Maharashtra Political News live : मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातील वॉरंट रद्द

| Updated on: Jun 04, 2024 | 6:49 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 31 मे 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News live : मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातील वॉरंट रद्द
Follow us on

ठाणे स्थानक आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या स्थानकातील फलाट रुंदीकरण आणि विस्तारीकरणाच्या कामासाठी मध्य रेल्वेने 63 तासांचा जम्बो ब्लॉक जाहीर केला. त्यामुळे अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या आणि अनेक लोकल्स रद्द करण्यात आल्या. मात्र यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून प्रत्येक स्टेशनवर आणि लोकलमध्येही प्रचंड गर्दी दिसत आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले आज दुष्काळ पाहणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड दौऱ्यावर आहेत.  मुंबई येथील होर्डिंग दुर्घटनेची गंभीर दखल घेत आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या आदेशानुसार आळंदी शहरातील सर्व 25 अनधिकृत होर्डिंग्ज नगरपरिषदेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने निष्कासित करून भुईसपाट केल्या आहेत. कल्याणी नगर अपघात प्रकरणात पुणे पोलीस अल्पवयीन मुलाची चौकशी करणार आहेत. यासाठी पुणे पोलिसांकडून बाल न्याय मंडळाला पत्र लिहीण्यात आलं आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.