मुंबईत मंत्री धनंजय मुंडे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. अन्न व नागरी पुरवठा खात्याबाबत चर्चा झाल्याची माहिती दिली. भुजबळांची भेट घेत आशीर्वाद घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. असं असलं तरी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची भेट घेतली. बैठकीनंतर गार्सेट्टी म्हणाले की, माझी मुकेश अंबानींसोबत अर्थपूर्ण भेट झाली. अमेरिका-भारत भागीदारीसाठी नवीन मार्ग शोधण्याबाबत आमच्या दोघांमध्ये चर्चा झाली.
चंद्रपूर वाघ आणि वारांचा जिल्हा आहे. कुठलेही वार असले तरी आम्ही त्यांचा सन्मान करतो. मुनंगटीवार नाराज नाहीत, त्यांनी स्वत: फोन केला होता. वैयक्तिक काम असल्याने गैरहजर होते, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
दिल्लीतील यूपी भवनातील एका सुरक्षा रक्षकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काँग्रेस नेते नाना पटोले यांची सांत्वनपर भेट घतली आहे. फडणवीस यांनी भंडाऱ्यातील साकोली येथे नाना पटोले यांची भेट घेतलीय. नाना पटोले यांच्या मातोश्रींचं अवघ्या काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर फडणवीस यांनी ही भेट घेतली.
सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख भावूक झाली आहे. आमच्या पाठीशी रहा, न्याय मिळवायचाय असं वैभवीने म्हटलं. बीड हत्या प्रकरणात जालन्यात आक्रोश मोर्च्यात वैभवी बोलत होती. तसेच जीव गेला तरी मागे हटणार नाही. मला तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत साथ द्या. आरोपी कोण हे सर्वांना माहित आहे. असं वैभवीनंतर सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख म्हणाले.
पनवेलमधील विचुंबे गावात आठवडा बाजारात २ महिला चोरांना चांगलाच चोप दिला गेला. बाळाच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट व महिलेच्या दागिन्यांवर त्यांनी डल्ला मारला होता. पनवेल परिसरात भुरट्या चोरांचे थैमान सुरु आहे. त्या चोरट्यांमध्ये महिलांची सहभाग आहे.
आमच्या पक्षात वाद नाहीत, चंद्रशेखर मुनगंटीवार यांनी फोन करून वैयक्तिक कारणामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीवर स्पष्टीकरण दिले.
नाशिकमध्ये एस टी महामंडळाच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणावर हातोडा चालवला आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एस टी महामंडळाची महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात आली. अतिक्रमण कारवाईदरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.
जालनात जन आक्रोश मोर्चा समारोप प्रसंगी सभास्थळी ज्योती मेटे, माजी आमदार संतोष सांबरे, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आसाराम बोराडे, आमदार अर्जुन खोतकर यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर उपस्थित आहे.
चंद्रपूर जिल्ह्याला कोणी वाली नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. आपण चंद्रपूर जिल्ह्यास सर्वच जण वाली आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज चौकापासून निघालेला जन आक्रोश मोर्चा अंबड चौफुली येथे दाखल झाला आहे. या मोर्च्यात देशमुख कुटुंबीय, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील,दीपक केदार यांच्यासह समाज बांधव मोर्चा मध्ये सहभागी झालेले आहे
बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या आजाराचा शोध घेण्यासाठी अकोला मेडिकल कॉलेजसह बुलढाणा येथील आरोग्य विभागाच्या टीम बोंडगाव येथे मध्ये दाखल झाले आहेत. त्यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यायाचे पथक ही दाखल झाले आहे. नागरिकाचे या ठिकाणी केसांचे, स्किनचे तसेच रक्ताचे नमुने ही घेतले जात आहेत. या ठिकाणी रुग्णाची संख्या एकदम 50 वरून 100 झालीय आणि याचे लोन आता 11 गावात पोहोचले आहे
संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी समाज आमच्या पाठीशी उभा राहिला आहे आरोपींना तात्काळ अटक करून फाशी शिक्षा देण्यात यावी. आरोपीचा मोबाईल पोलिसांना सापडत नाही, तो पोलिसांनी शोधला पाहिजे, अशी मागणी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली.
