Maharashtra Breaking News LIVE 9 January 2025 : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतची याचिका फेटाळली

| Updated on: Jan 09, 2025 | 4:57 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 9 जानेवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 9 January 2025 : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतची याचिका फेटाळली
महत्वाची बातमी
Image Credit source: tv9
Follow us on

LIVE NEWS & UPDATES

  • 09 Jan 2025 04:57 PM (IST)

    नंदूरबारमध्ये वृध्द महिलेवर बिबट्याचा हल्ला

    नंदुरबार : तळोदा तालुक्यातील खुर्चीमाड गावात एका ८० वर्षीय वृध्द महिलेवर बिबट्याने हल्ला केला आहे. घराबाहेर निघालेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. हल्ला करत ५०० मीटरवर फरफटत नेलं. या महिलेचा यात मृत्यू झाला असून तिचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला. या हल्ल्यात महिला जागीच ठार झाली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचे हल्ल्याचे प्रमाण अधिक वाढले असल्याने वन विभागाकडून पाहिजे तशी उपाययोजना होत नाहीत, असा आरोप होत आहे.

  • 09 Jan 2025 04:25 PM (IST)

    नवी मुबंईतील खारघरमध्ये बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

    नवी मुंबई – रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास बिबट्या सुरक्षा रक्षक यांना दिसला त्यांना पळ काढला. दुसऱ्या दिवशी cctv तपासले असता बिबट्या दिसला. त्यामुळे तेथील ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीच वातावरण निर्माण झालं. सध्या या ठिकाणी कोणाला जाण्यास परवानगी नाही आहे. फक्त येथील ग्रामस्थ जातात. परंतु ते आपल्या वाहनांनी प्रवास करत आहेत. सध्या या ठिकाणी वनविभाग अधिकाऱ्यांकडून खबरदारी घ्या, असे बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच पिंजरा लावण्यात आला आहे. तसेच या डोंगरावर वाघोबा मंदिर देखील आहेत. त्या ठिकाणी पर्यटकांसाठी आता बंदी करण्यात आलेली आहे.


  • 09 Jan 2025 04:11 PM (IST)

    गोंदियातील शेतकऱ्यांची 392 कोटी रुपयांच्या निधीसाठी पायपीट

    गोंदिया – 60 हजार शेतकऱ्यांची 392 कोटी रुपयांच्या निधीसाठी पायपीट सुरु आहे. गेल्या दीड महिन्यापासून शासनाकडून निधी मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांना केली आहे. ऐन रब्बी हंगामात आर्थिक कोंडी पाहायला मिळत आहे. लाडकी बहिणीसाठी पैसे आहेत,  शेतकऱ्यांसाठी नाही का ? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.  लवकरात लवकर शासनाने निधी द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

  • 09 Jan 2025 03:49 PM (IST)

    चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपतीमध्ये काल रात्री झालेल्या चेंगराचेंगरीची पाहणी केली

    आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काल रात्री तिरुपतीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीची पाहणी केली. ज्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आणि 40 जण जखमी झाले आहेत.

  • 09 Jan 2025 03:28 PM (IST)

    पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी भिवंडीत कामांचा घेतला आढावा

    पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भिवंडीतील कामांचा आढावा घेतला. ग्रामपंचायतीत हद्दीत सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतला. हर घर जल, हर घर नल योजना पूर्ण करण्याकरता सरकार कटीबद्ध असल्याचं सांगितलं.


  • 09 Jan 2025 03:11 PM (IST)

    राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतची याचिका फेटाळली

    राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतची याचिका हायकोर्टाने फेटाळली. मुख्य न्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी याचिका फेटाळली आहे. ठाकरे गटाचे कोल्हापूर शहराध्यक्ष सुनील मोदींची ही याचिका फेटाळली आहे.

  • 09 Jan 2025 03:03 PM (IST)

    भाजप मुख्यालयात संध्याकाळी 5 वाजता भाजपची महत्त्वाची बैठक

    दिल्लीतील भाजप मुख्यालयात आज सायंकाळी 5 वाजता भाजपची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत निवडणूक प्रचाराच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे.

