Maharashtra Breaking News LIVE : जेवण वेळेवर मिळत नाही, मनोरमा खेडकर यांचा पोलिसांवर आरोप

| Updated on: Jul 21, 2024 | 9:33 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 20 जुलै 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : जेवण वेळेवर मिळत नाही, मनोरमा खेडकर यांचा पोलिसांवर आरोप
Follow us on

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रांचीला भेट देणार आहेत. शाह दुपारी 1.40 वाजता बीएसएफच्या विमानातून रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर उतरतील. IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांची पोलीस कोठडीची मुदत आज संपणार असून त्यांना आज पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मुंबई मधील सखल भागात पावसामुळे पाणी साचण्यास सुरवात झाली आहे. हिंदमाता परिसरातील रस्ते जे आहेत ते जलमय झाले आहेत. आज मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. भुशी धरणाच्या पायऱ्यांवरील पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटकांना पायऱ्यांवर मज्जाव करण्यात आला आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी स्थानिक जीवरक्षक तसेच पोलिसांकडून पर्यटकांना भुशी धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे.
यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Jul 2024 08:55 PM (IST)

    अंधेरी भुयारी मार्ग पावसाच्या पाण्याने भरल्याने पुन्हा एकदा बंद

    अंधेरी भुयारी मार्ग पावसाच्या पाण्याने भरल्याने पुन्हा एकदा बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. आज सकाळी आणि दुपारीही पाणी भरल्यानंतर ते बंद करण्यात आले होते.

  • 20 Jul 2024 07:22 PM (IST)

    नवनिर्वाचित राज्यसभा खासदार सुनेत्रा पवारांची आजच्या डीपीडीसी बैठकीला दांडी

    नवनिर्वाचित राज्यसभा खासदार सुनेत्रा पवारांची आजच्या डीपीडीसी बैठकीला गैरहजर राहिल्या. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खासदार सुनेत्रा पवार अनुपस्थित होत्या. आजच्या डीपीडीसी बैठकीला पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार राज्यसभेचे खासदार उपस्थित होते. खासदार शरद पवारही आजच्या बैठकीला उपस्थित होते.


  • 20 Jul 2024 06:41 PM (IST)

    अजित पवार गटाच्या नेत्याचा कबड्डी स्पर्धेत राडा

    अजित पवार गटाच्या नेत्याचा कबड्डी स्पर्धेत राडा झालाय. पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये हा प्रकार घडला. अजित पवार गटाचे नेते बाबुराव चांदेरे यांनी कबड्डी स्पर्धेच्या पंचांला शिवीगाळ केली. शिवीगाळ करत बाबुराव चांदेरे यांनी पंचावर उगारला हात. जिल्हास्तरीय स्टेट लेव्हलच्या कबड्डी स्पर्धेमध्ये हा प्रकार घडला. आजच्या स्पर्धेमध्ये सांधेरी यांची टीम देखील खेळण्यासाठी उतरली होतीय पंचाचा निर्णय न पटल्याने चांदेरे यांनी शिवीगाळ केली.

  • 20 Jul 2024 06:21 PM (IST)

    सांगलीच्या शिराळ्यात मुसळधार पाऊस

    सांगलीच्या शिराळ्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

  • 20 Jul 2024 05:10 PM (IST)

    मी झोपते ते रूम ओली आहे: मनोरमा खेडकर

    मला वेळेवर जेवण मिळत नाही असा आरोप मनोरमा खेडकर यांनी पोलिसांवर केला आहे. आज मला 9 वाजता चहा आणि दीड वाजता जेवण मिळालं. मी झोपते ते रूम ओली आहे, असंही मनोरमा खेडकर म्हणाल्या.

