जळगावातील मतदानाचे मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमरूम मधील सीसीटीव्ही फुटेज डिस्प्ले बंदच्या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. भाजपचे माजी नेते आणि आता शिवसेनेच्या ठाकरे गटात आलेले उन्मेष पाटील यांनी खळबळजनक आरोप केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत भाजप पदाधिकारी स्ट्रँगरुममध्ये फिरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान कोकण पदवीधरसाठी चुरस वाढली असून ही जागा महाविकास आघाडीत कुणाला सोडायची यावर आज चर्चा होणार. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते यांच्यात आज चर्चा होणार असून शिवसेनेकडून किशोर जैन तर काँग्रेसकडून रमेश किर यांची नावे चर्चेत आहेत. इंडिगो कंपनीच्या दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा कॉल आल्याने एकच गोंधळ माजला. सर्व प्रवाशांना खाली उतरवून सुरक्षा यंत्रणांनी विमानाची कसून तपासणी केली असता विमानात काही आढळून आलं नाही. दरम्यान गोखले पुलाचा रेल्वेतील भाग बांधण्यासाठी विलंब केल्याबद्दल कंत्राटदाराला मुंबई महापालिकेकडून ३ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. उद्यापासून फडणवीस वाराणसी दौऱ्यावर आहेत. 1 जूनला वाराणसीत मतदान होणार आहे. त्यासाठी फडणवीस वाराणसीला जाणार आहे. काही सभांसोबतच फडणवीस रोड शो करण्याची देखील शक्यता आहे.
या क्षणाची मोठी बातमी, पालघर रेल्वे स्थानकात मालगाडीचे 5-6 डब्बे घसरले आहेत. गुजरातहून मुंबईच्या दिशेने येताना हा अपघात झाला आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ही विस्कळीत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी रेल्वे स्थानक परिसरात एकच गर्दी केली. आता मुंबईच्या दिशेने येणारी वाहतकू केव्हापर्यंत पूर्वपदावर येणार, याकडे आसपासच्या परिसरातील लोकांचं आणि प्रवाशांचा लक्ष लागून राहिलं आहे.
छत्रपती संभाजी नगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील चिखलठाणा शाखा येथील महावितरण कार्यालयात तंत्रज्ञान केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कामृद्दीन बागवान फत्ते मोहम्मद यांच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील नारेगाव नाला डीपीचे फ्युज कसे गेले? अशी विचारण करण्यासाठी बागवान हे तिथे गेले होते. बागवान यांनी त्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून बाचाबाची केली. पुढे त्याचं पर्यवसन मारहाणीत झालं.
मुंबई भाजप कोर कमिटीची आज तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाबाबत आज तातडीची बैठक होत आहे. दादर येथील भाजपा कार्यालयात ही बैठक होणार आहे. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुंबई भाजपचे कोर कमिटीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये दहशतवादी विरोधी पथकाने बनावट कागद पत्रासह पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. बनावट कागदपत्रांसह भारतात बेकायदेशीर रित्या राहणाऱ्या 5 जणांना दहशतवादी विरोधी शाखेने अटक केली आहे.
पोलीस कोठडी मिळाल्यानंतर सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना पोलीस आयुक्तालयात आणण्यात आले आहे. गुन्हे शाखेकडून आता दोघांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे. हिट अँड रन प्रकरणात चालकाला डांबून ठेवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल आहेत.
अंजली दमानिया यांना लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे. नार्कोटिक्स टेस्ट कुणाची करायची असते यासाठी कायदा आहे, हे दमानिया यांना माहिती नाही काय ? लोकशाहीमध्ये तुम्हाला स्वातंत्र्य दिले म्हणून काहीही बोलणार का? असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी अंजली दमानिया यांना दिले आहे.
धुळ्यातील पाणी टंचाईमुळे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळ आयुक्तांची भेट घेत धुळे शहरात पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. भाजपाने धुळेकर जनतेला फसविले असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
मविआचे सरकार कायम राहिले असते तर, मुंबई कोस्टल रोड डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्णपणे झाला असता. आणि नागरिकांसाठी खुला झाला असता. परंतू , भ्रष्ट राजवटीने आमचं सरकार पाडल्यानंतर त्या कामाचा वेग मुद्दाम कमी केला आणि खर्च वाढवण्याचे काम केले असा आरोप उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळ्याच्या पूर्वी कामांचा आढावा बैठक घेतली आहे. यात SDRF आणि TDRF च्या धर्तीवर पालिकांनी पथकं वाढवावी अशा सूचना दिल्या आहेत. धोक्याची सूचना देणारी यंत्रणा बसवावी असेही त्यांनी म्हटले आहे.
