Maharashtra Breaking News LIVE 05 October 2024 : राज ठाकरे यांची उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक

| Updated on: Oct 16, 2024 | 7:33 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 05 ऑक्टोबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 05 October 2024 : राज ठाकरे यांची उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक
महाराष्ट्रासह देशभरातील सर्व लाईव्ह अपडेट्स
Follow us on

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि वाशिमच्या दौऱ्यावर असणार आहेत. मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो- 3 चं लोकार्पण केलं जाणार आहे. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर असणार आहेत. राहुल गांधीच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीआधी आता घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील घडामोडी या ब्लॉगमध्ये तुम्हाला वाचायला मिळतील.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Oct 2024 12:37 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली

    रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली .

     

  • 10 Oct 2024 12:18 AM (IST)

    प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं निधन

    प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं निधन झालं. वयाच्या 86व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

     


  • 06 Oct 2024 03:52 PM (IST)

    लाडक्या बहिणींच्या या मेळाव्यात आणखी दोन योजना सुरवात केल्या- देवेंद्र फडणवीस

    शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे यासाठी शेतकऱ्यांना विजेच्या पंपाच बिल भरावं लागणार नाही ते राज्य सरकार भरत आहे. शेतकऱ्यांना सौरपंप सरकार देणार आहे, बिघाड झाले तर सरकार दृष्टी करेल. सौरपंपाचा लाभ घेणारे पहिल्या क्रमांकवर छत्रपती संभाजीनगर आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

  • 06 Oct 2024 03:44 PM (IST)

    सध्या नवरात्र उत्सव सध्या सुरु आहे, महिला या आदिशक्तीचे रुप आहेत- अजित पवार,

    आतापर्यंत अनेक सरकारे आली गेली मात्र सर्वात प्रभावी योजना ही लाडकी बहिण योजना.  राज्यात फिरत असतांना अणेक महिला म्हणतात दादा पैसे मिळाले.

  • 06 Oct 2024 03:20 PM (IST)

    निलम गोऱ्हे यांचे अत्यंत मोठे विधान

    नरहरी झिरवळ आमचे उपसभापती आहेत. मात्र ते अश्या पद्धतीने उड्या मारतील असे वाटले नव्हते. पण त्यांच्या मागण्यासाठी त्यांनी ते केले.अर्थात त्यांच्या मागण्या मान्य देखील झाल्या, असे निलम गोऱ्हे यांनी म्हटले.

  • 05 Oct 2024 06:52 PM (IST)

    परराष्ट्र मंत्री पाकिस्तानशी मैत्रीबाबत बोलणार : फारुख

    जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी श्रीनगरमध्ये सांगितले की, “परराष्ट्र मंत्री जयशंकर (पाकिस्तान) शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत जात आहेत हे खूप चांगले आहे. मला आशा आहे की ते हा द्वेष संपवून देशाला मैत्रीच्या दिशेने नेण्याबद्दल बोलतील.”

  • 05 Oct 2024 06:37 PM (IST)

    बुलडोझरबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय योग्य : जयंत चौधरी

    बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर केंद्रीय मंत्री जयंत चौधरी बिकानेरमध्ये म्हणाले, “हा न्याय्य निर्णय आहे. न्यायाची प्रक्रिया असते हे सर्व सरकार आणि यंत्रणांनी लक्षात ठेवावे. प्रत्येकाने त्याची काळजी घेतली पाहिजे. न्याय सर्वांसाठी समान असावा. योग्य न्यायाची परंपरा आहे.”

  • 05 Oct 2024 06:25 PM (IST)

    सतेंद्र जैन यांच्या जामीन अर्जावर 15 ऑक्टोबरला निर्णय होणार

    मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले दिल्ली सरकारचे माजी मंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांच्या जामीन याचिकेवर राऊस एव्हेन्यू कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. 15 ऑक्टोबर रोजी न्यायालय आपला निकाल देणार आहे. सुनावणीदरम्यान ईडीने याचिकेला विरोध केला.

