पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. श्रीनगरमधील एका महत्वपूर्ण कार्यक्रमात ते सहभागी होतील. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज इंडस्ट्री चेंबर्ससोबत अर्थसंकल्पपूर्व चर्चा करणार आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जुलै महिन्यात सादर होण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्यानंतर आजा त्या पहिल्यांदाच बारामतीमध्ये येणार असून नागरिकांची भेट घेतील. आज किल्ले रायगडावर तिथी प्रमाणे शिवराज्यभिषेक सोहळा होणार असून या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
मुंबईच्या ग्रँट रोड परिसरातून चार बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. अनधिकृतरित्या देशात प्रवेश आणि वास्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी डीबी मार्ग पोलीस, गावदेवी पोलीस आणि व्ही पी रोड पोलिसांची संयुक्त कारवाई केली आहे. अवैधरित्या देशात वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधातील विशेष मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली. चौघांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे. दिल्लीच्या राऊज अवेण्यू कोर्टाने केजरीवाल यांना दिलासा दिला आहे.
केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षणमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. पुणे विमानतळाची धावपट्टी विस्ताराची शक्यता तपासावी, असं मुरलीधर मोहोळ पत्राद्वारे म्हणाले आहेत. मोहोळ सोमवारी संरक्षणमंत्र्यांना भेटणारही आहेत. मोठी विमाने उतरण्यासाठी धावपट्टीची लांबी सुमारे १००० मीटरने वाढवणे आवश्यक आहे, असं मोहोळ यांचं म्हणणं आहे.
जळगाव जिल्ह्यात सर्व 11 विधानसभा जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी कॉंग्रेसने केल्याचे काँग्रेसचे जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी लोकसभेला 12 ठिकाणी प्रचाराला आले आणि 10 ठिकाणी त्यांचे उमेदवार पडले. त्यांनी विधानसभेला जास्त ठिकाणी प्रचाराला यावे असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार शरद पवार यांनी बारामतीतील मोरगाव येथ लगावला आहे.
माळी महासंघ आता न्याय हक्क परिषद घेणार आहे. राज्यात दुसऱ्या नंबरची लोकसंख्या असलेल्या माळी समाजाची राजकीय उपेक्षा होत असल्याने 23 जून रोजी भुसावळ येथे माळी समाज न्याय हक्क परिषद घेणार आहे.
ओबीसी आरक्षणासाठी उपोषणास बसलेले लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथक उपोषणस्थळी दाखल झाले आहे. दोघांच्याही प्रकृतीची तपासणी सुरू आहे. हाके आणि वाघमारे यांचा बीपी वाढला आहे. मात्र, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. उपचार न घेतल्यास त्यांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दडी मारल्याने पावसाने पुण्यात पुन्हा हजेरी लावली आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण झाल्यानंतर ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील अनेक भागात पावसाच्या सरी बरसल्या आहेत.
आता काँग्रेसची सत्ता आली आहे. आता त्रास सहन करण्याची वेळ नाही तर त्रास देण्याची वेळ आहे. मागील दहा वर्षात जो अन्याय झाला तो दूर करण्याची वेळ आता आली आहे, असे विधान सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केले. सोलापुरातील एम. के. फाऊंडेशनच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना 2 लाख वाह्यांचे वाटप करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.
ब्रॅंड आणि ब्रॅंडीसारखे पाचकळ विनोद करून सर्वज्ञानी संजय राऊत तुम्ही पेपरवाले नाही तर पडेल कॅामेडी शोचे पडेल कलाकार असल्याचं सिद्ध केलं. त्यामुळे आता ‘सामना’चं नाव बदलून ‘टोमणा’ ठेवा. पण, त्या टोमण्यांमध्ये किमान धार तरी ठेवा. की पहिल्या धारेचा एवढाच असर होतो? इतक्याशा विजयाची इतकी हवा डोक्यात जाऊ देऊ नका. नाही तर ‘आधीच मर्कट त्यात मद्य प्याला’ अशी अवस्था होईल लवकरच असा टोला भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी लगावला आहे.
काही करा पण जामीन विकू नका, असा सल्ला शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. पुणेकर मुंबईकर येतील पण जमीन तर आपली आहे. काही ना काही मार्ग निघतो. तुम्ही काही काळजी करू नका. कोणी एजंट गावात येत असेल तर त्याला गावात येऊ देऊ नका, असंही शरद पवार म्हणाले.
