Maharashtra News Live : केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा शेवटचा आठवडा आजपासून सुरु होत आहे. आज सकाळी अकरा वाजल्यापासून लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनुपस्थितीवरुन विरोधी पक्ष जोरदार हल्लाबोल करणार आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. तसेच पुणे, नाशिक या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्यांच्या प्रवाहात वाढ होताना पाहायला मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल बैठकीला उपस्थित आहेत. बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीवर बैठकीत चर्चा सुरु आहे.
नालासोपऱ्यात चालत्या कारला भीषण आग लागली. नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्क येथे आज रात्री पावने आठ वाजता ही घटना घडली. आगीत कारचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक नागरिकांकडून आग विझविण्यात आली आहे.
आरोग्य आणि जीवन विम्यावरील 18 टक्के जीएसटी मागे घेण्याच्या मागणीसाठी इंडिया अलायन्समध्ये समाविष्ट असलेल्या विरोधी पक्षांचे नेते मंगळवारी सकाळी 10.30 वाजता आंदोलन करणार आहेत. विरोधी पक्ष सरकारकडे जीएसटी पूर्णपणे हटवण्याची मागणी करत आहेत.
टीएमसी विधिमंडळ पक्षाने विधानसभेत आणलेल्या अविभाजित बंगालच्या ठरावाला भाजप आणि टीएमसी या दोन्ही पक्षांनी पाठिंबा दिला.
उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. अरविंद केजरीवाल यांना ईडी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे. अशा परिस्थितीत आता सीबीआयकडून अटक आणि जामीन घेण्याबाबत ते सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे उद्यापासून 2 दिवस दिल्लीत असणार आहेत. मुलगा आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे हेही त्यांच्यासोबत असतील. तीन दिवसांत ते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. तसेच टीएमसी आणि आम आदमी पक्षाचे नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. तसेच शरद पवार यांनाही भेटणार आहेत.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे हेलिकॉप्टर त्रिपुरामध्ये दाखल झाले आहे. हसीनाला अज्ञात ठिकाणी नेले जात आहे. भारत आणि बांगलादेश सीमेवर 24 तासांचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट आहे. बीएसएफने अलर्ट जारी केला आहे. बांगलादेशी नागरिक भारतात घुसू नयेत यासाठी हाय अलर्ट देण्यात आलाय.
शेख हसीना थोड्याच वेळात त्रिपुरामध्ये दाखल होणार आहेत. आगरताला विमानतळावर हेलिकॉप्टर लँड होणार आहे. तिथून शेख हसीना कुठे जाणार याबाबत अजून स्पष्टता नाही.
गरीब अपेक्षिताना मूख्य प्रवाहात आणण्यासाठी दिलेले आरक्षण आहे. राज ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका वेगळी असेल. माथी भडकावण्याचे काम होउ नये.वक्तव्य करताना कोणाची मन दुखावू नये याची काळजी घ्यावी, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
ठाकुर्ली – कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. कर्जत कसाऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरू आहे.
मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे कर्जत कसाऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
बांगलादेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशची राजधानी ढाका सोडली. त्या अज्ञात स्थळी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.अस्थिर परिस्थितीमुळे निर्णय.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच. कोर्टाने केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळली. केजरीवाल यांना CBI ने अटक केल्यानंतर केजरीवाल यांच्या वतीने याचिका दाखल केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज पुणे दौरा असून ते पुण्यातील एकता नगर परिसराची पाहणी करणार आहेत. पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणाचा मुख्यमंत्री आढावा घेणार. एकता नगर मधील पूर बाधित नागरिकांशी देखील मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत.
