Maharashtra Breaking News LIVE : ऐन गणेशोत्सवात राज्य परिवहन (एसटी) कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे. एसटी कर्मचारी संघटनेने कालपासून राज्यभर बेमुदत आंदोलनाची हाक दिली आहे. आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा, असा इशारा एसटी कर्मचारी संघटनेने दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. तर दुसरीकडे मराठवाडा-विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाच जिल्ह्यांची ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे पाहणी करणार आहेत. त्यासोबतच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप अखेर मागे घेतली आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात साडेसहा हजारांची वाढ केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचं एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी स्वागत केलं आहे.
एसटी महामंडळ संप प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय एस चहल, अपर मुख्य सचिव विकास खारगे, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सुमारे २६ एस टी कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.
नवी दिल्ली : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रता प्रकरणी उद्या होणारी सुनावणी टळली आहे. आता या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार नाही, अशी माहिती समोर येत आहे.
जम्मू-काश्मीरमधील रामबन येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, “पहिल्यांदाच एखाद्या राज्याला केंद्रशासित प्रदेश बनवून लोकांचे हक्क हिरावले गेले. सर्वप्रथम, जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा परत करावा लागेल कारण केवळ तुमचे राज्यच हिरावून घेतले जात नाही, तुमचे हक्क, तुमची संपत्ती, सर्व काही हिरावून घेतले जात आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट केले की, वायनाडमधील आमच्या बंधू-भगिनींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यावर मात करण्यासाठी त्यांना आमच्या पाठिंब्याची गरज आहे. मी माझा संपूर्ण महिन्याचा पगार बाधित लोकांसाठी मदत आणि पुनर्वसन प्रयत्नांसाठी देत आहे.
प्रयागराजमध्ये आज प्रशासनाने बनावट नोटा छापलेल्या मदरशाला सील केले आहे. मदरशात बनावट नोटा छापण्यासाठी मशीनसोबतच काही आक्षेपार्ह पुस्तकेही सापडली आहेत.
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजमध्ये म्हटले आहे की, काही लोकांना जातीच्या नावावर भांडण करायचे आहे. आज टिपू पुन्हा सुलतान होण्याचे स्वप्न पाहत आहे. हाच टिपू माफियांसमोर नाक मुठीत धरून उभा असायचा. नाक घासून ते प्रयागराजची ओळख धोक्यात घालायचे. त्याला फक्त आपल्या खुर्चीची काळजी होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमधील उदगीर तालुक्यातील हेर आणि लोहारा शिवारात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. यावेळेस केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते.
कांग्रेस नेते आबा बागुल यांनी पर्वती मतदारसंघावर दावा केला आहे. पर्वतीमधून आबा बागुल लढण्यास इच्छुक आहेत. कार्यकर्त्यांनी सारसबाग चौकात बॅनर लावले आहेत. ‘जनतेच्या मनातील भावी आमदार आबांचे कार्य दमदार’ अशा आशयाचे बॅनर लागलेले पाहायला मिळत आहेत. कांग्रेस आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे आता शरद पवार गट ही जागा सोडणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
परभणीच्या पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथे आदित्य ठाकरे,ठाकरे गटाचे संजय राऊत आणि अंबादास दानवे दाखल झाले आहेत. बोरगव्हाण येथे अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालंय. या नुकसानाची कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काही वेळापूर्वी या ठिकाणी पाहणी केली.त्यानंतर आता आदित्य ठाकरे संजय राऊत अंबादास दानवे पाहणी करतायत.
धुळ्यात एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने दुसऱ्या दिवशीही बंद कायम आहे. या बंदमुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. तसेच या बंदमुळे आर्थिक नुकसानही होत आहे. या बंदमुळे धुळे परिवहन विभागातील एकूण 9 डेपोंमधील 1 हजार 948 फेऱ्यांपैकी 1 हजार 764 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे धुळे परिवहन विभागाला तब्बल 3 कोटी 80 लाख रुपयांचे नुकसान झालं आहे.
