तुम्हाला अजून मोबाईल सापडत नाही, त्यामध्ये खूप पुरावे असतील म्हणून तर तो मोबाईल फेकून दिला. वाल्मिक कराड खंडणीतला आरोपी आहे. तो मोदींपेक्षा मोठा लागला की काय. त्याला 302 मध्ये आरोपी करू शकत नाही, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी विष्णू चाटेला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. हत्या प्रकरणातील चौकशीसाठी चाटे दोन दिवसांच्या कोठडीची मुदत आज संपली. त्याची पुन्हा कोठडी मागण्यात येणार आहे.
धनंजय देशमुखांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू आहे. संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप आहे. त्यामुळे वाल्मिक कराडवर मोक्का लावावा अशी मागणी केली जात आहे. या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकी मिळाली आहे , धमकीचा व्हिडीओ हाकेंकडून शेअर करण्यात आला आहे. मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून धमकी मिळाल्याचा आरोप हाकेंनी केला आहे.
बीड: संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक महिना आधी त्यांना वाल्मीक कराड आणि विष्णू चाटेकडून धमकी देण्यात आली होती. जीवे मारण्याची धमकी दिल्याने संतोष देशमुख होते अस्वस्थ असा जबाबा पत्नी अश्विनी देशमुख यांनी cid कडे दिला आहे. देशमुख यांना नोव्हेंबर महिन्यात धमकी मिळाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. 15 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असून नौसेनेच्या दोन युद्धनौका व एका पाणबुडीचे त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार तसेच आमदारांसोबत स्नेहभोजन देखील करणार आहेत. मोदी महायुतीच्या आमदारांना काय कानमंत्र देणार ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांत आजपासून औषधपुरवठा बंद, थकबाकी न मिळाल्याने वितरकांनी निर्णय घेतला आहे.
पालिका रुग्णालयांना पुरवठा करण्यात येणाऱ्या औषधांची १२० कोटी रुपयांची थकबाकी देण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करत असून त्यामुळेच सर्व पुरवठादारांचा सोमवारपासून औषधपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
४८ पुरवठादारांकडे १०० कोटी रुपयांची थकबाकी आणि २० कोटी रुपयांची नियमित थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. औषधपुरवठा बंद झाल्यास रुग्णांना बाहेरून चढ्या दराने औषधे खरेदी करावी लागतील.
राज्यातील पालकमंत्र्यांची यादी तयार असून पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल्याची माहिती समोर येत आहे. येत्या दोन दिवसांत यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. संवेदनशील जिल्ह्याबाबत राज्य सरकार महत्वाचा निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यादी तयार आहे. काल रात्री उशिरा तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये फोनवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
नाशिक- मंत्री गिरीश महाजन यांनी पोलीस आणि आरटीओ विभागाची तातडीची बैठक बोलावली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आरटीओ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. नाशिकच्या उड्डाण पुलावर रात्री झालेल्या अपघात प्रकरणी ही तातडीची बैठक आहे. या अपघातात वाहतूक नियमांचं उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झालं आहे. वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी आणि कारवाई करण्यासंदर्भात गिरीश महाजन पोलीस आणि आरटीओ विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
नवी दिल्ली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पानिपतमध्ये दाखल होणार आहेत. पानिपतमध्ये उद्या मराठा शौर्य दिन असून पानिपत शौर्य स्मारक समितीमार्फत उद्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. फडणवीस यांच्यासह माजी मंत्री रावसाहेब दानवेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पानिपत मधील काला आम स्मारकाजवळ उद्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षी 14 जानेवारीला पानिपतमध्ये शौर्य दिन साजरा होतो.
लासलगाव (नाशिक)- कांद्याच्या बाजारभावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत एक हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे. कांद्याचे सरासरी बाजार भाव तेराशे रुपयांपर्यंत कोसळले आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना आक्रमक झाली आहे. लासलगाव बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले आहेत. कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करा, कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्या, अशा मागण्या कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.
