Maharashtra Breaking News LIVE : ऐन गणेशोत्सवात राज्य परिवहन (एसटी) कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे. एसटी कर्मचारी संघटनेने आजपासून राज्यभर बेमुदत आंदोलनाची हाक दिली आहे. आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा, असा इशारा एसटी कर्मचारी संघटनेने दिला आहे. यामुळे सणासुदीच्या काळात लालपरीला ब्रेक लागणार आहे. तर दुसरीकडे मराठवाडा-विदर्भ या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होत आहे. मुसळधार पावसाने मराठवाड्यातील अनेक भागांना झोडपून काढले आहे. यामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
पंजाबमधील फिरोजपूरमध्ये दोन मोटारसायकलवरून आलेल्या काही तरुणांनी एका कुटुंबाला कारमध्ये घेरले आणि अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत कारमधील एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे.
कोलकाता न्यायालयाने आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना 8 दिवसांच्या सीबीआय कोठडीवर पाठवले आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, रेल्वेला गतिमान आणि सुरक्षित ठेवणाऱ्या ट्रॅकमन बंधूंसाठी ना पदोन्नती आहे ना भावना. भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये ट्रॅकमन हे सर्वात दुर्लक्षित आहेत, मला त्यांना भेटण्याची आणि त्यांच्या समस्या आणि आव्हाने समजून घेण्याची संधी मिळाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 सप्टेंबरला गुजरात दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान दोन दिवस दौऱ्यावर असतील. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा असेल. अहमदाबादच्या GMDC मैदानावरील सभेला संबोधित करतील.
सलमान खान गोळीबार प्रकरणातील जबाबदार असणाऱ्या बिश्नोई टोळीतील 2 आरोपींना जीवाला धोका असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच नवी मुंबईतील तळोजा जेलमध्ये दाऊद गँग चे काही आरोपी शिक्षा भोगत आहेत. यांच्याकडून यांच्या जीवाला धोका आहे, अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे. या प्रकरणी आता नवी मुंबई पोलीस अधिक तपास करीत आहेत.
छत्रपती संभाजी नगरात रास्ता रोको करण्यात आला आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानकडून हा रस्ता रोको करण्यात आला आहे. अचानक रस्ता रोको झाल्याने पोलिसांची धांदल उडाली. मराठवाड्यातील 21 मागण्यांना संदर्भात छत्रपती संभाजी नगरात उपोषणही करण्यात येत आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आणि मराठवाड्याच्या प्रश्नासाठी उपोषण केलं जात आहे. छत्रपती संभाजी नगरातील मुख्य चौक जाम करण्यात आला आहे. चार चाकी लावून मराठवाड्याच्या मागण्यांसाठी रस्ता रोको केला आहे.
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषद उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी बाळाराम पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांना हा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला , बाळाराम पाटील यांनी संसदेत विविध प्रश्नंना वाचा फोडण्याचं आणि आवाज उठवण्याचं काम हे केलं होत. याचीच दखल घेत उत्कृष्ट भाषण पुरस्कार देण्यात आला आहे. पाटील यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
नाशिक शहरातील खड्डे न बुजवल्यास महापालिकेत उपोषणाला बसणार असा इशारा भाजपा आमदार आमदार राहुल ढिकले यांनी दिला आहे.
कृती समिती सोबत उद्या बैठक घेऊ असे सीएमनी सांगितले आहे. आज राष्ट्रपती येणार असल्याने मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही आम्हाला माहीती आहे , मात्र तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार असल्याचे कामगार नेते संदीप शिंदे यांनी म्हटले आहे.
कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली असून आता कांद्याचा भाव पाच हजार रुपयांच्या दिशेने पुढे चालला आहे.भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी नाफेडने एनसीसीएफ मार्फत पाच लाख मॅट्रिक टन कांदा खरेदी केला आहे.
माजी मंत्री अमित देशमुख यांनी केली दुचाकीवर फिरून पूरग्रस्त भागाची पाहणी केली. प्रत्येकी घर 25 हजार रुपये अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेसकडून राज्य सरकारला सविस्तर निवेदन दिले जाणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणावर नदी-नाले काठावरील गावे, शेतीपिकांचे आणि रस्ते, पूल बाधित झाले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने योग्य समन्वय ठेवून तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करावेत. यामध्ये एकही बाधित व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश अल्पसंख्यांक विकास, औकाफ, पणन मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा प्रशासनाला आज दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या क्षणी अतंत्य नम्रपणे माफी मागितली आहे. महाराजांवरील खरं प्रेम त्यातून व्यक्त केलं. काही घटना अशा घडतात, त्यावरून राजकारण करू नये. मात्र मोदींजींनी माफी मागून आदर्श दाखवून दिला, यातून विरोधकांनी प्रेरणा घ्यावी, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथला यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्राची बैठक होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात किती जागा लढवायच्या यावर उद्या चर्चा होणार आहे. उद्याच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीत पश्चिम महाराष्ट्राच्या जागा मागितल्या जाणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , विजय वडेटीवार , बाळासाहेब थोरात , सतेज पाटील , विश्वजीत कदम , प्रणिती शिंदे , पृथ्वीराज चव्हाण , सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहतील.
भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या विविध मागण्यांसाठी भीमा कोरेगाव ते मंत्रालय आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानावर सन्मान मार्चचे दि. १२ सप्टेंबर २०२४ रोजी भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. लाखो भीमसैनिकांनी या सन्मान मार्चमध्ये सहभागी होण्याचे आवाहन भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघाने केले आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या जाहीरनाम्यात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आश्वासन देण्यासाठी सांगणार का? आठ दिवसात या प्रश्नांची उत्तरे न दिल्यास मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात उपोषणाला बसणार असल्याची माहिती बार्शी तालुक्यातील ज्येष्ठ मराठा नेते अण्णासाहेब शिंदे यांनी दिली आहे.
लोकसभेतील हाराकिरीमुळे आता भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळवून घेतलं आहे. लोकसभा निवडणुकीत संघाशी फटकून वागल्याचा फटका बसल्याने विधानसभेसाठी भाजपने संघाबाबत सावध पवित्रा घेतला आहे. दोन्ही संघटनांमध्ये नुकतीच बैठक झाली, त्यात मोठी घडामोड झाली.
एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आता या संपामुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी नगरपालिकेचे कर्मचारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. 29 ऑगस्ट पासून संप सुरू असून तरी मात्र अत्यावश्यकच सेवा सुरू होत्या.
प्रकल्प निवडणुकीच्या आधी आला आता तर त्याचा लोकसभेत या फायदा आधी झाला असता की नाही याचा विचार आम्ही केला नाही, असे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.
मोहोळ तालुक्याच्या हद्दीवर हा ट्रॅक्टर मार्च अडवण्यात आला आहे. मोर्चेकरी आणि पोलिसात तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकत
छगन भुजबळ यांची तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं भाजपच्या नेत्या अमृता पवार म्हणाल्या आहेत. जिल्ह्यातील निधीवर भुजबळांची मक्तेदारी आहे का, असा सवाल अमृता पवार यांनी केला. अमृता पवारदेखील येवला मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी तयारी करत आहेत.
“महिला डॉक्टरचा मृत्यू 9 ऑगस्ट रोजी झाला. घटना घडली त्याचदिवशी मी मृत्यांच्या पालकांशी बोलले. त्यांच्या घरी जाण्यापूर्वी त्यांना ऑडिओ, व्हिडीओ, सीसीटीव्ही फुटेज हे सर्वकाही त्यांना देण्यात आलं होतं. जेणेकरून त्यांना सर्व प्रकरण समजावं. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की मला रविवारपर्यंत वेळ द्या. तोपर्यंत जर मी सर्वांना अटक करू शकले नाही, तर मी सोमवारी केस सीबीआयकडे सोपवेन. पोलिसांनी बारा तासांत मुख्य आरोपीला पकडलं होतं. मी पोलिसांना फास्ट ट्रॅक कोर्टात जाऊन आरोपीसाठी फाशीची शिक्षा मागण्यास सांगितलं होतं. पण केस सीबीआयकडे देण्यात आली”, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विधानसभेत म्हणाल्या.
शिवसेना शिंदे गटाचे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख साईनाथ तारे हे उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाला फटका बसला आहे. मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
धुळे शहरातील पांजरा नदीवरील फरशी पूल पाण्याखाली गेला. काल झालेल्या पावसामुळे पांझरा नदीला पूर आला आहे. आठवडाभरात पांजरा नदीवरील पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. प्रशासनातर्फे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाहतुकीसाठी फरशी पूल प्रशासनातर्फे बंद करण्यात आला.
जळगावच्या जामनेरमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुण वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. एक तरुण जामनेर तालुक्यातील मुंदखेडा गावातील सुर नदीच्या पुरात तर दुसरा तरुण शहापूर गावात खडकी नदीच्या पुरात वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे.
समरजीत घाटगे भाजपामध्ये होते. पण कागलची जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे. तिथून हसन मुश्रीफ यांना उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे समरजीत घाटगे शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवू शकतात.
समरजीत घाडगे यांच्याशी आमच्याशी घरचे संबंध आहे. त्यांचं युवा नेतृत्व आहे, पारदर्शक कारभार केले आह. ते भाजप मध्ये असताना आमची भेट झाली तेव्हाही मी त्यांना म्हणाले की आमच्याकडे या. तो हिरा आहे त्याचे काय करायचे हे आम्हाला माहिती आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. भाजपा नेते असलेले समरजित घाटगे आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात.
