Maharashtra Breaking News LIVE 21 September 2024 : भाजप सत्तेवर असल्यावरच वाचाळवीर तयार होतात – सुप्रिया सुळे

| Updated on: Sep 21, 2024 | 12:00 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 21 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 21 September 2024 : भाजप सत्तेवर असल्यावरच वाचाळवीर तयार होतात - सुप्रिया सुळे
Maharashtra Live News
Follow us on

LIVE NEWS & UPDATES

  • 21 Sep 2024 12:00 PM (IST)

    जाती-जातीतील तेढ वाढवली जात आहे – किशोरी पेडणेकर

    जाती-जातीतील तेढ वाढवली जात आहे. तू राहशील किंवा मी राहीन असे तेढ पसरवणारे वक्तव्य भाजप आमदार करत आहेत. मात्र अशी वक्तव्यं न करता गुण्या गोविंदाने राहिलं पाहिजे. धारावी डेव्हलप करायची असेल तर स्थानिकांचं त्याच जागी पुनर्वसन झालं पाहिजे, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

  • 21 Sep 2024 11:50 AM (IST)

    अनधिकृत बांधकाम असेल तर प्रशासन निर्णय घेईल – उदय सामंत

    धारावी येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या सगळ्या प्रकारची माहिती घेतली पाहिजे,  जर अनधिकृत बांधकाम असेल तर प्रशासन निर्णय घेईल असे सामंत यांनी नमूद केले.


  • 21 Sep 2024 11:42 AM (IST)

    सिनेट निवडणूक रद्द झाल्या प्रकरणी युवासेनेचा दाखल करणार याचिका

    सिनेट निवडणूक रद्द झाल्या प्रकरणी युवासेनेच्या वतीने याचिका दाखल करण्यात येणार आहे. ठाकरे गटाची युवासेना कोर्टात याविषयी दाद मागणार आहे. तसेच आज आदित्य ठाकरे युवासेच्या पदाधिकाऱ्यांसोबत यासंबंधित बैठक देखील घेणार आहेत.

    मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यामागचं कारण काय? याबाबत याचिकाकर्त्याकडून प्रश्न विचारले जाणार.

  • 21 Sep 2024 11:35 AM (IST)

    मनसे विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल

    मनसे विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. शिवादादा पुरंदरे या पदाधिकाऱ्यावर अमरावतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्याकडे 2 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

  • 21 Sep 2024 11:12 AM (IST)

    लँड जिहाद आम्ही खपवून घेणार नाही – किरीट सोमय्या

    उद्धव ठाकरेंचं लँड जिहादला समर्थन, आम्ही लँड जिहाद खपवून घेणार नाही, असे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हल्ला चढवला.


  • 21 Sep 2024 11:04 AM (IST)

    भाजप सत्तेवर असल्यावरच वाचाळवीर तयार होतात – सुप्रिया सुळे

    भाजप सत्तेवर असल्यावरच वाचाळवीर तयार होतात. भाजपचे नेते संविधानाच्या विरोधात बोलतात, समाजात तेढ निर्माण होईल अशी भाषण करतात. त्याला हे राज्याचे गृहमंत्री डिफेंड करतात , अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

  • 21 Sep 2024 10:57 AM (IST)

    Maharashtra News: वीज पडल्याने 11 महिला गंभीर जखमी तर एक महिला जागीच दगावली

    गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्याअंतर्गत डार्ली गावात वीज पडल्याने 11 महिला गंभीर जखमी आणि एक महिला जागीच दगावली… शेतीच्या कामासाठी डार्ली गावात 12 महिला गेल्या होत्या. घरी परत येताना वादळ वारा सुरू होऊन वीज कोसळली… सध्या सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे या महिलांवर उपचार सुरू असून दोन महिला गंभीर आहेत…

  • 21 Sep 2024 10:37 AM (IST)

    Maharashtra News: मुंबईतील धारावीत तणावाची स्थिती

    मुंबईतील धारावीत तणावाची स्थिती… बीएमसीच्या वाहनाची तोडफोड केल्याची माहिती… धार्मिक स्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यावरुन वाद… शेकडो नागरिक रस्त्यावर, पोलीस बंदोबस्ट वाढवला…

  • 21 Sep 2024 10:30 AM (IST)

    Maharashtra News: चंद्रपूर-ताडोबा मार्गावरील नवीन सिन्हाळा वसाहतीतून 7 वर्षीय मुलगा बेपत्ता…