लोकांपर्यंत या योजना पोहोचाव्यात म्हणून आम्ही जन सन्मान यात्रा नाव दिलं आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात ही योजना जाईल. पहिल्या यात्रेत सलग 5 दिवसांचा कार्यक्रम दिंडोरीपासून ते मालेगाव यातून यात्रा जाईल, असे सुनील तटकरे म्हणाले. अजित दादा यांनी यंदा 10 वा अर्थसंकल्प मांडला हा दुर्मिळ योग आहे. राज्याची आर्थिक स्थिती भिघडणार नाही याची काळजी असेल, असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार रस्त्यावर उतरले आहेत. शिवाजीनगर परिसरात फुटपाथवर असणाऱ्या अतिक्रमण धारकांना पोलीस आयुक्तांकडून सज्जड दम देण्यात आला आहे. रस्त्याला लागून असणाऱ्या शोरूम्स मालकांना पुणे पोलीस आयुक्तांची ताकीद. फुटपाथवरील वाहनं तात्काळ हटवा अन्यथा कारवाई होणार. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्या टीमसह पाहणी केली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजा पिंपरीतील पूरस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांशी संवाद साधला.
मुंबईच्या समुद्राला आज उधाण, समुद्रामध्ये आज १२.५६ वाजेपासून पुढे ४.३७ मीटर इतक्या उंच लाटा उसळणार. लाटांचा खळखळाट पाहण्यासाठी मुंबईच्या समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र समुद्रकिनाऱ्याजवळ गर्दी करू नका असं आव्हान महानगरपालिका मुंबई, ट्रॅफिक पोलीस तसेच मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे.
वसुलीचे सर्व आरोप परमबीर यांनी फेटाळले आहेत, त्यांनी म्हटले की, अनिल देशमुख यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.
जरांगे पाटील यांच्यावर खासगी डॉक्टरकडून अंतरवालीमध्येच उपचार. थकवा जाणवत असल्याने जरांगे पाटील यांना लावण्यात आले सलाईन
क्रिकेटमध्ये उतरल्यावर माझा मुलगा सचिन तेंडुलकर झाला पाहिजे, अशी ज्या आई वडिलांची सक्ती असते त्यांनी यापासून लांब गेल पाहिजे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
दर्शनासाठी भाविकांची गर्दी येणारे भाविकांना प्रसादाचे वाटप
नाशिकचा सोमेश्वर धबधबा प्रवाहित झाला आहे. 24 तासांत नाशिकमध्ये 104 मिलिमीटर पाऊस झाला आहे. गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. गंगापूर धरण 86 टक्के भरलं आहे. सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. धबधबा परिसरात पर्यटकांना काळजी घेण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
“शिंदेंच्या सेनेला शिवसैनिक खरी शिवसेना मानतो. शिवसेनेला मिळणारी मतं एकनाथ शिंदेंकडे राहिली आहेत. ठाकरे आणि शिंदेंमध्ये शिंदे गटाचा स्ट्राईक रेट जास्त आहे. उद्धव ठाकरेंना आरक्षणवादी आणि मुस्लीम समाजाची मतं मिळतात,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे. आरक्षण शेवटच्या लोकांपर्यंत जावं यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हातनूर टोलनाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात येत आहे. हातनूर टोलनाका बंद करण्यासाठी मनसेकडून आंदोलन सुरू आहे. शेकडो मनसेचे पदाधिकारी या टोलनाक्यावर धडकले आहेत. 60 किलोमीटरच्या आतच टोलनाका असल्यामुळे बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मनसेकडून दोन विधानसभा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. शिवडीमधून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यात आली असून पंढरपूर विधानसभेतून दिलीप धोत्रेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कराड- कोयना धरणातून 10000 क्युसेक्सने पाणी विसर्ग कमी करण्यात येणार आहे. कोयना धरणामध्ये एकूण 86.34 टीएमसी पाणीसाठा असून सद्यस्थितीत सांडव्यावरून 50000 क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे. दुपारी 12 वाजता सांडव्यावरून सोडण्यात आलेला विसर्ग कमी करून 40000 क्युसेक्स करण्यात येणार आहे.