  • 05 Oct 2024 06:10 PM (IST)

    रिया चक्रवर्तीला 500 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी समन्स

    बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा त्रास काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. 500 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तिला समन्स बजावले आहे. हायबॉक्स ॲप फसवणूक प्रकरणात, दिल्ली पोलिसांच्या विशेष सेल IFSO (इंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स) ने या प्रकरणी रियाला नोटीस बजावली आहे. रियासोबत अनेक YouTubers ने Hibox ॲपचे प्रमोशनही केले. तपासात सुमारे 500 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

  • 05 Oct 2024 05:36 PM (IST)

    नाशिक दौऱ्यावर येणाऱ्या राज ठाकरेंच्या स्वागतासाठी झेंडूच्या फुलांचा भव्य हार

    मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी 500 किलो चा हार आणण्यात आला आहे. 25 फूट उंची असलेला हा झेंडूच्या फुलांचा भव्य हार आहे. क्रेनच्या सहाय्याने फुलांच्या हाराने राज ठाकरेंचं स्वागत केले जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक दौऱ्यावर येणाऱ्या राज ठाकरेंच्या स्वागतासाठी झेंडूच्या फुलांचा भव्य हार आणण्यात आला आहे.

  • 05 Oct 2024 05:19 PM (IST)

    पंतप्रधान मोदी यांचा मविआवर निशाणा

    मविआ ही विकासाला विरोध करणारी आघाडी आहे. मविआने अहदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचं काम पुढे सरकू दिलं नाही. मविआने महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील पाण्याशी संबंधित प्रकल्पही बंद पाडल्याचं मोदींनी म्हटलं. तसेच मविआने लोकांची तहान भागवण्यासाठी सुरू करण्यात आलेले प्रकल्प थांबवले. मविआ तुमची प्रत्येक कामं रोखत होते. आता तुम्ही त्यांना रोखा, असं मोदींनी म्हटलं. तसेच महाराष्ट्रातील विकासाच्या या शत्रूंनाना सत्रपासून दूर ठेवा, असं आवाहनही मोदींनी केलं.

  • 05 Oct 2024 05:10 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाण्यातून लाईव्ह

    आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मोदींनी वाशिम जिल्ह्याचा दौरा केला. त्यानंतर ते सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकासकामांचं भूमीपूजन केलं आहे आणि करणार आहेत. तसेच काही वेळानंतर मोदी मुंबईत मेट्रा 3 च्या एक्वा लाईनच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करणार आहेत.

  • 05 Oct 2024 04:58 PM (IST)

    गुणरत्न सदावर्ते यांना जीवे मारण्याची धमकी

    बिग बॉसच्या घरात जाताच गुणरत्न सदावर्ते यांना जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल आला. आंतरराष्ट्रीय कॉलवरून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. निनावी क्रमांकावरुन हा कॉल आला. याप्रकरणी जयश्री सदावर्ते भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवणार आहेत.

  • 05 Oct 2024 04:48 PM (IST)

    दोन वर्षांपूर्वी आम्ही टांगा पलटी केला -मुख्यमंत्री

    दोन वर्षांपूर्वी आम्ही टांगा पलटी केला, त्यामुळे मुंबईत अनेक प्रकल्प झपाट्याने पूर्ण झाले. मुंबईचा ऐतिहासिक विकास झाला आहे. महाराष्ट्र, मुंबई कात टाकत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

  • 05 Oct 2024 04:41 PM (IST)

    राहुल गांधी यांना शिवरायांची आठवण झाली

    राहुल गांधी यांना पण आता छत्रपती शिवरायांची आठवण झाली असा चिमटा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढली. त्यांनी जवाहरलाल नेहरू यांनी शिवाजी महाराज यांचा पुस्तकातून अपमान केल्याचा आरोप केला.

  • 05 Oct 2024 04:30 PM (IST)

    38 नक्षलवाद्यांचा खात्मा

    छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि पोलिसांदरम्यान मोठी चकमक उडाली. त्यात 38 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला.दंतेवाडा-नारायणपूर सीमेवर ही मोठी कारवाई करण्यात आली.

