सध्या गणेशोत्सव सुरु आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत आहेत. त्याबाबतचे अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. ठाण्यात आनंद आश्रमातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिथे आनंद दिघे यांच्या फोटोसमोर पैशांची उधळण करण्यात आली आहे. यावरून वातावरण तापलं आहे. याबाबतचे अपडेट्स आज दिवसभर तुम्ही टीव्ही 9 मराठीवर पाहू शकता. आमच्या वेबसाईटवर वाचू शकता. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
पुण्यातील गर्दीमुळे मेट्रो प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्यात रात्री २ पर्यंत मेट्रो सेवा सुरु राहणार आहे. गणपती पाहण्यासाठी मोठी गर्दी रात्रीच्या वेळी होत आहे. गणेश भक्तांची गैरसोय होवू नये म्हणून मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
मेरठमध्ये 3 मजली घर कोसळल्याने 10 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासन पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई देणार आहे. प्रत्येक मृतांना 4 लाख रुपये, घर बांधण्यासाठी 1 लाख 20 हजार आणि गुरांसाठी भरपाई दिली जाईल.
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये केंद्रावर हल्ला चढवत म्हटले आहे की, “ते जम्मू-काश्मीरमध्ये 5 वर्षांपासून राज्य करत आहेत, त्यांनी नेहमीच कलम 370 ला दहशतवादासाठी जबाबदार धरले होते, पण आता कलम 370 नाही, तरीही दहशतवाद का आहे? सगळी शस्त्रे कुठून येतात?”
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याच्या घोषणेनंतर दिल्लीचे मंत्री कैलाश गेहलोत म्हणाले, “आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाशी सहमत आहोत. अरविंद केजरीवाल यांनी लोकांचे प्रेम, आदर आणि आशीर्वाद मिळवले आहेत. विधानसभा विसर्जित करण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.”
दिल्लीतील लॉरेन्स रोड येथील एका कारखान्यात भीषण आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दिवसभरात 12.15 च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली.
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरु असून गणेशपुर-पाटणादेवी रस्त्यावर धावणाऱ्या 14 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
समृध्दी महामार्गावर छोट्या नव्हे तर मोठ्या गाड्यांचे देखील टायर फुटत आहे, रस्त्याच्या दर्जाबाबत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी कॉंग्रेसचे नेते नाना पटाले यांनी केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी ९ च्या सुमारास एसटी बसचा अपघात घडला. बसचे स्टेरिंग अचानक फ्री झाल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि पार्किंग करुन ठेवलेल्या ट्रकवर बस आदळली. या अपघातात २० ते २५ प्रवाशी किरकोळ जखमी झाले.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील नेत्यांमध्ये खडाजंगी उडत आहे. या बॅनरवार मधून देखील आपलाच मुख्यमंत्री राहणार आशा आशयाचे बॅनर लागत आहेत. नांदेड मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले आहेत.