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं पाप महायुती सरकारनं केलंय. धनगर विरूद्ध आदिवासी भांडण कुणी सुरू केलं? मराठा समाजाला अनेक वेळी लेखी आश्वासन दिलं. जे होऊ शकतं नाही ते मराठा समाजाला का लेखी दिलं? दोन समाजात सरकार पुस्कृत आग लावलेली आहे”, असं वडेट्टीवार म्हणाले.
गुजरातच्या कच्छ भागात बीएसएफने धडक कारवाई केली. या भागातील खाडी भागात बीएसएफचे जवान घुसले होते. सदर चिखलात पडलेली गोण उघडताच त्यात ड्रग्स असल्याचं निष्पन्न झालं आहे.
#WATCH कच्छ (गुजरात): BSF टीम ने खाड़ी क्षेत्र से ड्रग्स बरामद की। pic.twitter.com/CIyZw3DqgQ
— ANI_HindiNews (@AHindinews) June 20, 2024
यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याच्या आणि सीबीआयकडून तपास करण्याच्या आदेशावर, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री जयवीर सिंह म्हणाले, “परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता झाल्याची माहिती मिळताच, ती रद्द करण्याचा निर्णय तात्काळ घेण्यात आला. चौकशी करण्यात येईल. तसेच परीक्षांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रोखण्यासाठी सरकार कायदे बनवण्याचा प्रयत्न करत आहे.
दिल्लीत उष्णतेची लाट कायम आहे. अतिउष्मा आणि उष्णतेच्या लाटेमुळे गेल्या 24 तासांत 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून आपली प्रतिक्रिया दिली. ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. लक्ष्मण हाके यांचा जरांगे यांच्या सगेसोयरे मागणीला विरोध आहे. सगेसोयरांच्या मागणीवर तुम्ही लेखी लिहून द्या, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या शिष्टमंडळ पाठवतो, असं त्यांना सांगितलं.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपोषण स्थळी लक्ष्मण हाकेंची भेटी घेतली. यावेळी त्यांनी घटनास्थळावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कॉल केला. वडीगोद्रीत लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे.
प्रयागराज विकास प्राधिकरणाने पुन्हा एकदा धडक कारवाईला सुरुवात केली आहे. गँगस्टर अतिक अहमदचा भाऊ अशरफची पत्नी जैनब फातिमा हीचं घरं पाडलं.
#WATCH उत्तर प्रदेश: प्रयागराज विकास प्राधिकरण द्वारा गैंगस्टर अतीक अहमद के भाई अशरफ की पत्नी जैनब फातिमा के घर को ध्वस्त किया जा रहा है। pic.twitter.com/0Q9um2P1p8
— ANI_HindiNews (@AHindinews) June 20, 2024
NEET परीक्षेतील घोटाळ्याबाबत आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात काउंसलिंग बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. कोर्टाने आज पुन्हा एकदा त्यावर बंदी घालण्यास नकार दिला. परीक्षा रद्द झाल्यास काउंसलिंग आपोआप रद्द होईल, असं कोर्टाेने म्हटलं आहे. आज कोर्टात आठ नवीन याचिका दाखल झाल्या होत्या. परीक्षा रद्द करून पेपरफुटीची चौकशी करण्याची मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे. कोर्टाने आजही NTA ला नोटीस बजावली. या प्रकरणी 8 जुलै रोजी इतर याचिकांसोबत याही याचिकेवर सुनावणी होणार आहे.
नागपुरात एमडी ड्रगची तस्करी करणाऱ्या तीन भावांना अटक करण्यात आली आहे. दोन सख्खे भाऊ तर एक चुलत भाऊ यात सहभागी आहेत. गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. दुचाकींचा वापर करत तस्करी करत होते. 71.11 ग्राम एमडी ड्रग मिळून आलं त्याची किंमत 7 लाखाच्या घरात आहे.
बदलापूर शहरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालीय. बदलापूरच्या रेल्वे स्थानका बाहेर पाणी साचल्याने प्रवाशांना वाट काढावी लागत आहे. साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. नगरपालिका प्रशासनाच्या नालासफाईची पोलखोल झालीय. अवघ्या एका तासाच्या पावसात बदलापूर जोरदार पाऊस झालाय.
