Maharashtra Breaking News LIVE 02 October 2024 : रिफायनरी विरोधातील आंदोलकांवरील गुन्हे सरसकट माफ करावेत – भास्कर जाधव

| Updated on: Oct 02, 2024 | 1:55 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 02 ऑक्टोबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 02 October 2024 : रिफायनरी विरोधातील आंदोलकांवरील गुन्हे सरसकट माफ करावेत - भास्कर जाधव
Follow us on

LIVE NEWS & UPDATES

  • 02 Oct 2024 01:54 PM (IST)

    रिफायनरी विरोधातील आंदोलकांवरील गुन्हे सरसकट माफ करावेत – भास्कर जाधव

    कोकणातील रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे.निवडणुकीत आंदोलनकर्त्यांना फसवलं जाणार नाही याचा विचार आंदोलनकर्त्यांनी करावा असेही ते म्हणाले.

  • 02 Oct 2024 01:36 PM (IST)

    सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार आमने-सामने

    राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार एका कार्यक्रमात समोरासमोर आले, तेव्हा युगेंद्र पवारा यांनी नमस्कार करीत काकी सुनेत्रा पवार यांचे आशीर्वाद घेतले.

     


  • 02 Oct 2024 01:18 PM (IST)

    गोविंदा गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदवले

    गोविंदा गोळीबार प्रकरणी पोलिसांनी गोविंदाची मुलगी आणि अंगरक्षकाचे जबाब नोंदवले आहेत.गोविंदाच्या डिस्चार्जनंतर त्यांचाही पोलिस जबाब नोंदवणार आहेत.

  • 02 Oct 2024 11:57 AM (IST)

    नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

    नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील मोवाड गावातील धक्कादायक घटना आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे.

     

  • 02 Oct 2024 11:54 AM (IST)

    शिवसेना शिंदे गटाचे नेते सोमेश क्षीरसागर यांनी घेतली खासदार सुप्रिया सुळे यांची भेट

    शिवसेना शिंदे गटाचे नेते सोमेश क्षीरसागर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. सोमेश क्षीरसागर हे शिवसेना शिंदे गटाचे मोहोळचे नेते असून राष्ट्रवादी अजितदादा गटाचे माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत.

    मागील अनेक विधानसभा निवडणुका लढवल्या असून यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. यापूर्वी देखील सोमेश क्षीरसागर यांनी शरद पवार तसेच जयंत पाटलांची भेट घेतली आहे.


  • 02 Oct 2024 11:36 AM (IST)

    पक्ष फोडून मित्र मिळवणारे 2029 ला सत्तेत कसे येतील? जयंत पाटील

    जे पक्ष फोडून मित्र बनले, त्यांचा आधार घेण्याची वेळ 2024 मध्ये भाजपवर आली. तो पक्ष 2029 ला सत्तेत कसा येईल?  आता कमळाची परिस्थिती गंभीर आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील म्हणाले

  • 02 Oct 2024 11:25 AM (IST)

    देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोड, एका पोलिसाचं निलंबन

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर महिलेने तोडफोड केल्याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षेत चालढकल केल्याप्रकरणी एका पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे. पोलीस हवालदार अनिल आवळेंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

  • 02 Oct 2024 11:19 AM (IST)

    अमित शहांच्या दौऱ्यावरून मार्मिक चे व्यंगचित्र, भाजप नेत्यांना केलं लक्ष्य

    विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून मार्मिकच्या व्यंगचित्रातून त्यावर भाष्य करण्यात आले आहे.

    महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याचा मुद्दा, हाय प्रोफाईल अपघात प्रकरण, बदलापूर अत्याचार प्रकरण, मुंबईतील रस्ते इत्यादी मुद्द्यांवरून व्यंगचित्रांच्या मार्फत भाजप नेत्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

  • 02 Oct 2024 11:08 AM (IST)

    मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंकडून दिल्लीत लोटांगण – प्रतापराव जाधव यांची टीका

    मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत छोट्या-छोट्या नेत्यांसमोर लोटांगण घालत आहेत, अशी टीका प्रतापराव जाधव यांनी केली आहे. बाळासाहेबांनी कधी मातोश्री सोडली नाही. आमच्या पक्षातील कोणीही मुख्यमंत्रीपदासाठी उंबरठे झिजवले नाहीत, असेही ते म्हणाले.

  • 02 Oct 2024 10:55 AM (IST)

    Maharashtra News: मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव भाजपच्या विद्यमान आमदाराच्या विरोधात मैदानात

    परिवर्तन रॅली काढत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या शक्तीने निवडणुक लढवण्याची केली घोषणा… ज्याप्रमाणे फडणवीस यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार विजयी झाले त्याप्रमाणेच मुख्यमंत्र्यांच्या शक्तीने मी सुद्धा निवडणूक येणार – बालाजी खतगावकर , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव

  • 02 Oct 2024 09:57 AM (IST)

    आंबेप्रेमींसाठी आनंदाची बातमी

    आंबा खवय्यांसाठीची बातमी आहे. ऑक्टोबरमहिन्यात पाऊस न झाल्यास यावर्षीचा आंबा वेळेत येणार आहे. 15 आँक्टोबरपर्यत पाऊस पडत राहिला तर आंब्याचे गणित बिघडणार आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्यावर आंब्याचे बरेसचे गणित अवलंबून आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

  • 02 Oct 2024 09:50 AM (IST)

    पोलिसांनी गोविंदाचा जबाब नोंदवला

    अभिनेता गोविंदाचा मुंबई पोलिसांनी काल जबाब नोंदवला. गोविंदाकडून काल पहाटे स्वतच्याच पिस्तूलमधून मिसफायरींग झालं होतं. सध्या गोविंदा जुहूतल्या क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल असून उपचार सुरू आहेत. गोविंदाच्या घरी कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवण्यात आला.