मुंबईत ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली असून हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा फटका
भ्रष्टाचाराला मोदी – शहांनी खतपाणी घातलं… गद्दारांना सोबत घेऊन सरकार बनवलं… इंडिया आघाडी टिकायला हवी, काँग्रेसनं जबाबदारी घ्यायला हवी… पालिका स्वबळावर लढणार… लोकसभेत पुन्हा एकत्र येणार… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
नवीन वर्षातील पहिला सण असल्याने विठ्ठल मंदिरात विठ्ठल सभागृह,रुक्मिणी सभागृह तसेच मंदिराच्या इतर भागांची केली जात आहे स्वच्छता…. मकर संक्रांती निमित्त राज्यभरातून लाखो महिला भाविक येत असतात वाण वसा करण्यासाठी… पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे विठ्ठल मंदिराची स्वच्छता…
मुंबईत थंडीचा कडाका वाढला असून प्रदूषातही मोठी वाढ झाली आहे… शिवडी परिसरातील हवेची गुणवत्ता ढासळली असून मुंबईत होणाऱ्या विकासकामांमुळे हवेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे…
ठाणे पालिकेवर आज धडकणार दिव्यांगांचं आंदोलन… बच्चू कडूंच्या नेतृत्त्वाखाली दिव्यांगांचं आंदोलन…
पालघर मध्ये 500 रुपये बनवणारी बनावट नोटांचा कारखाना भायखळा पोलिसांनी केला पर्दाफाश… वाडा तालुक्यातील नेहाल पाडा येथे शेतात पत्र्याचा शेड बांधून सात महिन्यापासून सुरू होता बनावट नोटांचा कारखाना… निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बनावट नोटांची वितरण केल्याची तपासात प्राथमिक माहिती… भायखळा पोलिसांची पालघरच्या वाडा तालुक्यातील बनावट नोटांच्या कारखान्यावर मोठी कारवाई… बनावट नोटा छापण्याचे प्रिंटर, सहित अनेक साहित्य पोलिसांनी केलं जप्त… चार आरोपींना पोलिसांनी केली अटक, मोहरक्या फरार…
आशियातील दुसऱ्या सर्वात मोठ्या मंदिराचे नवी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे, अजित पवार हजेरी लावणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १५ जानेवारीला आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. नवी मुंबईतील खारघरमध्ये गेल्या १२ वर्षांपासून निर्माणाधीन असलेले इस्कॉन मंदिर अखेर पूर्णपणे तयार झाले आहे. भगवान कृष्णाला समर्पित या भव्य मंदिराचे नाव ‘श्री श्री राधा मदन मोहन जी मंदिर’ असे आहे. ९ एकरात पसरलेले हे आशियातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर आहे. मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही उपस्थित राहणार आहेत.
मनोज जरांगे पाटील आज संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत. आज देशमुख कुटुंबीयांनी टावर चढून आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्यातच जरांगे पाटील देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहेत. आज सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
बीड – आज मस्साजोगचे ग्रामस्थ करणार मोबाईल टॉवर चढून आंदोलन करणार आहेत. खंडणी प्रकरणातील आरोपीला मकोका लावण्यात यावा व हत्या प्रकरणात त्याचा समावेश करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सहभागी होणारआहेत. सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
पुणे : घरगुती गॅस सिलिंडरचा साठा करून त्याची अवैधरित्या सुरू असलेली विक्री सिंहगड रस्ता पोलिसाच्या पथकाने उघडकीस आणली. गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एकाला अटक करून त्याच्याकडून टेम्पोसह ६१ गॅसच्या टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. विकास आकळे (३१, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आकळे याच्यावर दोन महिन्यांपूर्वी देखील अशीच कारवाई करण्यात आली होती. पोलिस गस्तीवर होते. त्यादरम्यान वडगाव बुद्रूक भागात एकाने सिलिंडरचा साठा केला असून त्याची चोरून विक्री करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकला
पुणे : सारथीमार्फत सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण’ कार्यक्रमांतर्गत १ हजार ५०० विद्यार्थ्यांना दरवर्षी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिली. महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील तरुणांना याचा लाभ होणार आहे.
आजपासून महाकुंभ 2025 चा शुभारंभ होत आहे. पुढील 45 दिवस हा महाकुंभ मेळावा प्रयागराजमध्ये सुरु असणार आहे. या मेळाव्यात 30 कोटींहून अधिक भाविक सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रयागराजमध्ये आज महाकुंभचा दिमाखदार शुभारंभ होणार असून पहिलं शाही स्नान आज पार पडणार आहे. पौष पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर 50 लाख भाविक गंगेत स्नान करणार आहेत.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र आक्रमक झाला आहे. संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी द्या, अशी आक्रमक मागणी केली जात आहे. त्यासोतच वाल्मिक कराडला मोक्का लावा, या मागणीसाठी आज मस्साजोगमध्ये आंदोलन केले जाणार आहे. आज 13 जानेवारीला ग्रामस्थांच्या वतीनं टॉवरवर चढून आंदोलन करण्यात येणार आहे. तर 14 जानेवारीला मकर संक्रातीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.
तर दुसरीकडे उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभ 2025 चा शुभारंभ होत आहे. पुढील 45 दिवस सुरू असणाऱ्या या महाकुंभ मेळाव्यात 30 कोटींहून अधिक भाविक सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यांसह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा