राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज पासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत.रोहित पवार आणि एमपीएससीचे विद्यार्थी शरद पवारांना भेटण्यासाठी मोदी बागेत दाखल झालेत. पुण्यातील शास्त्री रस्त्यावर आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांना भेटीसाठी शरद पवारांनी आज मोदी बागेत बोलावलं आहे. दरम्यान काँग्रेसच्या वतीनं उद्या जालना बंदची हाक देण्यात आली आहे. बदलापूर प्रकरण आणि कोलकाता येथे झालेलं हिंसाचार प्रकरणी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकार्यांची भेट घेतली. तर अमरावती जिल्ह्यातील 36 महसूल मंडळात 100 टक्के पाऊस; तर अनेक मंडळात अतिवृष्टी झालीये. चार महसूल मंडळात मात्र अत्यल्प पावसाची नोंद करण्यात आली आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
उद्या 11 वाजता एक दोन तासांसाठी शिवसेना भवनातील चौकासमोर आंदोलन करणार. खरंतर याचिकाकर्त्याने या कारणासाठी कोर्टात जायला नको होतं. जिथे आई बहिणींचा विषय येतो तिथे त्यांनी संवेदनशील व्हायला हवं होतं. आता उद्या जर कुणावर अत्याचार झाला तर त्याची जबाबदारी याचिकाकर्ते आणि कोर्टावर असेल.
सरकार नराधमांना पाठीशी घालवत आहे. उत्स्फूर्तपणे आंदोलन करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवलं जात आहे. ते स्वतच्या विश्वात मश्गुल आहेत. त्यामुळेच आम्ही आंदोलन करणार आहोत. लोकांना जागरूक करत आहोत.
मी दोन तास आंदोलन करणार आहे. तोंडाला काळी पट्टी बांधून शिवसेना भवनाजवळ बसणार आहे. माझं रक्षण करण्यासाठी कोणी येत नाही असं लोकांना वाटतं, तेव्हा लोक रस्त्यावर उतरतात. बांगलादेशात ते पाहिलं. ते आपल्या देशात होऊ नये म्हणून आमचे प्रयत्न आहेत. आमचं आंदोलन थांबणार नाही.
बदलापूरच्या केसवर आता कोर्ट फास्ट ट्रॅक काय असतं ते दाखवेल अशी आशा आहे. काल कोर्टाने जे थोबडवलं ते मुख्यमंत्री आणि सरकारला चपराक नाही का. आताही मी कौतुक करत आहे. न्यायालयाच्या भूमिकेचं कौतुक आहे. न्यायालय हे तत्परतेने हलू शकतं. तीच तत्परता त्यांनी ज्या कारणासाठी आंदोलन करणार होतो त्यावर दाखवली पाहिजे. आरोपींना शिक्षा सुनावली पाहिजे.
बंद आम्ही उद्याच जाहीर केला होता. पवारसाहेब आणि पटोले बाहेर आहेत. त्यामुळे एकत्र बसून निर्णय घेऊ शकलो नाही. फोनवरून बोलणं झालं. पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. उद्या परवा आम्ही बसून चर्चा करू. भविष्यात बंद करणार नाही, असं नाही. संप करणं हा लोकशाहीचा अधिकार आहे. पुन्हा सांगतो, कोर्टाचा निर्णय मान्य नाही.पण कोर्टाचा आदर करून आम्ही निर्णय स्वीकारत आहोत. पण आम्ही बंद करणार नाही. आंदोलन करूनच स्वातंत्र्य मिळालं आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आंदोलन करायचं नाही. तेही महिलांविरोधातील अत्याचारांविरोधात आंदोलन करायचे नाही. हे काही पटत नाही. त्यांचे काही सदाआवडते लोक आहेत. ते नेहमी कोर्टात जातात आणि निर्णय घेऊन येतात. मागे मराठा आरक्षणाच्या विरोधातही ते गेले होते.
WFI चे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात लैंगिक शोषणाच्या प्रकरणी तक्रार करणाऱ्या महिला कुस्तीपटूंपैकी एकाने राऊस एव्हेन्यू कोर्टात आपले म्हणणे नोंदवले आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रियांका राजपूत यांनी हे जबाब कॅमेराबद्ध केले आहेत. न्यायालयीन कामकाज पूर्ण झाल्यामुळे तक्रारदाराची साक्ष आज पूर्ण होऊ शकली नाही, 10, 12 आणि 13 सप्टेंबर रोजी पीडितेचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया न्यायालय सुरू ठेवणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 10 सप्टेंबर रोजी होणार आहे.