मुंबई- गोवा महामार्ग रस्ता खराब असल्याने चाकरमान्यांकडून पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचा प्रयत्न मात्र पर्यायी रस्त्यावर सुद्धा मोठ मोठे खड्डे पडले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 6 आणि 7 सप्टेंबर रोजी जम्मू-कश्मीर दौऱ्यावर असून विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे जाहीरनामे जाहीर करतील. तसेच 7 सप्टेंबर रोजी ते जम्मूत कार्यकर्ता संमेलनात सहभागी होणार आहेत.
लाडकी बहीण योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद असल्याचे भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
आता नकारात्मक रहायचं नाही निवडणुकीला ५० ते ६० दिवस राहिले आहेत. लाडकी बहीण योजना ही आपल्याला अमृतासारखी ठरलेली आहे.
यामध्ये जे मला करायचं होतं तेवढ मी केलेला आहे आता वरिष्ठांचा निर्णय आहे त्यानुसार ते दोघ ठरवतील काय करायचे ते. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोघांनी एकत्र यावे अशी इच्छा भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पुन्हा बोलून दाखवली आहे.
नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र विभागाचे प्रवासी कार्यकर्ता बैठकीचे आयोजन. गुजरातमधील भाजपचे 48 आजी – माजी आमदार आजी – माजी महापौर उपमहापौर पदाधिकारी घेणार आढावा
लासलगाव- कांद्याच्या बाजारभावात 700 रुपयांची घसरण झाली आहे. नाफेड एनसीसीएफचा कांदा खुल्या बाजारात उपलब्ध केल्याने कांद्याचे बाजार भाव कोसळले आहेत. आणखी बाजारभाव कोसळणीच्या भीतीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. कांद्याला जास्तीतजास्त 4001 रुपये, कमीतकमी 1500 रुपये तर सरासरी 3900 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये आहेत. आज संध्याकाळी साडेसात वाजता सह्याद्री अतिथी गृह इथं अधिकारी आणि एसटी कर्मचाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त वेतन देण्यात येईल, अशी सूत्रांची माहिती आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुटावा यासाठी मुख्यमंत्री यांची आग्रही भूमिका असल्याची सूत्रांची माहिती आहे.
‘इमर्जन्सी’ चित्रपटाची सह-निर्माती कंपनी झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायझेसने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अभिनेत्री कंगना राणौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आणि सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्रासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
सेन्सॉर बोर्डाने मनमानी आणि बेकायदेशीरपणे चित्रपटाचे सेन्सॉर प्रमाणपत्र रोखून धरले आहे, असा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. हे दोघं काँग्रेस पक्षाकडून हरयाणा विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठवाड्यातील 90 टक्के भागात अतिवृष्टी झाली आहे. सरकार शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणार असं गिरीश महाजन म्हणाले.
पंचनाम्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केलं.
विधानसभेत कोणालाही पाठिंबा देणार नाही, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. लोकसभेत काँग्रेसने फोन केला होता, त्यामुळे पाठिंबा दिला होता, पण विधानसभेत कोणालाही पाठिंबा देणार नाही.
पूजा खेडकरचं अपंगत्व प्रमाणपत्र बनावट आहे, असं दिल्ली पोलिसांकडून मान्य करण्यात आल आहे. दिल्ली पोलिसांनी हायकोर्टात स्टेटस रिपोर्ट दाखल केला आहे.
अभिनेत्री कंगना रनौत यांच्या इमर्जन्सी चित्रपटला सेन्सॉर सर्टिफिकेट नाकारल्या प्रकरणी झी स्टुडिओने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
सेन्सॉर सर्टिफिकेट देण्याचे आदेश देण्याची मागणी करणारी याचिका असून न्यायाधीश कुलाबावाला यांच्यासमोर सुनावणी सुरू.
भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आणि दीर शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यात चिंचवड विधानसभेवरून समझोता झाला. गेल्या पोटनिवडणुकीपासून दीर-भावजय यांच्यात सुरू असलेल्या वादावर पडदा पडला. चिंचवड विधानसभा मतदारसंघ त्याचबरोबर भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा.