  • 20 Jul 2024 04:54 PM (IST)

    नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मोरबे धरण 50 टक्के भरले

    जून महिन्यात नवी मुंबई शहरात व धरणात पावसाचे प्रमाण कमी असल्याने सर्वांचेच डोळे पावसाकडे लागले होते. नवी मुंबई शहरात गेल्यावर्षीच्या तुलनेत जून महिन्यात कमी पाऊस झाला. यंदाही मोरबे धरण 100 % भरण्याचे अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

  • 20 Jul 2024 04:48 PM (IST)

    शिराळा आणि शाहुवाडी तालुक्यातील प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प

    सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरामध्ये बऱ्यापैकी संततधार मुसळधार पावसामुळे वारणा नदीच्या पात्रात वाढ झाली आहे. त्यामुळे वारणा नदीवरील मांगले सावर्डे दरम्यानचा बंधारा ही पाण्याखाली गेला आहे. यामुळे शिराळा आणि शाहुवाडी तालुक्यातील या प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प आणि बंद झाली आहे.

  • 20 Jul 2024 04:32 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची मुसळधार हजेरी, अभावाने दिसणारा वाघ नजरेस

    चरण्यासाठी आलेल्या बैलाची वाघाने शिकार केली. चिचपल्ली भागातील वाघाच्या शिकारीची घटना आनंद शेगावकर यांनी कॅमेऱ्यात कैद केली.

  • 20 Jul 2024 04:15 PM (IST)

    पुण्यात तरुणीला जबर मारहाण, बाणेर पाषाण रोडवरील घटना

    पुण्यातील बाणेर पाषाण रोडवरील धक्कदायक घटना समोर आली आहे. अज्ञात इसमाकडून तरुणीच्या नाकातून रक्त येईपर्यंत मारहाण झालीये. संबंधित तरुणीचा पाठलाग करत बेदम मारहाण करण्यात आली. 2 किमी पर्यंत अज्ञात इसमाने पाठलाग तरुणीने  आरोप केलाय.

  • 20 Jul 2024 03:57 PM (IST)

    पूजा खेडकरचा फोन बंद

    पूजा खेडकरचा फोन बंद आहे. पुणे पोलीस आणि पुजा खेडकरचा कुठलाही संपर्क झालेला नसल्याची पुणे पोलीस आयुक्तांची महिती दिली आहे. आज पुणे पोलीस पूजा खेडकरचा जबाब नोंदवणार होते. पण पूजा खेडकर अजून देखील पोलीस आयुक्तालयात आलेल्या नाहीत. अजून कुठललाही जबाब नोंदवला नसल्याची माहिती  पुणे पोलीस आयुक्तांनी दिलीय.

  • 20 Jul 2024 03:45 PM (IST)

    भलं मोठं आंब्याचे झाड पडलं अन्…

    नवी मुबंईत वाशी येथे झाड पडलं आहे. भलं मोठं आंब्याचे झाड पडल्यानं वाहनांचं मोठं नुकसान आहे.  काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली होती.

  • 20 Jul 2024 03:30 PM (IST)

    चंद्रपुरात यंदा किती पाऊस झाला?

    चंद्रपुरात कोसळधार, एक जूनपासून आज तारखेपर्यंतच्या वार्षिक सरासरीच्या 44 टक्के पाऊस झाला आहे. शहरालगतच्या इरई धरणाची तीन दारे 0.25 मीटरने उघडली आहेत. पाण्याचा मोठा प्रवाह नदीत प्रवाहित होत आहे.  प्रशासनाने सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

  • 20 Jul 2024 03:15 PM (IST)

    दहा वर्षाचा मुलगा नाल्यात वाहून

    चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यातील विलम नाल्यात दहा वर्षाचा मुलगा वाहून गेला. स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू, कॅमेऱ्यात कैद घटना झाली. चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ग्रामीण भागातील नदी- नाले- ओढे भरून वाहत आहेत. अशातच नागभीड तालुक्यातील चिकमारा मार्गावरील विलम नाला देखील ओसंडून वाहत आहे. हा नाला पार करण्याच्या प्रयत्नात असलेला दहा वर्षाचा ऋणाल प्रमोद बावणे हा मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेला. पुलाचा अंदाज न आल्याने त्याचा पाय घसरून तो पुराच्या पाण्यात पडला. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली. सध्या स्थानिकांच्या मदतीने शोध कार्य सुरू आहे.