  • 09 Jan 2025 02:37 PM (IST)

    एकही आरोपी सुटला तर गाठ आमच्याशी, जरांगे पाटील यांचं सरकारला थेट इशारा

    मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला बीड प्रकरणी थेट इशारा दिला आहे. न्याय मिळेपर्यंत एकाही बांधवाने मागे हटायचं नाही. एकही आरोपी सुटला तर सरकारची गाठ आमच्याशी आहे, असं जरांगे पाटील म्हणाले. छत्रपती संभाजीनगरमधील पैठण येथील आक्रोश मोर्च्यात जरांगे पाटील बोलत होते.

  • 09 Jan 2025 02:33 PM (IST)

    काही प्रीपेड कार्ड पुढारी आहेत जे रिचार्ज मारलं की सुरू होतात : सुरेश धस

    संभाजी नगर मधील जलील खान याची हत्या झाली. 45 लाखाच प्रकरण मिटवलं. मरण इतकं स्वस्त झालं आहे का? तुम्हाला 45 लाखांत मारायचं असेल तर परळीमधील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वताला बदडून घेता. काही प्रीपेड कार्ड पुढारी आहे रिचार्ज मारलं की सुरू होतात, असं म्हणत सुरेश धस यांनी हाके यांना नाव न घेता टोला लगावला.

  • 09 Jan 2025 02:30 PM (IST)

    आका 302 मध्ये जाऊ द्या, सर्व बाहेर येईल : सुरेश धस

    परळीत एका वर्षात 109 मृतदेह सापडले. अनेक मृतदेहांची ओळखही पटलेली नाही. आका 100 टक्के 302 चा आरोपी आहे. तसेच आका 302 मध्ये जाऊ द्या, सर्व बाहेर येईल, असं सुरेश धस म्हणाले. सुरेश धस पैठणमधील आक्रोश मोर्च्यात बोलत होते.

  • 09 Jan 2025 01:58 PM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये निषेध मोर्चा

    बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवडमध्ये निगडी येथील तहसील कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील मराठा क्रांती मोर्चा पुरोगामी पक्ष संघटना आंबेडकरवादी संघटना यांचा समावेश होता.

  • 09 Jan 2025 01:36 PM (IST)

    वाल्मिक कराडवर ई़डी कारवाई का नाही? सुप्रिया सुळे

    वाल्मिक कराडचा विषय राजकीय नाही. तो सामाजिक विषय आहे. अवधा कंपनीने हा गुन्हा दाखल केला आहे. गुंतवणूकदारांनी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांच्यावर ईडी आणि पीएमएलएची कारवाई का नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे…सविस्तर वाचा

  • 09 Jan 2025 01:25 PM (IST)

    वांद्रे भारतनगरमध्ये अतिक्रम विरोधात कारवाई

    वांद्रे भारतनगरमध्ये अतिक्रमण कारवाई केली जात आहे. त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाने विरोध केला आहे. त्यासाठी आदित्य ठाकरे त्या ठिकाणी पोहचले आहे.

  • 09 Jan 2025 01:09 PM (IST)

    बर्डफ्लूच्या दहशत, वाघांच्या आहात चिकन बंद

    नागपूर महाराजबाग प्राणीसंग्रहालयातील ‘ली’ वाघिन आणि नर वाघ यांच्या आहारात देण्यात येणारे चिकन बंद करण्यात आहे. बर्डफ्लूच्या दहशतीमुळे प्राणीसंग्रहालयातील वाघांच्या आहातील चिकन पूर्णपणे बंद केले आहे. वाघांसोबतंच बिबट्यांनाही चिकनचा आहार पूर्णपणे बंद केला आहे. नागपूरातील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये बर्ड फ्लूमुळे तीन वाघ आणि एका बिबट्यांचा मृत्यू झाला होता.

