्या जागा वाढल्या यात आमचा वाटा आहे . आत्मविश्वास वाढला म्हणून काँग्रेस काही एकट्याने निवडणूक लढणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.

  • 20 Sep 2024 10:11 AM (IST)

    जालना-बीड मार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

    जालना-बीड मार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात झाला असून यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातावेळी बसमध्ये 25 ते 30 प्रवासी असल्याची माहिती समोर येत आहे.

  • 20 Sep 2024 10:05 AM (IST)

    नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत, काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार ?

    नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत, काँग्रेस पक्षाकडून कोणाला उमेदवारी द्यायची यासंदर्भात काँग्रेस पक्षातील राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडून या संदर्भात चाचपणी चालू आहे .

    दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचा मुलगा रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे.  वसंत चव्हाण यांच्या कुटुंबात उमेदवारी दिल्यामुळे पक्षाला  सहानुभूती स्वरूपात फायदा मिळू शकतो.

    यासंदर्भात चर्चा करण्यासाठी टिळक भवन मुंबई येथे आज सकाळी 11 वाजता काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे.

  • 20 Sep 2024 10:00 AM (IST)

    Maharashtra News: भाजप खासदाराचे मेव्हणे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

    विधानसभा निवडणूक अशोक चव्हाण यांना धक्का… भास्करराव पाटील खतगांवकर यांची घरवासी, आज मुंबईत होऊ शकतो काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश… सोबत सुनबाई मीनल खतगांवकर करणार पक्षप्रवेश, मीनल खतगांवकर करणार काँग्रेसकडून नायगाव विधानसभेवर दावा… खतगांवकर समवते माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा व अविनाश घाटे पक्षप्रवेश करण्याची शक्यता.

  • 20 Sep 2024 09:55 AM (IST)

    Maharashtra News: केजरीवाल सुरू करणार जनसंपर्क अभियान

    मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर केजरीवाल सुरू करणार जनसंपर्क अभियान… येत्या रविवारपासून जनसंपर्क अभियानाची होणार सुरुवात… जंतर-मंतर वरून करणार सुरुवात… केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांकडे मागितली परवानगी… जंतर-मंतर वर पाचशे लोक एकत्र येऊन जनसंपर्क अभियान करणार असल्याची केजरीवाल यांची पोलिसांकडे मागणी… पोलिस परवानगी देणार का याकडे सर्वांचे लक्ष

  • 20 Sep 2024 09:48 AM (IST)

    Maharashtra News: टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन…

    देशांतर्गत तसेच आखाती देशात टोमॅटोची मागणी वाढल्याने टोमॅटोला चढली बाजारभावाची लाली… टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन… पिंपळगाव बसवंत बाजार समिती टोमॅटोला 751 रुपये मिळाला बाजार भाव… पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2 लाख 53 हजार 56 टोमॅटो क्रेट्सची आवक…. जास्तीतजास्त 751 रुपये, कमीतकमी 100 रुपये तर सरासरी 651 रुपये इतका मिळाला प्रति 20 किलोच्या क्रेट्सला बाजार भाव…

  • 20 Sep 2024 09:40 AM (IST)

    Maharashtra News: मराठा धनगर आणि मातगं समाजाची महत्त्वाची बैठक

    प्रलंबित मागण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मंत्री शंभूराज देसाई घेणार बैठक… मंत्रालयात चार ते पाच वाजेच्या दरम्यान आयोजित करण्यात आली बैठक… या बैठकीत तिन्ही समाजाच्या प्रलंबित मागण्याचा आढावा घेतला जाणार

  • 20 Sep 2024 09:29 AM (IST)

    Maharashtra News: नंदुरबार शहरात झालेल्या दंगलीनंतर तणावपूर्ण शांतता

    दंगली करणाऱ्या आरोपींवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला… दगडफेक करणाऱ्या चाळीस आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं…. कुठलाही अनिश्चित प्रकार घडू नये यासाठी माळीवाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला…

  • 20 Sep 2024 08:25 AM (IST)

    Maharashtra News Live : नागपुरात उभारता येणार 40 मजल्यांच्या इमारती, विमानतळ प्राधिकरणाकडून मर्यादेत वाढ