नंदुरबार- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस असून जिल्ह्यातील बस सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पंधराशेपेक्षा अधिक बस फेऱ्या रद्द झाल्या आहेत. संपामुळे महामंडळाला आर्थिक फटका बसतोय. बस नसल्यामुळे खाजगी वाहनदाराकडून प्रवाशांची लूट होतेय. अव्वाचे सव्वा भाडा आकारत असल्याने प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे.
राहुल गांधी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. उद्या 5 सप्टेंबर रोजी सकाळी दिल्लीवरून ते थेट नांदेड येथे जाणार. नांदेड येथे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतील. नांदेड येथून ते थेट कोल्हापूरला विमानाने जातील.
जळगावात सेवानिवृत्त पारिचारिकेचा खून करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या दोघा कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून अटक. जळगावच्या खोटेनगर येथील रहिवाशी असलेल्या स्नेहलता अनंत चुंबळे या साठ वर्षीय खून झालेल्या वृद्ध सेवानिवृत्त पारिचारिकेच नाव आहे. जिजाबराव अभिमन्यू पाटील व विजय रंगराव निकम अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची नावं आहेत.
भारतीय जनता पक्षाची राज्यातील परिस्थिती सुधारली असल्याचा दावा. लोकसभेच्या तुलनेत सद्य विधानसभेसाठी पक्षाची परिस्थिती सुधारली. गेल्या दोन महिन्यांपासून केंद्रीय नेतृत्व राज्यातील परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करत आहे. पक्षांतर्गत गटाचे राजकारण संपवल्याचा केंद्रीय नेतृत्वाला विश्वास. दिल्लीतल्या एका केंद्रीय नेत्याची टीव्ही 9 ला माहिती.
बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेच्या मोबाईलचा तपास करण्यासाठी विशेष न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर. बदलापूर येथील मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अक्षय शिंदेच्या मोबाईलचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाने (SIT) पुन्हा त्याची दोन दिवसांची पोलीस कोठडी घेतली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा दुसरा दिवस… ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संप… एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल… एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत आज मुख्यमंत्र्यांची बैठक…
बदलापूर प्रकरणातील आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यात अटक… दुसऱ्या पॉक्सो गुन्ह्यात अक्षय शिंदेला 2 दिवसांची पोलीस कोठडी…
देवरुख मधील पंच जोशी यांच्या चौसूपी वाड्यातील अश्वारुढ गणराची देखणी मुर्ती लक्षवेधी… पारंपारीक रिद्धी सिद्धीच्या साक्षीनं गणरायाचं आगमन… 380 हून अधिकची पंतजोशी चौसोपी वाड्यातल्या गणपतीची परंपरा… उजव्या सोंडेचा या गणरायाचं पारंपारीक वाद्यांच्या गजरात आगमन… मोरगावच्या अष्टविनायकाप्रमाणे या गणपतीचा होतो उत्सव साजरा… अडीज फुट उंचीची दिमाखदार गणरायाची रेखीव मुर्ती…
पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकात सर्व बसेस थांबून आहेत… शिवाजीनगर बस स्थानकातील एसटी कर्मचारी संपात सहभागी… एसटी प्रवाश्यांचे हाल…
काँग्रेस नेते राहुल गांधी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची सभा होणार आहे. राहुल गांधी यांची पहिली सभा काश्मीरमधील अनंतनाग आणि दुसरी सभा जम्मूतील सांगलदानमध्ये होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्र निवडणूक लढवत आहेत. पहिल्या टप्प्यासाठी 59 जगांवर मतदान होणार असून काँग्रेस त्यातील 9 जागा लढवत आहे. पहिल्या टप्प्यासाठी 18 सप्टेंबरला मतदान होत आहे. 10 वर्षांनी जम्मू काश्मीरमधे निवडणुक होत असल्याने राहुल गांधी काय बोलणार याची उत्सुकता आहे.