“मी नारायण राणेंवर टीका केली नाही. त्यांनी आरक्षण दिले होते म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो. आम्ही त्यांना दादा म्हणतो. तुम्हाला शेवटचे सांगतो, माझ्या नादी लागू नका. जी वळवळची भाषा मला शिकवू नका. तुम्हाला पश्चाताप होईल आणि मी तुला तुम्हाला एक शेवटची संधी देतो, तुम्ही नीट शहाणे व्हा. राणे पिता पुत्राला दोष द्यायचं काही कारण नाही, हे सर्व देवेंद्र फडवणीस करत आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
गिरणा नदीत अडकून पडलेल्या तरुणांना बचावासाठी वायू सेनेचे हेलिकॉप्टर दाखल. थोड्यात वेळात सुरु करणार रेस्क्यू ऑपरेशन. गिरणा नदी पत्रात मासेमारीसाठी गेले असता अडकून पडले होते तरुण.
राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे झाले बंद. राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून होणारा विसर्ग थांबल. तब्बल बारा दिवसानंतर राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे झाले बंद. कोल्हापूर जिल्ह्याला मोठा दिलासा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना CBI ने केलेल्या अटक प्रकरणावर आज कोर्ट निकाल देणार. दुपारी 2.30 वाजता दिल्ली उच्च न्यायालय निकाल देणार. केजरीवाल यांना कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी केली आहे अटक. सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांना ED च्या प्रकरणात जामीन दिला आहे. त्यानंतर केजरीवाल यांना CBI ने अटक केली होती
अमेरिकेत मंदी येण्याच्या भीतीने जगभरातील शेअर बाजार कोसळले… जपानचा शेअर बाजार 8 टक्क्यांनी कोसळला… भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स 1900 अंकांनी कोसळला…
शाळकरी विद्यार्थ्यांनी शाळेत जाणारा रस्ता अडवला… शाळेतील अशोक कचरे नामक शिक्षकाची संस्थेने बदली केल्याने शाळेतील विद्यार्थ्यांनी सुरू केलं शाळा बंद आंदोलन… रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी भोर माध्यमिक विद्यालय ठाणगाव सिन्नर मधील प्रकार… याच शाळेत एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचे प्रकरण या शिक्षकाने आणलं होतं समोर… संस्थाचालकांनी याच कारणाहून सदर शिक्षकाची बदली केल्याने विद्यार्थ्यांनी पुकारल आंदोलन
शरद पवार गटाकडून भाजपच्या समरजित घाटगेंना 2 वेळा संपर्क… मुश्रीफांविरोधात कागलमधून लढण्यासाठी घाटगेंना संपर्क… समरजीत घाटगेंनी अद्याप पवार गटाचा प्रस्ताव स्वीकारला नाही… अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुण्यातला पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे एकतानगर मधलं पाणी ओसरल… पूर्णपणे पाणी ओसरल्यामुळे पुणे महानगरपालीकेच्या कर्मचाऱ्यांकडून औषधांची फवारणी करण्यात येत आहे… रोग पसरू नये म्हणून महापालीलेकडून दक्षता घेण्यात येतीय…
लागोपाठ हल्ल्याने चंद्रपूरमधील चिमूर तालुक्यातील गरडपार आणि उरकूडपार गावात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. वाघाच्या हल्ल्यात ४ जण जखमी झाले आहेत. वाघाने गरडपार येथे शेतात काम करणाऱ्या लोकांवर हल्ले केले.
श्रावण महिन्यात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात लांब रांगा पहावयास मिळत आहेत. राजशिष्ट्यचारातील व्यक्ती वगळता अन्य व्यक्तींना व्हीआयपींना दर्शन बंद करण्यात आले आहे.
भाजपला पाठिंबा फक्त लोकसभेपुरताच होता. विधानसभेचे आपण काही बोललो नाही, असे राज ठाकरे यांनी भाजपसोबत युतीच्या प्रश्नावर बोलताना सांगितले. विधानसभेबाबत काही निर्णय झाला नाही, असे त्यांनी म्हटले.