कदाचित अजितदादांना दूरदृष्टी असल्याकारणाने त्यांना महाराष्ट्राची परिस्थिती समजली असेल कि ती काय चांगली नाही. भुजबळ साहेब ही म्हणतात की महाराष्ट्राची परिस्थिती चांगली नाही, त्यांचे अजून दोन-तीन मंत्री असं म्हणाले आहेत मला त्यांची काय नाव घ्यायची नाही, त्यांना जे दिसतंय ते बोलतायेत, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
कोलकाता हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाचं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी स्वागत केले आहे.मूळ OBC वर्गाचा अधिकार पश्चिम बंगाल मधील ममता सरकारने कमी करत त्यांच्यावर अन्याय केला होता तो थांबवल्याच आयोगाचं मत असल्याचे ते म्हणाले.
आमची महायुती मजबूत आहे आणि मुख्यमंत्री बदलले जाणार नाहीत. मुख्यमंत्री खंबीर आहेत आणि राज्यकारभार जोमाने करतील, असं उत्तर देत संजय शिरसाट यांनी याविषयीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
ज्यादा दराने कपाशीचे बियाणे विक्री करणाऱ्या जळगावच्या पारोळा तसेच म्हसावद येथील कृषी केंद्रांवर कृषी विभागाची कारवाई करण्यात आली आहे. साडेआठशे रुपये दराचे कपाशीचे बियाण्याचे बाराशे ते साडेबाराशे रुपयांमध्ये विक्री केली जात असल्याची तक्रार आली होती. कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करत दोन्ही विक्रेत्याविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत.
इगतपुरी तालुक्यातील परिसरामध्ये पर्यटनासाठी आलेल्या वैतरणा धरणाच्या बॅक वॉटरमध्ये मुंबईतील पर्यटकांचा मृत्यू झाला. प्रशासनाने नागरिकांना पाण्यापासून दूर राहण्याचा आव्हान करण्यात आले आहे.
स्वतःला ईश्वर का अवतार म्हणून घेणाऱ्या मल्लिकार्जुन खरगे यांच्यावरही लेख लिहा असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांना दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे स्वतःला देवाचे अवतार म्हणू लागले आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांचा व्हिडिओ ट्विट करत बावनकुळे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
30 मे ला पंतप्रधान मोदी कन्याकुमारीला जाण्याची शक्यता आहे. विवेकानंद रॉक मेमोरियल मेमोरियलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानस्थ बसणार आहेत. 1 जून रोजी देशातील शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकांचा शेवटचा टप्पा असतानाच पंतप्रधान मोदी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा जागर करणार आहेत.
नाशिकमध्ये बनावट नोटा तयार करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नाशिकच्या अंबड पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे. पाचशे रुपयांच्या बनावट नोटा विक्री करणारं रॅकेट उघडकीस आलं आहे. पाचशे रुपयांच्या 30 बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. बनावट नोटा प्रिंटरद्वारे तयार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एकावर गुन्हा दाखल करून अटक तरी तर फरार आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना झालं आहे.
गुरमीत राम रहीम हा हत्या प्रकरणातून निर्दोष… माजी कॅम्प मॅनेजर रणजित सिंग यांच्या हत्येप्रकरणी निर्दोष मुक्तता झाली आहे. 2021 मध्ये CBI ने राम रहीम आणि 4 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सीबीआयचा निर्णय रद्द केला आहे.
राज्यातील सरकारी रुग्णालयात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये फक्त 16 बॉटल रक्त शिल्लक आहेत. दररोज 50 ते 60 रक्ताच्या बॉटलची मागणी होते. रुग्णाच्या नातेवाईकाना ब्लड पाहिजे असल्यास ब्लड डोनर आणावा लागत आहे. उन्हाळा असल्याने रक्तदान शिबिर कमी घेतली जात आहे. त्यामुळे रक्तदान करण्याचं आवाहन अमरावती जिल्हासामान्य रुग्णालयाकडून करण्यात आलं आहे.
