Maharashtra Political News live : नागपूरातील आयआयटी संस्थेतील विद्यार्थ्याने जीवन संपविले

| Updated on: Jun 04, 2024 | 6:49 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 30 मे 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News live : नागपूरातील आयआयटी संस्थेतील विद्यार्थ्याने जीवन संपविले
Follow us on

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्याचा आरोप असलेले डॉ. अजय तावरे, डॉ श्रीहरी हलनोर आणि घटकांबळे तिघांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. आज दुपारी पुणे पोलीस त्या तिघांना कोर्टात हजर करणार. आमदार जितेंद्र आव्हाड यांना शरद पवार साहेबांनी तात्काळ पक्षातून हकालपट्टी करावी, आणि राज्य सरकारने कायदेशीर कारवाई करून महाड राज्यातून तडीपार करावे अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे. भुसावळ मध्ये अज्ञात हल्लेखोरांनी चालत्या कारवर केलेल्या गोळीबारात माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांचा मृत्यू झाला. भुसावळमध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर 1 आणि 2 जून रोजी 36 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. सीएसएमटी फलाट क्रमांक १० आणि ११ ची लांबी वाढविण्यासाठी ब्लॉक घेतला जाईल. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.