Maharashtra Rain News LIVE : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने राज्यातील पुणे, सातारा, रायगड, पालघर, सांगली या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुणे, सांगलीत पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुटांवर पोहोचली आहे. राधानगरी धरण देखील 98 टक्के पेक्षा जास्त भरले आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज दुपारपर्यंत उघडण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक जिल्हा आणि राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
नवी मुंबई : सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेली पर्जन्यवृष्टी लक्षात घेऊन तसेच हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेत शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते. याचा विचार करून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उद्या 26 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सांगली : सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे सांगलीमधल्या कृष्णा नदीच्या पाण्याचे पातळीमध्ये वाढ झाली आहे. सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 34 फुटांवर पोहचली आहे. तर पाऊसाचा जोर कायम असल्याने उद्या सकाळपर्यंत पाण्याची पातळी सांगलीत 37 ते 38 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर कोयना धरणातून देखील 20 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, आणि वारणा धरणातून 15 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पुढच्या 24 तासानंतर सांगलीतल्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार असल्याने, 40 फूट असणारी इशारा पातळी देखील कृष्णा ओलांडेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पूर पट्ट्यातल्या नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत.
बदलापूर : बदलापूरची उल्हास नदी अजूनही धोक्याच्या पातळीच्या वरच आहे. आज दिवसभरात उल्हास नदीने 18.80 मीटरची पाणीपातळी गाठली. सध्या उल्हास नदीची पाणी पातळी 18.20 मीटरवर पोहोचली आहे. रस्त्यावरचं पाणी ओसरल्यामुळे बदलापूर शहराकडून ग्रामीण भागाकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र पाऊस पूर्णपणे थांबल्यामुळे नदीची पाणीपातळी ओसरण्यास सुरुवात झाली आहे.
भर पावसात पनवेलमधील ओवळे गावात चोरांचा धुमाकूळ बघायला मिळतोय. चोरांनी एकाच रात्रीत ४ बंद घरे फोडली आहेत. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाचा फायदा घेत चोरट्यांनी हे कृत्य केलं. चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
महिला कारचालकांचे नियंत्रण सुटल्याने गिट्टीखदान चौकात अपघात झाला आहे. कार चालवत असताना नियंत्रण सुटून रस्त्यालगत असलेल्या भाजीपाला दुकानासमोरील तीन दुचाकीना धडक देऊन कार झाडावर जाऊन आदळली. या अपघातात एक जण जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी रुग्णलयात दाखल केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने 50 रस्ते बंद केले आहेत. काल रात्रीपासून जिल्ह्यात दुपारपर्यंत मुसळधार पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती. यामुळे अनेक नदी, नाले भरभरून वाहत आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढया मोठ्या संख्येत रस्ते बंद झाले आहेत. यात पाच राष्ट्रीय महामार्गाचा समावेश आहे.
कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर आणि मुरबाडच्या तहसीलदारांना एमआयडीसीकडून पत्र पाठविण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बारवी धरणाची पाणीपातळी सध्या 68.15 मीटर इतकी आहे. 72.60 मीटर पाणीपातळी गाठताच स्वयंचलित दरवाज्यांमधून आपोआप पाण्याचा विसर्ग सुरू होईल.
कल्याण खाडीची पाणी पातळी वाढल्याने रेतीबंदर परिसर जलमय झाला आहे. खाडी किनारी राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे. रेतीबंदर परिसरात असलेल्या अनेक तबेल्यामध्ये पाणी शिरले आहे.
कल्याण खाडी किनारी घरात अडकलेल्या 11 नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. केडीएमसीच्या कर्मचारी आणि अग्निशमन विभागाने बोटीच्या आधारे या नागरिकांना बाहेर काढले. खाडीतील पाण्याची पातळी वाढल्याने केडीएमसीने वारंवार सूचना केल्या. मात्र, काही नागरिक घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे ते घरातच अडकले होते.
धाराशिव जिल्हयातील परंडा पंचायत समिती कार्यालयाला गळती लागली आहे. जीर्ण झालेल्या परंडा पंचायत समितीच्या कार्यालयाला गळती लागल्याने संगणकावर प्लास्टिक कापड टाकले आहे. या धोकादायक इमारतीमध्ये कर्मचाऱ्यांना कामकाज करण्याची वेळ आली आहे. नवीन इमारतीचा प्रस्ताव दोन वर्षापासुन धूळखात पडून आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर ही वेळ आली आहे.
रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. त्यामुळे सवित्री, काळ आणि गांधारी नद्यांना पूर आला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यात रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. लवासामध्ये दरड कोसळल्याची घटना घडली. यात तीन बंगले दरडीखाली गेले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली.
Maharashtra | A team of NDRF has reached the site of the landslide in Lavasa. The road route to the landslide site has developed some cracks.
(Source – National Disaster Response Force) pic.twitter.com/iyj0KWMbgu
— ANI (@ANI) July 25, 2024
पिंपरी-चिंचवडमधील मोरया गोसावी गणपती मंदिर परिसर पाण्याखाली गेला. तर ठिकठिकाणी मुसळधार पावसाने पाणी साचले आहे.
#WATCH | Maharashtra: Morya Gosavi Ganpati Mandir in Pimpri-Chinchwad submerges as the region witnesses incessant heavy rainfall. pic.twitter.com/Lpxvs0h9ud
— ANI (@ANI) July 25, 2024
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहे. 10 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नदीकाठच्या आजूबाजूच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नागरी सेवांमधील अपंगत्व निकषांमध्ये सुधारणा करा अशी मागणी खासदार फौजिया खान यांनी राज्यसभेत केली. पुजा खेडकर आणि कार्तिक कंसल यांच्या प्रकरणांचा उल्लेख पण त्यांनी केला. फौजिया खान यांनी राज्यसभेत कार्तिक कंसल यांचा प्रश्न मांडला.
पुण्यापाठोपाठ कोल्हापूरालाही पुराचाही फटका बसला. कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे. तर राधानगरी धरणाच्या दरवाजे उघण्यात आले आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे.
मुंबई उपनगरात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईत वाहणाऱ्या नाल्यांवरही दिसून येत आहे. मुंबईतील दहिसर नालाही तुडुंब भरला होता. आता पावसाने विश्रांती घेतल्याने दहिसर नाल्यातील पाणी कमी झाले आहे.
पश्चिम महाराष्ट्राला पण पावसाच्या तडाख्यामुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे. कोयना धरणातून विसर्ग कायम सुरू आहे. सांगलीत धोक्याची पातळी निर्माण झाली आहे. 2019 ला पुराचा फटाका बसला होता.राज्य सरकारने तात्पुरती योजना न करता कायमस्वरूपी योजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.
पुण्याच्या सखल भागात पडलेल्या अविरत पावसामुळे सर्व परिसर जलमय झाला असून अशा परिस्थितीत पुण्याच्या नागरी प्रशासनाने केलेल्या विनंतीवरुन लष्कराच्या बचाव आणि मदत कार्य पथकाने एकता नगरच्या दिशेने प्रयाण केले आहे. या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी कृती दल तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असून या पथकासोबत आपत्तीने प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी तसेच तत्पर आणि परिणामकारक मदतकार्यासाठी आवश्यक बचाव बोटी आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा साधने आहेत.
जोरदार पावसाने पुण्याला झोडपले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळपासूनच सूत्रे हाती घेतली. तर दुसरीकडे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फ़ोन केला. उद्याची सुट्टी आजच जाहीर करा. उद्या ऐनवेळी अडचण नको त्यामुळ आज संध्याकाळ पर्यंत जाहीर करा. आज जशी अडचण झाली तशी उद्या होवू नये अशा सूचना त्यांनी दिल्या.
पुणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीची पाणी पातळी प्रचंड वाढली असून बदलापुरात तर उल्हास नदी धोक्याच्या पातळीच्याही वरून वाहत आहे. उल्हास नदीच्या या पुराचं पाणी बदलापूर शहरात घुसलं असून अनेक सखल परिसर जलमय झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून बदलापूर शहरात एनडीआरएफ सुद्धा तैनात करण्यात आली आहे.
पुण्यात पाऊस पूर्णपणे थांबला आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात पाणी ओसरलं आहे. सिंहगड रोड परिसरातील काही भागात आज सकाळी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. सिंहगड रोड परिसरातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.
पुणे, कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील इतर भागांत होणाऱ्या मुसळधार पाऊसावर सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सवाल उपस्थित केलाय. पुण्यात झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुण्यात खडकवासला धरणातून विसर्ग सुरु आहे. शासनाकडून पुरेशी काळजी घेण्यात आली नाही. एनडीआरएफच्या माध्यमातून बाधित क्षेत्रात केंद्राने मदत पोहोचवावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे.
आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. परिणामी विहार तलाव , तुलसी तलाव ओव्हर फ्लो झालाय. याचा थेट परिणाम मिठी नदीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. मिठी नदी धोकादायक पातळीजवळ पोहचली आहे. २.४ मिटरवर सध्या पाणी पोहोचलं आहे. जास्त पाऊस झाला आणि पाण्याचा निचरा झाला नाही तर मिठी नदी धोकादायक पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आजूबाजूच्या रहिवाशी वस्तींना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
शिरूर – राजगुरुनगर – भीमाशंकर मार्गावर पडलेली दरड काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटवण्याचे काम सुरू आहे. पहाटे ५ वाजल्यापासून भीमाशंकर मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. पुढील एक तासात वाहतूक सुरळीत होण्याचे संकेत आहेत.
पावसामुळे पुण्यात पाणी साचलं आहे. अशात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आहेत. पोलीस आयुक्त कार्यालयातील कंट्रोल रुममधून शहराचा आढावा घेत आहेत.
सातारा जिल्ह्यात उद्या देखील रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रक जारी केलं आहे.
उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. उजनी धरणाची दुपारी बारा वाजेपर्यंतची पाणी पातळी मायनस 12.60 टक्के होती. दौंडमधून 51 हजार क्यूसेकने उजनी धरणात आवक सुरू झाली आहे. दौंडमधून रात्री उजनी धरणात आवक वाढण्याची शक्यता आहे. आवक वाढल्यास दोन दिवसात धरण प्लसमध्ये येणार आहे. भीमा खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
नाशिक शहरातील शिंगाडा तलाव परिसरात भले मोठे झाड कोसळल्याने दोन चारचाकी वाहांनाचे नुकसान झाले आहे.य
इगतपुरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे भावली येथे धबधब्यालगत दरड कोसळल्याची घटना घडली.कोणतीही हानी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केलीये. राज ठाकरे यांनी स्पष्ट केले ते 225 ते 230 जागा लढणार आहेत.
निवडून येणाऱ्यांनाच तिकिट दिले जाणार असल्याचे राज ठाकरे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मी अनेकवेळा नकाशावर पाहिले होते, कॅनडा आणि अमेरिका यात पाच तलाव आहेत. आपल्याकडे असंख्य तलाव आहेत.
आज राज ठाकरे यांचा पदाधिकारी मेळावा पार पडतोय. यावेळी ते पदाधिकाऱ्यांना संबोधित करत आहेत.
पुण्यात पुरामुळे मोठे नुकसान झाल्याचे बघायला मिळतंय.
कोल्हापुरचे राधानगरी धरण हे आता 100 टक्के भरले आहे. आता पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
कल्याणच्या उल्हास नदीच्या पाणी पात्रात वाढ झालीये.
डेक्कन परिसरात घरांसमोर पाण्याचा वेढा असून नागरिकांना घराबाहेर पडता येत नाहीये.
“मुंबई, पुणे, रायगड इथे जास्त पाऊस पडतोय. सर्व प्रशासनाला सकाळपासून सूचना केल्या आहेत. अर्लट मोडवर राहून प्रशासनाला लोकांना मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. धरण, कॅचमेंट एरियात खूप पाऊस झाला. त्याचा डबल फटका बसला. लष्कर, नौदल एअर फोर्सची बचाव पथकं सज्ज आहेत. गरजेनुसार लगेच पावल उचलली जातायत. आपातकालीन परिस्थिती ओढवली, तर लोकांना एअरलिफ्ट केलं जाईल” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde speaks to Raigad Collector and directs him to provide all assistance to rainfall & flood-affected people in the district and assures him of all help from the state government pic.twitter.com/tHgXCrNeFv
— ANI (@ANI) July 25, 2024
उल्हास नदीची पातळी वाढली. कल्याण नगर महामार्गावरील रायते पुल गेला पाण्याखाली. रायते पूल वाहतुकीसाठी बंद. वाहतूक पोलिसांनी नगर मुरबाडहुन कल्याणच्या दिशेने येणारी व जाणारी वाहतूक टिटवाळा गोवेली मार्गे वळवण्यात आली असून नदी काठच्या गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
कोल्हापूरला पाणी पुरवठा करणारं राधानगरी धरण पूर्ण भरलं आहे. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले. धरणातून 1500 क्युसेकचा विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम
पुण्याच्या राजगुरुनगर येथील पोलीस कस्टडीत साचले गुडघाभर पाणी. राजगुरुनगर पोलीस स्टेशन पोलीस लॉकअप (कस्टडी) ही राजगुरुनगर तहसिलदार कार्यालयाजवळ आहे. गेले दोन दिवस पडत असलेल्या संततधार पावसाने येथील चारही कस्टडी रुममध्ये गुडघा भर पाणी शिरले आहे. कस्टडीत सध्या एकही आरोपी नाही. पोलीस कर्मचारीच पाणी काढत आहेत.
आर्वी तालुक्यातील महाकाळी येथील धाम प्रकल्प ओव्हरफ्लो. प्रकल्पाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. धाम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने वर्धा शहरासह प्रकल्पावर अवलंबून पाणी पुरवठा योजनांना मिळणार भविष्यात पाणी. उद्योगांसह शेतीलाही मिळणार पाणी.
मुंब्रा-शिळफाटा रस्त्यावर पाणी साचलं. पाण्यातून वाहने काढताना तारेवरची कसरत करताना दिसत आहे. पुणे लवासा सिटी येथे दरड कोसळली आहे. तीन बंगले दरडीखाली आहेत.
पिंपरी चिंचवडच्या चिखली मधील घरकुल येथील इमारतींमध्येही पाणी शिरायला लागले असून सखल भागात गुडघ्या हून अधिक पाणी साठलेले आहे. अनेक वाहनं पाण्याखाली गेली असून पावसाचा जोर कायम राहिल्यास इमारती मधल्या घरांमध्येही पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घरकुल मध्ये 160 इमारती असून त्यातील जवळपास 40 ते 50 इमारतीच्या भागात पाणी शिरल्याने नागरिक हैराण झाले आहे.
बदलापूरच्या उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. उल्हास नदीने 17.60 पातळी गाठली. बदलापूरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नागरिकांनी गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा असं प्रशासनाने आवाहन केलय. बदलापूरला पुराचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून नदीकिनारच्या रहिवाशांना सतर्कतेचं आवाहन. नदीने २० मीटर पाणीपातळी गाठल्यास शहरात येणार पूर.
कल्याण डोंबिवली परिसरातील पाणीपुरवठा बंद. मोहिली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये उल्हास नदीचे पाणी शिरल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र बंद. मांडा, टिटवाळा, उंबरणी , बल्याणी, आटाळी, आंबिवली, मोहने, वडवली आणि कल्याण पश्चिमेसह पूर्व व डोंबिवली मधील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर जलशुद्धीकरण केंद्र चालू करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची महानगरपालिकेची माहिती.
कर्जतमध्ये ट्रॅकवर पाणी साचण्यात सुरुवात. मध्ये रेल्वेची रेल्वे सेवा अर्धा तास उशिराने. चाकरमानी वर्गांचे मोठे हाल.
पुण्यात सिंहगड रोडवर भीषण परिस्थिती आहे. दुचाकी स्कूटर, बाईकच फक्त हँडल दिसतय. चारचाकी गाड्या सुद्धा पाण्याखाली आहेत. नागरिकांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढलं जातय.
इगतपुरी तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू आहे. मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणत वाढ झाली. बुधवारी भावली धरण 100 टक्के भरले तर, भाम धरण भरण्याच्या मार्गावर आहे सद्यस्थितीत कडवा 63.45, भाम 79.34 दारणा 78.26, मुकणे 22.56,वाकी 24.08 तर वैतरणा धरण 50 टक्के भरले आहे.
कालपासून कोसळत असलेल्या पावसामुळे कल्याण ग्रामीण भागातून वाहणाऱ्या उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला तर कल्याण नगर महामार्गावरील रायते पुलाला देखील पाणी लागलं आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीचे पाणी पुलावरून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव या रायते पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहन चालकांना टिटवाळा गोवेली मार्गे कल्याण गाठण्याचा आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येतेय….
पुण्यातील काही भागात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुण्यातील सर्व शाळा – महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे… पुण्यात कालच प्रशासनाने रेड अलर्ट दिला होता… नागरिकांना पूरस्थितीतून बाहेर काढण्याचं काम सुरु आहे…असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.
अजितदादांकडून पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून अजित पवार पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहे. शिवाय त्यांनी प्रशासनाला सूचना देखील दिल्या आहे… पुण्यास सध्या पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे.