नवी मुंबईत पावसामुळे काही सखल भागातील रस्ते जलमय झाले आहेत. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्यावर पाणीच पाणीस झालंय. रस्ता जलमय झाल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
साहेबाला साजेल अशी निवडणूक तुम्ही केली. मी स्वतः चिंतेत होतो. इंदापूर, बारामती मी स्वतः दौरे केले. बारामती गड टिकला पाहिजे ही भावना आमची होती.
धुळ्यात भाजप महानगरच्या वतीने शोभा बच्छाव यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन. शोभा बच्छाव यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपचं जोडे मारो आंदोलन…
राजधानी दिल्लीतल्या आरएमएल हॉस्पिटलमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड.गेल्या पाच ते सहा दिवसांपासून उत्तर भारतात उष्णतेची प्रचंड लाट
भाजपचे नेते आशिष देशमुख यांच्या उपस्थित स्थानिक भाजपच्या कार्यालयात पार पडणार बैठक..बैठकीच्या पूर्वी पदाधिकारी यांच्याकडून भरून घेतले जात आहे फ़ॉर्म.
नवी दिल्ली – NEET परीक्षेतील घोटाळ्याबाबत आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात काउंसलिंग बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. कोर्टाने आज पुन्हा एकदा त्यावर बंदी घालण्यास नकार दिला आहे. परीक्षा रद्द झाल्यास काउंसलिंग आपोआप रद्द होईल, असं कोर्टाने म्हटलंय. आज कोर्टात आठ नवीन याचिका दाखल झाल्या होत्या. परीक्षा रद्द करून पेपरफुटीची चौकशी करण्याची मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे. कोर्टाने आजही NTA ला नोटीस बजावली आहे. या प्रकरणी 8 जुलै रोजी इतर याचिकांसोबत याही याचिकेवर सुनावणी होणार आहे.
बिहार- पाटणा हायकोर्टाने नितीश कुमार सरकारला दणका दिला आहे. एससी, एसटी आणि ओबीसींना 65 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय रद्द केला आहे. नितीश कुमार सरकारने घेतलेला निर्णय पाटणा हायकोर्टाने रद्द केला आहे. नितीश कुमार सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीवरून ठाकरे गट कोर्टात जाण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणूक घेणं घटनाबाह्य असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. येत्या 12 जुलैला 11 जागांसाठी विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत.
अंबाजोगाई-परळी महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला आहे. रस्त्यावर टायर जाळून हा रास्ता रोको करण्यात आला आहे. लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ ओबीसी समाजाचा रास्ता रोको सुरू आहे.
नाशिक- संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. आज दुपारच्या सुमारास त्र्यंबकेश्वर इथून पंढरपूरच्या दिशेने संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.
ठाणे ते कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या 5 मिनिटे उशिराने धावत आहे. तर ठाणे ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या 7 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहे. ठाणे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे.
धुळे-सोलापूर हायवेवर ओबीसी समाजाकडून रास्ता रोको करण्यात येत आहे. लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ हा रास्ता रोको सुरू आहे. शेकडो ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे.
“भाजपचा डीएनए ओबीसीचा असता तर त्यांनी आतापर्यंत आमची दखल घेतली असती,” असं ओबीसी आरक्षणाचे नेते लक्ष्मण हाके म्हणाले. फर्ग्युसन कॉलेजमधली नोकरी सोडल्याची कहाणी सांगताना लक्षण हाके यांना भावना अनावर झाल्या. यावेळी लक्ष्मण हाके ढसाढसा रडले. “भाजपच्या धोरणांना वैतागून मी महादेव जानकर यांना सोडलं. सरकारने सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून विचार करावा,” असं ते म्हणाले.
मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसला आहे. अप आणि डाऊन मार्गावर धीम्या गतीने धावणाऱ्या सर्व लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने आहेत. तर कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या जलद लोकस वीस मिनिटे उशिरा धावत आहेत. यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळतेय.
“सरकारने काय ठरवले माहीत नाही. आम्ही आमचा फोकस क्लिअर केला आहे. देश स्वतंत्र नव्हता तेव्हापासून मराठ्यांचे आरक्षण आहे. आमचे रोकॉर्डला आहे ते आरक्षण घेणार आहोत. ओबीसी आणि कुणबी एकाच आहेत आणि आम्ही ते घेणार आहोत. तुमच्या पेक्षा 100 वर्ष पुर्वीचे आरक्षण आहे. सग्या सोयऱ्याचे आरक्षण टिकणार नाही असे महाजन म्हणत असतील तर त्यांचा डाव आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर शहरात मुसळधार पावसाची हजेरी. गेल्या काही दिवसांपासून पावसाने मारली होती दडी. वातावरणात बदल निर्माण झाला असून गारवा निर्माण. पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ. काही भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
“लक्ष्मण हाके यांच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने पहाव. सरकार काहीही करताना दिसत नाही” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. जालन्याच्या वडगोद्रीमध्ये हाके यांचं उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सगे सोयऱ्याच्या मागणीला हाके यांचा विरोध आहे.