खेड आणि दापोली एसटी डेपो वगळता रत्नागिरी जिल्ह्यातील एसटीची वाहतूक सुरू आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना आणण्यासाठी जवळपास दीडशे गाड्या मुंबईसाठी रवाना झाल्या आहेत. लांजा देवरुख आणि राजापूर डेपोतून ग्रामीण एसटीची वाहतूक सुरू आहे. चिपळूण संगमेश्वर मंडणगड आणि गुहागर डेपो मधून देखील एसटीची अंशता वाहतूक सुरू आहे.
बदलापूरमध्ये चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूरकरांनी रस्त्यावर येत आंदोलन केलं. यावर बोलताना बदलापूरमधील लोक आम्ही जमा केले नव्हते. तो लोकांना उद्रेक होता, असं शरद पवार म्हणाले.
महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र येत स्थिर सरकार देणार आहोत. मुख्यमंत्री कोण असेल? यावर आता जाहीर बोलण्याची गरज नाही. निवडून आल्यावर मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवू, असं शरद पवार म्हणाले.
– वनराज आंदेकर खून प्रकरणातील मोठी अपडेट
– या प्रकरणात 13 आरोपींना ताम्हिणी घाटातून अटक
– अटक करण्यात आलेल्या 13 जणांपैकी काही जण अल्पवयीन असल्याची माहिती
– रविवारी रात्री पुण्यातील नाना पेठ येथे वनराज आंदेकर यांचा खून करण्यात आला होता
राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु, संपाचा आजचा दुसरा दिवस
अहमदनगर विभागातील एकूण 377 फेऱ्या रद्द
अहमदनगर विभागातील श्रीरामपूर, शेवगाव, अकोले आणि कोपरगाव डेपोच्या सर्व फेऱ्या बंद
तर पारनेर आणि तारकपूर डेपोतील काही फेऱ्या बंद आहेत मात्र काही प्रमाणात फेऱ्या सुरू
संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे मन परिवर्तन करण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न
मात्र एसटी कर्मचारी संपावर ठाम
आदित्य ठाकरे यांचा आज अतिवृष्टी पहाणे दौरा
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात करणार आदित्य ठाकरे अतिवृष्टीचे पाहणी
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली या पाच जिल्ह्यात करणार पाहणी
सकाळी दहा वाजल्यापासून दौऱ्याला होणार सुरुवात
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आदित्य ठाकरे देणार भेटी
वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता
पैनगंगा नदीवरील बुलढाणा जिल्ह्यातील पेन टाकळी धरण 82 टक्क्यांहून अधिक भरलं
धरणात पाण्याची आवक मोठया प्रमाणात होत असल्यानं धरणाचे 3 वक्रद्वार 15 सेंटिमीटरने उघडून नदीपात्रात 1584 क्यूसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग
वाशिम जिल्ह्यातील पैन गंगा नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने रिसोड आणि वाशिम तालुक्यातील नदी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना
– पुण्यातील तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार
– शहरातील अनेक मेट्रो स्थानकांच्या नावाला आक्षेप घेण्यात आला आहे.
– शहरातील काही मेट्रो स्थानकांची नावे बदलण्याची मागणी,
– बुधवार पेठ, मंगळवार पेठ आणि नाशिक फाटा या स्थानकांची नावं बदलण्यात येणार,
– पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
– भाजप नेत्या पंकजा मुंडे आज पुणे दौऱ्यावर
– पंकजा मुंडे आज पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार
– पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी
– आढावा घेऊन रिपोर्ट प्रदेश कार्यालयाला सादर करणार
– आढावा बैठकीनंतर पंकजा मुंडे मीडियाशी संवाद साधणार
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णात वाढ
दोन महिन्यांत कल्याण डोंबिवली परिसरात डेंग्यू, मलेरियाचे ३८७ रुग्ण
साथरोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने २० हजाराहून अधिक नागरिकांच्या रक्ताची केली तपासणी
संशयित रुग्णांवर तात्काळ उपचार सुरु