जळगाव जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू, संपूर्ण जिल्ह्यात एस. टी.ची चाकं थांबली आहेत. जळगाव जिल्ह्यातील 4200 चे कर्मचारी बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. जळगावच्या बस आगारात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आलं.
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे तसेच थकित भते मिळावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन. एसटीच्या सर्व फेऱ्या बंद झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याला लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. पुतळा पडल्याच्या दिवसापासून आपटे हा फरार आहेत. पोलीस त्याचा शोध घेत असून तो अजूनही सापडलेला नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलिसांनी त्याला लूक आऊट नोटीस बजावली आहे.
जामनेरमध्ये 1 लाख 20 हजार मराठा आहेत. बघतोच गिरीश महाजनकडे. इंगाच दाखवतो, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
आजपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. या संपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एसटी संपावर सकारात्मक तोडगा निघेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या संपाबाबत उद्या बैठक बोलावल्याचंही त्यांनी सांगितलं.
लाडकी बहीण योजनेची कमी वेळात अंमलबजावणी झाली. कमी वेळात आम्ही महिलांच्या खात्यात पैसे जमा केले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशात सर्वत्र डीजिटल व्हायला लागलं आहे. त्यामुळे आम्ही लोकांना जलद सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेची अत्यंत कमी वेळात अंमलबजावणी केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
हिंगोली- गरोदर मातेला खाटेवरून नेत उपचारा साठी दाखल केलं. औद्याला पूर आल्याने जीव धोक्यात घालून नागरिकांनी गरोदर मातेला खाटेवरून उपचारांसाठी नेलं. वसमत तालुक्यातील चोंडी भैरोबा गावातील औद्याला पूर आल्याने अर्ध्या गावचा संपर्क तुटला आहे.
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज संभाजीनगर येथे बंजारा समाज चांगलाच आक्रमक झालाय. शहरातील सिडको चौकात बंजारा समाजाच्या वतीने वडेट्टीवारांच्या फोटोला जोडे मारत बंजारा समाज बांधवांनी आपला निषेध व्यक्त केलाय.
परभणी एसटी बंदला संमिश्र प्रतिसाद. 25% एसटी गावात आहेत. काही कर्मचारी संपावर तर काही कर्तव्यावर. दुपारनंतर आणखी बसेस रस्त्यावर धावताना दिसतील, परिवहन विभागाकडून अंदाज
जो पर्यंत मुख्यमंत्री लेखी आश्वासन देत नाहीत तो पर्यंत माघार नाही. बैठक जरी बोलवली असली तरी आम्ही ठोस निर्णयाची वाट पाहतोय. आम्ही माघार घेणार नाही. पुण्यातील एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांची मागणी
एसटी संपाबाबत मुख्यमंत्र्यांचं ऊदय सामंत यांच्याशी फोनवर झालं बोलणं… १२ वाजता ऊदय सामंत एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांसोबत त्यांचा शासकिय निवासस्थानी घेणार बैठक… गणपती सणाच्या तोंडावर प्रवासाचे हाल होऊ नये म्हणून बैठक बोलावल्याची माहिती…
लासलगाव आगारचे 30 ते 35 चालक-वाहक एसटी कर्मचारी आतापर्यंत राज्यव्यापी संपात सहभागी… लासलगाव बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन…. चांदवड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, सिन्नर, येवला येथील 42 फेऱ्या रद्द… 2800 किलोमीटरचा एसटी बसचा प्रवास ठप्प… अचानक संप सुरू झाल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे हाल…
मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना… लाडक्या उद्योगपतींनी शिवरायांच्या पुतळ्याचा अपमान केला… आमचे शिवसैनिक विमानतळावरील पुतळ्याची सुटका करण्यासाठी गेलेले… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
कल्याणच्या विठ्ठलवाडी आगारातील एसटी कर्मचारी संपावर… गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱ्यांची आगारात गर्दी… एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गावी जाणाऱ्यांचे हाल…
वांद्रे विधानसभेतील दोन महत्वाच्या नेत्यांचा आज रात्री नऊ वाजता शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करणार आहेत. झिशान सिद्दीकी आणि अनिल परब यांच्यासाठी हा धक्का मानला जातोय.माजी नगरसेवक सालिम कुरेशी आणि शिवसेना ठकरे गटाच्या महिला पदाधिकारी आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. वांद्रे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे.