    चंद्रपूर-ताडोबा मार्गावरील नवीन सिन्हाळा वसाहतीतून 7 वर्षीय मुलगा बेपत्ता… भावेश जरकर असं बेपत्ता झालेल्या मुलाचं नाव… संध्याकाळी घराच्या मागे फिरत असताना अचानक बेपत्ता झाला मुलगा… दुर्गापूर पोलीस आणि वनविभाग घेत आहे मुलाचा शोध…या भागात आज सकाळी एक बिबट्या दिसल्याने बेपत्ता मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची शक्यता बळावली

  • 21 Sep 2024 10:15 AM (IST)

    Maharashtra News: राजोडी समुद्र किनाऱ्यावर मेघा स्वच्छता दिन साजरा

    वसई विरार महापालिकेच्या वतीने नालासोपाऱ्याच्या राजोडी समुद्र किनाऱ्यावर मेघा स्वच्छता दिन साजरा करण्यात आला आहे… या स्वच्छता मोहिमेत शाळकरी मुलं, सामाजिक संस्था, महापालिका अधिकारी कर्मचारी, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते. सकाळी सात ते 9 वाजेपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून, या मोहिमेत 50 टन पेक्षा जास्त कचरा उचलून 4 किलोमीटरचा समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला आहे… गोळा झालेल्या कचऱ्याचे समुद्र किनाऱ्यावरच प्रक्रिया करून, टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू तयार करण्यात आल्या आहेत…

     

  • 21 Sep 2024 10:04 AM (IST)

    Maharashtra News: राज्यात शिंदेंचं डरपोक सरकार आहे… संजय राऊतांची टीका

    निवडणुका घेण्याची सरकारकडे हिंमत नाही… राज्यात शिंदेंचं डरपोक सरकार आहे… सिनेट निवडणूक दुसऱ्यांदा पुढे ढकलली… सिनेट निवडणुकीत ठाकरे गट ताकदीनं उतरली… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 21 Sep 2024 09:57 AM (IST)

    चंद्रपुरात 7 वर्षीय मुलगा बेपत्ता

    चंद्रपूर-ताडोबा मार्गावरील नवीन सिन्हाळा वसाहतीतून 7 वर्षीय मुलगा बेपत्ता झाला आहे. भावेश जरकर असं बेपत्ता झालेल्या मुलाचं नाव आहे. संध्याकाळी घराच्या मागे फिरत असतांना अचानक मुलगा बेपत्ता झाला आहे. दुर्गापूर पोलीस आणि वनविभाग मुलाचा शोध घेत आहेत.या भागात आज सकाळी एक बिबट दिसल्याने बेपत्ता मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची शक्यता बळावली आहे.

  • 21 Sep 2024 09:45 AM (IST)

    अमित शाह 25 तारखेला नाशिक दौऱ्यावर

    आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. 25 तारखेला अमित शहा नाशिकमध्ये बैठक घेणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील भाजप नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची अमित शाहा नाशिकमध्ये बैठक घेणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील जागावाटप तसेच इतर निवडणुकीच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा होणार आहे. अमित शाह यांच्या या दौऱ्यात एकनाथ खडसे संदर्भात काही निर्णय होतो का याकडे देखील लक्ष असणार आहे. गणपती नंतर एकनाथ खडसे यांच्या संदर्भात निर्णय होईल देवेंद्र फडणवीस यांनी याआधी वक्तव्य केलं होतं. एकनाथ खडसे उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते मानले जातात.

  • 21 Sep 2024 09:30 AM (IST)

    नवरात्र काळात सप्तशृंगी देवी मंदिर 24 तास सुरू राहणार

    नवरात्र काळात नाशिकमधील सप्तशृंगी देवी मंदिर 24 तास सुरू राहणार आहे. 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र उत्सव होणार आहे.  याच कालावधीत मंदिर भाविकांसाठी 24 तास सुरू ठेवण्याचा मंदिर प्रशासनाने निर्णय घेतला आहे. साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ म्हणून सप्तशृंगी देवी मंदिराची ओळख आहे. नवरात्र काळात लाखो भाविक दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर येत असतात. नांदुरी नाका ते सप्तशृंगी गड पर्यंत नवरात्र उत्सक काळात खाजगी वाहतूक देखील बंद ठेवण्याचं निर्णय घेण्यात आला आहे. नांदुरी नाका पासून सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी 100 बसेचची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • 21 Sep 2024 09:15 AM (IST)

    मुलीवर लैंगिक अत्याचार

    गुंगीचे इंजेक्शन देऊन पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. शाळेतील तक्रार पेटीतून हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. नात्यातील एका शाळकरी मुलीला गुंगीचे इंजेक्शन देऊन अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने बंडगार्डन पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. बंडगार्डन पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. आरोपी 21 वर्षीय तरुण मुलीच्या नात्यातील आहे.