आरक्षणावरुन जातीत जातीत भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जातीच्या मुद्यावर शरद पवार यांनी हातभार लावू नये. महाराष्ट्राचे मणिपूर होऊ नये, याची पवारांनी काळजी घ्यावी. मतांसाठी राजकारण करु नये, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
नाशिक जिल्ह्यातील बागलाणच्या पश्चिम भागास वरदान ठरलेले ५७२ दलघफू क्षमतेचे केळझर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरून आरम नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. केळझर मध्यम लघू प्रकल्प परिसरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे केळझर धरण ओसंडून वाहू लागले आहे.
कल्याण स्टेशनवरील तिकीट काउंटरवर गोंधळ झाला. तिकीट काढताना सुट्टे पैसे नसल्याने झालेल्या वादात महिला प्रवाशांनी व्हिडिओ काढला म्हणून तिकीट काउंटरच्या महिला स्टाफने महिलेला मारहाण केली. त्यावेळी इतर प्रवाशांनी रेल्वेच्या स्टाफच्या हातातून महिलेची सुटका केली.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर 12000 वाहन चालकांवर कारवाई
पुणे मुंबई दृतगती मार्गांवर नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा
केवळ पंधरा दिवसात 12810 बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई
वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी एक्सप्रेस वेवर कारवाई
द्रुतगती मार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम यंत्रणा सुरू झाल्यानंतर कारवाईचा वेग वाढला
छत्रपती संभाजीनगर : जन्म-मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी संकेतस्थळ दोन महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. या संकेतस्थळात सुमारे ५ व हजारांपेक्षा जास्त जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रे अडकली आहेत. प्रमाणपत्रांसाठी नातेवाईक मनपा ५ वॉर्ड कार्यालयांसह मुख्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. बनावट प्रमाणपत्रांना आळा घालता यावा, यासाठी हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. मात्र, त्यात काही दुरुस्ती केल्याने ते अतिशय संथगतीने सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर
पुण्यातील पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्री करणार पाहणी
सिंहगड रोड परिसरातील एकता नगर मधील पाहणी करत मुख्यमंत्री साधणार नागरिकांशी संवाद
पुणे शहरात उद्धवलेल्या पूर सदृश्य परिस्थितीचा मुख्यमंत्री आज घेणार आढावा
पाहणीनंतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत मुख्यमंत्री घेणार शहराचा आढावा
आज दुपारी मुख्यमंत्री पुण्यात
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकाच दिवशी 1 हजाराहून अधिक पाणी गुणवत्ता तपासणीची विशेष चाचणी मोहीम संपन्न
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणारा पाणीपुरवठा स्वच्छ व शुध्द असावा याची काळजी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने घेण्यात येत आहे. विविध ठिकाणांहून दररोज 110 पाणी नमुने तपासण्यात येत असतात
यामध्ये नेहमीपेक्षा 10 पट अधिक म्हणजे 1000 पेक्षा अधिक पाणी नमुने महापालिका क्षेत्रातील विविध भागांतून संकलित करण्यात आले. त्यांची गुणवत्ता प्रयोगशाळेत तपासण्यात आली. या विशेष मोहीमेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले
पुणे शहरासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज पुण्याला ऑरेंज अलर्ट
काल संध्याकाळ नंतर पुण्यात पावसाची विश्रांती, धरण क्षेत्रातून नद्यांमध्ये विसर्ग अद्याप ही सुरू
कुठल्या धरणातून सध्या किती विसर्ग सुरू आहे (क्यूसेक्स मध्ये)
खडकवासला: 45705
पानशेत: 10500
वरसगाव: 10102
पुणे : नगर कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा येथे लक्झरी बस आणि कार चा अपघात या अपघात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
आळेफाट्यावरुन कल्याणच्या दिशेने जाणा-या बसची समोरुन येणा-या कारला समोरासमोर धडक झाली या भीषण अपघातात कारमधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. रिया गायकर,कुसुम शिंगोटे असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहे