Maharashtra News Live : सध्या विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यामुळे सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे महायुतीत जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदावरुन राजकारण सुरु झाले आहे. तसेच सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन झाल्यानंतर काल गौराईंचेही आगमन झाले. आज गौरी पुजनानिमित्त संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्रात भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच सध्या मुंबईची लाईफलाईन विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अनेक चाकरमान्यांचा लेटमार्क लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पॅरिस ऑलंपिक 2024 मध्ये कांस्य पदक जिंकलेल्या भारतीय मराठमोळ्या खेळाडू स्वप्निल कूसळे याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली आहे.
अमरावतीत लाडकी बहीण योजनेच्या बॅनर वरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो गायब झाला आहे. बॅनरवर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो लावला आहे. देवा भाऊ लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला असा मजकूर आहे. बॅनरवर अजित पवार यांचा फोटो नसल्याने राष्ट्रवादीत नाराजी असल्याची चर्चा आहे.
अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर मलायकाचा पूर्व पती आणि अभिनेता अरबाज खान घटनास्थळी पोहोचला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप पदाधिकारी संदीप लेले यांच्या निवासस्थानी गणेश दर्शनासाठी पोहोचले आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे मोठा फटका
ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपुर (मेंडकी) येथील घटना. मृतकांमध्ये गणेशपुर येथील पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे आणि नानाजी राऊत यांचा समावेश. आज सकाळी शेतात खत टाकण्यासाठी प्रकाश राऊत यांच्या मालकीच्या शेतात गेले होते हे सर्व जण
बडनेरा मतदार संघात मी महायुती मधून युवा स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक लढवणार आहे. माझे पाना हे चिन्ह आहे, देवेंद्र फडणवीस यांनी मला हिरवी झेंडी दिली आहे असं केलं होतं रवी राणा यांनी वक्तव्य
कसारा रेल्वे स्थानकावर गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला कल्याण जीआरपीने बेड्या ठोकल्या आहेत. बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना कसारा रेल्वे स्थानकावर गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली. रेल्वे स्थानकावर गस्तीदरम्यान कल्याण रेल्वे पोलिस आणि आरपीएफने बेड्या ठोकल्या आहेत.
पुणे- 2023 च्या सारथी संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के दराने फेलोशिप मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील संशोधक विद्यार्थ्यांनी 9 सप्टेंबरपासून पुणे येथील सारथीच्या मुख्य कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केलंय. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, संभाजीनगर, मुंबई, अहिल्यानगर इत्यादी ठिकाणाहून संशोधक विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये निर्णय न झाल्यास साखळी उपोषण स्थगित करून आमरण उपोषण चालू करणार असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
कोल्हापुरात घरगुती गणपती विसर्जनावरून पुन्हा एकदा हिंदुत्ववादी संघटना प्रशासन आमने-सामने येण्याची चिन्हं आहेत. प्रदूषण टाळण्यासाठी पंचगंगा नदीमध्ये गणेश मूर्ती विसर्जनाला महानगरपालिकेकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रशासनाकडून पंचगंगा नदी घाट परिसरात बॅरिकेटिंग करण्यात आलंय. प्रशासनाच्या भूमिकेला हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध आहे.
अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे. “सध्या जे सर्व्हे येतायत, ते ७ ते १२ जागा अजित पवार गटाच्या येतील. मग बाकीचे ३० आमदार काय करणार? हरी हरी! तेव्हा त्यांना वाटेल तेव्हाच तुतारी बरी होती. राज्यात महाविकास आघाडीच सरकार येणार. महाराष्ट्र चुकीला माफ करतो पण गद्दारांना नाही,” असं ते म्हणाले.
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या. वांद्रे येथील इमारतीवरून उडी घेऊन केली आत्महत्या. आलमेडा पार्क या इमारतीच्या ६ व्या मजल्यावरून उडी घेऊन केली आत्महत्या. आत्महत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहे.
नागपूर अपघातातील गाडीचा नंबर FIR मध्ये का नाही ? अपघातग्रस्त गाडी गॅरेजमध्ये का पाठवली ? संकेत बावनकुळेची मेडिकल का केली नाही ? सुषमा अंधारे यांचा नागपूर पोलिसांना सवाल
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे थोड्या वेळात नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचणार आहेत.
नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पोहचत आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्यावर आरोप केल्यानंतर सुषमा अंधारे आज पोलीस स्टेशनमधून माहिती घेणार आहेत.
रविकांत तुपकरांची आज सरकारच्या शिष्ट मंडळासोबत बैठक होणार आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक होणार. पीकविमा, कर्जमुक्तीसह दरवाढीसंदर्भात चर्चा होणार.
जळगाव जिल्ह्यातील सव्वा तीन लाखांवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम राज्य शासनाकडून उपलब्ध. गेल्या वर्षी वादळ, गारपिटीसह अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यातच अनेकांचा रब्बी हंगामही पाण्यात गेला होता. या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने नुकसान भरपाईची रक्कम उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत 2 लाख 13 हजार 416 शेतकऱ्यांना 244 कोटी 47 लाख 50 हजार 709 रुपयांची भरपाई त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी कायदा-सुव्यवस्थेचा धिंडवडे काढलेत. गाडी ज्याच्या नावावर, त्याचं नावच FIR मध्ये नाही. बीफ कटलेटही ऑर्डर केलं होतं. बीलमध्ये उल्लेख आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला.