  • 09 Jan 2025 12:01 PM (IST)

    डोंबिवली प्रीमियर रुणवाल गार्डनजवळ नवी मुंबईच्या इलेक्ट्रिक मिनी बसला आग

    डोंबिवली प्रीमियर रुणवाल गार्डनजवळ नवी मुंबईच्या इलेक्ट्रिक मिनी बसला आग लागली. अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये धावपळ झाली. मात्र वेळेवर बस थांबवल्याने आणि बस चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. रस्त्यावर येणाऱ्या पाण्याच्या टँकरने आग नियंत्रणात आणली.

  • 09 Jan 2025 11:50 AM (IST)

    बीडमधील लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष वाल्मिक कराडच

    वाल्मिक कराडसंदर्भात आणखी एक माहिती समोर आली आहे. बीडमधील लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष वाल्मिक कराडच असल्याचं कळतंय. खंडणीच्या गुन्ह्यातत शर आलेल्या वाल्मिक कराडचं पद अजूनही कायम आहे. धनंजय मुंडेंनीच वाल्मिकची अध्यक्ष म्हणून शिफारस केली होती. वाल्मिक कराडवर 14 गुन्हे दाखल असूनही पद दिल्याचा आरोप आहे.

  • 09 Jan 2025 11:40 AM (IST)

    मुंबई- वांद्र्यात ठाकरे गटाकडून आंदोलन

    मुंबई- वांद्र्यात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे. वरुण सरदेसाईंसह ठाकरे गटातील इतर नेतेही आंदोलनाला उपस्थित आहेत. भारतनगरमध्ये असलेलं अनधिकृत बांधकाम एसआरए पाडणार असून एसआरएच्या कारवाईला ठाकरे गटाकडून विरोध करण्यात येतंय.

  • 09 Jan 2025 11:30 AM (IST)

    शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आणि इतर पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश

    शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आणि इतर पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. ठाणे, भिवंडी, शहापूर,पालघरमधील जिल्हा प्रमुख, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य,पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात संध्याकाळी साडेचार वाजता पक्ष प्रवेश होणार आहे. यावेळी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

  • 09 Jan 2025 11:20 AM (IST)

    बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकरणात मोठी अपडेट समोर

    बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगावातील आणि खातखेड येथील पाण्यात नायट्रेटसारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. तर पाण्याची टीडीएस लेव्हलही भयंकर वाढली असल्याचं या पाण्याच्या तपासणीत उघड झालंय. गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं विष ठरतंय. खारपाण पट्ट्यातील या गावात पिण्याची पाण्याची वेगळी सोय केलेली आहे, मात्र वापरण्याच्या पाण्यात नाइट्रेटसारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्याने हे पाणी वापरण्यायोग्य देखील नसल्याचं धक्कादायक वात्सव समोर आल आहे.

  • 09 Jan 2025 11:10 AM (IST)

    बीड: खंडणीतील आरोपी वाल्मिक कराड आजारी

    बीड: खंडणीतील आरोपी वाल्मिक कराड आजारी असून त्याच्या डोळ्याला संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे. वाल्मिकच्या डोळ्यांवर उपचार सुरू आहेत. गेल्या नऊ दिवसांपासून वाल्मिक बीडच्या सीआयडी कोठडीत आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याच्यावर उपचार केले जात आहेत.

  • 09 Jan 2025 10:58 AM (IST)

    अहिल्यानगर जिल्ह्यातील 1316 ग्रामपंचायत बंद

    सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्याप्रकरणी राज्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्यांनी बंद पुकारला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 1316 ग्रामपंचायतींनी बंदमध्ये सहभाग घेतला.

  • 09 Jan 2025 10:50 AM (IST)

    २३ वर्षे वयाचा एक पोऱ्या पोलिसांवर भारी

    सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना उलटला तरी केवळ २३ वर्षे वयाचा एक पोऱ्या, कृष्णा आंधळे हा सहावा आरोपी पोलिसांच्या हाती तुरी देतोय, असे वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं आहे.