  • 05 Oct 2024 04:20 PM (IST)

    विधानसभेच्या इच्छुक उमेदवाराला तडीपारीची नोटीस

    चंद्रपूर येथील शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांना तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे. मूल उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी ही तडीपारीची नोटीस बजावली होती. 9 ऑक्टोबरला सकाळी 11 उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्याची आणि तडीपारी का करू नये याचं उत्तर सादर करण्यासाठी ही देण्यात आली. संदीप गिऱ्हे हे बल्लारशा मतदारसंघातून शिवसेने कडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

  • 05 Oct 2024 04:10 PM (IST)

    अनिल गोटे महाविकास आघडीकडून इच्छुक

    मी महाविकास आघाडीचा घटक आहे. धुळे मतदार संघात उमेदवारी देताना माझा नावाचा विचार करावा, अशी विनंती आपण संजय राऊत यांना केल्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी सांगितले. संजय राऊत धुळे दौऱ्यावर असताना एका हॉटेलमध्ये भेट घेतली होती.

  • 05 Oct 2024 04:00 PM (IST)

    रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपली

    केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपली आहे. बोदवड रेल्वे प्रश्नावरून आणि बोदवड विकास कामावरून एकमेकांमध्ये शा‍ब्दिक चकमक उडाली आहे.

  • 05 Oct 2024 02:43 PM (IST)

    नावाला शोभेल असे काम या कार्यालयातून होणार आहे- जरांगे पाटील

    नावाला शोभेल असे काम या कार्यालयातून होणार आहे. मी जातीयवादी असतो तर या कार्यालयाला मराठा भवन असे नाव दिले असते, मनोज जरांगे पाटील

  • 05 Oct 2024 02:40 PM (IST)

    राज ठाकरे यांचा संताप

    कार्यकर्त्यांना परवानगी नसताना कार्यकर्ते हॉटेलमध्ये आल्याने राज ठाकरे संतापले. राज ठाकरे यांनी रागात स्वीकारला पुष्पगुच्छ. राज ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना घडला प्रकार

  • 05 Oct 2024 02:09 PM (IST)

    ब्रेक निकामी झाल्याने स्कूल बसचा अपघात

    कोरपना तालुक्यातील राजुरा-गडचांदुर मार्गावरील हरदोना गावाजवळची घटना, बस वरील नियंत्रण सुटल्याने बस उतरली रस्त्याखाली, गडचांदूर येथील लाल बहादूर शाळेची होती स्कूल बस, स्कूल बस मध्ये असलेल्या 40 विद्यार्थ्यां पैकी 7 जण किरकोळ जखमी

  • 05 Oct 2024 02:09 PM (IST)

    जळगाव दोन महायुतींच्या नेत्यांमध्ये जुंपली

    केंद्रीय मंत्री रक्षा खडसे व शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील. बोदवड रेल्वे प्रश्नावरून व बोदवड विकास कामावरून एकमेकांमध्ये जुंपली…

  • 05 Oct 2024 01:57 PM (IST)

    डहाणू-नाशिक राज्य मार्गावर अपघात

    डहाणू-नाशिक राज्य मार्गावरील सारणी-वधना येथे मारुती सुझुकी इर्टिगा कार (एम एच 15 जी एक्स 3761) आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस (एम एच 20 बी एल 2479) यांचा भीषण अपघात झाला. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही

  • 05 Oct 2024 01:52 PM (IST)

    शेतकऱ्यांना डबल फायदा- नरेंद्र मोदी

    राज्यात शेतकऱ्यांना एनडीए सरकारने डबल फायदा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या सरकारने शेतकऱ्यांचं वीज बिल शून्य केलं, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

  • 05 Oct 2024 01:46 PM (IST)

    काँग्रेसने अनेक कामे रोखून धरली- मोदी

    प्रत्येक निवडणुकीत कर्जमाफीचं आश्वासन देणं हा काँग्रेसचा हातखंडा आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस आणि महाआघाडी सरकारने सिंचनाशी संबंधित अनेक कामे रोखून धरले होते. पण आमचं सरकार आलं आणि हे काम सुरू केलं.