उद्धव ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. काँग्रेस आणि शरद पवार गटाने उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे. उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी सांगितले की, आम्ही एकट्यानेच प्रवास सुरू केला आहे. संस्थेबद्दल आमची इच्छाशक्ती नाही. यात नवीन अध्याय जोडले जातील, आम्ही आमची राजकीय पावले ताकदीने पुढे करू.
शरद पवारांच्या आव्हानानंतर काँग्रेसनेही महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे. आम्ही बंद करणार नाही, पण जनतेने बंद केल्यास संबंध नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. उद्या शांततेने काळ्या पट्ट्या बांधून निषेध व्यक्त करू, असं पटोले पुढे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी कीवमधील मारिंस्की पॅलेसमध्ये शिष्टमंडळ-स्तरीय बैठक घेतली आणि दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करारांची देवाणघेवाण केली.
महाराष्ट्र बंद काय करता? राजकारण बंद करा, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. हायकोर्टाने देखील हा बंद असंवैधानिक असल्याचं सांगितलं आहे. दुसरीकडे,महाविकास आघाडीचं सरकार असताना महिलांवर अत्याचार होत होते, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. राजकीय हेतूने बंद पुकारत आहेत असं टीकास्त्रही त्यांनी सोडलं.
न्यायालय बंद बेकायदेशीर कसं ठरवू शकते. सरकारच्या निष्क्रियेतेविरोधात आमचं आंदोलन होतं. न्यायालयाने लोकभावनेचा आदर करायला हवा. लोकशाहीने आम्हाला अधिकार दिला आहे. खासगी कार्यासाठी हा बंद नव्हता, उद्या लोकांनी ठरवावं. दुसरीकडे, सरकारने याचिकाकर्ता पाळून ठेवलेला आहे.
शरद पवारांना कायद्याच्या पुढे जाता आलं नसल्याचं एडव्होकेट गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर बंद पुकारणं बेकायदशीर असतं. राजकीय पक्षांना बंद पुकारता येत नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं. तसेच बंद पुकारण्यात आला, तर कारवाई करा, असंही उच्च न्यायालयाने सांगितलं. तसेच बंद पुकारणाऱ्यांना नोटीस बजावल्याचंही सांगितल्याची माहिती सदावर्ते यांनी दिली. बदलापूर अत्याचार घटनेनंतर मविआने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र न्यालयाच्या निर्णयानंतर पवारांनी हा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं. त्यामुळे आता काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.
महाविकास आघाडीने उद्याचं महाराष्ट्र बंद मागे घ्यावं असं आव्हान शरद पवार यांनी केलं आहे. हायकोर्टाने हा बंद घटनाबाह्य असल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंच्या भूमिकडे लक्ष लागून आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवाार यांनी मविआला 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदचा निर्णय मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. शरद पवारांनी एक्स या सोशल मीडिया माध्यमावरुन हे आवाहन केलं आहे.
शरद पवार यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?
बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 23, 2024
बदलापूर अत्याचार प्रकरणी, शाळेतील ट्रस्टी-मुख्याधपिकांसह शिक्षकांची चौकशी सुरु आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग रुपाली बॅनर्जी सिंग यांनी नगरपरिषदेच्या इमारतीत बोलवून केली चौकशी सुरु आहे. नेमकं त्यादिवशी काय घडलं होतं हे जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय आयोगाने शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी तपासणी करणारे डॉक्टर्स, पोलीस अधिकारी यांची एकट्यात बोलवून चौकशी केली जात आहे.
रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचा केला निषेध. देवरी मुस्लिम समाज यांनी देवरी पोलिस ठाण्यात निवेदन दिले…..
जेसिबितून पुष्पवृष्टी करत क्रेनने हार आणून राज ठाकरे यांचे स्वागत. राज ठाकरे यांच्या स्वागताला पदाधिकारी, कार्यकर्त्याची मोठ्या संख्येनं उपस्थिती
या महिला भगिनी म्हणजे आदिशक्ती माया. आम्ही आमचे भाग्य समजतो की आमच्या भगिनींसाठी आम्हाला काहीतरी करता आलं, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
कार्यक्रम स्थळी पोहोचण्यासाठी दादांना उशीर झाल्याने अजित दादा परतले. मुख्यमंत्र्यांचे भाषण संपत असतानाच दादा कार्यक्रम स्थळी पोहोचत होते.
जर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा – सरकारला निर्देश
पुण्यातील व्यापारी उद्याचा महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होणार आहेत. पुणे शहरातील सर्व व्यापारी बंधूंची दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी ही माहिती दिली.