आपल सरकार आणा मी तुमची जुनी पेंशन योजनेची मागणी पूर्ण करतो, सरकारला घाम फुटणार आणि कदाचित कॅबिनेट घेऊन घोषणा करतील. मला किती पेंशन मिळणार माहित नाही…मी अजून रिटायर नाही, पण मी सत्तेतून रिटायर होणार नाही. माझा महाराष्ट्र म्हणजे तुम्हासारखी हाडा माणसाची आहे. आम्ही कंत्राटी तुम्ही सरकार चालवता. कोविड मध्ये तुम्ही नसता तर महाराष्ट्र टिकला नसता, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Maharashtra News Live : जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, आपण सर्व कुटुंब आहोत, आमच्या बहिणींना भावांना न्याय द्या असं साईबाबांकडे साकड घातलं. माझा पक्ष चिन्ह आणि वडील पण चोरलेत. मला दिवारचा डायलॉग आठवला? मेरे पास ईमान है …विश्वास है…एकजूट ठेवा…फोडाफोडीचे राजकारण जे आमच्यासोबत झाल ते तुमच्या सोबतही होईल, यांना टेंशन द्या , उपोषणाची हाक दिली पण ते करू नका आधीच उपाशी यांना सत्तेवाचून उपाशी ठेवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले
“माझ्यासह मनीष सिसोदियाही उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री हे पद तेव्हाच सांभाळतील, जेव्हा दिल्लीची जनता सांगेल की मनीष सिसोदिया प्रामाणिक आहेत. माझा आणि मनीष सिसोदिया आमच्या दोघांचाही निर्णय तुमच्या हातात आहे. आम्ही दोघेही लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधू, आम्ही गल्लोगल्ली फिरून लोकांशी बोलू – अरविंद केजरीवाल
जर केजरीवाल प्रामाणिक आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर माझ्या पक्षाला भरघोस मतदान करा. मी निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर जाऊन बसेन – अरविंद केजरीवाल
नवी दिल्ली : मी दोन दिवसांनंतर माझ्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन. तोपर्यंत माझ्याऐवजी आप पक्षाचा दुसरा नेता मुख्यमंत्री होईल. येत्या दोन दिवसात विधीमंडळाची पक्षाची एक बैठक होईल. या बैठकीत पुढील मुख्यमंत्री कोण हे निश्चित केले जाईल- अरविंद केजरीवालांकडून मोठी घोषणा
उद्धव ठाकरे शिर्डीत दाखल झाले आहेत. ते संभाजीनगर दौऱ्यावर असून जुनी पेन्शन योजनेसंदर्भातील आंदोलनाला भेट देणार आहेत.
“पंधराशे रुपयांपेक्षा सरकारने बहिणींची अब्रु वाचवावी. सत्तेचा उन्माद चढला त्यांना खड्यासारखं बाजूला टाकण्याचं काम करा. नाशिकच्या आसपासच्या परिसरात विकास पण नाशिकमध्ये गेल्यावर वेगळं चित्र दिसतं,” असं शरद पवार म्हणाले.
जळगावात शासकीय वसतिगृहाच्या अधिक्षकांचा हृदयविकारानं मृत्यू झाला आहे. योजनेच्या कामाच्या तणावामुळे मृत्यू झालाचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे. कारवाई करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
टाटानगर जंक्शन रेल्वे स्टेशनवर पंतप्रधान मोदींनी टाटानगर-पाटणा वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. टाटानगर इथं ते प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीणच्या (PMAY-G) 20,000 लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वाटपदेखील करणार आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचं स्वागत केलं आणि त्यांना ‘शासन आपल्या दारी’ या पुस्तकाची प्रत भेट दिली.
कांदा निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क मध्ये बदल केल्यानंतर कांदा निर्यातीला वेग आला. श्रीलंका,बांग्लादेश,गल्फ कंट्री, मलेशिया या देशातून कांद्याच्या मागणीला सुरुवात झाल्याची माहिती कांदा निर्यातदारांनी दिली. कांदा निर्यात देखील वेगाने सुरू होण्याची शक्यता, त्यामुळे कांद्याचे दर आणखीन वाढणार आहे. कांदा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पुणे मेट्रोतून एका दिवसात तब्बल दोन लाख प्रवाशांची वाहतूक झाली.शनिवारी सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत एक लाख 75 हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. शहरातील मध्यभागी गणेशोत्सव देखावे पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी झाली आहे. मेट्रोचे डबे प्रवाशांनी फुल्ल झाले होते तर स्थानकेही गजबुजून गेली होती.
खासदार शरद पवार यांचे शिंदखेडा येथे आगमन झाले. शिंदखेडा येथील शेतकरी मेळाव्याला पुष्पकृष्टी करत स्वागत करण्यात आले. जेसीबी वरून शरद पवारांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. शरद पवार वेळेवर कार्यक्रमाला हजर उपस्थित झाल्यामुळे आयोजकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली.
मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी संदिपान भुमरे अंतरवाली सराटीत पोहचले आहेत. उद्यापासून जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यापूर्वीच भुमरे यांनी त्यांची भेट घेतली आहे.