  • 05 Oct 2024 01:32 PM (IST)

    हरियाणामध्ये मोठ्या संख्येने मतदान करावे- मोदी

    हरियाणामध्ये मतदान होत आहे. हरियाणामधील लोकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. विकासासाठी ते महत्वाचे असमार आहे.

  • 05 Oct 2024 01:25 PM (IST)

    आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्याने वाढवणार- राहुल गांधी

    आम्ही संविधान बदलू देणार नाही. संविधानाचं रक्षण करण्यासाठी दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा वाढवण्यात येणार आहे. तसेच जातीनिहाय जनगणना करण्यात येईल, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

  • 05 Oct 2024 01:22 PM (IST)

    सरकारच्या अग्नीवीर योजनेवर राहुल गांधींची टीका

    अग्निवीर ही पेन्शन काढून घेणारी स्कीम आहे. पूर्वी एखादा तरुण आर्मीत जायचा. तेव्हा देश त्याला पेन्शन द्यायचा. त्याला भरपाई द्यायचे. सरकारची ही कमिटमेंट होती. जवानांच्या योगदानाची कदर होती.

  • 05 Oct 2024 01:14 PM (IST)

    न्यायपालिकेत मागास व्यक्ती नाहीत- राहुल गांधी

    न्यायपालिका,  गुप्तचर विभाग या ठिकाणी पाहा, कुठेच दलित, ओबीसी नाहीत. मागास समाजातील एकाही व्यक्तीचे नाव दिसत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

  • 05 Oct 2024 01:14 PM (IST)

    लाडकी बहीण योजना बंद होणार नाही- एकनाथ शिंदे

    लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. कोणीही लाडकी बहीण योजना बंद करु शकत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

  • 05 Oct 2024 01:07 PM (IST)

    अदानी, अंबानींकडे अधिकारी मागास समाजातील नाही- राहुल गांधी

    अदानी, अंबानी कंपनीचे मॅनजर्स पाहा. त्यात सीनिअर मॅनेजर्स दलित आहे का. त्यांचा पगार एक कोटी, ५० लाख असतो. त्यात एक दलित, आदिवासी आणि मागास व्यक्ती दाखवा. मीडियातील मालकांची नावे काढा. त्यात एकही दलित ओबीसी निघणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

  • 05 Oct 2024 01:04 PM (IST)

    देशात शिक्षणाचं खासगीकरण सुरू आहे. गरिबाच्या मुलांना शिक्षण कसं मिळणार ?

    देशात शिक्षणाचं खासगीकरण सुरू आहे. गरिबाच्या मुलांना शिक्षण कसं मिळणार ? राहुल गांधी यांचा सवाल

  • 05 Oct 2024 01:01 PM (IST)

    ज्याच्या हातात कला त्याला मागे बसवलं जातं, हेच देशात सुरू आहे – राहुल गांधी

    जे हाताने काम करता ते मागे पडले आहेत. ज्याच्या हातात कला त्याला मागे बसवलं जातं, हेच देशात सुरू आहे – राहुल गांधी यांची टीका

  • 05 Oct 2024 12:59 PM (IST)

    शासनाकडून पेसा भरतीसंदर्भात परिपत्रक जारी

    पेसा कायद्यांअंतर्गत जे उमेदवार भरती साठी पात्र झाले आहेत त्यांची भरती प्रक्रिया ही कंत्राटी पद्धतीने करण्यात यावी असा निर्णय राज्य शासनाने आज पारित केला आहे.

    पेसा कायद्यांअंतर्गत राखलेल्या भरती प्रक्रियेसंदर्भात काल आदिवासी लोकप्रतिनिधी यांनी मंत्रालयात आक्रमक आंदोलन केलं होतं. काल या मागणी संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत आदिवासी नेत्यांची बैठक देखील पार पडली होती. आदिवासी नेत्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे.