कोणत्याही पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही, असे हायकोर्टाने स्पष्ट केले. जर एखाद्या पक्षाने बंद पुकारला तर त्यावर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे.
राज्य सरकार शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात बसवणार होतं. मात्र अरबी समुद्रात स्मारक झालं नाही. संभाजी ब्रिगेड ची भूमिका यापूर्वीही राजभवनावरती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा अशी होती. लवकरच तारीख जाहीर करून राजभावनावर कुदळ मोर्चा काढणार असल्याचं आज संभाजी ब्रिगेडच्या मेळाव्यात जाहीर करण्यात आलं.
नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव स्टेट बँक शाखेत महिलांची लोटालोटी झाली. या घटनेत 2 महिला बेशुद्ध पडल्या आहेत.ई केवायसीसाठी आणि पैसे काढण्यासाठी आदिवासी महिलांची सकाळपासून बँकांसमोर तुफान गर्दी केली आहे. बँकेच्या आणि पोलीस विभागाच्या कुठलाच नियोजन नसल्यामुळे महिलांना तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
महाविकास आघाडीने स्वतःच्या घरातले भांडण स्वतः सोडवले पाहिजे, ते महाराष्ट्रातील जनतेच्या डोक्यावर लादू नये! महाविकास आघाडीत काहीच आलबेल दिसत नसून, उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून आंदोलने करून लोकांना भडकवण्याचे काम होत आहे, असे मत आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केले आहे.
नार-पार योजनेसाठी गिरणा नदीपात्रात अर्धनग्न होऊन जलसमाधी आंदोलन करण्यात आले. जळगावच्या चाळीसगांव तालुक्यातील गिरणा नदीपात्रात हे आंदोलन करण्यात आले. शिवसेना नेते उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलनं सुरू करण्यात आले. नार-पार योजनेसाठी गिरणा पट्ट्यातील शेतकरी, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहे.
काम केल्यावर काही लोकं विरोध करतात, श्रेय घेतात हर्षवर्धन पाटलांचे नाव न घेता दत्तात्रेय भरणे यांनी टीका केली आहे. महायुतीने जर हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिली तर मी 100 टक्के त्यांचं काम करणार, त्यांनी उमेदवारी मागणे काही चुकीचं नाही, असे ते म्हणाले.
बदलापूरमधील नामांकित शाळेत दोन बालिकांवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी महाविकास आघाडीने उद्या, 24 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. तर आता या दोन मुलींना झालेल्या जखमांबाबत मुख्याध्यापिकेच्या दाव्याने पुन्हा संतापाची लाट उसळली आहे.संबंधित शाळेतील मुख्याध्यापिकेने मुलींच्या जखमांबाबत “सायकल चालविताना झालेली असावी,” असे वक्तव्य केले आहे.
धुळे जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या दोन तासांपासून धुळे जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणासंदर्भात जाब विचारण्यासाठी मराठा आंदोलक सभास्थळी दाखल. थोड्याच वेळात मुख्यमंत्री नाशिक मध्ये तपोवन परिसरात सभास्थळी येणार. काही वेळापूर्वी नाना पटोले, विजय पाटील यांना देखील मराठा आंदोलकांनी घातला होता गराडा. मराठा आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस देखील हजर.
“काम करूनही आम्हाला फटका बसला, तुमच्या सारखं आम्हाला मन आहे. कांद्याने आमचा लोकसभेत वांदा केला, देशाचे कृषिमंत्री भेटलेत कांदा, सोयाबीन यांना भाव चांगला ठेवा. विरोधक म्हणतात 6 महिन्यात सरकार जाणार. एकनाथ शिंदेचे सरकार आले तेव्हाही असच म्हटलं होतं. सगळे मला विचारतात गुलाबी रंग आणला, हा रंग महिलांना आवडतो, गुलाबी रंगाचे फेटे एकाच ठिकाणी बघितले का? ही किमया लाडकी बहीण योजनेची आहे” असं अजित पवार म्हणाले.
धुळे जिल्ह्यातील निमडाळे गावात तलावात बुडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. वनभोजन साठी शाळेच्या सहलीसोबत हे विद्यार्थी गेले होते. सहली दरम्यान तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव स्टेट बँक शाखेत महिलांची चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत 2 महिला पडल्या बेशुद्ध झाल्या. ई केवायसीसाठी आदिवासी महिलांची सकाळपासून बँकांसमोर तुफान गर्दी झाली आहे. या गर्दीमध्ये दोन महिलांचे प्रकृतिक खराब झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले.
येत्या विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी आणखी एक उमेदवार जाहीर केला. यवतामळमधील वणीमध्ये बोलताना त्यांनी राजू उंबरकर यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर केली.
