आज विधिमंडळाचा पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज विधिमंडळात घाटकोपर हॉर्डिंग दुर्घटना प्रकरणात लक्षवेधी आहे आणि मदर डेअरी च्या प्रकरणात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. आज विधिमंडळात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अडगावात दूध दरवाडीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.दुधाला भाव वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. दूध रस्त्यावर ओतून देत निषेध केला. पुणे शहरात झिकाचा चौथा रुग्ण सापडला आहे. पुणे शहरात तिघांना झिकाची लागण झाल्याचे समोर आले होते. आता मुंढवा भागात एका तरुणाला झिकाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्याची तब्येत चांगली असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. एरंडवणे येथे झिकाचे दोन रुग्ण आढळले तर मुंढवा भागात एका रुग्णाची नोंद झाली आहे.खासगी रुग्णालयाने ही माहिती महापालिकेला कळविण्यास विलंब केला,त्यामुळे त्या रुग्णालयास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
अक्षर पटेल याने ट्रिस्टन स्टब्स याला बोल्ड केलं आहे. रचनात्मक शॉट मारण्याच्या प्रयत्नात ट्रिस्टन बोल्ड झाला. ट्रिस्टनने 21 बॉलमध्ये 31 धावा केल्या.
क्विंटन डी कॉकच्या अचूक थ्रो मुळे चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात नॉन स्ट्राईक एंडवर रन आऊट झाला आहे. डी कॉकने मारलेला थ्रो स्टंपला लागून बाउंड्रीच्या दिशेने गेल्याने टीम इंडियाला 4 धावा अतिरिक्त मिळाल्या. मात्र अक्षर आऊट झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का लागला आहे. अक्षरने 31 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 1 फोरसह 47 रन्स केल्या.
पावसाळ्याच्या पहिल्या पावसानंतर अयोध्येत अनेक ठिकाणी रस्ता खचल्याच्या घटना घडल्यानंतर आता आयुक्त गौरव दयाल आणि डीएम नितीश कुमार स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. दोन्ही अधिकारी आज फिल्डमध्ये असून अयोध्येच्या रस्त्यांची पाहणी करत आहेत. रस्ता खचल्याप्रकरणी सहा अभियंत्यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले.
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने शनिवारी सीबीआयच्या न्यायालयीन कोठडीच्या याचिकेवर सुनावणी करताना मुख्यमंत्री केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
हरिद्वारमधील गंगा नदीत अनेक वाहने वाहून गेली आहेत. पावसामुळे नदीची पातळी अचानक वाढली आण दुथडी भरून वाहू लागली. जोरदार प्रवाहामुळे अनेक गाड्या कागदी होड्यांप्रमाणे तरंगताना दिसत होत्या.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले की, हे झारखंड फक्त झारखंड नाही तर ती वीरांची भूमी आहे. आम्ही वीरांचे पुत्र आहोत, आम्हाला घाबरण्याची गरज नाही.
पुण्यात चौथा झिकाचा रुग्ण सापडला आहे. चार रुग्ण सापडले आहेत त्या भागात सर्वेक्षण सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये. असं आवाहन करण्यात आलं आहे.
पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणात सर्व 10 आरोपींना 1 जुलै पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना सुनावली 1 जुलै पर्यंत कोठडी. सर्व आरोपींची एकत्रित चौकशी करायची असून अनेक धागेदोरे हाती येणार असल्याची पोलिसांनी कोर्टात माहिती दिली आहे.
नंदुरबार शहरात आणि परिसरात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना फायदा होणार आहे. मात्र जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न अजूनही गंभीर स्थितीत आहे. या पावसामुळे शेती पिकांना फायदा तर होणार मात्र धरणात पाणीसाठा वाढणार कधी असा प्रश्न. धरणात पाणीसाठा वाढण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा अजूनही लागून आहे.
अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण अफ्रिका एकही सामना न गमवता पोहोचले आहेत. दक्षिण अफ्रिकेने सलग 8 सामने जिंकले आहेत. तर भारताने सलग 7 सामने जिंकले आहेत. साखळी फेरीत कॅनडाविरुद्धचा भारताचा सामना पावसामुळे झाला नाही.
नागपूरात सकाळपासूनच्या ढगाळ वातावरणानंतर पावसाच्या हलक्या सरी झाल्या आहे. नागपूरला यलो अलर्ट मिळाला असून पुढील चार दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांना गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांनी दिलं निवेदन आहे. दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय थांबवण्यासाठी गोकुळ दूध संघाने शरद पवार यांना साकडं घातले आहे.
लोकसभेत राहलेले लोक पेढे वाटत होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
नुकताच विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अजितदादांचा वादा पक्का असतो.
नुकताच विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अर्थसंकल्प शेतकरी हिताचा आहे.
मदर डेअरीसाठी ठाकरे गट आक्रमक झाल्याचे बघायला मिळतंय.