  • 05 Oct 2024 12:51 PM (IST)

    पोहरादेवीला भेट देणार नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान – देवेंद्र फडणवीस

    पोहरादेवीला भेट देणार नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने मोदींचे आभार – देवेंद्र फडणवीस

  • 05 Oct 2024 12:29 PM (IST)

    सरकारमध्ये बसलेले गद्दार बेकार होणार – उद्धव ठाकरे

    सरकारमध्ये बसलेले गद्दार बेकार होणार. एकाही गद्दाराला नोकरी देणार नाही, उद्धव ठाकरेंची टीका

  • 05 Oct 2024 12:26 PM (IST)

    मोदींनी भूमीपूजन केलेली काम अपूर्ण – उद्धव ठाकरे

    मोदींनी भूमीपूजन केलेली काम अपूर्ण. आमचं हिंदुत्व हे घरातील चूल पेटवणारं तर त्यांचं हिदुतव्त हे घर पेटवणार, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.   ठाकरे गटाच्या महारोजगार मेळाव्यात ते बोलत होते.

  • 05 Oct 2024 12:05 PM (IST)

    पोहरादेवीत नरेंद्र मोदींच्या हस्ते नंगारा भवनाचं उद्घाटन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. वाशीमच्या पोहरादेवी येथे नंगारा भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. तत्पूर्वी  पंतप्रधानांनी जगदंबा माता मंदिरात दर्शन घेतले.

     

  • 05 Oct 2024 11:52 AM (IST)

    Maharashtra News: शिवरायांच्या विचारातूनच संविधानाची निर्मिती झाली – राहुल गांधी

    शिवरायांच्या विचारातूनच संविधानाची निर्मिती झाली… महापुरुष ज्यासाठी लढले, त्यासाठी आपणही लढायला हवं… शिवराय आणि काँग्रेसची विचारधारा एकच… असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे.

  • 05 Oct 2024 11:39 AM (IST)

    Maharashtra News: नाशिकच्या अशोक स्तंभावर महाविद्यालयीन मुलांचा जोरदार राडा

    नाशिकच्या अशोक स्तंभावर महाविद्यालयीन मुलांचा जोरदार राडा… दोन गटात तुंबळ हाणामारी… अशोक स्तंभ परिसरात असलेल्या खाजगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांचा राडा…

  • 05 Oct 2024 11:21 AM (IST)

    Maharashtra News: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी जिल्हाध्यक्ष पदाचे राजीनामा दिला…

    पदाचा राजीनामा दिला मात्र पक्षाचा राजीनामा दिला नाही…..उदेसिंग पाडवी काँग्रेस मधून लढण्यास इच्छुक… राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला नाही मात्र तरी देखील काँग्रेसकडून लढण्याची इच्छुक… भाजपानंतर राष्ट्रवादीला देखील शहादा तळोदा मतदारसंघात मोठा धक्का….

  • 05 Oct 2024 11:08 AM (IST)

    Maharashtra News: राज ठाकरे आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर

    राज ठाकरे आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर… राज ठाकरेंच्या स्वागताचे नाशिक मध्ये बॅनर… दोन दिवसीय बैठकीत घेणार उत्तर महाराष्ट्राचा आढावा… राज ठाकरेंच्या स्वागतासह राज ठाकरेंचे आभार मानणारे बॅनर… मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल राज ठाकरे यांचे मनःपूर्वक आभार अशा आशयाचे बॅनर…

  • 05 Oct 2024 10:56 AM (IST)

    अजित पवारांना दौंडमध्ये बसणार धक्का

    अजित पवारांना दौंड विधानसभेत धक्का बसण्याची शक्यता. रमेश थोरात यांनी घेतली शरद पवारांची भेट. दौंडमधून निवडणूक लढवण्यास आहेत इच्छुक. भेटीला सुप्रिया सुळे यांनी दिला दुजोरा.