  • 02 Oct 2024 09:45 AM (IST)

    अपघातग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे प्रवास करणार होते

    पुण्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. याच हेलिकॉप्टरने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरने प्रवास करणार होते.

  • 02 Oct 2024 09:32 AM (IST)

    धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळलं

    पुण्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा यात मृत्यू झाला आहे.

  • 02 Oct 2024 09:30 AM (IST)

    आज भाजपची निवडणूक नियोजन बैठक

    नागपूर शहर भाजपची आज निवडणूक नियोजन बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि नागपूर जिल्हा प्रभारी कैलास विजयवर्गीय उपस्थित राहतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या सूचनांवर या बैठकीत मंथन होणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी नागपूरच्या सुरेश भट सभागृहात संध्याकाळी ही बैठक होणार आहे. बैठकीला शहर पदाधिकारी,मंडळ अध्यक्ष,शक्तिकेंद्र प्रमुख यांचा समावेश राहणार आहे.

  • 02 Oct 2024 09:15 AM (IST)

    पूरग्रस्त राज्यांसाठी केंद्राची मदत

    देशातील पूरग्रस्त राज्यांसाठी केंद्र सरकारने मोठी मदत जाहीर केली आहे. 5850 कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून मंजूर केले आहेत. महाराष्ट्रासाठी 1492 कोटी , आंध्र प्रदेश साठी 1 हजार कोटी, गुजरात साठी 600 कोटी, तेलंगणासाठी 417 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. देशभरातील 21 राज्यांसाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर करण्यात आला आहे.

  • 02 Oct 2024 08:46 AM (IST)

    Maharashtra News Live : धाराशिवमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष देणार उमेदवार, लवकरच जाहीर करणार नावे

    धाराशिव जिल्हयातील चारही विधानसभा जागेवर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार देणार आहेत. या विधानसभेवरील उमेदवारांची नावे लवकरच जाहीर केली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष विकास पाटील यांनी दिली. धाराशिव जिल्हयातील भुम परंडा वाशी, कळंब-धाराशिव, तुळजापूर, उमरगा या चारही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्ष निवडणूक लढणार असून उमेदवार लवकरच जाहीर करणार आहे. धाराशिव जिल्हयाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकास पाटील यांनी जाहीर केले आहे.

  • 02 Oct 2024 08:44 AM (IST)

    Maharashtra News Live : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून खुला, अर्थव्यवस्थेला मिळणार चालना

    चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. पावसाळ्याचे तीन महिने म्हणजे 1 जुलै ते 30 सप्टेंबर ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा पर्यटनासाठी बंद असतो. या काळात ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अंतर्गत रस्ते पावसामुळे सफारीसाठी उपयुक्त नसल्याने आणि या काळात अनेक जीवजंतू, प्राणी आणि पक्षांचा प्रजनन काळ असल्यामुळे पर्यटकांसाठी सफारी बंद करण्यात येते. मात्र पावसाचा जोर उतरताच आज पासून पुन्हा एकदा ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांच्या सेवेत दाखल होत आहे. ताडोबात आज पासून पर्यटकांची रेलचेल सुरू होणार असल्यामुळे स्थानिक लोकांच्या रोजगाराला आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल.

  • 02 Oct 2024 08:43 AM (IST)

    Maharashtra News Live : इम्तियाज जलील यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

    एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल कोंढवा पोलीस ठाण्यात इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, म्हणून काल शंभू भक्तांनी ठिय्या मांडला होता. आता तिरंगा रॅली दरम्यान छत्रपती संभाजीनगर बोर्डला काळ फासण्यात आलं आहे. यामुळे शंभु भक्तांच्या भावना दुखावल्या म्हणून काल ठिय्या मांडण्यात आला. आता याप्रकरणी इम्तियाज जलील यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     

  • 02 Oct 2024 08:40 AM (IST)

    Maharashtra News Live : धुळे शहरातील काही भागाची बत्ती गुल

    धुळे शहरातील काही भागाची बत्ती गुल झाली आहे. गेल्या 7 तासांपासून धुळ्यातील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. रात्री आठ वाजल्यापासून धुळे शहरातील मोगलाईसह बाजारपेठ विभागाची लाईट बंद करण्यात आली आहे. गेल्या सात तासापासून हा सर्व भाग अंधारात आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अधिकारी नागरिकांचे कॉल उचलत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. वीज नसल्याने संपूर्ण परिसरात डास मच्छरांचा त्रास वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळत आहे. महाविकासआघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर काही पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. तर सध्या अनेक पक्षांतंर्गत बैठकाही होत आहेत. तसेच सध्या महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. गुजरातमधील चक्रीय स्थितीमुळे राज्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल, अशीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.