उरण येथील निर्घृण हत्या प्रकरणात कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी मृत यशश्री शिंदेच्या कुटुंबाला कायदेशीर मदत करावी, अशी लेखी मागणी यशश्री शिंदेच्या कुटुंबीयांनी केली आहे. असीम सरोदे यांनी मृत यशश्री शिंदेच्या कुटुंबाला कायदेशीर मदत करण्याची लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे. उरणमध्ये आमच्या मुलीची अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या झाली. अनेक राजकीय नेते भेट देऊन गेले. पण तुम्ही मदत करा, असं यशश्रीच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. यशश्री शिंदे हिच्या कुटुंबियांना कायदेशीर मदत आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घ्यायला असीम सरोदे तयार आहे.
5 तारखेला पुण्यात संभाजीराजे आणि बच्चू कडू यांच्यात बैठक होणार आहे. तिसऱ्या आघाडीची बोलणी आणि चाचपणी सध्या केली जात आहे. विधानसभा निवडणुकीसाठी या आधी दोघांची बैठक मुंबईत पार पडली होती. आता पुण्यात ही बैठक होणार आहे. विधानसभेला पर्याय देण्याच्या विचारात आहेत.
कल्याण विठ्ठलवाडी आगारात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. गणेशोत्सव घ्या दोन दिवसांवर आला असून उत्सवासाठी गावाकडे जाण्यासाठी प्रवाशांची तोबा गर्दी उसळलेली असतानाच कर्मचाऱ्यांनी संप केल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे त्याचबरोबर 2016 पासूनच्या थकीत महागाई भत्ता, घर भाडे भत्ता नक्कीच, व वार्षिक वेतन वाढ करण्यात यावी या मागण्या घेऊन अचानक कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल होतायेत.
श्रीरामपुर / अहमदनगर : लालपरीला ब्रेक, एस.टी कर्मचारी बेमुदत संपावर
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे या मागणीसाठी संप
काल राज्यभर आंदोलने झाल्यानंतर एस.टी कामगार आजपासून बेमुदत संपावर
खाजगीकरण बंदी यासह आठ मागण्यांकरीता एस.टी कामगार संपावर
सरकारने एस.टी कामगारांच्या मागण्यांवर तोडगा न काढल्याने संप
विविध प्रलंबित मागण्यांकरिता एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारला बेमुदत संप
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व डेपो एस.टी कामगारांचा संपात सहभाग
सरकारला अंतिम इशारा देत एस.टी कामगारांनी उपसले संपाचे अस्त्र
एस.टी कामगारांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल
पुणे मेट्रोची प्रवासी संख्या पाच लाखावर, पुणेकरांचा मेट्रो कडे कल वाढला
ऑगस्टमध्ये 36 लाख 65 हजार प्रवासांची मेट्रो सफर
वाहतूक कोंडीत अडकणे ऐवजी मेट्रो ने प्रवास करण्याला पुणेकरांची पसंती
ऑगस्टमध्ये येरवडा स्थानक सुरू झाल्याने मेट्रोच्या प्रवासी संख्येत आणखी वाढ
ऑगस्टमध्ये वनात ते रामवाडी मार्गावर चोवीस लाख प्रवाशांनी प्रवास केला तर पिंपरी चिंचवड ते जिल्हा न्यायालय मार्गावर बारा लाख प्रवाशांनी प्रवास केला
हिंगोली-जिल्ह्यात तब्बल 36 तासानंतर नदी नाल्याचे पूर ओसरायला सुरुवात
घरांच्या पडझड़ीसह शेती पिकांचे प्रचंड नुकसान, जमिनी ही खरडून गेल्या
अनेक शेतकऱ्यांची जनावरे दगावली तर काही पुराच्या पाण्यात वाहुन गेली..
– नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र बाधित
– 25 जनावरांचा मृत्यू, एक जण गेला वाहून
– 93 पैकी 45 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी
– नांदेड शहरात सरासरी 125 मीमी पावसाची नोंद
– बारा तासात अर्धापुर तालुक्यात 170 मिलिमीटर पाऊस
– जिल्ह्यात 30 घरांची पडझड, अनेक ठिकाणी रस्ते खचले
– SDRF च्या तुकडीने 25 जणांची केली सुखरूप सुटका
– आजपासून सुरू होणार प्रशासनाकडून शेत नुकसानीचे पंचनामे.
– पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घेतला ऑनलाईन पद्धतीने आढावा.
– काल रात्रीपासून पावसाची विश्रांती
बदलापूरमधील आंदोलनातील १०५ जणांना जामीन मंजूर
रेल रोको आणि पोलिसांवर दगड फेक करणाऱ्या ५८ जणांना, तर शाळेची तोडफोड करणाच्या आरोपात असलेल्या 47 जणांना कल्याण सत्र न्यायालयाकडून जमीन मंजूर
आंदोलनात अटक झालेल्यांची जामीनावर सुटका
तर या प्रकरणी वकील संघटनांनी आंदोलनकर्त्यांची केस मोफत लढल्याने त्यांच्या कुटुंबियांना ही मोठा दिलासा