नाशिकच्या मालेगावमधून बातमी… माजी महापौर अब्दुल मलिक इसा गोळीबार प्रकरणी अपडेट समोर आलीय. मालेगाव शहर पोलीस स्थानकात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनास्थळी दोन्ही बाजूंनी गोळीबार, दोन्ही बाजूकडून ६ राऊंड फायर झाले. जमिनीच्या खरेदी – विक्री प्रकरण आणि वैमस्यातून गोळीबार झाला. हल्ल्यात वापरण्यात आलेली दुचाकी, गावठी कट्ट्यासह दोघे संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत. घटनेला २४ तास झालेत. आतापर्यंतच्या तपासातील माहिती विशद करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी ही माहिती दिली आहे.
जरांगेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छगन भूजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बोलावली बैठक. भूजबळ यांच्या बंगल्यावर राज्यातील ओबीसी नेते भुजबळ यांच्या भेटीसाठी जाणार
नक्षलवाल्यांनी लपवलेल्या भूसुरंग स्फोटक ब्लास्ट होऊन गावातील एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेला बिजापूर जिल्हा रुग्णालयात उपचार करून तिथून गंभीर असल्यामुळे रायपूर तत्काळ हलविण्यात आले
सोलापुरातील ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या तलावात मृत माश्यांचा खच. तलावातील पाणी अशुद्ध झाल्यामुळे माशांचा मृत्यू. तलावात शहरातील ड्रेनेजचे पाणी सोडल्याने माश्याचा मृत्यू होत असल्याची प्राथमिक माहिती
समितीच्या अध्यक्षा डॉ पल्लवी सापळे, डॉ गजानन चव्हाण आणि डॉ सुधीर चौधरी या समितीकडून चौकशी केली जाणार
आज रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे घेणार कुलगुरूंची भेट. गांजा पकडल्याचा आरोप हा विद्यार्थी संघटनांचा आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त विद्यापीठात तैनात करण्यात आला आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी 3 जूनला रंगीत तालीम… 336 निवडणूक कर्मचाऱ्यांचे आज प्रशिक्षण… मतमोजणी करिता प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात… लोकशाही भवनातील 6 हॉल मध्ये 108 टेबल वर होणार मतमोजनी; प्रत्येक हॉल मध्ये ठेवले जाणार 18 टेबल… अमरावतीत भाजपच्या नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखडे अशी थेट लढत..
ससून रुग्णालयातील रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी चौकशीच्या भीतीने पळाला… पुणे पोलिसांची एक टीम आरोपीच्या शोधात… आपल्याला ताब्यात घेतील या भीतीने तो पळून गेल्याची माहिती… त्यान अजय तावरे आणि श्रीहरी हार्नोल याला केली होती मदत… आज त्याला पुणे पोलीस अटक करण्याची शक्यता… पुणे पोलिसांनी राबवली शोधमोहीम
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गांजा पकडल्याचा आरोप…. आज रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे घेणार कुलगुरूंची भेट… गांजा पकडल्याचा आरोप हा विद्यार्थी संघटनांचा आहे… त्यासाठी आज कुलगुरूंची भेट घेण्यासाठी ते येतायत… पोलिसांचा मोठा बंदोबस्त विद्यापीठात तैनात करण्यात आला आहे
पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी फेटाळलेत अंजली दमानियांचे आरोप… अंजली दमनियांचे आरोप असत्य असून बिनबुडाचे आहेत… पुणे पोलीस आयुक्तांची टीव्ही 9 ला माहिती… पुणे अपघात प्रकरणात अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता का ? अंजली दमानियांनी अजित पवारांवर केले होते आरोप
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा झटका… सुप्रीम कोर्टाच्या सुट्टीकालीन बेंचचा जामीन वाढवण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार… जस्टीस माहेश्वरी यांनी सरन्यायाधीशांकडे जाण्याचा दिला सल्ला.. तात्काळ सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार… अरविंद केजरीवाल यांना दोन तारखेला पुन्हा तिहार जेलमध्ये जावंच लागणार
कोल्हापूरची पंचगंगा नदी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात आली आहे. पंचगंगा नदीच्या पात्रात जलपर्णी आल्या आहेत. नदीत वाढलेल्या जलपर्णीमुळे जलचर प्राण्याचे अधिवास धोक्यात आले आहे. तसेच नदीकाठच्या गावातील लोकांचा आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.
कल्याणी नगर अपघात प्रकरणात अग्रवाल कुटुंबाची आणखीन एक गाडी पोलिसांकडून जप्त करण्यात आली.
अपघातात वापरलेली गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.