“आरोपी जो आहे तो कमी वयाचा आहे. घाबरून कुठेतरी बसला असावा. बाकी आरोपी पकडले गेले आहेत. जो फरार आहे तो पण पकडला जाईल. विष्णु चाटे पोलीस तपासात मदत करतो की नाही हे माहित नाही. वेळ पडली तर हे प्रकरण नार्को टेस्ट पर्यंत जाईल. अजित दादांच्या कोडांवळ्यामुळे निर्णय घेता येत नाही. धनजंय मुंडेंनी पदावर राहु नये, तपासावर प्रभाव होईल,” असं सुरेश धस म्हणाले.
“लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया अलायन्स जिवंत ठेवण्याची काँग्रेसची जबाबदारी होती. काँग्रेसने बैठक घ्यायला हवी होती. त्यांनी पुढचं मार्गदर्शन करायला हवं होतं. पण एकही बैठक घेतली नाही. इंडिया अलायन्सचं अस्तित्व राहिलं नाही, असं लोकांना वाटत असेल तर ही काँग्रेसची जबाबदारी आहे. इंडिया अलायन्समध्ये संवाद राहिलेला नाही,” असं संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात राज्यातील एकोणीस महत्त्वकांशी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीमध्ये तुळजापूर मंदिर विकास आराखडा मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात यावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे तुळजाभवानी विकास आराखड्याची काम लवकर मार्गी लागणार असल्याचं दिसत आहे.
“मला वाटतं वस्तुस्थितीवर गेलं पाहिजे. धनंजय मुंडे यांचा डायरेक्टली किंवा इनडायरेक्ट संबंध तपासामध्ये येत नाहीत. ज्या दिवशी ते तपासात येतील त्या दिवशी आम्ही कोणालाही सोडणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तपास मजबूत आहे. आरोपी कोर्टातून सुटणार नाही यासाठी सरकार काम करत आहे. योग्य तपास सुरू आहे. राजीनामामध्ये कोणाचा कस काढायचा नाही,” असं बावनकुळे बीड प्रकरणावर म्हणाले.
“बीड हत्या प्रकरणात राजकारण व्हायला नको. आरोपींवर कारवाई होईपर्यंत सर्वांनी एकत्र राहायला हवं. विरोधकांनी पराभवावर अभ्यास करायला हवा. कालपर्यंत विरोधक ईव्हीएमला दोष द्यायचे. मविआ आता वस्तुस्थितीवर लक्ष देतंय हे चांगलं आहे,” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडतील जागा वाटपातील घोळावर त्यांनी तोंडसूख घेतले. नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यावर त्यांनी टीका केली. तर दुसरीकडे आता संजय राऊत यांनी सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी धाराशिवकर रस्त्यावर उतरणार आहे.धाराशिवमध्ये ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जन आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे. जिल्हाभरातील नागरीक रस्त्यावर उतरणार.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार असे वाटत नाही, त्यांच्यावर निलंबनाची कुठची कारवाई अजित पवार करतील, असे वाटत नसल्याचे वक्तव्य अंजली दमानिया यांनी केले आहे.
शरद पवार महाविकास आघाडीच्या नेत्यावर नाराज असल्याचे समजते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेविषयी नियोजन होत नसल्याचे समोर आले आहे.
महाविकास आघाडीच्या हातून राज्य जाणे ही मोठी दुर्घटना आहे. विधानसभेला जागा वाटपाची चर्चा लांबल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. त्यांनी यावेळी काँग्रेसवर निशाणा साधला.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील खंडणीप्रकरणात मोठा पुरावा तपास यंत्रणेच्या हाती लागला आहे. एक फोन कॉलने मोठा क्ल्यू पोलिसांच्या हाती लागला आहे. आवाजाचा नमुना तपासण्यात येणारे आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय खोलात आहे.
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने राजकीयच नाही तर फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला होता. आता पोलिसांच्या तपासावरच त्यांचा मुलगा, माजी आमदार झिशान सिद्दीकी याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पश्चिम रेल्वेच्या डहाणू आणि घोलवड रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे शेड्युल खोळंबलं. सकाळी सात वाजेच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याने मेल आणि एक्सप्रेस गाड्याचे वेळापत्रक बदलल. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांना सहन करावा लागतोय मोठा त्रास. दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती.
“काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही, ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही” खासदार अमोल कोल्हेंची मविआतील मित्र पक्षांवर टीका. ‘अमोल कोल्हेंनी स्वत:च्या पक्षाकडे लक्ष द्यावं’, विजय वडेट्टीवारांचा खोचक सल्ला
मुंबई महापालिकेकडून राज्य सरकारच्या विविध खात्यांना पाणीपुरवठ्याबरोबरच विविध सुविधा पुरविण्यात येतात. त्याचबरोबर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या खर्चापोटी राज्य सरकारकडून महापालिकेला सहाय्यक अनुदान देण्यात येते. मात्र शिक्षणाच्या खर्चासाठी सहाय्यक अनुदान, पाणीपट्टी आणि मालमत्ता कराचा राज्य सरकारच्या विविध खात्यांनी गेल्या वर्षभरात महापालिकेच्या तिजोरीत भरणाच केलेला नाही.
मालवणी पोलिसांनी एका बंगाली व्यक्तीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी मायाराणी सिंग, निमय सिंग, बापी सिंग आणि लोचन सिंग या चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्या व्यक्तीच्या पत्नीने सांगितले की, चौघांनी जोगन हंसदा यांना नोकरीच्या ऑफरसह 10 ऑक्टोबर रोजी शहरात आणले. 19 ऑक्टोबर रोजी मायाराणीने, हंसदाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तिने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला, ज्यांनी नंतर प्रकरण मुंबईला वर्ग केले.
एकता कपूर यांच्या नावाने चालवण्यात येणाऱ्या ॲक्टिंग इन्स्टिट्यूटची मनसेने पोलखोल केली आहे. अंधेरी भागात एकता कपूरच्या नावाने इन्स्टिट्यूट चालवल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. एवढेच नाही तर या इन्स्टिट्यूट मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार न दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
ICE नावाची इन्स्टिट्यूट तुमची नसेल तर त्यावर कारवाई करा, अशी मागणी मनसेने एकता कपूर यांच्याकडे केली आहे. आणि जर ते तुमचे असेल तर कर्मचाऱ्यांना पगार द्या, असे सांगण्यात आले आहे.
गोरेगावमध्ये एका शाळेत 16 वर्षीय विद्यार्थिनीने टॉयलेटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही विद्यार्थिनी मागील काही दिवसापासून डिप्रेशनमध्ये होती अशी माहिती समर आली आहे. तिने शू लेसचा वापर करत गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसानी अपघाती मृत्यूची नोंद करत तपासाला सुरुवात केली आहे.
बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 31 दिवस उलटले आहेत. हत्या आणि खंडणी प्रकरणात अटकेत असलेला आरोपी विष्णू चाटेची आज दुपारी एक वाजता केज न्यायालयात सुनावणी होणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात उद्धव ठाकरे शिवसेनेला धक्का बसला आहे. युवा सेनेच्या विभागीय सचिवाने स्थानिक गटबाजीला कंटाळून राजीनामा दिला आहे.
युवा सेना विभागीय सचिव तथा युवा सेना जिल्हाध्यक्ष अक्षय ढोबळे यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेतील स्थानिक गटबाजीला कंटाळून राजीनामा दिला आहे. अक्षय ढोबळे अनेक वर्षापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी होते तसेच ते वरूण सरदेसाई यांचे निकटवर्तीय होते.
संतोष देशमुख हत्याप्रकरण : न्याय मिळवण्यासाठी आज जालन्यात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. स्वर्गीय संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख यांच्यासह भाजप आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे देखील या मोर्चात उपस्थित राहणार आहेत. 200 कर्मचारी आणि 15 अधिकारी यांच्यासह पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज संभाजी महाराज चौक ते अंबड चौफुली पर्यंत रस्ता बंद राहणार.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात न्याय मिळवण्यासाठी आज जालन्यात जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. देशमुख कुटुंबियांसह मनोज जरांगेही मोर्चात सहभागी होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची पाहणी करणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती देणार आहेत. बाप-लेक शब्दाचा वापर आयुष्यात कधीच केला नाही ,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे आज पत्रकार परिषद घेणार असून ते आज काय खुलासा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टोरेस घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने काल 6 ठिकाणी छापेमारी केली. टोरेसची सर्व कार्यालये तसेच संचालक बोर्डवरील आरोपीच्या घरी सर्च ऑपरेश करण्यात आले. यासह राज्यातील, तसेच देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, तसेच क्रीडा , मनोरंजन, क्राईमच्या बातम्या वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.