  • 09 Jan 2025 10:40 AM (IST)

    तर वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ

    मस्साजोग येथील पवनचक्की खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड शरण आला आहे. वाल्मीक कराड सध्या नऊ दिवसांपासून सीआयडीच्या कोठडीत आहे. CID कडून आज त्याची व्हॉईस सॅम्पल घेण्याची शक्यता आहे. व्हाईस सॅम्पल जुळल्या नंतर वाल्मीक कराड याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

  • 09 Jan 2025 10:30 AM (IST)

    राज्यात सगळ्याच माफियांना अभय-संजय राऊत

    महाराष्ट्रात सर्वच माफियांना अभय आहे, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी घातला. संतोष देशमुख यांचा खून हे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला.

  • 09 Jan 2025 10:15 AM (IST)

    यापेक्षा धक्कादायक काय असू शकतं? – अंजली दमानिया

    मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना परळीच्या अध्यक्षपदी जर वाल्मीक कराड सारखी माणस असली तर काय बोलावं आणि हसावं का रडावा हेच कळते म्हणजे एक व्यक्ती ज्याच्यावर 14 एफ आय आर आहेत 23 सेक्शन लागलेत आणि तेही अनेक वेळा असे जे 45 सेक्शन लागलेल्या व्यक्तीवर व्यक्तीला जर अध्यक्ष बनवलं आणि ते पण मुख्यमंत्री लाडकी बहिणी वजनेच आणि त्याची शिफारस पण आहे ते धनंजय मुंडे यांनी केली असेल त्याच्यापेक्षा धक्कादायक आणि दुसरे तिसरे काहीच नाही होऊ शकतं, अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली.

  • 09 Jan 2025 10:07 AM (IST)

    वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष

    लाडकी बहीण योजना समितीचा अध्यक्ष असल्याचे समोर आले आहे. खंडणीच्या गुन्ह्यात शरण आलेल्या वाल्मीकचे या योजनेचे अध्यक्ष पद कायम असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तो परळी येथील लाडकी बहीण योजना समितीच्या पदावर अजूनही कायम आहे.

  • 09 Jan 2025 09:58 AM (IST)

    कारमध्ये गॅस भरताना स्फोट, तीन जण गंभीर जखमी तर एका शेळीचा मृत्यू

    कारमध्ये गॅस भरताना स्फोट झाल्याने सिल्लोडमध्ये तीन जण गंभीर जखमी तर एका शेळीचा मृत्यू. सिल्लोडच्या आझादनगर भागात कारमध्ये गॅस भरताना, गॅस किटमध्ये क्षमतेपेक्षा अधिक गॅस भरल्याने भीषण स्फोट झाला. या स्फोटात गॅस भरणारे पिता-पुत्र आणि अन्य एक मुलगा गंभीर जखमी झाला. कारच्या बाजूला बांधलेल्या शेळीचा या स्फोटात मृत्यू झाला.

  • 09 Jan 2025 09:50 AM (IST)

    सुजय विखे पाटील घेणार अमित शाह यांची भेट

    भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील घेणार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट. दिल्लीतील शाह यांच्या निवासस्थानी आज होणार भेट. 12 जानेवारीला शिर्डीत होणाऱ्या भाजपच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने भेटत चर्चा होणार. काही दिवसांपूर्वी सुजय विखे यांनी भिकाऱ्यांबद्दल केलेल्या विधानानंतर होणार भेटीला महत्व.

  • 09 Jan 2025 09:32 AM (IST)

    विद्यार्थी विषबाधा प्रकरण मुख्याध्यापक निलंबित

    अमरावतीच्या अडगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात शाळेचे मुख्याध्यापक दिनेश भागवत यांना निलंबित करण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी अरविंद माहूरे यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली. शाळेतील मदतनीस व स्वयंपाकी देखील कारवाईच्या रडारवर.

  • 09 Jan 2025 09:21 AM (IST)

    धारावीपासून माहीमकडे जाणाऱ्या पुलाचे काम जेमतेम पूर्ण

    धारावीपासून माहीमकडे जाणाऱ्या पुलाचे काम जेमतेम पूर्ण. मात्र मिठी नदीवर छोट्या पुलाचे काम रखडल्याने मोठ्या पुलाचं उद्घाटन रखडलं. एमएमआरडीएला मीठी नदीवर पूल तयार करायला 6 महिन्याचा वेळ लागणार असल्याची माहीती. कलानगर जंक्शनजवळील अत्यंत महत्वाचा असा हा पूल मानला जातो. मात्र नियोजनाच्या अभावामुळे हे काम रखडल्याची प्राथमिक माहिती.