पुण्यात पुराची स्थिती भयानक… पुण्यात पूरस्थितीसंदर्भात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलं आहे… असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
पूरस्थितीसंदर्भात प्रशासनाला सूचना दिल्यात… नागरिकांना सुरक्षित स्थळी जावं… प्रशासनाला सहकार्य करावं… कामाशिवाय लोकांनी बाहेर पडू नये… असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला केलं आहे.
अंबरनाथ शहरात मागील 24 तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात साचलं पाणी… नवरे नगरकडून ग्रीन सिटी कडे जाणारा रस्ता पाण्याखाली… वाहनचालक आणि पादचाऱ्यांना गुडघाभर पाण्यातून काढावी लागतेय वाट…. साचलेल्या पाण्यात अनेक दुचाकी बंद पडत असल्यामुळे वाहन चालकांचे होतायत हाल
पवना धरण क्षेत्रात 375 मिलिमीटर पाऊस झाला आहे. लोणावळा शहरात 370 मिलिमीटर पाऊस पडला आहे. पिंपरी चिंचवड शहरात 145 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
राधानगरी धरण 94 टक्के भरले आहे. इचलकरंजी शहरातील बागवानपट्टी शेळके मळा परिसरात पुराचे पाणी येऊ लागले आहे. इचलकरंजी कर्नाटकची जोडणारा रस्ता पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद केली आहे.
अनिल देशमुख यांनी उघडपणे ईडीकडून मिळालेल्या धमकीसंदर्भात सांगितले. परंतु राज्यातील अनेक नेत्यांना धमकी मिळाली आहे. मलाही धमकी मिळाली होती, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले.
राज्याला अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नाही.राज्याच्या सत्ताधाऱ्यांनी यासंदर्भात उत्तर द्यावे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पिंपरी चिंचवड शहरासह पवना धरण क्षेत्रामध्ये पडत असलेल्या दमदार पावसामुळे पवना नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. शहराच्या काही भागांमध्ये पवना नदीचे पाणी रस्त्यावर यायला सुरुवात झालेली आहे.
इचलकरंजीमधील पंचगंगा नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर आले आहे. यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. राधानगरी धरण 94 टक्के भरले आहे. शहरातील बागवानपट्टी शेळके मळा परिसरात पुराचे पाणी येऊ लागले. इचलकरंजी कर्नाटकची जोडणारा रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला आहे.
Maharashtra Rain Live : पर्यटन नगरी लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरु
या पावसाने यंदाच्या मोसमातील उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या चोवीस तासात तब्बल 370 मिलिमीटर पाऊस बरसला आहे.
यामुळे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचं बोललं जातं आहे.
या एक जून पासून 2971 मिलीमीटर इतका पाऊस बरसला आहे
गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2638 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.
Maharashtra Rain Live : कोल्हापुरात सध्या पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीने गाठली धोक्याची पातळी ओलांडली आहे.
पंचगंगा नदीची पाणी पातळी पोहोचली 43 फुटांवर
तर राधानगरी धरण देखील 98 टक्के पेक्षा जास्त भरलं
राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज दुपारपर्यंत उघडण्याची शक्यता
अनेक जिल्हा आणि राज्य मार्ग वाहतुकीसाठी केले बंद
कोल्हापूर कडून रत्नागिरीला जाण्यासाठी महत्त्वाचा असलेला पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल वाहतुकीसाठी बंद
जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात अजूनही पावसाच्या दमदार सरी
Maharashtra Rain Live : सांगलीत 24 तासात 172 मिमी पावसाची नोंद
सांगलीत मुसळधार पाऊस
गेल्या पाच सहा दिवसापासून चांदोली धरण परिसरामध्ये सलग अतिवृष्टीचा पाऊस
24 तासात 172 मिलिमीटर पावसाची नोंद
Maharashtra Rain Live : गोंदियातील इटीयाडोह प्रकल्प यंदाही ओव्हरफ्लो
गोंदिया जिल्ह्यातील इटीयाडोह प्रकल्प झाला यंदा ओव्हरफ्लो
धरण १०० टक्के भरलं असून यातून पाण्याच्या विसर्ग झाला सुरू
शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली
सलग तिसऱ्या वर्षी भरले धरण….
Maharashtra Rain Live : पुण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, शाळांना सुट्टी जाहीर
हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.