अजितदादा भाजपच्या नादाला लागून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर खाली खेचलं त्याबाबत त्यांना पश्चाताप झालाय, असे भास्कर जाधव यांनी म्हटले.
नुकताच सतेज पाटील यांनी मोठी मागणी केलीये. शक्तीपीठ मार्ग बंद व्हायला पाहिजे असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
पुण्यातील प्रसिद्ध मॉलमध्ये असलेल्या नामांकीत पब मध्ये पोलिसांची छापेमारी. परवाना रद्द असताना सुद्धा मद्याची विक्री. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. येरवडा भागात असलेल्या “plink” पब वर सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई. संशय येऊ नये म्हणून रात्री फक्त 2 तास सुरू होता पब. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सील केलेला पब होता सुरू
नीटची परीक्षा रद्द करा. बारावीच्या मेरिटवरच मेडिकल प्रवेश निश्चित करा. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलीन यांचे पंतप्रधान मोदींसह आठ मुख्यमंत्र्यांना पत्र. दिल्ली, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, केरळ, पंजाब, तेलंगणा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना एमके स्टॅलिन यांचे पत्र. नीट परीक्षाबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार का? याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष
केंद्र सरकारने बुधवारी अधिसूचना काढून मका, कच्चे सूर्यफूल तेल, रिफाइंड मोहरी तेल आणि दूध भुकटीची आयात शुल्क शून्य केले आणि १० हजार टन दूध भुकटी, ५ लाख टन मका, तीन लाख टन कच्चे सूर्यफूल आणि रिफाइंड मोहरी तेल आयातीचा अध्यादेश काढला. त्या अध्यादेशाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून होळी करण्यात आली.
लडाखच्या दौलत बेग ओल्डी भागात एक दु:खद घटना घडली आहे. शुक्रवारी युद्ध सुराव सुरु होता. रणगाडे नदी पार करताना अचानक पाण्याची पातळी वाढली. त्यात 5 जवान शहीद झाले.
सातव, मुंदडा, वानखडे यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात काम केल्याचा खळबजनक आरोप हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केला. यापैकी कुणाला पण मिळणाऱ्या लाभाच्या पदाला किंवा विधानसभेच्या उमेदवारीला विरोध असेल असा इशाराच आष्टीकरांनी दिला.
एक माणूस तिकडे निवडून आला. आणि आम्ही 10 पैकी 8 निवडून आलो. तर एक जागा तुतारी आणि पिपाणी या संभ्रमामुळे गेली. नाहीतर 10 पैकी 9 जागा आल्या असत्या, असे शरद पवार यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाच्या दमदार सरी आल्या. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. पंचगंगा नदीवरील कसबा बावडा इथला राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. बंधाऱ्यावरील वाहतूक पोलिसांनी बंद केली.पंचगंगा नदीची पाणी पातळी 17 फुटांवर आली आहे.
संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे देहु येथील इनामदार वाडा येथे आज जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवस, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी २९ जून रोजी सर्व पक्षीय बैठकित ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. आरक्षणाबाबत सर्व पक्षीय बैठक पुढे ढकलण्यात आली, बैठक रद्द करण्याचे करण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील आठवड्यात बैठक होण्याची शक्यता आहे.
काल राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आज संपूर्ण मुंबईमध्ये राज्य सरकारने जाहीर केलेल्या घोषणा सांगणारे बॅनर्स झळकत आहेत. मुंबईतील कुलाबा परिसरामध्ये आणि गेटवे ऑफ इंडिया परिसर तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या चौका बाहेरच हे बॅनर लावण्यात आलेले आहे. मदतीचा हात एकनाथ या मथळ्याखाली हे बॅनर लावलेले आहेत ज्या लेक लाडकी योजना, युवा कार्य योजना , अन्नपुर्णा योजना यांसारख्या विविध योजनांची माहिती दिली आहे
राज्याच्या अर्थसंकल्पाचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला. खिशात 70 रुपये मग 100 रुपये खर्च करणार कसे? असा हिशेबच शरद पवारांनी काढला. त्यांनी इतर अनेक मुद्यांवर मत मांडले.
संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे देहु येथील इनामदार वाडा येथे आज जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवस, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. इनामदार वाडा येथून मुक्काम उरकून पालखी आकुर्डीकडे मार्गस्थ होणार आहे
पंजाबच्या बरोबरीने पुणे हे ड्रग्सचं महत्वाचं केंद्र बनलं आहे. पुण्यातील एक पिढी नशेच्या आहारी जाताना दिसत आहे.
पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे. माणगावच्या लोणेरेमध्ये मुंबई-गोवा महामार्गाची चाळण झाल्याचे दिसत आहे. पहिल्याच पावसात महामार्गावर खड्डे निर्माण झाले असून त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबईत आज भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रभारी व सहप्रभारी कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीचा रोड मॅप बनविण्यावर चर्चा होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अडगावात दूध दरवाडीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. दूध रस्त्यावर ओतून देत केला निषेध. दुधाला भाव वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.