मूल शहरातील गडचिरोली मार्गावरील टोपाझ बार अँड रेस्टॉरंटचे शटर तोडून २५ हजार रोख रक्कम व तीन बिअर बाटल्या लंपास केल्याची घटना घडली. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. गत आठवड्यात तालुक्यातील चिरोली व नांदगाव येथील चोरीच्या घटना घडल्या.
जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीने दुसऱ्या दिवशी पण दंगा केला. सोने-चांदीच्या या घौडदौडीमुळे सुवर्णनगरीत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मोठा झटका बसला. शुक्रवार आणि शनिवारी दोन्ही धातूंनी मोठी भरारी घेतल्याने त्यांच्या तोंडचे पाणी पळाले. शुक्रवारी चांदीच्या दरात ४,४०० रुपयांनी वाढ झाली. तर सोन्याचे दर 1 हजार रुपयांनी वाढले. सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी चांदीमध्ये १६०० रुपयांनी तर सोन्याच्या दरात २०० ची दरवाढ झाली. चांदी ८८ हजार ६०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. दुसरीकडे सोने २०० रुपयांनी वधारून ते ७४ हजार १०० रुपये प्रति तोळा झाले आहे.
कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण ताजं असताना आता मुंबईतील नायर रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून सहाय्यक प्राध्यापकाचं निलंबन करण्यात आलं आहे.
कुठली संस्कृती ठाण्यामध्ये आली एक तर तुम्ही आनंद आश्रमाचा बेकायदेशीर ताबा घेतला. त्यांचे जे मूळ मालक होते त्यांना धाक , दहशत या माध्यमातून तो जो पारशांचा ट्रस्ट होता त्यांचा ताबा त्यांनी घेतला मुळात .ती शिवसेनेची प्रॉपर्टी आहे .आनंदी दिघे साहेबांची प्रॉपर्टी आहे. आनंद दिघे साहेब असते तर हे जे लेडीज बार वाले होते आत मध्ये घुसलेले मिंधे सेनेची लोक त्यांना आणि त्यांच्या बॉसला चापकाने फोडून काढलं असतं टेंभी नाक्यावर, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.
पुणे शहरात झिकाच्या रुग्णसंख्येतील वाढ सुरूच आहे. आता एकूण रुग्णांची संख्या ही शंभरवर पोहोचली आहे. त्यात रुग्णांमध्ये गर्भवतींचे प्रमाण अधिक आहे. शहरात आतापर्यंत झिकाच्या पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांचे वैद्याकीय अहवाल राज्याच्या आरोग्य विभागाला पाठविण्यात आले आहेत. आरोग्य विभागाची मृत्यू परीक्षण समिती या रुग्णांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधणार आहे. त्यानंतर हे मृत्यू कशामुळे झाले हे स्पष्ट होणार आहे.
पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर आणि दुचाकीच्यात झालेल्या अपघातात एका अठरा वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील अंगूर वाइनच्या समोर सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सार्थक बाहेती असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मुंबईतील वांद्रे भागात मुसळधार पाऊस होतोय. मुंबई उपनगर वांद्रे अंधेरी बोरिवलीत आज सकाळपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. वांद्र्यातील मातोश्री परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. सध्या कुठेही पाणी साचलेले नाही.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ कायम आहे. शुक्रवारी चांदीच्या दरात ४,४०० रुपयांनी वाढ झाली. तर सोन्याचे दर 1 हजार रुपयांनी वाढले होते. सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी चांदीमध्ये १६०० रुपयांनी तर सोन्याच्या दरात २०० ची दरवाढ झाली आहे. चांदी ८८ हजार ६०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. दुसरीकडे सोने २०० रुपयांनी वधारून ते ७४ हजार १०० रुपये प्रति तोळा झाले आहे.
खासदार शरद पवार यांचं शिरपूर विमानतळावर आगमन झालं आहे. राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून स्वागत शरद पवारांचा करण्यात आलं आहे. विधान परिषदेचे भाजपाचे आमदार अमरीश पटेल यांची देखील उपस्थित आहेत. अमरीश पटेल यांनी देखील स्वागत केलं आहे. माजी सभापती अरुण गुजराती यांची उपस्थिती होती.