  • 21 Sep 2024 08:20 AM (IST)

    Maharashtra News Live : जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज बीड बंदची हाक

    बीड – मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज बीड बंदची हाक

    – मनोज जरांगे पाटील यांचे मागील पाच दिवसापासून उपोषण सुरूय

    – जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली

    – आजचा बंद शांततेत पार पडेल अशा आश्वासन जरांगे समर्थकांनी दिले आहे

    – त्याच पार्श्वभूमीवर आज बीड शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला

    – बीड जिल्हा हा मनोज जरांगे पाटलांचे जन्म गाव असल्याने बीड मधून पहिला बंद पुकारण्यात आलाय

  • 21 Sep 2024 08:19 AM (IST)

    Maharashtra News Live : नाशिकमध्ये ५ हजार लाडक्या बहि‍णींचे अर्ज रद्द

    नाशिक – ५९४५ लाडक्या बहिणींचे अर्ज तात्पुरते रद्द
    – तर कागदपत्रांच्या अपूर्तते अभावी ४५४ अर्ज पूर्णतः नामंजूर
    – नाशिक मनपा कार्यक्षेत्रात ४४८५ अर्ज प्रलंबित
    – लाडक्या बहिणीं’ना बँक खात्याला आधारकार्ड लिंक नसल्याचा फटका
    – योजनेच्या लाभार्थीच्या बैंक खात्याला आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य
    – आधारकार्ड लिंक झाल्यानंतर अर्ज मंजूर करून योजनेची रक्कम खात्यात वर्ग केली जाणार

     

  • 21 Sep 2024 08:17 AM (IST)

    Maharashtra News Live : करमाळा तालुक्यात जोरदार पाऊस, शेतकरी सुखावला

    करमाळा तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात

    जवळपास 1 तासापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू

    अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी

    पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

    पहाटे साडे पाच वाजल्यापासून पाऊस सुरू

    मोठ्या पावसाची होती शेतकऱ्यांना प्रतिक्षा

  • 21 Sep 2024 08:17 AM (IST)

    Maharashtra News Live : प्रसिध्द लेखक, दिग्दर्शक शरद गोरे यांची शरद पवार गटाच्या प्रदेश प्रवक्तेपदी निवड

    – प्रसिध्द लेखक, दिग्दर्शक शरद गोरे यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेश प्रवक्तेपदी निवड

    – शरद गोरे हे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत

    – साहित्य क्षेत्रात गेली तीस वर्षे कार्यरत असून आता ते राजकारणातही कार्यरत झालेत

    – श्री. गोरे हे शरद पवारांचे अत्यंत निकटवर्ती मानले जातात

    – नुकताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला

    – दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेश प्रवक्तेपदाच्या निवडीचे पत्र दिले

  • 21 Sep 2024 08:16 AM (IST)

    Maharashtra News Live : मनोज जरांगेंची प्रकृती खालवली, मध्यारात्री उपचार सुरु

    मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस, कालपासूनच जरांगे यांची प्रकृती खालावली होती.

    यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती, मंत्री शंभूराज देसाई यांच्या विनंतीचा मान राखत घेतले उपचार

    मध्यरात्री पावणेदोन वाजता मनोज जरांगे यांना डॉक्टरांकडून लावण्यात आले सलाईन

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड आणि धाराशिव बंदची हाक देण्यात आली आहे. तर दुसरीकडे मंत्री शंभूराज देसाई यांच्या फोननंतर मनोज जरांगेंनी मध्यरात्री उपचार घेतले. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पुन्हा एकदा स्थागित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून आदेश प्राप्त झाल्याने निवडणूक स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी मोठ्या वेगाने सुरु आहेत. त्यातच सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीलाही सुरुवात झाली आहे. तर आज दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री अतिशी यांचा शपथविधी पार पडणार आहे.