मणिपूर पेटलेलं असताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कुठे आहेत?. मोदींनी युक्रेनला जाण्यापेक्षा मणिपूरला जावं. मोदी मणिपूरवर कधी बोलणार?. मोदींनी मणिपूरला जावं, अन्यथा राजीनामा द्यावा खासदार संजय राऊत यांची मागणी.
गणेशोत्सवामुळे नाशिक शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहेत. आरास आणि देखावे पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने बुधवार ते सोमवार दरम्यान वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेत. सायंकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी वाहतूक पोलीस शाखेतर्फे नियोजन करण्यात आलं आहे. वाहतूक मार्गात बदल केल्यानंतर पर्याय मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पोलीस आयुक्तांचा आदेश धुडकावणाऱ्या शार्पी , बीम लेझर मालकांवर गुन्हा दाखल करायला सुरुवात झाली आहे. दहीहंडी उत्सवात न वापरण्याचे आदेश काढले होते. पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल झालेत. डोळ्यांना इजा होत असल्याने बंदी घातली होती. पोलीस आयुक्तांनी नियम धुडकावल्यावर कारवाईचे निर्देश दिले होते.
कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील सरवडेमध्ये भीषण अपघात झाला आहे. सोळंकूर गावातील तीन तरुण जागीच ठार झालेत. मॅक्स गाडी आणि ट्रकची जोरदार धडक झाली आहे. अपघातात तीन ठार तर 5 जण गंभीर जखमी झालेत. ऐन गणेशोत्सवात सोळंकूर गावावर शोककळा पसरली आहे. शुभम चंद्रकांत धावरे, आकाश आनंदा परीट, रोहन संभाजी लोहार अशी मृत तरुणांची नावं आहेत. तर ऋत्विक राजेंद्र पाटील, सौरभ सुरेश तेली, भरत धनाजी पाटील, संभाजी हणमंत लोहार हे जखमी आहेत.
गणेशोत्सव काळात पुण्यात गर्दी वाढली. वाढती गर्दी पाहता संध्याकाळी ५ नंतर प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. संध्याकाळी ५ नंतर लक्ष्मी रोड , शिवाजी रोड ,बाजीराव रोड, टिळक रोड बंद ठेवला जाणार आहे. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा पोलिसांना आवाहन केलं आहे. आजपासून पुण्यात गर्दी वाढणार आहे. पोलिसांनी पर्यायी मार्गांची यादी जाहीर केली आहे.
छत्रपती संभाजी नगर शहरासह जिल्हाभरात मागील दीड महिन्यात स्वाईन फ्लूचे 59 रुग्ण हे आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात स्वाइन फ्लूने विळखा घातल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून असे असले तरी कोणतीही गंभीर स्थिती नसल्याच आरोग्य विभागाने सांगितलय. पावसाळा सुरू झाल्यानंतर बदलत्या वातावरणामुळे डेंग्यू,टायफाईड,हिवताप आणि स्वाईन फ्लूने डोकं वर काढले असून शहरातील घाटीसह खाजगी रुग्णालयात देखील रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान नागरिकांनी स्वच्छतेचे पालन करावे अस आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलय.
एसटीच्या पुणे विभागाला मिळणार आता नव्या लालपाऱ्या
२१५ नवीन गाड्यांची केली जाणार खरेदी
दिवसेंदिवस वाढणारी प्रवाशी संख्या आणि अपुऱ्या बसेस संख्येमुळे नवीन बस खरेदी करण्याचा निर्णय
ऑक्टोबरमध्ये नवीन बस ताफ्यात होणार दाखल
पुणे – मुद्रांक अभय योजनेतून महसूल खाते मालामाल
पुण्यातून महसूल विभागला मिळाले ४६३ कोटी रुपये शुल्क
दोन हजार कोटी महसुलाची होती अपेक्षा
प्रतिसादाअभावी योजना असफल झाल्याचा दावा
अभय योजनेतून केवळ २५ टक्केच महसूल प्राप्त झाला
कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई
दिवसा घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात एकूण 13 घरफोड्या केल्याचे उघड
1 किलो 200 ग्रॅम सोने, 1 किलो 430 ग्रॅम चांदी आणि इतर मुद्दे माल जप्त
86 लाख 26 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्दे मला जप्त
बेळगाव जिल्ह्यातील दोघे सराईत चोरट्याना कोल्हापूर पोलिसांनी केली अटक
अमरावती शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरे पकडण्यासाठी मोहीम सुरू
आतापर्यंत शहरात मोकाट फिरणाऱ्या 400 जनावरावर कारवाई करत जनावरे जप्त
राहत्या घरी सुद्धा महानगरपालिका मध्ये पशु पालकाची नोंद करून परवानगी शिवाय जनावरे ठेवता येणार नाही -अमरावती महानगरपालिकेची पशु पालकांना सक्त ताकीद…
आतापर्यंत पशु पालक मालका कडून दीड लाखांचा दंडही वसूल
अनधिकृत जनावरे असतील व तसेच रस्त्यावर जनावरे फिरतील व वाहतूकीला अडथळा आणतील तर गुन्हेही दाखल करण्याचा इशारा
अमरावती शहरात गवळीपुरा,कल्याणनगर, पठाण चौक, चपराशीपुरा,प्रसाद कॉलनी,मितीनगर,सौदापुरा भागात मोकाट जनावरे जप्त