येत्या विधानसभा निवडणुकीच मनसे राज्यात २०० ते २५० उमेदवार उभे करणार आहे. त्यासाठी उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी दौरा असल्याचे मनसे नेते राज ठाकरे यांनी सांगितले.
बदलापुरातील आंदोलनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे म्हटले होते. त्यांचे हे वक्तव्य दुर्देवी असल्याचे शरद पवार यांनी केले.
बदलापुरातील घटनेनंतर कडक कारवाई करण्याची गरज आहे. राज्यभरात मुलींवर अत्याचार वाढले आहेत, असे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. उद्याच्या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
बदलापुरातील जनतेने शांततेने आंदोलन केले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे योग्य नाही, राज्य सरकारने अधिक संवेदनशील व्हावे आणि सर्वांवरील गुन्हे मागे घ्यावे, असे शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्रातील जनता उद्याच्या बंदमध्ये सहभागी होतील. त्यामुळे एक जनमत तयार होईल, असे शरद पवार यांनी सांगितले. बदलापुरातील घटनेबाबत जनभावना व्यक्त करण्यासाठी बंद असल्याचे त्यांनी म्हटले.
देशभरात फेक नॅरेटिव्हचा मुद्दा गाजतोय. एनडीएकडून हा मुद्दा उचलला गेला आहे. परंतु आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. तेच फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत. हे राज्य महिला, मुलींसाठी सुरक्षित नाही. हे सरकार आल्यापासून १४९३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट… तीन दिवस आंदोलन केल्यानंतर हे सगळे विद्यार्थी त्यांचे मुद्दे घेऊन शरद पवारांना भेटले… सगळे मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडू… तुमच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ आणि प्रश्न मार्गी लावू शरद पवारांचं आश्वासन…
राज्यातील महिलांवरील अत्याचारांमध्ये होणाऱ्या वाढीविरोधात पुण्यात सर्वपक्षीय एकटवले… बदलापूर प्रकरण यासह राज्यातील महिला असुरक्षिततेबाबत प्रश्न विचारत पुण्यातील कोथरूड येथे सर्वपक्षीय आंदोलनाला सुरुवात… राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज इंदापूर विधानसभा मतदारसंघात… इंदापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन… दुपारी इंदापुरात अजित पवारांची जाहीर सभा… जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून आमदार दत्तात्रय भरणे करणार शक्तिप्रदर्शन…
विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांना गुंतवलं.. राज्यातील पोलीस खातं भ्रष्टाचारानं बरबटलंय… महाराष्ट्र पोलिसांवर गृहमंत्र्यांचा विश्वास नाही.. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
कोल्हापूर हिंदुत्व संघटनांनी आज बंदची हाक पुकारली आहे… कोल्हापूर शहराला पोलीस छावणीचे स्वरूप… छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते करणार निदर्शने… शिवाजी चौकामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त…
उपमुख्यमंत्री अजित पवारांची जन सन्मान यात्रा आज इंदापूर विधानसभा मतदारसंघात येणार असून इंदापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन होईल. आज दुपारी इंदापुरात अजित पवारांची जाहीर सभा होणार असून जन सन्मान यात्रेच्या माध्यमातून आमदार दत्तात्रय भरणे शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांची नवनिर्माण यात्रा उद्या अमरावतीत दाखल होणार. त्यावेळी
राज ठाकरे अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. अमरावती मनसेच्या वतीने राज ठाकरे यांच्या स्वागताचे होर्डिंग्ज लागले आहेत.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बाबत आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी. सीबीआयने केलेल्या अटके विरोधात केजरीवाल यांनी याचिका दाखल केली आहे. दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल सीबीआयच्या अटकेत आहेत. यापूर्वी अटक झालेले नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह हे सध्या जेल बाहेर आहेत. केजरीवाल यांना दिलासा मिळणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात रात्री काही गावांमध्ये ड्रोन आकाशात घिरट्या घालत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अनेक नागरिक रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर होते. मात्र हे ड्रोन नेमके कोणाचे याबाबत पोलीस प्रशासनालाही कोणतीच माहिती मिळालेली नाही.
सोशल मीडियावर या ड्रोन बाबत अनेक अफवांचे मेसेज व्हायरल त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
शरद पवार आज पासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून रोहित पवार आणि एमपीएससीचे विद्यार्थी शरद पवारांना भेटण्यासाठी मोदी बागेत दाखल झाले आहेत. पुण्यातील शास्त्री रस्त्यावर आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांना भेटीसाठी शरद पवारांनी आज मोदी बागेत बोलावलं आहे.