महाराष्ट्रात सामाजिक सलोखा रहायला हवा. ओबीसींच्या आरक्षणाच ताट वेगळच असायला हवं असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज तिथे जाऊन त्यांची भेट घेतली.
लोकसभा अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाबाबत पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी नियम पाळला नाही. मोदी हे मोदी आहेत. मोदी यांच्याकडुन हा नियम पाळला जाईल का सांगता येत नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला.
वसई विरार नालासोपारा परिसरात काळेकुट्ट ढगाळ वातावरण निर्माण झाले असून अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. शहरात कुठेही पाणी साचले नसून, विरार चर्चगेट चालणारी पश्चिम रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे पालघर बोईसर, उमरोली, परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने विरार डहाणू लोकल सेवा 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहे.
केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आपल्या सलग दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या द्विपक्षीय परदेश दौऱ्यात आज श्रीलंकेला भेट देणार आहेत. ही भेट भारताच्या ‘नेबरहुड फर्स्ट पॉलिसी’च्या अनुषंगाने आहे आणि श्रीलंका आपला सर्वात जवळचा सागरी शेजारी असल्याने या भेटीचे नियोजन केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
देशातील महत्वाच्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड होत असल्याने देशभरातील पालक आणि विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. इतकेच नाही तर सुप्रीम कोर्टाने पण नाराजी व्यक्त केली आहे. आता विरोधकांनी पण सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेता प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले.
तामिळनाडूतील कल्लाकुरिची येथे विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू झाला आहे. 60 हून अधिक गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून 200 लिटर विषारी दारू जप्त करण्यात आली आहे. त्या दारूत मिथेनॉल मिसळले जात असल्याचे तपासातून उघड झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू आणि कश्मीर दौऱ्यावर आहेत.२१ जूनला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीनगर इथं ‘एम्पावरिंग यूथ, ट्रांसफॉर्मिंग जम्मू आणि कश्मीर’ कार्यक्रमात भाग घेणार आहेत.
त्याच बरोबर मोदी 1हजार 500 कोटी रूपयांच्या कामाचे उद्घाटन आणि भूमीपूजन करणार आहेत.
सलग तिसऱ्या दिवशी शरद पवार बारामती दौऱ्यावर आले आहेत. त्यांना भेटण्यासाठी गोविंदबाग येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली आहे. बारामती तालुक्यातील अनेक गावांत शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
1993च्या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या 105 जणांच्या नातेवाईकांना राज्य सरकारचे आवाहन. मृतांच्या नातेवाईकांना देण्यात येणारी मदत अद्याप त्यांना पोहोचली नसल्याने सरकारकडून मृतांची यादी जाहीर करण्यात आली. अनेक प्रयत्न करूनही या लोकांच्या नातेवाईकांचा शोध न लागल्याने आता नातेवाईकांनी समोर यावं अस आवाहन यात करण्यात आलंय.
कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांच्या वतीने 105मृतांची यादी जाहीर केली असून महिनाभराच्या आत नातेवाईकांनी संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी केला हल्ला. मोठ्या दगडाने गाडीची काच फोडली. दोन वर्षांपूर्वी देखील कोकणे यांच्यावर झाला होता जीवघेणा हल्ला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक राज्यमंत्रिपद घ्या अशी मागणी राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाने अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याकडे केली आहे. बाबासाहेब पाटील यांनी अजित पवारांना पत्र लिहून हे खातं आपल्याकडे घेण्याची मागणी केली.
यवतमाळ – पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेशवे प्लॉट मध्ये चोरट्यांनी 5 घरे फोडली.हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. वर्दळ असलेल्या या भागात बंद घरे शोधून चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दिवसाच्या सुरूवातीलाच पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत आहे. बोईसर- उमरोळी स्थानकादरम्यान रुळांवर पाणी साचल्याने लोकल 20-30 मिनिटे उशीराने धावत आहेत