  • 20 Jul 2024 01:22 PM (IST)

    धारावीकरांचा त्यांच्या मूळ जागीच पुनर्विकास करा – ठाकरे

    धारावीच्या निमित्ताने सरकारला मुंबई अदानी सिटी करायची आहे. परंतू हे आम्ही होऊ देणार नाही. तिथल्या नागरिकांचा धारावीतच पुनर्विकास करावा अशी मागणी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

  • 20 Jul 2024 01:12 PM (IST)

    निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून सरकारच्या फसव्या घोषणा – ठाकरे

    विधानसभा निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून सरकारच्या फसव्या घोषणा राज्य सरकारने फसव्या घोषणांचा पाऊस पाडला आहे अशी टिका उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.

  • 20 Jul 2024 01:07 PM (IST)

    अजय बारस्कर यांचा फडणवीस यांच्या बंगल्यासमोर ठिय्या

    मनोज जरांगे यांच्यावर आरोपांची राळ उडवून देणाऱ्या अजय बारस्कर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर ठिय्या मारीत भर पावसात आंदोलन सुरु केले आहे.

     

  • 20 Jul 2024 12:53 PM (IST)

    प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न म्हणजे आनंदाचा क्षण असतो- अजित पवार

    आपल्या काळी एक दिवसाचं लग्न बघितलं आहे. मात्र आता सहा सहा महिने लग्न चालतात, हजारो कोटी रुपये त्यावर खर्च होतात, अजितदादांची अंबानीच्या लग्नावर भाष्य केले आहे.

  • 20 Jul 2024 12:45 PM (IST)

    घाट रोडवरील पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी

    नागपूरच्या घाट रोडवरील पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एका बाजूची वाहतूक बंद. एका बाजूने वाहतूक सुरू मात्र वाहतुक पूर्णतः विस्कळीत झाली

     

  • 20 Jul 2024 12:05 PM (IST)

    नीट परीक्षेचा निकाल जाहीर

    न्यायालयाने सांगितल्यानंतर परत एकदा नीट परीक्षेचा निकाल हा केंद्रनिहाय जाहीर करण्यात आलाय

  • 20 Jul 2024 11:59 AM (IST)

    Maharashtra News : ग्रँड रोड स्टेशन परिसरात इमारतीचा भाग कोसळला

    ग्रँड रोड स्टेशन परिसरातील चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला. काही लोक आत मध्ये फसल्याची माहिती. साई गुणीसा इमारतीचं नाव. नाना चौक परिसरात ही इमारत आहे. 4 जण जखमी झाल्याची माहिती.

  • 20 Jul 2024 11:50 AM (IST)

    Maharashtra News : पुण्यातील बाणेर रस्त्यावरील पूजा खेडकरचा बंगला उघडला

    खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील बाणेर रस्त्यावरील बंगल्याला काही दिवसांपासून कुलुप लावण्यात आले होते. मात्र आत्ता अचानक हे कुलुप उघडण्यात आलेय. आत बंगल्यात कोण व्यक्ती आहेत याची माहिती मिळू शकलेली नाही. पूजा खेडकर या वाशीम मधुन निघाल्यावर कुठे गेल्यात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशावेळी खेडकर कुटुंबाचा बंगला पुन्हा उघडण्यात आलाय.

  • 20 Jul 2024 11:26 AM (IST)

    Maharashtra News : वर्धा जिल्ह्यात पाऊस कायम

    वर्धा जिल्ह्यात पाऊस कायम आहे. जिल्हयातील शाळांना सुट्टी जाहीर. पोथरा प्रकल्प ओव्हरफ्लो. लालनाला प्रकल्पाचे उघडले पाच दरवाजे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

  • 20 Jul 2024 11:25 AM (IST)

    Maharashtra News : नाशिकच्या आरोग्य यंत्रणेचा सावळा गोंधळ उघडकीस

    नाशिक शहरातील डेंग्यु चाचण्या ठप्प. एकीकडे डेंग्यु रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे चाचणी करणाऱ्या किटचा साठा संपला. मनपा आणि जिल्हा आरोग्य विभागाची एकमेकांकडे टोलवा टोलवी. 200 हून अधिक रुग्णाचे अहवाल चाचण्यांअभावी रखडले. पालकमंत्री दादा भुसे काय आदेश देणार? याकडे लक्ष.