    नागपुरात आता गगनचुंबी इमारती वाढणार

    नागपुरात उभारता येणार 40 माळ्यांच्या इमारती

    विमानतळ प्राधिकरणाकडून 121 मीटरची परवानगी तर विमानतळाच्या आसपासच्या परिसरात नऊ मीटरची परवानगी

    कमी जागेत जास्तीत जास्त कुटुंब राहतील अशा इमारती आता उभ्या व्हायला लागल्या

    1980 च्या दशकात शहरात पहिली अकरा माळ्यांची इमारत बनली होती

    पण आता शहरात 40 माळ्यापर्यंत इमारती उभ्या राहतील

    आतापर्यंत शहरात 100 ते 110 मीटर उंच इमारतीला परवानगी होती

    आता ती मर्यादा विमानतळ प्राधिकरणाकडून 121 मीटर झाली त्यामुळे आता शहरातिल सीमेलगत विकसित होणाऱ्या भागात बहुमत दिली इमारती उभ्या होत आहेत

     

  • 20 Sep 2024 08:23 AM (IST)

    Maharashtra News Live : कोल्हापुरात नवरात्रौत्सवात अंबाबाई मंदिरात बसवले जाणार जादाचे सीसीटीव्ही, जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

    कोल्हापूर : नवरात्र उत्सव काळात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात जादाचे सीसीटीव्ही 20 कॅमेरे बसवले जाणार

    जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना

    नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी येडगे यांनी घेतली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि पोलीस प्रशासनाची आढावा बैठक

    नवरात्र उत्सवाच्या तयारीचा घेतला आढावा

    मंदिर परिसरातील धोकादायक इमारती तात्काळ उतरून घेण्याचा येडगे यांच्या सूचना

    तर सुरक्षेच्या दृष्टीने आणि भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेत तयारी करण्याची जिल्हाधिकारी येडगे यांचे आदेश

  • 20 Sep 2024 08:18 AM (IST)

    Maharashtra News Live : डोंबिवलीकरांसाठी स्वतंत्र पाणी योजना मंजूर, लाखो नागरिकांना दिलासा

    डोंबिवलीकरांसाठी 585 कोटींची स्वतंत्र पाणी योजना मंजूर

    शहाड पाणी पुरवठा योजना पुनर्जीवित; जलवाहिन्यांचे नवीन कामे सुरू होणार

    खासदार डॉ. शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरठा आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निर्णयामुळे लाखो नागरिकांना मिळणार दिलासा

  • 20 Sep 2024 08:16 AM (IST)

    Maharashtra News Live : विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या, धनंजय मुंडे यांच्या सूचना

    विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तातडीने अदा करावी, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचना,

    मुंबईत झालेल्या बैठकीत देण्यात आल्या सूचना

    विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान भरून येण्यासाठी शासनाने निर्गमित केलेला निधी सर्व प्रक्रिया पूर्ण करून वितरित करण्यात यावा,

    संत्रा व मोसंबी उत्पादक बागायतदार शेतकरी यांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाला पाठवला आहे.

    यासंदर्भात लवकरात लवकर मदत वितरित करण्याच्या सूचना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मदत व पुनर्वसन विभागास केल्या,

    त्याचबरोबर मॅग्नेट प्रकल्पांतर्गत संत्रा पिकासाठी करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा घेऊन गती देण्याच्या सूचना केल्या.

  • 20 Sep 2024 08:13 AM (IST)

    Maharashtra News Live : मुंबई पुणे एक्स्प्रेसवर लुटमार करणारी टोळी जेरबंद

    मुंबई पुणे एक्स्प्रेसवर लघुशंकेला थांबणाऱ्या ट्रक चालकांना मारहाण करून त्यांच्याकडून पैसे, मोबाईल इतर वस्तू लुटमार करून लंपास होणारी टोळी पनवेल शहर पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून रोकड, मोबाईल असा एकूण 1 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात पाच आरोपींना अटक केली आहे. यातील आरोपी अट्टल चोर असून त्यांच्यावर इतर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. अधिक तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत.

Maharashtra News Live : महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी मोठ्या वेगाने सुरु आहेत. त्यातच सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीलाही सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे महायुतीत जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदावरुन राजकारण सुरु झाले आहे. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी हे आज वर्धा दौऱ्यावर आहेत. राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार आहेत. तसेच उद्या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री अतिशी यांचा शपथविधी पार पडणार आहे. अतिशी यांनी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला आहे.