  • 09 Jan 2025 09:01 AM (IST)

    गडचिरोली व छत्तीसगड पोलिसांकडून गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागात नक्षलविरोधी ऑपरेशन सुरू

    गडचिरोली व छत्तीसगड पोलिसांकडून गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागात नक्षलविरोधी ऑपरेशन सुरू आहे. गडचिरोली जिल्हा मुख्यालयात काल दोन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं होतं.  दोन दिवसा अगोदर छत्तीसगड राज्यात एक भूसुरूंग स्फोटामुळे ९ जवान शहीद झाले होते. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आज पहाटेपासून जंगल सीमावर्ती भागात नक्षलविरोधी अभियान सुरू आहे. महाराष्ट्र व छत्तीसगड पोलीस मिळून हे ऑपरेशन राबवण्यात येत आहे.

  • 09 Jan 2025 08:44 AM (IST)

    नाशिक मध्ये तापमानाचा पारा पुन्हा घसरला, नाशिक मध्ये आज 10अंश तापमानाची नोंद

    नाशिक मध्ये तापमानाचा पारा पुन्हा घसरला,  अवघ्या 24 तासात पारा दोन अंशांनी खाली आला आहे. काल तापमान 12 अंशांपर्यंत होतं, मात्र आज नाशिक मध्ये आज 10 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.  तर निफाड मध्ये पारा 6.8 अंशापर्यंत खाली घसरला. उत्तर भारतातील थंडीच्या लाटे मुळे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र देखील गारठले.

  • 09 Jan 2025 08:29 AM (IST)

    मस्साजोग येथील पवनचक्की खंडणी प्रकरण : CID आज वाल्मीक कराडचे व्हॉईस सॅम्पल घेण्याची शक्यता

    बीड: मस्साजोग येथील पवनचक्की खंडणी प्रकरण प्रकरणात आरोपी वाल्मीक कराड शरण आला असून गेल्या 9 दिवसापासून तो CID च्या कोठडीत आहे. आज CID कडून त्याचे व्हॉईस सॅम्पल घेतले जाण्याची शक्यता आहे. व्हाईस सॅम्पल जुळल्या नंतर वाल्मीक कराडच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

  • 09 Jan 2025 08:19 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर

    उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत आज साखर संकुल येथे आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलही उपस्थित राहणार आहेत.

  • 09 Jan 2025 08:17 AM (IST)

    कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी तीन दिग्गजांमध्ये रस्सीखेच सुरू

    कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी तीन दिग्गजांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर तर पुणे कोथरूडचे आमदार आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत.

कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी तीन दिग्गजांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. मात्र जिल्ह्याचा पालकमंत्री पदावर जिल्ह्याचे तिघे सुपुत्र इच्छुक आहेत. शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर तर पुणे कोथरूडचे आमदार आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत.  उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत आज साखर संकुल येथे आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. टोरेस कंपनी फसवणूक प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात थंडीची लाट पसरली असून पुन्हा गारठा वाढला आहे. शहरी भागात तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली तर सातपुडा पर्वत रांगेत तापमान 8° अंश सेल्सिअस इतके आहे. सप्तशृंगी गड घाट रस्ता उद्यापासून भाविकांसाठी पूर्ववत होणार. सप्तशृंगी गड ते नांदुरी घाट दरड प्रतिबंधक जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. दरड कोसळणे मोठे दगड पडून रस्ता बंद होणे यासारख्या घटना होत असल्याने रॉकफॉल प्रोटेक्शन लावण्यात आलं. शुक्रवारपासून भाविकांना 24 तास कधीही या रस्त्यावरून प्रवास करता येणार . यासह राज्यातील, तसेच देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, तसेच क्रीडा , मनोरंजन, क्राईमच्या बातम्या वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.