  • 20 Jul 2024 10:58 AM (IST)

    पावसाची संततधार, ग्रामीण भाग प्रभावित

    चंद्रपूर जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, काही ठिकाणी रस्ते वाहून गेले, तर एक दोन ठिकाणी पाणी घरात शिरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पावसाचा सर्वाधिक फटका नागभीड तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातील बामणी ते कोटगाव हा पोच मार्ग वाहून गेला, तर नागभीड शहरातील शिवनगर भागात काही घरात पाणी शिरले आहे. चिमूर या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तलावामुळे शहराच्या बाह्य भागाला पाण्याने वेढले आहे.

  • 20 Jul 2024 10:46 AM (IST)

    यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा

    संघ लोक सेवा आयोग अर्थात यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच सोनी यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठवला आहे. सोनी यांनी व्यक्तीगत कारणं दाखवून राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे.

  • 20 Jul 2024 10:40 AM (IST)

    पुणे ग्रामीण पोलिसांकडून मनोरमा खेडकरची कार जप्त

    काल खेडकर यांच्या राहत्या घरातून पुणे पोलिसांनीलँड क्रूजर कंपनीची कार जप्त केली. शेतकऱ्यांना धमकवतानाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये हीच कार खेडकर यांनी वापरली होती. मनोरमा खेडकरला अटक केल्यावर पिस्टल आणि गाडी जप्त करणार असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितलं होतं. जप्त केलेली गाडी पौड पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली आहे.

  • 20 Jul 2024 10:30 AM (IST)

    अजित पवारांची साथ बेनके सोडणार का?

    अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळं आता अतुल बेनके ही अजित पवारांची साथ सोडणार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का? अशी चर्चा रंगलेली आहे. खासदार अमोल कोल्हेच्या घरी ही भेट घडली, याला शरद पवारांनी ही दुजोरा दिलेला आहे. ते आत्ता कोणत्या पक्षात आहेत? मला ते अजित पवार गटात आहेत, याची मला कल्पना नाही. तो माझ्या मित्राचा मुलगा आहे, त्यामुळं यावर फार चर्चा नको. असं म्हणत शरद पवारांनी अतुल बेनके यांच्या पक्ष प्रवेशावर सूतोवाच केले.

  • 20 Jul 2024 10:20 AM (IST)

    लोणावळ्यात मागील 24 तासांत 131 मिलीमीटर पावसाची नोंद

    लोणावळ्यात मुसळधार पावसाला सुरु आहे. मागील 24 तासांत लोणावळ्यात तब्बल 131 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांना पावसात भिजण्याची चांगलीच संधी मिळत आहे. पावसामुळे लोणावळ्यात आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आता पर्यटकांची पावले लोणावळ्यात वळू लागली आहेत.

  • 20 Jul 2024 10:10 AM (IST)

    या मागण्यांसाठी उपोषणाचे उपसले हत्यार

    सगे सोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करा.

    हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेटचा आधार घेत मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे.

    गॅझेट मध्ये मराठा समाजाचा कुणबी असा उल्लेख आहे.

    अंतरवालीसह राज्यात मराठा आंदोलकावर दाखल झालेले गुन्हे परत घेण्यात यावे. अशा मागण्या जरांगे पाटील यांनी केल्या आहेत.

  • 20 Jul 2024 10:01 AM (IST)

    सग्या सोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करा – मनोज जरांगे पाटील

    सग्या सोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करा.  हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेटचा आधार घेत मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. गॅझेट मध्ये मराठा समाजाचा कुणबी असा उल्लेख करा. अंतरवालीसह राज्यात मराठा आंदोलकावर दाखल झालेले गुन्हे परत घेण्यात यावे, अशा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या आहेत.

  • 20 Jul 2024 10:00 AM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

    सरकारने आम्हाला धोका दिला म्हणून आमरण उपोषण करण्याची वेळ आल्याची टीका मनोज जरांगे यांनी सरकारवर केली. आजपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत.