  • 05 Oct 2024 10:55 AM (IST)

    चंद्रपूर – एमपीटी मशीनची दुसऱ्या एमपीटी मशीनला मागून धडक

    एमपीटी मशीनची दुसऱ्या एमपीटी मशीनला मागून धडक. मशीन ऑपरेटर सह चार रेल्वे कर्मचारी जखमी. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बल्लारपूर-गोंदिया मार्गावरील मुल आणि मारोडा या दोन रेल्वे स्थानका दरम्यानची घटना. सिंदेवाही रेल्वे स्थानकावरून मेंटेनन्सचे काम करून बल्लारपूरकडे एकामागेएक निघालेल्या एमपीटी मशीनला मागून येणाऱ्या दुसऱ्या एमपीटी मशीनने दिली जोरदार धडक.

  • 05 Oct 2024 10:26 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेडमध्ये दाखल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेड विमानतळावर दाखल. पंतप्रधान नांदेडहून पोहरादेवीला रवाना होणार.

  • 05 Oct 2024 10:20 AM (IST)

    वोट जिहादवर श्वेत पत्रिका काढावी लागेल – संजय राऊत

    वोट जिहादवर आरएसएस, भाजपा फेक नरेटिकव्ह सेट करतय. वोट जिहाद काय असतं? त्यावर श्वेतपत्रिका काढावी लागेल. भाजपा निवडणूक हरले की वोट जिहाद, एखाद्या मतदारसंघात मुस्लिमांनी मतदान केलं की, वोट जिहाद नाही का? या देशात सगळ्या जाती धर्माचे मतदार आहेत असं संजय राऊत म्हणाले.

  • 05 Oct 2024 10:13 AM (IST)

    भाजपासाठी पंतप्रधान गल्लीबोळात फिरत आहेत – संजय राऊत

    “भाजपासाठी पंतप्रधान गल्लीबोळात फिरत आहेत. उत्तर महाराष्ट्राच वातावरण मविआसाठी अनुकूल. पंतप्रधानांनी महाराष्ट्रात डेरा टाकलाय. भाजपा, RSS फेक नरेटिव्हचा कारखाना” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

  • 05 Oct 2024 09:57 AM (IST)

    लक्ष्मण हाके आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट

    ओबासी समाजाचे आंदोलन नेते लक्ष्मण हाके यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. काल दुपारी ही भेट झाल्याची माहीती आहे. या भेटीमध्ये जवळपास एक तास आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती आहे.

  • 05 Oct 2024 09:45 AM (IST)

    शिंदे गटाला आणखी एक मोठा धक्का

    विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. मोहोळमधील शिवसेना शिंदे गटाचे नेते नागेश वनकळसे यांनी घेतली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. नागेश वनकळसे यांनी मोहोळ विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी केलीय. नागेश वनकळसे हे शिवसेना शिंदे गटाचे सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष असून ते राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय पदाधिकारी राहिले आहेत. अभ्युदय मल्टिस्टेट बँकेचे प्रमुख आणि माजी आमदार सीताराम घनदाट मामा यांनी वनकळसे यांच्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारीसाठी ताकद लावली आहे.

  • 05 Oct 2024 09:30 AM (IST)

    राज ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये, बैठका घेणार

    मनसे प्रमुख राज ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात बैठक घेणार आहेत. मराठवाड्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सुभेदार विश्रामगृहात बैठक घेणार आहेत. आजपासून राज ठाकरे यांचा संभाजीनगर दौरा सुरू होतोय. संध्याकाळच्या सुमारास राज ठाकरे नाशिकसाठी रवाना होणार आहेत. दहा वाजल्यापासून राज ठाकरे यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेणार आहेत.

  • 05 Oct 2024 09:15 AM (IST)

    नरेंद्र मोदी थोड्याच वेळात नांदेडला पोहोचणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पोहरादेवीला जाणार आहे. त्यासाठी नांदेड विमानतळवर ते उतरतील. त्यानंतर ते पोहरादेवीला जाणार आहेत. 9 वाजून 40 मिनिटांनी नांदेड विमानतळावर पोहचणार आहेत. विमानतळवरून हेलिकॉप्टरने पोहरादेवी जाणार आहेत. नांदेड विमानळ बाहेर आणि परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.