लोकसभा निवडणूक निकाल होण्याआधीच खेड तालुक्यात भावी आमदारचे बॅनर झळकले आहे. भाजपच्या पुणे जिल्हा अध्यक्षाचे भावी आमदार म्हणून बॅनरवर नाव आले आहे. खेड-आळंदी विधानसभेची जागा राष्ट्रवादीकडे असताना भाजपच्या जिल्हा अध्यक्षांनी तयारी सुरु केली आहे.
यवतमाळमध्ये वादळामुळे दिग्रस तालुक्यातील दिग्रस पुसद रस्त्यावर 132 केव्ही टॉवर जमिनीवर कोसळले. विजेचे टॉवर कोसळल्याने दिग्रस तालुक्यातील अनेक भागात वीज पुरवठा बंद झाला.
भिवंडी शहरात स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा बुधवार दिनांक 29 मे सकाळी 09 वाजता पासून 30 मे रोजी सकाळी 09 वाजता पर्यंत 24 तासांसाठी बंद राहणार आहे. पावसाळा पूर्व अत्यावश्यक कामे व देखभाल दुरुस्ती साठी स्टेम ने शट डाऊन घेतले आहे. त्यानंतर पुढील 24 तास पाणी कमी दाबाने मिळणार आहे.
कल्याणी नगर अपघात प्रकरण. पुणे पोलिसांनी अग्रवाल कुटुंबाची आणखी एक गाडी केली जप्त. अपघातात वापरलेली गाडी पोलिसांनी केली जप्त. चालक गंगारामला बसवून नेलेली गाडी पोलिसांच्या ताब्यात.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाझर तलाव आटला. पाझर तलाव अटल्यामुळे पाण्याची भीषण टंचाई. पाझर तलाव अटल्यामुळे मासे, कीटक आणि जल जीवांवर संकट. छत्रपती संभाजीनगर शहाराजवळच पाझर तलाव आटलं. पाझर तलाव आटल्यामुळे जमिनीच्या पाणीपातळीत कमालीची घट.
माजी आमदार शरद सोनवणे यांच्या जुन्नर तालुका बिबट्या मुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल राज्यसरकारने घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. जुन्नर तालुक्यातील बिबट्या आणि मानवी संघर्ष वाढला असताना माजी आमदार शरद सोनवणे यांनी तीन दिवसापासून उपोषण सुरू केले आहे. बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूरचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील जुन्नरचे आमदार अतुल बेनके , जिल्हाधिकारी , वन विभागाचे सचिव , महावितरण विभागाचे अधिकारी आणि पोलीस विभागाचे अधिकारी यांची होणार बैठक
NIA ने देशभरात विविध ठिकाणी छापे टाकून 5 जणांना केली अटक. परदेशात चांगल्या नोकरीच आमिष दाखवून तरुणांना जाळ्यात ओढायच आणि त्यानंतर विविध देशात नेऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने अनधिकृत कॉल सेंटरवर काम करून घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब यासह इतर राज्यातील 15 ठिकाणी छापे मारून 5 जणांना अटक केलीय
लाखो रुपये घेऊन पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलणाऱ्या डॉक्टर श्रीहरी हळनोर याची प्रकृती बिघडली. काल श्रीहरी हळनोरला पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर सध्या श्रीहरी हळनोर हा पुणे पोलिसांच्या कोठडीत आहे.
पुण्यातील पोर्शे अपघातातील प्रकरण अद्याप चर्चेत असताना शहरात आणखी एक अपघात घडला आहे. ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन पुन्हा 2 बाईकस्वारांचा मृत्यू झाला आहे. खराडी बायपास परिसरात काल रात्री अपघाताची दुर्दैवी घटना घडली असून एक जण गंभीर जखमी आहे.
मुंबईतील धारावी येथे रात्री 3 च्या सुमारास भीषण आग लागून 6 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यात यश मिळाले. सध्या कूलिंग ऑपरेशन सुरू आहे.
घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळेच उघडले नसते. ऑडिट न करताच थेट कारवाई नको, अशा शब्दांत मुंबई हायकोर्टानं सिडकोला खडसावलं. होर्डिंग्जबाबत व्यापक धोरण सादर करण्याची गरज आहे. घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळे उघडले असते का? अश्याप्रकारे कारवाईला वेग आला नसता, या शब्दांत मुंबई उच्च न्यायालयानं सोमवारी सिडकोला खडसावलं.
इंडिया आघाडीत पुन्हा बिघाडी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. एक जूनला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे, मात्र या बैठकीला ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नाहीत. राज्यातून शरद पवार उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता असून आगामी रणनीतीबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.