  • 20 Jul 2024 10:00 AM (IST)

    Maharashtra News: वाघनखं ही काय मतं मागण्याची वस्तू आहे का? संजय राऊत

    छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जी श्रद्धा आहे महाराष्ट्रामध्ये, त्या श्रद्धेचा व्यापार चालवला आहे. वाघनखं ही काय मतं मागण्याची वस्तू आहे का? राजकारण करण्याची वस्तू आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

  • 20 Jul 2024 09:58 AM (IST)

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून पुन्हा उपोषण

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून पुन्हा उपोषण सुरू करणार आहेत. आंतरवली सराटी येथे उपोषणस्थळी ते दाखल झाले असून थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधून भूमिका स्पष्ट करणार आहेत.

     

  • 20 Jul 2024 09:55 AM (IST)

    कल्याण स्टेशन परिसरातील रस्त्यावर साचले गुडघ्याभर पाणी

    कल्याण डोंबिवलीत पहाटे पासून पावसाची हजेरी.  कल्याण स्टेशन परिसरातील रस्त्यावर गुडघ्याभर पाणी साचले. पाण्याचा निचरा करण्यासाठी महानगरपालिकेकडून तीन पंप लावून पाणी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

  • 20 Jul 2024 09:50 AM (IST)

    Maharashtra News: स्ट्राईक रेटनुसार आमचा पक्ष नंबर 1 वर – शरद पवार

    स्ट्राईक रेटनुसार आमचा पक्ष नंबर 1 वर… आम्ही 10 जागा लढवल्या, 8 जागा जिंकल्या… असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

  • 20 Jul 2024 09:45 AM (IST)

    Maharashtra News: उल्हासनगर अंबरनाथ बदलापूरमध्ये पहाटे पासून रिमझिम पावसाला सुरूवात

    उल्हासनगर अंबरनाथ बदलापूरमध्ये पहाटेपासून पाऊस सुरू असून, अधून-मधून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण असून, पहाटेपासून रिमझिम पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

  • 20 Jul 2024 09:44 AM (IST)

    वाढत्या डेंग्यू संदर्भात आढावा घेण्यासाठी आज पालकमंत्री दादा भुसे घेणार बैठक

    वाढत्या डेंग्यू संदर्भात आढावा घेण्यासाठी आज पालकमंत्री दादा भुसे घेणार बैठक.  दुपारी नाशिकच्या संदर्भ रुग्णालयात होणार बैठक. गेल्या काही दिवसांपासून शहरात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

  • 20 Jul 2024 09:31 AM (IST)

    Maharashtra News: भिवंडी शहरात रात्रीपासून पाऊस, शहरातील अनेक सकल भागामध्ये साचले पाणी

    भिवंडी शहरात रात्री पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सकल भागामध्ये साचले पाणी. भिवंडी शहरातील भाजी मार्केट तीनबत्ती परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. भाजी मार्केटमध्ये आलेल्या पाण्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाचा जोर कायम राहिल्यास अनेक घर व दुकानांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता

  • 20 Jul 2024 09:25 AM (IST)

    भांडुप परिसरात पावसाची दमदार हजेरी

    भांडुप परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसासह वाऱ्याचा देखील वेग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.आकाश ढगाळ वातावरण झाल्यामुळे काळोख पसरला आहे त्यामुळे अनेक गाड्या दिवे लावून रस्त्यावरती धावत आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास सखोल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • 20 Jul 2024 09:23 AM (IST)

    मुंबई उपनगरात सकाळ पासून जोरदार पाऊस, हिंदमाता परिसरात पाणी साचण्यास सुरवात

    मुंबई मधील सखल भागात सध्या दमदार पावसामुळे पाणी साचण्यास सुरवात झाली आहे. सध्या मुंबई मधील हिंदमाता परिसरातील रस्ते  जलमय झाले आहेत. या रस्त्यावरची वाहतूक ही दुसऱ्या मार्गाने पुढे वळवण्यात आली आहे.